जगण्यासाठी ‘पैसा’ स्वतःकडे कसा ओढायचा? टिप्स वाचूया !
टीम आपलं मानसशास्त्र
हवा आणि पाणी. याप्रमाणे सध्याच्या आयुष्यात ‘पैसा’ हा आपल्या आयुष्याचा आपल्या अस्तित्वाचा अविभाज्य असा भाग बनलेला आहे. आपल्या आयुष्याचा हा मध्यवर्ती भाग बनला आहे. पैसा कमविणे यापकीकडे आपल्यापुढे कोणतेही दुसरे उद्दिष्ट दिसून येत नाही. उत्तम शिक्षण, आरामदायी जीवन आणि आपल्या साऱ्या इच्छा-आकांक्षांची पूर्तता करण्यासाठी आपल्याला सतत पैसा हवा असतो.
हा तर निसर्गाचा नियम आहे, आपण ज्या गोष्टीसाठी अथवा इच्छेसाठी आपली ऊर्जा खर्च करीत असतो, त्यामध्ये आपल्याला यश मिळत जाते आणि हि प्रक्रिया गतिमान होत राहते. एकदा विचार कुंठित झाले कि, आपल्या प्रत्यक्ष आयुष्यातील एक प्रकारचे थांबलेपण येते.
मनात सातत्याने शंकाकुशंका निर्माण होतात, भीती वाटत राहते, विश्वास हरवतो आणि त्याद्वारे आपल्याही नकळत आपण वैश्विक शक्तीला काही भावनिक आंदोलने पाठवत असतो. त्याच्या परिणाम स्वरूप आपणच आपल्याला बांधून घेतल्याचे दिसून येते.
आजच्या जगात लोकांची प्रवृत्ती ‘अजून हवे’ अशी झालेली आहे. त्यांच्या साऱ्या कामांमध्ये आणि नातेसंबंधामध्ये वावरत असताना लोकं आनंद आणि समाधानाच्या टप्प्यावर क्वचितच पोहोचलेले दिसतात. आपल्या साऱ्या इच्छा आणि आकांशा पूर्ण करण्यासाठी अधिकाधिक पैसा कमविण्याच्या मागे लागतात.
अनेकदा आपण याचे मर्यादेची रेषा आपल्याही नकळत पार करून जातो आणि मग पैसे कमविण्याची गरज संपून जाते आणि आपण त्याही पलीकडे जातो आणि न संपणारी पैशाची भूक आणि आणखी मिळवत राहण्याची हाव फक्त उरते.
‘जेव्हा तुम्ही आर्थिकतेने संपन्न असता, तेव्हा केवळ तुमच्या जगण्याचा दर्जा उंचावू नका, तर दुसऱ्याला देण्याचा दर्जा उंचावायला शिका.
हे खरे आहे कि,कष्टांना योग्य असा मोबदला मिळतो. प्रत्येकाला निसर्गाप्रमाणे जितके नेमून दिले आहे तेवढे निश्चितपणे मिळते. मग याचा अर्थ असा आहे का कि, एखाद्याने नुसते बसून रहावे आणि त्याच्या ऊर्जेचा वापरच करू नये ??
आणि आपल्या वाटेचे जे काही मिळणार आहे, ते ‘असेल हरी तर देईल खाटल्यावरी’ प्रमाणे निवांत राहावे का ?
तर तसे अजिबात नाही. किंबहुना, प्रत्येकाने आपले ध्येय सध्या करण्यासाठी आणि पैसे कमाविण्यासाठी कष्ट हे तर करायलाच हवेत. काहींना तर विविध प्रकारच्या कष्टांतून प्रवास करावा लागत असतो. तर काहींना त्यांच्या योग्य स्रोतांचा वापर करून कमी प्रयत्नांमध्ये देखील ते सध्या होऊन जाते.
या विश्वातील अनेक गोष्टींप्रमाणेच पैसा हा सुद्धा एक वस्तू आहे आणि वस्तू म्हणजे ऊर्जा. निसर्ग तत्वानुसार कोणतीही ऊर्जा निश्चित किंवा निष्क्रिय स्थितीत नसते. हि ऊर्जा कायम वाहती असते. या विश्वास असणाऱ्या प्रत्येक विश्वातील प्रत्येक वस्तूत कंपनांची जी पुनरावृत्ती होते, त्यातूनच ऊर्जा निर्माण होते.
तुम्ही, मी, निसर्गातील प्रत्येक गोष्टींना कंपने असतात. तिथेच ऊर्जा असते. या उर्जेला आपण कायम प्रवाही ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवायला हवे. त्याच दृष्टीने पैशांची ऊर्जा देखील आपण सातत्याने प्रवाही ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
हा पैसे कायम घट्ट धरून ठेऊन आणि कायम असुरक्षित राहणे ऐवजी तो पैसे सातत्याने प्रवाही कसा राहील हे पाहायला हवे. प्रत्येक माणूस हा दुसऱ्या माणसाशी एका अदृश्य अशा साखळीने बांधलेला असल्याने त्याने पैसा नावाची ऊर्जा सुद्धा एकीकडून दुसरीकडे प्रवाही करायला हवी.
तो जेव्हा आपण जितका घट्ट धरायचा प्रयत्न करू पाहतो, तितका तो हातातून सुटू लागतो किंवा नेमके याच्या उलट देखील घडते. जेव्हाजेव्हा पैसे देण्याची वेळ येईल किंवा दुसऱ्याला काही देण्याची वेळ येईल, तेव्हा आपण आतून आनंदी असायला हवे.
पैशांची घासाघीस करत न बसता त्याचे जे योग्य मूल्य असेल, ते आपण द्यायला हवे. हि ऊर्जा आपल्या जवळ थांबून न राहता ती कायम प्रवाही राहील असा प्रयत्न करायला हवा.
निसर्गाचे एक तत्व आपण प्रथमतः नीट समजून घ्यायला हवे. ते म्हणाले, ‘जे जे तुम्ही द्याल ती गोष्ट फिरून निश्चितपणे पुन्हा तुमच्यापर्यंत येते. परंतु जर तुम्ही तीच गोष्ट धरून ठेवली आणि ती पुढे वाटली नाही (मग ती कोणतीही गोष्ट का असेना) ती क्वचितच परत तुमच्याकडे येते.’
मग याचा अर्थ असा होतो का, कि कोणी आयुष्यात एखादी महत्वाकांक्षा किंवा चांगली इच्छा बाळगूच नये ?
नाही… तसे अजिबात नाही! आयुष्य कोणत्याही योजनेविना, कोणत्याही महत्वाकांक्षेविना जगणे म्हणजे अपंगत्व आल्यासारखीच अवस्था!
आंतरिक शांततेविना केवळ भौतिक वस्तूंची श्रीमंती म्हणजे एखाद्या मोठ्या तलावामध्ये पोहोताना तहान संपल्याची अवस्था असते.
खुल्या मनाने आणि सकारात्मक वृत्तीने जगल्यास पैसा आपोआप आपल्याजवळ येत जातो.


