जीवनात नेहमी दुःखी व्यक्ती तीच असते जी रिकामी असते.
सोनाली जे.
Empty mind is Devil’ s Workshop. रिकामे डोके सैतनाच घर असेच काहीसे म्हणले आहे.
बघा ना आयुष्यात जी व्यक्ती कायम स्वतः ला कशात ना कशात गुंतवून ठेवते , जी पोटासाठी , कुटुंबा करिता काम करून मिळवत असते.शिवाय आपले छंद जोपासत असते. अडीअडचणीला आपल्या लोकांना मदत करत असते. नवीन काही शिकत असते. रात्रीचे झोपेचे काही तास सोडल्यास ती सतत कार्यरत असते अशा व्यक्तीला इतर कोणत्या गोष्टींचे विचार करायला , वेळ फुकट घालविण्यासाठी सुधा वेळ नसतो. ती कायम आनंदी , उत्साही असते. म्हणजे तिला काही त्रास, प्रॉब्लेम्स नसतील का ?? तिच्यावर कधी संकटे येत नसतील का ? असणारच ना ..
पण दुःख झाले तरी त्यावर मात करून त्यातून मार्ग शोधण्याचा , बाहेर पडण्याचा ती यशस्वी प्रयत्न करत असते. तसे जी व्यक्ती रिकामी असते तिला मुळातच काही करण्याची प्रेरणा नसते, जिद्द नसते , किंवा वेळेचे महत्व ही नसते. आपल्याकडे वेळच वेळ आहे , करू काम , आता नाही तरी नंतर करू ..असे म्हणून ती वेळ काढत असते. आणि हातात आलेली चांगली संधी ही अनेकदा गमवून बसते. आणि मग माझेच नशीब फुटके. मीच कमनशिबी. माझ्याच वाट्याला सगळे दुःख असे म्हणून अजूनच निराश होते.
एक साधू महाराज असतात त्यांचा एक शिष्य असाच असतो त्याला वेळेचे महत्व नसते. रिकामपणा मधून वेळच नसतो आणि सतत आपल्या नशिबाला बोल लावून दुःखी होत असे .
एक दिवस साधू महाराज त्या शिष्याला एक काळा दगड देतात. शिष्य म्हणतो हा तर काळा दगडच आहे की, साधू म्हणतात हा परीस आहे यावर तू लोखंड जरी घासले तरी ते सोने होईल. हा दोन दिवस तुला देतो तू त्याचा वापर कर , दोन दिवसांनी मी परत आलो की तो मला संध्याकाळी परत द्यायचा. असे म्हणून साधू महाराज निघून जातात.
तो शिष्य म्हणतो आता हा परीस आपल्याकडे दोन दिवस आहे. भरपूर वेळ आहे आपल्याकडे , आपण भरपूर लोखंड घेवून येवू आणि त्याचे सोने करू आणि ते बाजारात विकू , त्यातून आपल्याला भरपूर पैसे मिळतील , आपण श्रीमंत होवू आपली सगळी दु:ख दूर होतील.
असा विचार करत त्याचा पूर्ण दिवस स्वप्ने बघण्यातच जातो. संध्याकाळी विचार करतो उद्या संध्याकाळी गुरुजी येणार आहेत , उद्या सकाळी लवकर उठून आपण बाजारात जावून लोखंड आणू. दुसरे दिवशी सकाळी उठल्यावर आरामात इकडे तिकडे करत अरे गुरुदेव संध्याकाळी येणार आहेत अजून बराच वेळ आहे असे म्हणून परत थोडे इकडे तिकडे करून वेळ तसाच घालवतो.
मग विचार करतो आता भूक लागली आहे जेवण करून जावू असे म्हणून जेवतो . बरं जेवल्यावर त्याला झोपायची सवय असते. तो झोपतो त्याला एवढी गाढ झोप लागते आणि जेव्हा त्याला जाग येते तेव्हा जवळपास संध्याकाळ व्हायला आलेली असते..तो गडबडीने आवरून लोखंड घेवून येण्याकरीता बाजारात जायला निघतो तोच गुरुदेव समोरून येताना दिसतात. गुरुदेव त्याला म्हणतात दोन दिवस झाले आता संध्याकाळ ही झाली. माझा परीस मला परत दे..
