जिंकणारे जिंकण्यासाठी खूप वेळा अगोदर हरलेले असतात.
सोनाली जे
बचेंगे तो और भी लडेंगे !! सकारात्मक विचार काय दर्शवितो ? वाचलो तर अजून परत लढेन .. म्हणजे जिंकणे काय हो सहज जमेल , हरलो तरी जिंकण्याकरिता परत प्रयत्न करावे लागतील. धडपड करावी लागेल. Plans करावे लागतील , नवीन मार्ग शोधावे लागतील . का हरलो याची कारणे शोधावी लागतील .
” खोकर पाने का मजा ही कूछ और है ! रोकर मुस्कुराने का मजा ही कुछ और है ! हार तो जिंदगी का हिस्सा है ! दोस्तों क्योंकी हार कर जीत जाने का मजा ही कुछ और है !”
हावर्ड यूनिवर्सिटी मधले विख्यात साइंटिस्ट कर्ट रिचट्टर यांनी 1950 मध्ये उंदरांवर एक प्रयोग केला होता. कर्ट यांनी एक काचेचा जार घेतला तो पूर्ण भरून त्यात पाणी भरले. आणि त्यात एक जिवंत उंदीर सोडला. उंदीर एकदम पाण्यात पडल्यावर गडबडला. आणि त्याचे पूर्ण प्रयत्न करून , पूर्ण ताकदीने त्याने त्या जारच्या वरच्या. बाजूच्या तोंडाकडे जाण्याचा आणि बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्यानंतर पंधरा मिनिटांनी त्याने आशा सोडली. आणि त्याचे प्रयत्न हळूहळू कमी होत गेले आणि त्या पाण्याने भरलेल्या जार मध्ये बुडून गेला त्याचे प्राण गेले.
कर्ट यांनी परत काही वेळाने एक प्रयोग केला त्यात. पूर्वीसारखा जार पाण्याने पूर्ण भरला आणि दुसरा उंदीर त्या पाण्यात सोडला. तोही उंदीर गोंधळला . हात पाय मारू लागला. बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागला , पण पंधरा मिनिटं झाल्यावर त्यानेही आशा सोडली. हात पाय हलविणे बंद होवू लागले . तो बुडायला लागला तेव्हा कर्ट यांनी पटकन त्या उंदराला पाण्यातून , जार मधून बाहेर काढले . त्याला पुसून कोरडे केले. त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरविला.
थोडा वेळ त्या उंदराला त्या जार मधल्या पाण्या पासून दूरच ठेवले. आणि थोड्या वेळाने परत त्या पाण्यात टाकले . तो उंदीर त्या जार मधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला. पण यावेळी त्या उंदिरा मधला बदल कर्ट यांना जाणविला.
यावेळी तो उंदीर सतत हातपाय हलवून बाहेर येण्याकरीता प्रयत्न करत होता. कर्ट यांना वाटले की पूर्वी प्रमाणे च हा आता पंधरा मिनिटात हा प्रयत्न थांबवणार. पण तो उंदीर त्या जार मधून बाहेर येण्याकरीता प्रयत्न करत राहिला. अर्धा तास झाला , एक तास झाला, दोन तास झाले , तीन तास झाले तरी त्याचे हातपाय हलवून बाहेर पडण्याचे प्रयत्न सुरूच होते. न थकता त्याचे ते प्रयत्न सुरूच होते.
कर्ट यांना खरेच आश्चर्य वाटत होते की पहिला उंदीर पंधरा मिनिटात थकला . त्याने संघर्ष थांबविला. पण हा दुसरा उंदीर साठ तास झाले तरी ही संघर्ष करीत होता. आणि त्या पाण्याच्या जार मधून बाहेर पडण्याचे प्रयत्न त्याने तरीही सुरू ठेवले होते. आणि कोणत्याही परिस्थितीत तो उंदीर हार मानायला तयार नव्हता. शेवटी कर्ट यांनी त्या उंदराला पाण्यातून बाहेर काढले.
कर्ट यांनी त्यांच्या या experiment चे नाव” The Hope Experiment ” ठेवले . Hope म्हणजे आशा.
