Skip to content

जडलेल्या वाईट सवयी कायमस्वरूपी सोडण्याच्या मानसशास्त्रीय पद्धती!

जडलेल्या वाईट सवयी कायमस्वरूपी सोडण्याच्या मानसशास्त्रीय पद्धती!


सोनाली जे


प्रत्येक व्यक्ती ही दुसऱ्या व्यक्ती पेक्षा भिन्न आहे. प्रत्येकामध्ये काही चांगल्या आणि काही वाईट सवयी आहेतच . असतात च. ज्याची त्याची जडणघडण ही वेगवेगळी असते.

एखाद्याची सवय ही एखाद्याला चुकीची , वाईट भासते. त्यामुळे त्यावरून टीका म्हणण्यापेक्षा ती सवय सुटण्याकरिता आणि चांगली सवय लावून घेण्याकरिता बरेचदा समोरचा खूप स्पष्ट आणि परखडपणे आपले मत मांडत असतो. काही वेळेस समोरच्या व्यक्तीला आपल्या वाईट सवयी समजत नसतात तेव्हा समोरच्याने शब्दश : टीका नाही पण त्याची जाणीव करून देणे ही गरजेचे असते.

सवय आणि व्यसन या वरवर सारख्याच दिसणाऱ्या गोष्टी पण खरेच दोन्ही सारख्याच आहेत का? सवय :- एखादी क्रिया सतत करत राहणे म्हणजे सवय. प्रयत्नपूर्वक लावलेली सवय ही म्हणजे एखादी गोष्ट सातत्याने करत राहणे म्हणजे ही सवय.

उदाहरण .

* चांगली सवय : – रोज नियमित सकाळी ६ .०० वाजता उठणे. रात्री वेळेत दहा वाजता झोपणे. रोजचा व्यायाम , संध्याकाळी श्लोक पठण, सकाळी वेळेत नाश्ता , दोन्ही वेळा ही वेळेत जेवण , या ही काही चांगल्या सवयीचं. संगीताचा रोज ठराविक तास रियाझ करणे ही सुधा चांगली सवय च झाली.

* वाईट सवय : – सकाळी कधी ही उठणे. रात्री कधी ही झोपणे ही वाईट सवयच झाली. कधी नाश्ता करणे तर कधी नाही. जेवण खाणे याच्या वेळा निश्चित नाहीत. स्वतः चा व्यवसाय असेल तर कधी ही ऑफिस ला जाणे. एक ठराविक वेळ न पाळणे. या ही वाईट सवयी .मोबाईलच्या आधीन होण्याची सवय, व्हिडिओ गेम्स ,

व्यसन :- सवय झालेली एखादी गोष्ट वेळेत न करता आल्यास होणारी , जाणविणारी अस्वस्थता असेल, तडफड असेल ती म्हणजे व्यसन.
उदाहरण : – रोज दारू पिणारा व्यक्ती त्या रोजच्या ठरविक वेळेला त्याला दारू पिण्याची तल्लफ आली आणि ती पूर्ण करता नाही आली तर त्याची तडफड होते. अस्वस्थ होतो.

ज्या अनेक वाईट सवयी आहेत त्या पैकी काही नमूद करते. Obsessive compulsive behaviour..एखादी गोष्ट सतत करत राहणे. त्याच गोष्टीचा विचार मनात येणे. आणि तशी कृती ही करणे.

उदाहरण .. मला स्वच्छता करण्याची सवय आहे. आणि सतत स्वच्छ्ता हाच विचार डोक्यात आणि तशी कृती घडत असते. मग दिवसभरात इकडे तिकडे कुठे हात लावला, किंवा नाही लावला तरी माझे हात खराब झाले आहेत, धूळ लागली आहे . अशा विचारांची सवय आणि त्यातून वीस पंचवीस वेळा हात धुणे याची ही सवय..

ही सवय त्या व्यक्तीच्या दृष्टीने चांगली असेल पण इतरांच्या दृष्टीने त्रासदायक असते. सिगारेट पिण्याची सवय ही वाईटच. सतत चिंता करणे , सकाळी उशिरा उठणे रात्री उशिरा झोपणे ही सवय वाईटच, विद्यार्थी दशेत रोज अभ्यास न करणे ही सवय ही वाईटच. ऑफिस मध्ये आजचे काम उद्या वर ढकलणे ही सुधा वाईट च सवय.