तेव्हा त्या शिष्याला परत जाणीव होते, त्याचे डोळे उघडतात की आपण रिकामपणा मध्ये आपला पूर्ण वेळ घालविला आणि आपल्याला मिळालेली संधी ही घालविली म्हणून परत तो दुःखी होतो.
आपल्याही आयुष्यात बरेचदा असे होत असते की संधीचे सोने करणे तर दूरच पण ती संधी आहे हे समजतच नाही . बिनकामाचे लोक दिवसभरात रिकामपणा मध्ये बिझी असतात. आणि मग या रिकामटेकड्या वेळात बाकीचे कसे नशीबवान , त्यांच्या कडे कसे सगळे आहे, तो किंवा ती किती हुशार आहे. तो / किंवा ती किती मोठ्या अधिकारपदावर आहे , पैसा आहे, किती श्रीमंती आहे , त्याच / तीच सोशल वलय किती मोठे आहे . सगळ्या नातेवाईकांना कसे जपून आहे. मित्र मैत्रिणी कायम सोबत असतात .असे विचार करून ते किती सुखी आणि आपण किती दुःखात असे विचार करत असतो.
पण हे का असे ? तर हे सगळे कमाविण्याकरिता त्या समोरच्या व्यक्तीची दिवसरात्र ची मेहनत असते कष्ट असतात.तो स्वतः ला वेळ देत नाही तेव्हडा तो / ती कामात व्यस्त असते.
अगदी बायकाही तिचे घर कसे स्वच्छ / टापटीप , याकडे बघून जेलस फील करतात पण त्यामागे त्या समोरच्या बाई ची मेहनत असते, स्वच्छता, टापटीप यात सातत्य असते. नुसतेच विचार नसतात ..तर कृती ही असते.
नेहमी समुद्रात वर गोठलेल्या बर्फाचे उदाहरण लक्षात ठेवा. बर्फाचा तुकडा जेवढा वर दिसतो त्याच्या कैकपट पाण्या खाली तो बर्फ असतो.
- तसेच आहे आपण रिकामे राहून नुसतेच विचार करत बसलो असे करू , तसे करू , माझी ही स्वप्ने आहेत , मला हे करायचे आहे , मला डॉक्टर बनायचे , इंजिनियर व्हायचे पण हे नुसते विचार करत बसतो आणि त्यात वेळ घालवतो ..त्यातून कृती काहीच करत नाही ..नुसते बसून विचार हे ही रिकामपण च झाले. आणि ती स्वप्ने पूर्ण झाली नाहीत म्हणून दुःखी होतो.
बरेचदा नको असलेले विचारच करण्यात वेळ वाया जातो. नकारात्मक च वलय vibes निर्माण होतात. आणि निराशा च पदरी पडते.
जीवनात नेहमी दुःखी व्यक्ती तीच असते जी रिकामी असते. जी व्यक्ती काही ध्येय निश्चित करते, आणि त्याकरिता काय करावे लागेल हे ठरवून तसे प्रयत्न करते ती यशस्वी होतेच आणि कायम आनंदी ही राहते.
आम्ही लहान असताना बाबांनी घरात भिंतीवर समोर दोन खूप महत्वाची वाक्य लिहून ठेवली होती. जी रोज सकाळी उठल्यावर आम्ही वाचूनच आणि ती अंगी भिनवून च घेतली. सकाळी लवकर उठत होतो तरी कधी ही उठण्याचा कंटाळा नाही , आळस नाही. कारण हे दोन सुविचार आम्हाला कधी ही आळस काय पण रिकामे ही ठेवू देत नव्हती.
” आळसाने गंजून मरण्यापेक्षा उद्योगाने झिजून मेलेले बरे ” !!
आणि दुसरे
” उद्योगाचे घरी रिध्धी – सिध्दी पाणी भरी ” !!
आयुष्य सुंदर आहे. आनंदी राहण्याकरिता रिकामपणा वर मात करून सतत उद्योगी रहा.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



आपल मानसशास्त्र या पेज वरील सर्वच लेख खूप प्रेरणादायी असतात. मला प्रत्येक लेख वाचताना वाचतच राहावं आस वाटत.
Nice
Nice 👍👌