Skip to content

जितकं सहन करू शकता, तितकंच दुःख वाट्याला येईल!!

जितकं सहन करू शकता, तितकंच दुःख वाट्याला येईल!!


अपर्णा अशोक कुलकर्णी


अस म्हणतात की ८४ योनी जन्म घेतल्यानंतर माणसाचा जन्म मिळतो.माणूस हा प्राणी इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे कारण सगळ्यांना माहीत आहे की माणसाकडे विचार करण्याचं सामर्थ्य आहे.

आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात काही ना काहीतरी अडचण असतेच असते. कधी कोणाला आर्थिक चणचण असते,कोणाला नोकरीची, कोणाला घराची, कोणाला व्यवसायाची,कोणाला लग्न जमत नाही ही अडचण असते,तर ज्यांच लग्न झालंय त्यांना आपण लग्न का केलं असा प्रश्न पडतो,कोणाला मुलं होत नाहीत ही अडचण असते तर कोणाला काय.एकंदरीत काय तर प्रत्येकाला अडचण असते या परिस्थितीत आपण त्या अडचणींना तोंड कसे देतो हे जास्त महत्त्वाचं.

जगणं म्हणल की अडचणी यायच्याच आणि अडचणींना सामोरे जाण्यासाठी संघर्ष ही आलाच.हा संघर्ष प्रत्येकाच्या वाट्याला येतो फक्त प्रमाणकमी जास्त होत इतकंच.अगदी प्राणी, पक्षी याचं जीवन विचारात घेतले तर संघर्ष त्यांनाही करावाच लागतो की.
प्राण्यांना शिकार करण्यासाठी,पक्ष्यांना घरटे बांधण्यासाठी,त्यांच्या पिल्लांना खाऊ घालण्यासाठी.पण ते कधी खचून जात नाहीत त्यांचे अविरत प्रयत्न चालूच असतात.मग मी तर माणसं आहोत.आपल्यालाकडे तर बुध्दी,विचार करण्याची क्षमता, कष्ट करण्यासाठी हात – पाय सगळंच तर आहे.

मग अडचणी आल्या,संघर्ष करावा लागला तर बिघडलं कुठे??हे माझ्याच नशिबी का ?? म्हणून प्रश्न विचारत बसण्यापेक्षा या परिस्थितीवर मात कशी करावी हा विचार करायला हवा आणि परिस्थिवर मात करण्यासाठी शक्ती,सामर्थ्य दे अशी प्रार्थना करायला हवी.
आताच्या या कोविडच्या वातावरणात खूप गोष्टी बदललेल्या आहेत अगदीच मान्य आहे.सगळ्यांसाठीच ही परिस्थिती सांभाळणं कठीण होऊन बसले आहे.अशा वेळी सकारात्मक विचार करणं आणि त्या नुसार वागणं खरंच जमत नाही.पण विश्वास ठेवा हे ही दिवस जातील नक्की च जातील.कोणीतरी म्हणलेलाच आहे ये समय भी बीत जायेगा.प्रत्येक रात्री नंतर दिवस उगवतो च हे जसं ठरलेलं आहे तसच वाईट काळ जाऊन चांगले दिवस येतातच हे ही ठरलेलं आहे.

आपण जितकं सहन करू शकतो तितकेच दुःख आपल्या वाट्याला येत.
आयुष्य जगणं सोप करण्यासाठी काही गोष्टी आपण ही लक्षात ठेवायला हव्यात.

१. आशावादी रहा :

उम्मिद पे दुनिया कायम है. अस म्हणतात ते उगीच नाही.आकाशातून काळे ढग निघून गेल्यावर आकाश किती स्वच्छ निरभ्र वाटत ना.तसेच आपल्या आयुष्यातील सगळे त्रास,कष्ट,अडचणी निघून जातील आणि सगळं स्वच्छ होईल अशी आशा सतत मनात ठेवा.आशेचा किरण कधीच मावळू देऊ नका.ते गाणं आठवत का दिल है छोटासा छोटीसी आशा.

२. सकारात्मक विचार करा :

आपण जसा विचार करतो तशाच घटना आपल्या आयुष्यात घडतात हे १००% खर आहे .मनात कोणत्याही चुकीच्या किंवा वाईट विचारांना थारा देऊ च नका.मनाला सतत चांगल्या गोष्टी सांगत चला.

3. स्वतःला वेळ द्या :

तुमचे छंद जोपासा.जे काही करायचं राहुन गेलं असेल ते करा.नवीन काहीतरी शिकायचं प्रयत्न करा,आवडती गाणी ऐका,संगीत ऐका,सिनेमा बघा, पुस्तकं वाच,फिरायला जा अस काहीही ज्यातून तुम्हाला आनंद मिळेल.

४. योगा करा :

रोज सकाळी उठून श्वसनाचे व्यायाम करा,प्राणायाम करा,मोकळ्या हवेत फिरून या आणि बघा किती ताजतवान वाटत ते.

५. पौष्टिक आहार घ्या :

आपण जे आणि जसं खातो तसे विचार आपल्या मनात येतात.रोज संपूर्ण आहार घेतला,दूध, फळं याचं सेवन केले तर पोट शांत राहील आणि विचार ही सकारात्मक येतील.

६. सगळ्यांवर मनापासून प्रेम करा :

आपण जितकं आणि जे देतो तेच आपल्याला परत मिळतं.जे पेराल तेच उगवेल अस म्हणतात ना.तुम्ही तुमच्या आयुष्यात असलेल्या सगळ्या लोकांना मनापासून प्रेम,आदर, मान,आनंद द्या आणि बघा तुमच्या आयुष्यात हे सगळं तुम्हाला न मागता कसं मिळतं ते.सगळ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करा.जर कोणाच्या सुखाच कारण होता येत नसेल तर निदान दुःखाचं कारण नक्कीच होऊ नका.

७. आनंदाने जगा :

कोणाचं आयुष्य किती आहे हे तर आपल्या कोणालाच माहित नसते.आज च्य कविडच्या परिस्थितीत तर ते जास्तच कठीण होऊन गेलंय. आयुष्य क्षणभंगुर आहे पुढच्या क्षणात काय होणारे काय माहित? मग मनात राग,अहंकार,शत्रुत्व ठेवून का जगायचं.आयुष्यातला प्रत्येक क्षण शेवटचा आहे अस समजून भरभरून जगा अगदी मनापासून.

आणि हो आपल्या माणसांच्या चुका मोठ्या मनाने माफ करा.या जगात परिपूर्ण अस कोणीच नाही.माणसांच्या हातून चुका तर होणारच त्या चुका मनात ठेवण्यापेक्षा त्यांच्या चांगल्या सवयी आठवा आणि सोडून द्यायला शिका.

जगणं खुप सुंदर होईल.हे जग खूप सुंदर आहे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदला आणि जगण्याची मजा घ्या.


Online Counseling साठी !

क्लिक करा


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!