Skip to content

जवळचा असो वा नसो..कोणाच्याही व्यक्तिगत आयुष्यात जास्त खोलवर जाऊ नका..

जवळचा असो वा नसो..कोणाच्याही व्यक्तिगत आयुष्यात जास्त खोलवर जाऊ नका..


सौ.मयुरी महेंद्र महाजन

पुणे(चिंतामणी चौक)


मित्रहो,

विषय खूप गहन आहे, परंतु तितकाच मार्मिक सुद्धा कारण प्रत्येक नात्याची आणि प्रत्येक माणसाची आपापली अशी एक स्पेस नक्कीच असते……..

सतीश आणि संजय दोघेही खूप चांगले मित्र असतात, रोज ऑफिसला एकमेकांची भेट होत असते, मग गप्पा कुठल्यातरी विषयावर ती तासनतास चर्चा करणे हे सर्वच होत असायचं , त्यात सतीशला नेहमीची सवय प्रत्येकाबाबत जाणून घेण्याची…..

नव्याने ऑफिसला जॉईन झालेला संजय मात्र शांत आणि आपल्या कामाप्रती प्रामाणिक असून, आहे त्यामध्ये भागवायचा मित्राच्या नात्याने संजयला सतीशच्या कंपनीमध्ये त्याच्या ओळखीने काम मिळाले होते, परंतु सतीशचे काम करण्याचे कसब आणि त्याचा कामाप्रती असलेला विश्वास बघून त्याला बाॅसने सतीशच्या वरची पोस्ट बहाल केली होती,

सतीश आणि संजयची मैत्री कायम असली तरी, कुठेतरी सतीश ला मात्र या गोष्टीची खंत वाटू लागली सतीश संजयला त्याच्या या कामगिरीचे श्रेय वैयक्तिक रित्या कुणाला जाते याबद्दल विचारत असे आणि हळूहळू त्याने त्याच्या आयुष्यात आजवर केलेल्या त्याच्या प्रवासाची खडा न खडा माहिती काढण्याच्या तयारीत असे,

परंतु संजयला मात्र त्याच्या व्यक्तिगत आयुष्याची खोलवर माहिती घेणे पसंत नव्हते, सतीश कधी कधी आपल्या ego ला समाधानी करण्यासाठी संजयशी वादावादी करायचा, सतीश मात्र छोट्या छोट्या गोष्टींवरून सुद्धा त्याच्यावर चिडायचा, त्यात सतीश संजय च्या आयुष्यात डोके खूपसू लागला, त्याला माहिती झाले की तो एका मुलीच्या प्रेमात आहे, सतीश मात्र संजयच्या व्यक्तिगत गोष्टीला सर्वांना मिरची मसाला लावून पुरवत असे,

त्यामुळे संजयची बाकी सर्वांसमोर ची प्रतिमा मात्र बिघडत असे,

मैत्रीसारखी एक सुंदर गोष्ट त्यामध्ये मात्र कटुता आली ,आणि त्या दोघांच्या नात्यात अबोला निर्माण झाला , आणि वाढत जाणारा हा अबोला एके दिवशी गैरसमजामुळे सतीशच्या दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ केल्यामुळे मैत्री सारख्या सुंदर नात्याचा अंत झाला…..!

 

खरं म्हणजे ही एक काल्पनिक रित्या असलेली गोष्ट असली ,तरी आपल्या सर्वांना त्यातून एक धडा नक्कीच मिळतो, नाती-गोती, मित्रपरिवार, समाज, यामध्ये कोणीही आपल्या कितीही जवळचे असले, तरी प्रत्येकाची पर्सनल लाईफ असते, त्यामध्ये आपण जास्त खोलवर जाऊच नये….
काहीजण मित्रपरिवारात बाहेर खूप चांगले वागताना दिसतात, परंतु घरी मात्र अशी लोक फार हुकूमत आणि माझं घर आहे या रुबावात ,मी कुणाला काहीही बोलू शकतो ,सगळ्यांनी माझ्या मनाप्रमाणेच केले पाहिजे….

वास्तविक एक शिस्त असावी, घराला एक वळण असावे, यासाठी काही गोष्टी ठीकच, परंतु त्याचबरोबर हेसुद्धा समजून घेणे गरजेचे आहे, प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने जगण्याचा हक्क आहे फक्त एकच लक्षात ठेवायचं माझ्या जगण्याने कुणाला काही त्रास होईल असे होऊ नये याची काळजी घ्यावी…..

काहीजण नको त्या ठीकाणी बाकिच्यांना सल्ले देताना दिसतात, किंवा त्या व्यक्तीकडून कुठली चूक झाली असेल, तर त्याने असे करायला नको होते ,याबाबत बोलताना दिसतात कोणी जर स्वतःहून आपल्या कडे सल्ला मागायला आले , तर आपले मत मांडावे निर्णय आपण देऊ नये, त्याचा निर्णय त्यालाचं घेऊ द्यावा,

एखाद्याची आपल्याला एकच बाजू माहिती असेल, आणि त्याच्या आयुष्याचा पूर्ण शोध घेतल्यावर जेव्हा नको त्या गोष्टी हाती लागल्या असतील,
तर त्या व्यक्तीच्या आपल्या मनातील प्रतिमेला कुठेतरी तडा जातो……

कदाचित त्या व्यक्तीची त्यावेळेस परिस्थिती तशी असेल , त्यामुळे तसा निर्णय घेतला असेल एका गोष्टीला विविध पैलू असतात, परंतु कुणाच्याही व्यक्तिगत आयुष्यात आयुष्यातले सगळेच धागे माहिती असायला हवेत, याचा अट्टाहास नकोचं…..

कारण की त्या व्यक्तीची स्वतःहून सांगायची इच्छा असेल तर ती व्यक्ती नक्की सांगणार, परंतु आपण जबरदस्तीने काही उकलण्याचा प्रयत्न केला , तरं हाती काही लागत नाही आणि असलेले संबंध सुद्धा दूरावतात…..

त्या व्यक्तीला वेळ हवा असेलं, सांगायचंच नसेल, तर नको त्या गोष्टींचा खोद घेण्यात शहाणपण नाहीचं….,

मनुष्यजन्म म्हटला म्हणजे सगळीच नाती गोती आली, पण एक नातं कायम असतं, आपलं आपल्याशी असलेलं त्यामुळे त्यावर हक्क आपलाच असतो , आणि त्याचे संरक्षण करणे हे सुद्धा आपल्यावरच असते म्हणून..

प्रत्येकाचं प्रत्येकाशी असलेलं नातं जपूया…..
प्रत्येकाचं वैयक्तिक स्वातंत्र्य अबाधित ठेवूया…..

“मत कर झाकाँ -झाँकी मेरे दोस्त ,
बुरी बला है,टाल दो सब…..!””


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!