जगायला सुरुवात करा, दुसऱ्यांविषयीची मते बनविणे थांबवा!
टीम आपलं मानसशास्त्र
प्रत्येक दिवस, प्रत्येक मिनिट, प्रत्येक सेकंद इतकेच काय तर अगदी मायक्रो-सेकंद आपण दुसऱ्यांचे मूल्यमापन करीत असतो. जागरूकतेने अथवा बेसावधपणेसुद्धा! त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलत असताना अथवा आपल्याच मनाशी विचार करत असतानासुद्धा आपण दुसऱ्यांचे मूल्यमापन सातत्याने करीत असतो. या मूल्यमापनामध्ये आपले दुसऱ्यांविषयीचे मत हे सुमारे ९९% नकारात्मक आणि टीकाटिप्पणी करणारी असते. अशा प्रकारचा विचार करण्यासाठी आणि तशीच प्रतिक्रिया देण्यासाठी आपला जन्म झाला होता का?.. तर याचे उत्तर ‘नाही ‘ असे आहे.
अनेक वर्षांच्या प्रभावामुळे आपल्या सुप्त मनामध्ये इतर लोकांचे व परिस्थितीचे मूल्यमापन व तुलना करण्याचा विचार आपण नकारात्मकतेने करण्याची सवय लावून घेतलेली आहे. आपण आपल्याच विचारांचे एक पांघरूण अंगावर ओढून घेतो आणि स्वतःलाच एका दृष्टचक्रामध्ये अडकवून टाकतो.
सामान्यतः दुसऱ्यांना दोष देत राहण्याचा मानवी स्वभाव असतो. कोणतीही जबाबदारी घ्यायची आपली तयारी नसते अथवा कोणालाही मदत करण्याची प्रवृत्ती नसते. इतरांचे कौतुक करण्यापेक्षा त्यांच्यावर टीका करण्यात आपण धन्यता मानणारे असतो आणि बहुतेक लोकांना आपण ते जसे समोर येतात तसे समजून घेत असतो.
दुसऱ्यांचे मूल्यमापन करीत राहणे ही अनेक लोकांची रुजलेली अशी सवय आहे. एखाद्याला दुसऱ्याचे मूल्यमापन करावे असे का वाटते? दुसऱ्यांविषयी मत बनवत राहण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्याकडे अधिक गंभीरतेने पाहणे हे जास्त सोयीस्कर नाही का?
आई वडील विभक्त झाल्यामुळे एकाजवळच राहण्याची वेळ एका मुलावर आलेली होती. हे घडले तेव्हा तो खूप लहान होता. लहानग्यापासून तरुण होण्यापर्यंतचा त्याचा पर्यंतचा प्रवास होत असताना कटुता, दाहक स्वभाव आणि उद्धटपणा या जगाला वेळोवेळी सामोरे जावे लागले. घरात आणि बाहेर मित्रांसमवेत त्याला सतत ताणाखाली वावरावे लागले . अशा धोकादायक वातावरणामध्ये कोणताही माणूस अंतर्मुख, बंडखोर आणि कमी वयात प्रौढ झाल्यास नवल ते काय?
आपण ज्या समाजामध्ये राहतो तिथे आपले ताणतणाव आणि आयुष्याची दुसरी काळसर बाजू इतर कोणालाही दिसू नये अशी आपली धडपड असते. व्यक्तिमत्वाचे विविध प्रकारचे गुरखे पांघरता यावेत आणि वर्तणुकीचे प्रकार सोयीने वापरता यावेत यासाठी आपण आपल्या सभोवताली संरक्षित वलय तयार करून ठेवलेले असते.
त्यामुळे त्या तरुण मुलानेदेखील तेच केले. त्याचे वागणे इतरांच्या बाबतीत कमालीचे थंड असे.त्यामुळे स्वाभाविकपणे त्याचे सारे मित्र आणि नातेवाईक त्याची साथ शक्यतो टाळायला बघत.
त्यामुळे त्याचा परिणाम व्हायचा तोच होत गेला. तो अधिकच उद्धट बनला आणि खोटे बोलायलाही सुरवात केली. त्याच्या वागण्यातही नाटकीपणा येऊ लागला आणि तो सगळ्यांमध्ये असताना खोटे हसायचा आणि सार काही आलबेल आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करायचा. परंतु लोक त्याचे नेमके मूल्यमापन करायचे, कारण त्यांना तेच करण्यात सहज आनंद मिळत होता. हा मुलगादेखील दाहक टीकेचा आणि मतांचा बळी ठरला.
