जिच्या आनंदासाठी आपण काहीही करू शकतो, तीच व्यक्ती जेव्हा आपल्या नैराश्याचं कारण होते..
मयुरी महेंद्र महाजन
पुणे
तसं पाहिलं, तर प्रत्येकाला आपल्या जीवनात आनंद हवा, सुख व परस्पर नात्यांमध्ये एकमेकांप्रती प्रेमाचे सलोख्याचे बंध असावे, असे वाटत असते, त्यामध्ये काही खास जिव्हाळ्याची व्यक्ती, मग त्यात आई-वडील असतील, बहीण असेल, मैत्रिणी -मित्र असेल, किंवा ज्यांना आपण जन्माला घालतो, ती पोटची मुलं -मुली असतील ,जीवापलीकडे जपलेल्या या नात्यांमध्ये कुणीतरी अगदी मनाला स्पर्श करणारं असते, आणि त्याच्या सुखात आपले सुख आहे ,ज्याच्या दुःखात आपण हळवे होतो ,अशा ठिकाणी आपण आपला जीव ओवाळुन टाकतो, आणि तिच्या आनंदासाठी आपण काही करू शकतो, तीच व्यक्ति जेव्हा आपल्या नैराश्याचं कारण होते,,,,
खरे तर प्रेमाच्या खूप व्याख्या केल्या जातात ,परंतु प्रेमाची व्याख्या करावि इतकी ती मर्यादित नाही ,कारण प्रत्येकाच्या ठायी, प्रत्येकाच्या दृष्टीने प्रेमाची व्याख्या वेग- वेगळी बघायला मिळते, फक्त कुठली मुलगी सुंदर आहे, दिसायला एकदम स्टायलिश आणि बघताक्षणी पसंत पडावी, असे रूप, ती सुंदर आहे, म्हणून कुणी त्या मुलीच्या प्रेमात पडावं हे फक्त आकर्षण असू शकते,
कारण अल्लळ वयाच्या बुद्धीला काही गोष्टी पटत नाही , आपल्या आनंदासाठी स्वतःच्या इच्छा आकांक्षांचा त्याग करते, आणि आपण जसे आहोत त्याच पद्धतीने आपल्याला स्वीकारते, तर या जगात त्या व्यक्तीच्या प्रेमाला तोड नाही ,जी व्यक्ती प्रेमाचा आदर आणि सन्मान करते, त्या व्यक्तीला त्या प्रेमाची किंमत कळते ……
राकेश एक साधारण घरातला मुलगा, कष्ट करणारे आई वडिल,राकेशला शिक्षण पूर्ण करता यावे, यासाठी खस्ता खात होते ,आणि आपल्या कष्टाचे चीज होईल, म्हणून त्याच्या पाठीशी उभे असायचे ,आणि राकेश ला सुद्धा आईवडिलांसाठी काहीतरी करावे हीच मनोमन इच्छा….. कॉलेजमध्ये शिकत असणाऱ्या एका मुलीवरती राकेशचे प्रेम जडले, परंतु तिला सांगण्याची हिंमत होत नव्हती ,कुठेतरी मनामध्ये प्रश्न यायचे ,आपली वाट चुकली का???? आपण ज्या वाटेने जातात ते आपले ठिकाण आहे का????मन काहीतरी वेगळे सांगायचे, आणि मेंदू काहीतरी वेगळेचं….
राकेश आपल्या अभ्यासाकडे लक्ष देवुन होताचं, परंतु राहून राहून विचार डोक्यात यायचे, बोलून मोकळे होऊया ,,,,जे होईल ते होईल ,,,,राकेशने मनातील गोष्ट सांगितली, त्या मुलीची स्वप्न मोठी होती, राकेश मात्र त्यासाठी मात्र नव्हता,राकेशने शब्द दिला मी जोपर्यंत ती पात्रता पूर्ण करत नाही, तोपर्यंत मी तुला लग्नासाठी मागणी घालणार नाही ,,,परंतु तुझा विश्वास आहे का ???माझ्यावर ,तू माझ्यासाठी थांबशील का ????
मुलीने सुद्धा होकारार्थी उत्तर दिले,राकेश झटून अभ्यास करायचा, जिच्यावर प्रेम केलं तिच्या साठी तो जिवाच रान करायचा, अगदी काहीही करायला तयार होता, मनगटाच्या बळावरती चांगली पोस्ट मिळवली, आनंदाचे उधाण होते, आई-वडिलांना गहिवरून गेल्यासारखे झाले ,आमच्या कष्टाचे चिज झाले, हे धन्यता मानावी असे ….जिच्या आनंदासाठी आपण इथपर्यंत आलो ,तीला हे सांगायला हवे त्या मुलीलाही आनंद झाला तिलाही आभाळ ठेंगणे झाले, बोल आता आपण कधी लग्न करायचं, सांग मी आज खूप आनंदी आहे, माझ्या आयुष्याचे टारगेट पूर्ण झालं,,,
लवकरच करूया लग्न, परंतु माझी एक अट आहे, मी तुझ्या आई-वडिलांना सांभाळू शकणार नाही, जर तुला मान्य असेल, तर आपण लग्न करूया,,, राकेशला पायाखालची जमीन सरकली असे वाटले काय बोलतेस तू ,आई वडिलांनी मी मोठं व्हावं हे स्वप्न पाहिलं, मला कितीतरी यातना सहन करुन, ईथपर्यंत आणलं, मला त्यांच्या शिवाय कोणी नाही ग माझं ….
राकेशला आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक कळाली, ज्याला आपण इतका जीव लावतो ,ती व्यक्ती त्या पात्रतेची आहे का???? हे तपासून पाहायला हवे!!!!!! नाती नक्की जोडा, प्रेम नक्की करा, परंतु जेथे आपण आपली भावनिक गुंतवणूक करत आहोत, ती काळजीपूर्वक करा,,,,
हे फक्त उदाहरणादाखल होते, प्रत्येकाच्यथ बाबतीत उदाहरण लागू होईल ,असे नाही ,कारण पदरी येणाऱ्या या नैराश्याचा सर्वात जास्त त्रास आपल्यालाच होतो ,त्यामुळे आपण जर आधीच सावध होऊ शकलो, तर उत्तम, नवरा असो की बायको, समजून घेण्याची क्रिया दोघांकडून व्हायला हवी, अन्यथा एक व्यक्ती फक्त समजून घेत असणार, तर तो त्यासोबत स्वतःच्या अस्तित्वाला रोज थोडं थोडं आपल्यात मारत जातो,
कारण आपल्या नैराश्याचं कारण जेव्हा आपली जवळची व्यक्तीचं असते, तेव्हा त्या व्यक्तीपेक्षा जास्त स्वतःचा राग वाटायला लागतो, म्हणून कोणी आपल्यावर जीवापलीकडे प्रेम करत असेल, तर त्याची कदर करा, अन्यथा त्या व्यक्तीला गमावून आपण आपलेच नुकसान करून घेणार, आणि हो जी व्यक्ती आपल्या आनंदासाठी काहीही करू शकते, त्यांच्या नैराश्याचं कारण आपण होणार नाही याची आपण काळजी घेऊ या …..!!!!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



सुंदर लेख
सुंदर लेख !