जडलेल्या वाईट सवयी कायमस्वरूपी सोडण्याच्या मानसशास्त्रीय पद्धती!

१. स्वीकार :

मला वाईट सवय आहे . हा मुळात त्या व्यक्ती कडून स्वीकार होणे गरजेचे असते. उदाहरण :- आपला मुलगा रोज अभ्यास करत नाही. ही तक्रार पालकांची असते. मुलाला त्याची ही वाईट सवय आहे हे मुळात लक्षात आले पाहिजे किंवा ते लक्षात आणून दिले पाहिजे. कधी कधी अनुभव ही त्याला सत्याची जाणीव करून देतात.

पण मुळात स्वतः त्या मुलाकडून मला अभ्यासाची सवय नाही ही गोष्ट स्वीकारण्याची त्याची मानसिकता तयार झाली पाहिजे किंवा पालक , counsellor, मित्र मैत्रिणी यांनी ती योग्य पद्धतीने जाणीव करून दिली पाहिजे. आणि या सवयीचे तोटे सांगून ते पटवून दिले पाहिजेत.
आणि ही वाईट सवय आहे हा त्या मुलाकडून मनापासून स्वीकार केला गेला पाहिजे.

२. स्वयंसूचना :

आपण स्वीकार केल्यावर ही गोष्ट , ही सवय वाईट आहे. अशी स्वतः च स्वतः ला सूचना देत राहिले पाहिजे. ही करू नये. जेव्हा कधी ती वाईट सवयीची गोष्ट करावीशी किंवा पुन्हा पुन्हा करावीशी वाटेल तेव्हा तेव्हा स्व मनाला समजवा. त्यावर वेळीच आवर घाला. मनाला निक्षून बजावा. किंवा त्या क्षणी ती गोष्ट टाळण्याचा प्रयत्न करा. थोड्या वेळाने करू .असे म्हणून ती वेळ मारून न्या. परत थोड्या वेळाने असेच करा.

आणि मग एक वेळ अशी येईल की अरे आपण ही गोष्ट केली नाही तरी आपल्या ला काही फरक पडत नाही. आपल्याला त्याची तल्लफ येत नाही.
उदाहरण : सिगारेट ओढण्याची सवय असलेला व्यक्ती , थोड्या थोड्या वेळाने त्याला ती आठवण येते.सिगारेट ओढविशी वाटते अशावेळी थोड्या वेळाने ओढू असे म्हणून ती वेळ टाळा. स्व मनाला समजवा. आवर घाला .

३. ओढ किंवा ती कल :-

एखाद्या व्यसनाची सवय असेल किंवा तेच तेच विचार मनात येत असतील ती ही सवयच .. तर आपले मन इतर गोष्टी करा. जसे सिगारेट च च उदाहरण बघू..सिगारेट पिण्याची इच्छा झाली. ओढवी वाटले तर इतर गोष्टी करा, पाणी प्या, कामात गुंतून रहा, मित्र मैत्रिणी यांच्या सोबत गप्पा मारा. काही आवडीचे पदार्थ खा , कधी घरी असाल तर ते करा आणि खा.

आपल्या व्यसनामुळे होणाऱ्या शारीरिक व्याधी आणि इतर त्रासाची आठवण करून ती ओढ किंवा तो कल नियंत्रित करा.

४. प्रतिसाद :

आपल्याला एखाद्या गोष्टीची सवय लागली तर त्याची ओढ निर्माण होवू नये म्हणून आणि ओढीतून निर्माण होणारा प्रतिसाद निर्माण होवू नये म्हणून ती सहजसाध्य असणारी गोष्ट अवघड करून ठेवा.

उदाहरणार्थ : ठराविक वेळी सिगारेट ओढण्याची सवय आपल्याला ओढ निर्माण करते. पण प्रतिसाद कधी दिला जातो जेव्हा आपल्याकडे सिगारेट आहे तेव्हाच . ते टाळण्यासाठी सिगारेट पाकीट आणुच नका. विकत घेवु नका. जवळ बाळगू नका.

५. समाधान :

सवयी मधून मिळणारे समाधान म्हणून बघण्याऐवजी त्यातून भविष्यात होणारे परिणाम, त्रास , झालेली हानी आणि होणारी हानी किंवा नुकसान याचा विचार करा.

