जीवनात येणारा दुःखद बदल अजिबात स्वीकारता येत नसेल तर काय करावे?
मयुरी महेंद्र महाजन
जीवन हे सुख दुःखाच्या वाटेवर कायम झुलणारे असते, ते नेहमीच तसे हेलकावे घेत असते, सर्वांनाच सुखाची अपेक्षा असली, तरी दुःखाच्या प्रसंगानाही तोंड दिल्याशिवाय आयुष्याला गत्यंतर नसते, आणि फुलांच्या पायघड्यांवरुन चालताना काट्यांनाही तुडवत जावे लागते, प्रत्येकवेळी मनासारखे घडेलं, असा आंधळा विश्वास खरे तर आपण लावून धरलेला असतो, आणि जेव्हा फासा मनाविरुद्ध ध्यानीमनी नसताना पडतो, तेव्हा मात्र सर्व होत्याचं नव्हतं होतं,आणि आलेली परिस्थिती स्वीकारायला मनाची तयारी होतचं नाही, कारण आलेलं दुःख पचवणे प्रत्यक्षात मात्र खूप कठीण जाते,
जीवनात येणारा दुःखद बद्दल अजिबात स्वीकारता येत नसेलं तर काय करावे ?तसे तर कोरोना काळात आणि एरवीसुद्धा सुखाने चालणाऱ्या संस्कारांना न जाणो घरातल्या त्या माणसांवर दुःखाचे किती मोठे संकट ओढवले, आणि घरातील कर्ती माणसे आपल्याच माणसाला मधून निघून गेली, व या परिस्थितीचा सामना अशा कितीतरी स्रीया रोजच करत असतील, किंवा पुरुषही याचं परिस्थितीशी लढत असतील, माहिती नाही तो आकडा किती मोठा असेलं,परंतु हे सुद्धा तितकेच खरे आहे की ‘ज्याचे दुःख तोच जाणो’ आपण कोणाचाही दुःख समजू शकतो, पण त्या दुःखाला अनुभव नाही शकतं, यालाच मानसशास्त्रीय भाषेमध्ये ‘तद्नुभूती’ असं म्हटलं जातं ,
दुःखाला फक्त हेच एकमेव कारण असेलं, असे नाही कुणाचे आजारपण ,जवळची व्यक्ती सोडून गेल्याचे दुःख, किंवा इतरही काही ,परंतु जीवनात येणारा दुःखाचा काळ माणसाला बदलायला भाग पाडतो, जगण्याचे सत्य आणि जगण्याचे मर्म जर आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलात, तर आपल्या लक्षात येईल येथे काहीही आपले नव्हते, काही आपले नाही, आणि काहीही आपले असणारं नाही, प्रत्येक गोष्टीची काहीतरी मर्यादा ठरलेली आहे,वेळ ठरलेली आहे, आपणही आलो तसेच कधी ना कधी जाणारचं, मृत्यू हे जगण्यातीलं वास्तव आहे, पण ते स्वीकारता येत नाही, इतकचं,
दुःखद बदल स्वीकारता येत नसतील, तर आपण काय करावे??? जेणेकरून आपणच आपल्या स्वतःला मदत करू शकतो,
एक- जर आपल्या वर्तमानात आपला दुःखाचा काळ असेलं, तर आपण त्यासाठी वेळ द्यायला हवा, कारण वेळेसारखे दुसरे औषध नाही,
दोन- ज्या गोष्टी किंवा वस्तू एखाद्या व्यक्तीच्या आठवणींशी जुळलेल्या असतील आणि त्याच्यामुळे दुःख उफाळून येत असेल ,तर त्या वस्तूंपासून आणि शक्य असेल तर ती जागा सोडून राहावे ,
तीन -दुःख कुठलेही का असेना त्याला विसरण्याचा प्रयत्न नका करू ,हो हे अगदी बरोबर आहे, त्याचे कारण असे आहे की जी गोष्ट विसरण्याचा तुम्ही जितका प्रयत्न करणार ,ती गोष्ट तितकीच लक्षात राहते ,किंवा पुन्हा पुन्हा आठवत राहते , चार-आपल्या आजूबाजूला जी माणसे आपल्याला त्या दुःखाची जाणीव करून देतात, त्यांच्या पासून स्वतःला दूर ठेवा,
पाच- ज्या व्यक्तीला आपण आपले दुःख निसंकोचपणे सांगू शकतो ,अशा व्यक्तीला भेटा, ती व्यक्ती आपल्या दुःखाला आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करेल, ती व्यक्ती तितक्या विश्वासाला पात्र आहे का?? हे बघणेही गरजेचे आहे, ज्या खांद्यावर डोकं ठेवून रडता येत असेल, तेथे मनमोकळेपणाने रडा, रडता येत नसेल, तर आपला एकांत गाठा आणि एकांता सोबत रडून घ्यावं, पण मोकळं व्हावं, ते महत्वाच आहे, पुन्हा आपले डोळे पुसून आपणच तयार व्हावं,
सहा- एखाद्या ठिकाणी भटकंतीला जा ,शक्य असेल, तितके फिरा ,स्वतःला कुठल्या ना कुठल्या कामात व्यस्त ठेवा, सात- निसर्गासोबत वेळ घालवा, शक्य असेल तेव्हा तेव्हा वेळ द्या, निसर्गासोबत मैत्री करा ,झाडे असतील एखादा बगीचा असेल त्याला वेळ द्या,
आठ-तुम्हाला आवडत असतील ती गाणी ऐका, तुम्हाला आवडत असलेल्या गोष्टी करायला घ्या, तुमचे छंद असतील, त्याला वेळ द्या ,
नऊ-एखादी नवीन गोष्ट करण्याचा प्रयत्न करा, मग ते एखादी पाककृती असेल, एखादे कौशल्य असेल, इत्यादी दहा- शेवटी सर्वात महत्त्वाचा मुद्दा ध्यान करा ,स्वतःला काही वेळ निवांत सोडा ,मौन अवस्थेत , जे विचार येतात ,त्याला येऊ द्या, जे जातात त्याला जाऊ द्या, पण आपण आपल्या श्वासाच्या क्रियेवरती ध्यान करून एकाग्र करण्याचा प्रयत्न करूया ,शक्य असल्यास आपण व्यायाम ,योग प्राणायाम करू शकता, यामुळे आपल्याला खूप फायदा होतो,
जीवनात येणारा दुःखाचा बदल स्वीकारणे वाटते तितके सोपे नसते ,कारण मी सांगितले ‘ज्याचे दुःख तोचं जाणो’ परंतु या सर्वांवर रामबाण पद्धतीने चालणारा उपाय म्हणजे वेळ, कारण वेळेसारखे दुसरे औषध नाही, कारण वेळेनुसार प्रत्येक जखम भरून निघतेचं,
एका स्त्रीने ऐन तारुण्यात आलेलं वैधंत्व, आपल्या दुःखाला बाजूला सारून आपल्या मुलांचा प्रश्न तिच्यापुढे उभा होता ,तिने एका छोट्याशा व्यवसायाला सुरुवात केली, दुःख तर होतंच पण त्या दुःखाशी दोन हात करून तिने आपल्या दुःखाला हरवून स्वतःला जिंकले, आणि आज त्या माऊलीने आपला स्वतःचा व्यवसाय वाढवला अशी कितीतरी उदाहरणे आपल्या आजूबाजूला आहेतचं, आपणच ठरवायचे आपण कशात मुडतोय, कारण असे म्हणतात “परिस्थिती हमारे लिए समस्याए नहीं होती ,
समस्या तो तब होती है ,जब हमें ऊनसें निपटना नही आता…”
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