पहिल्या वेळेस पंधरा मिनिटे प्रयत्न केल्यानंतर हा उंदीर बुडायला लागला , त्याने जार मधल्या पाण्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न , संघर्ष सोडून दिला तेव्हा कर्ट यांनी त्याला शेवटच्या क्षणी पाण्यातून बाहेर काढले. त्याला पुसून कोरडे केले आणि प्रेमाने हात फिरविला होता.
त्या उंदराच्या डोक्यात , मेंदूत ते पक्के झाले होते की आपल्याला आपण मरत असताना मरणाच्या दारातून कोणीतरी वाचविले. आपल्याला वाचविणारे कोणी तरी आहे , त्याच्यामुळे आपल्याला हे नवजीवन मिळाले आहे.
त्यामुळे उंदराच्या मेंदूत “आशेची पालवी फुटली. ज्यातून उंदराला जीवनाविषयी विश्वास , खात्री निर्माण झाली. त्याला खात्री निर्माण झाली की आपल्याला संकटातून वाचविणारे कोणी तरी आहे त्यामुळे त्याची भीती ही नाहीशी झाली. या मागे कारण म्हणजे कोणी तरी प्रसंगी त्याला दिलेली साथ. कोणाचा तरी मदतीचा हात. त्यातून त्याच्यात एक आशा निर्माण झाली होती. संकटाला सामना करण्याची तयारी झाली होती. पहिल्यांदा संघर्ष करून हरलो असताना आशेची , जगण्याची उमिद त्याला कोणी तरी करून दिली होती. ज्यातून खात्री आली होती की संकटे असोत किंवा हार असो आपण त्यातून बाहेर पडणार च.
जीवनात कितीही बिकट परिस्थिती निर्माण होवू देत. अनेक समस्या , संकटे यांचा सामना करायला लागतो , कितीही वेळा विपरीत परिस्थीती ची वेळ येवो . खेळात कधी क्रिकेट मधला सामना असेल , कधी फुटबॉल , कधी हॉकी , तर कधी इतर कोणतेही खेळ असतील पत्ते , टेनिस , यात कधी हार मानावी लागली , कधी व्यवसायात नुकसान होवून निराशा , हार मानण्याची वेळ येवू देत. तर कधी संसारात , तर कधी शालेय प्रगती मध्ये नापास होवून त्याच वर्गात बसण्याची हारच की.
सगळी उम्मिद , सगळ्या आशा संपत आल्या आहेत असे जरी जाणवत असेल तरी. ही कुठे ना कुठे आशा , उम्मिद ठेवा. आशेची किरणेच आपल्याला समस्येतून बाहेर काढतील . स्पर्धा असेल किंवा खेळ मग जीवनाचा असो त्यातून नेटाने , जिद्दीने , हरलो तरी परत परत संघर्ष करण्याकरिता तेवढ्याच उत्साहाने , आशेने तत्परतेने उभे राहू.
काही झाले तरी मनाला हारू देवू नका. जसे संकटात पडलो. हरण्याची परिस्थिती निर्माण झाली तरी लक्षात घ्या ज्याने आपल्याला पाण्यात टाकले त्यानेच बाहेर काढले. परिस्थिती असेल किंवा खेळताना आपल्यातल्या क्षमता कमी पडल्या असतील , परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असेल किंवा नात्यात हार पत्करावी लागली असेल . त्यामुळे हार पत्करून प्रयत्न थांबवू नका. आशा सोडू नका. जरी अंधारातून जात राहिलात तरी कुठे तरी प्रकाशा ची किरणे दिसणारच आहेत. रात्री नंतर दिवस उगविनारच आहे. प्रयत्न आणि आशा सोडू नका.
सचिन तेंडुलकर पहिल्या च मॅच मध्ये जिंकला नाही किंवा सामनावीर ही झाला नाही. तर प्रयत्न , सातत्य आणि आशा या जोरावर अनेक वेळा हरला तरी परत उत्साहाने उभा राहिला. आणि जिंकला ..कधी man of the match , man of the series , best player , captain झाला . हार पत्करून नाराज झाला असता. खेळ थांबवला असता तर जिंकण्याच्या स्वतः आणि दुसऱ्याच्या आनंदाला ही कायमचा मुकला असता.