उदाहरण : आज अभ्यास न करणे आवडते, टंगळमंगळ आवडते. आराम करणे आवडते. आज सुख मिळते पण याचा परिणाम म्हणजे आपल्याला कमी मार्क्स मिळतील, नापास होवू. अभ्यास कच्चा आणि मागे पडू त्यात.

६.मनाचा निर्धार :

कोणतीही वाईट सवय कायमस्वरूपी लगेच सुटणे शक्य नाही. त्याकरिता मनाचा निर्धार पक्का करावा.ठाम राहावे आपल्याला ही सवय कायमची सोडायची आहे हे. जसे आपण एखादी गोष्ट साध्य करण्याकरिता , किंवा मोठे goal प्राप्त करण्याकरिता छोटी छोटी goal आधी पूर्ण करतो तसे छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा.

एक गोष्ट इथे आवरजून सांगते. शिवाजी महाराज मध्यंतरी काही काळ खूप बिकट परिस्थिती मधून जात असतात. काय करावे म्हणून मार्ग शोधत असतात. त्यात ते ठरवितात सगळीकडे फिरून एकदा परिस्थितीचा अंदाज घेवू आणि मग पुढचे पावूल उचलू. फिरता फिरता त्यांना खूप भूक लागते , एक झोपडी दिसते तिथे जातात आत एक वयस्क म्हातारी आजी असते तिला सांगतात ते मला काही खायला मिळेल का. ती बरं म्हणून गरम गरम भाताची खिचडी करून ती हंडी च त्यांच्या पुढे ठेवते.

शिवाजी महाराज खूप भुकेले असतात ते त्या गरम खिचडी मध्ये हात घालून खायला सुरुवात करताच तोच त्यांचा हात भाजतो एवढी खिचडी गरम असते. तेव्हा ती वयस्क म्हातारी म्हणते मुला तू पण शिवाजी सारखेच वेडेपणा करतो आहेस. तिला हे ही माहिती नसते की महाराज स्वतः आहेत इथे. तो म्हणतो मी एवढा महान , शूरवीर आणि ही मला का नावे ठेवती.

तो तिला विचारतो काय झाले तेव्हा ती सांगते. तू हंडी मध्ये गरम गरम खिचडी मध्येच एकदम हात घातला हात भाजनार च की. त्याऐवजी कडे कडेने खायला सुरुवात केली असतीस. तर कडेची खिचडी गार , खण्यासारखी होती. शिवाजी महाराज हेच करतात ..मोठे किल्ले सर करण्याच्या विचारात , आधी सहज सोपे छोटे छोटे गड, किल्ले मिळवून आपले राज्य , वर्चस्व स्थापन करण्या पूर्वीच मोठ्या किल्ल्यांना हात घालतात. त्यामुळे संपूर्ण राज्यावर.. किल्ल्यांवर किंवा शत्रू वर वर्चस्व गाजवीत येत नाही.

यातून शिवाजी महाराजांना ही मोठी शिकवण मिळाली, धडा मिळाला की आधी छोट्या गोष्टी पूर्ण कराव्यात. छोटी ध्येय पूर्ण करावीत.

तसेच आपले ही अभ्यास न करण्याची सवय कायम स्वरुपी सोडायची असेल तर आधी छोटी छोटी टार्गेट ठेवा. सगळी पुस्तके एकच दिवसात वाचून होणे शक्य नाही. ताजमहाल एका दिवसात बांधला गेला नाही.

वर्षानुवर्ष सातत्य ठेवून, नवीन गोष्टी शिकून , नावीन्य शोधून त्याचा वापर करून ती कलाकृती च म्हणावी लागेल अशी दुर्मिळ ताजमहाल ची निर्मिती झाली. तसेच आपल्याला अभ्यास न करण्याची वाईट सवय मोडून अभ्यास करण्याची चांगली सवय लागली पाहिजे. याकरिता प्रयत्न केले पाहिजेत.

रोजचे time table तयार केले पाहिजे. प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम लक्षात घेवून , कोणता विषय अवघड जातो त्या करिता जास्त वेळ , सोपा विषय असेल त्याकरिता थोडा वेळ याचे नियोजन केले पाहिजे. आणि केलेले नियोजन रोजचे सातत्य ठेवून अमलात आणले पाहिजे. तर रोजची चांगली सवय, रोज नियमित अभ्यास करण्याची सवय तुम्हाला अभ्यास न करण्याच्या सवयींवर मात करण्यास मदत करेल.