कौटुंबिक वातावरणातील दुरावलेपणाचा परिणाम म्हणजे त्या लहान मुलाचे वागणे होते. कळत असो वा नकळत, लोकांनी त्याचे मूल्यमापन करावे आणि त्याच्याविषयी कंड्या पिकवण्यात आनंद मानावा, हे वागणे योग्य होते का ?
जेव्हा आपण दुसऱ्याविषयी बोलू तेव्हा आपल्या बोलण्यामध्ये निर्मळ असे माधुर्य असू द्यावे. आपल्या शब्दांना नम्रतेचा साज असावा. जखमेवर जसे मलम काम करते तशी आपल्या शब्दांची फुंकर असावी. आगीत तेल टाकल्यासारखे आपले शब्द जहरी असू नयेत.
दुसऱ्यांच्या चुका काढून त्याविषयी वाईट बोलण्याऐवजी सर्वांविषयी चांगले बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसऱ्यांविषयी वाईट बोलण्याने विश्वातील इतर कुणाहीपेक्षा स्वतःवरच त्याचा विपरीत परिणाम होतो.
नकारात्मक शब्द आणि विचारांमुळे आपलं शरीर आणि मनाभोवती नकारात्मक वलये तयार होतात. त्यामुळे आपले विचार आणि ऊर्जा या कायम नकारात्मक आणि कमी राहतात. त्यामुळे आपण वैश्विक नियमाचा विसर पडू देऊ नये. तुम्ही इतरांना जे जे द्याल, ते ते तुमच्याकडे फिरून परत येईल. त्यामुळे आपण जर इतरांविषयी चुकीच्या गप्पा मारत असू वा अनावश्यक मूल्यमापन करत असू तर एक दिवस आपणच त्याचे बळी ठरतो.
आपल्या सर्व धार्मिक, परंपरा, महान संत, ऋषीमुनी, अवतार या साऱ्यांनी कायमच एक गोष्टीचा आग्रह धरला आहे. तो म्हणजे इमानी प्रामाणिक रहा, साधे, सत्याधारित असे आयुष्य जगा.’ चुकीच्या सवयींचा प्रभाव आयुष्यावर पडू देऊ नका. खरेतर, कोणतीही गोष्ट पूर्णांशाने योग्य अथवा अयोग्य, सकारात्मक किंवा नकारात्मक, चांगली किंवा वाईट नसते.
प्रत्येक गोष्ट हि प्रत्येक व्यक्तीच्या संदर्भात असते आणि आपण त्या परिस्थितीकडे कसे पाहतो यावर अवलंबून असते. प्रत्येक विषयाचे कप्पे तयार करणे आणि त्याचे गुणानुक्रम ठरवणे हि गोष्ट लोकांमध्ये आणि समाजामध्ये अनेक दशकांपासून प्रभावीपणे रुजलेली असते.
केवळ एका दिवसासाठी, लोकांचे मूल्यमापन न करण्याचे सजग प्रयत्न करून पहा. जर तुमचे विचार तुम्हाला एखाद्या विषयीचे मत बनविण्याच्या दिशेने खोल दरीत घेऊन जात असतील, तर ते मत हे सकारात्मक आणि ठाम असेल असा प्रयत्न करा. संबंधित माणसाला शंकेच्या संधीचा लाभ लाभ मिळेल असे पहा.
हे करायला थोडेसे अवघड वाटेलही, परंतु अशक्य नक्कीच नाही. दिवसाच्या अखेरीस तुम्हाला मन हलके झालेले अनुभवास येईल. मनामध्ये शांतता आणि आनंद निर्माण झालेला असल्याचा सुखद अनुभव येईल.
तुमची ऊर्जा आणि कामाची गुणवत्ता यामध्ये सुधारणा झाल्याचे तुम्हाला जाणवेल. गोष्टी अधिक नेमकेपणाने तुम्हाला समजतील आणि त्या योग्य प्रकारे हाताळताही येतील.
म्हणून जगायला सुरुवात करा. दुसऱ्यांविषयीचे मते बनवणे थांबवा.