व. पु. काळे यांनी लिहिले आहे ” स्वतः चे मन जिंकणे हे खरे यश “. निवडणुकीतील हार असो तरी उमेदवार परत परत निवडणुकीला उभे राहुन कधी ना कधी तरी जनतेची मने जिंकतो च ना !! आणि त्यातून निवडणूक ही जिंकतो. पण त्याकरिता अपयश , हार याने निराश न होता , सातत्य , धडपड , आशा ठेवली पाहिजे आणि त्याच सोबत कायम तत्पर आणि जागरूक राहिले पाहिजे. जसे लहानपणीची भरधाव वेगवान धावणारा ससा , आणि हळूहळू संथ गतीने चालणारे कासव. पण ससा निर्धास्त झाला. ओव्हर confident झाला. त्याचे सातत्य टिकविले नाही. स्पर्धेत समोरच्याला कमजोर समजले .
आणि आपल्यात क्षमता असून वापर करू शकला नाही. त्यामुळे संथ गतीने पण सातत्य ठेवून चालणारा कासव , त्याच्या ध्येय पूर्ती वर focus करून होता. सुरुवात केली आहे तर शेवट करायचा हा निर्धार पक्का करून चालला होता. समोरचा आपल्या पेक्षा ताकदवान आहे , चपळ आहे. वेगवान धवणारा आहे या गोष्टीकडे फार महत्व दिले नाही आणि त्याची भीती ही मनात बाळगली नाही .त्यामुळे हळूहळू का होईना हरणार याची खात्री असणारे कासव ही आशेने आणि प्रयत्नाने जिंकले.
The Hope experiment यातून आपण आयुष्यात काय शिकू शकतो तर अनेकवेळा आपण ही अशा समस्ये च्या जार मध्ये , समुद्रात फेकले जातो तर तेव्हा आपल्याला ही समजत नाही की पोहायचे आहे का बुडणार आहोत. कोणी वाचविणारे येईल का ? का नाही ? त्या समस्येच्या जार मध्ये आपल्याला टाकले जाते ना त्यात १५ मिनिटात give up केले तर बुडून जाणार . हार मानणार. पण आपण जर मानली नाही आणि कोणी तरी येईल , हात देईल ही आशा ठेवली , उम्मिद ठेवली तर तो हात देणार मिळेल च . नाही तर स्व बळावर विश्वास ठेवला , स्वतची ताकद वाढवली . प्रयत्न केले . आशा ठेवली. सकारात्मक दृष्टिकोन ठेवला give up केले नाही तर आपण हरणार नाही तर नक्कीच आपली जीत होईल.
आयुष्य सुंदर आहे. जिंकणारे जिंकण्यासाठी खूप वेळा अगोदर हरलेले असतात.हाच आदर्श ठेवा आणि मीच का परत असे न म्हणता अरे वा आपल्याला जिंकण्याची परत परत मिळालेली संधी म्हणून बघा.
नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत उंच उडी मध्ये अगदी शेवटी पाय दुखावला म्हणून स्पर्धा पुढे खेळू शकणार नाही निर्णय दिला तेव्हा दुसराही खेळाडू जो स्पर्धेत होता त्यानेही माघार घेतली आणि शेवटची फेरी खेळली नाही. तरी ही दोघा खेळाडू ना सुवर्णपदक मिळाले. दोघांनी हार न पत्करता खीलाडू वृत्तीने जीत पत्करली ..कधी कधी. दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद ही द्विगुणित होतो.
हार ही हार न मानता जिंकण्या करिता , अजून क्षमता वाढविण्याकरिता मिळालेली संधी समजा.
आयुष्य सुंदर आहे . रडत खडत पुढे जाण्यापेक्षा सगळ्याचा हसत खेळत सामना करा. प्रयत्न करा.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



Khupppp motivated watala wachun….. Khup chan hota lekh…. Thank you so much