याकरिता मनाचा निर्धार पक्का पाहिजे. मला अभ्यास करून , चांगल्या stream , शाखेची निवड करायची आहे , आणि त्यात यश मिळवून , व्यावसायिक , नोकरी यात यश मिळवून आणि माझ्या आयुष्यात माझे ध्येयप्रप्ती करायची आहे. हे मनाचे निर्धार तुम्हाला चांगल्या सवयी लावतील. आणि वाईट सवयींचा पगडा दूर करतील.

७. योगा , meditation , प्राणायाम, ध्यान धारणा , व्यायाम : motivational videos :

या गोष्टी तुम्हाला वाईट सवयी कायमच्या सुटण्याकरीता उपयोगी पडतात. मनःस्वास्थ्य , शरीर स्वास्थ्य तुम्हाला उत्साहित ठेवते. प्रोत्साहन देते.
योगा आणि इतर गोष्टी Concentration वाढविण्यास मदत करतात. सकारात्मक राहण्यास, प्रोत्साहन मिळण्यास , ध्येय पूर्ती करिता motivational videos मदत करतात.

८.स्व नियंत्रण :

एखादी वाईट सवय सोडविण्यासाठी स्व नियंत्रण जरुरीचे. उदाहरण .. मी स्वतः मोबाईल गेम खेळायचे. वेळे पाई वेळ वाया जायचं. माझी ही वाईट सवय सोडविण्यासाठी मी एक दिवस ठरविले की पूर्ण दिवस , जेवढं पाहिजे तेवढे मनसोक्त , मन भरेपर्यंत आज मोबाईल गेम खेळायचा.

आणि एव्हढे खेळायचे की परत कधी ही मोबाईल गेम खेळायचे नाहीत. मन भरेपर्यंत. आणि दर वेळेस माझ्याच score पेक्ष high score करायचे ध्येय असायचे .ठरविले आज नॉन स्टॉप किती score होईल बघू.. bubble shooter सारखा गेम होता. मी दिवसभर आणि रात्री ही खेळले इतके की माझ्या score होता त्याच्या चौप्पट score केला.

त्यानंतर कधी ही मी मोबाईल गेम खेळले नाही. स्व नियंत्रण. यालाच तर म्हणतात ना. कधी कधी आपल्याला दुसऱ्याच्या आयुष्यात घुसण्याची सवय असते. त्यांच्या सोबत आपण खूप आनंदी असतो पण जेव्हा इतरांना , त्या व्यक्तीच्या जवळच्या ना , आपली ही सवय वाईट आहे हे जाणवत असेल तेव्हा आपण आपली आपल्या आवडत्या व्यक्ती सोबत असण्याची ही सवय सोडू शकत नाही , ती ही व्यक्ती सोडू शकत नाही.. तेव्हा एक तर मनावर नियंत्रण ठेवून या सवयी पासून दूर राहायचे. किंवा मग एकमेकांविषयी इतके negative व्हायचे की परत कधीच तुम्ही आणि ती व्यक्ती जवळ ही येवू ही शकणार नाही. काही वेळेस ते सर्वांच्या फायद्याचे असते.

व्यसन किंवा वाईट सवयी लागत असताना मन आणि बुध्दी दोन्ही ही सुप्त होत असतात. काही वेळेस स्वयं चलित प्रतिक्षप्त क्रिया होत असताना मन सतर्क ठेवून नियंत्रित करता येते. मनाचा ठाम निर्णय घेवून ध्यान धारणा करून वाईट सवयी चांगल्या सवयी मध्ये रुपांतरीत करता येतात.

आयुष्य सुंदर आहे. काय चांगले काय वाईट आहे सवय याची पारख असणे ही गरजेचे असते. इतरांच्या चांगल्या वाईट सवयी यांचा विचार किंवा त्यांची मते लादून घेवू नका.

आपल्या स्वतः ला स्वतः ओळखा , आपल्यातल्या वाईट सवयी या आपणच चांगल्या सवयी लावून कायमच्या सोडवू शकतो. त्याकरिता स्वतः प्रयत्नशील रहा. मनाचा संयम आणि निर्धार करा. इतरांवर अवलंबून राहू नका. आयुष्य सुंदर आहे. रोजच्या जगण्यात मानसशास्त्र तुम्हाला सकारात्मक बनवत असते. त्याची मदत घ्या आणि आयुष्य अजून सुंदर करा.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!