Skip to content

छोट्या छोट्या गोष्टींच मोठं मोठं टेन्शन….. पण उगाच कशासाठी ?

छोट्या छोट्या गोष्टींच मोठं मोठं टेन्शन…..


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


“टेन्शन” “टेन्शन” “टेन्शन”………..अरे किती टेन्शन घेतो आपण….!!

टेन्शन हा शब्द आपल्याला आता काही नवीन नाही.अगदी रोजच्या जीवनात आपण त्याची एकदा तरी आठवण काढतच असतो.अगदी छोट्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच कोणत्या ना कोणत्या गोष्टीच टेन्शन असतचं.आणि हे टेन्शन कोणत्या गोष्टींच असतं तर….अगदी कोणत्याही गोष्टींच टेन्शन आपण घेतो.म्हणजे एखादी क्षुल्लक गोष्ट असेल तर त्या गोष्टीचही आपण इतकं टेन्शन घेतो न की काही विचारायलाच नको…………!!कसलं टेन्शन नसतं ओ आपल्याला…???

अगदी छोट्या छोट्या गोष्टींच आपण मोठं मोठं टेन्शन घेतो.दिवसाची सुरुवात ते शेवट कधीकधी तर या टेन्शननेच होतो.खाता-पिता , उठता-बसता या टेन्शनभोवतीच आपण घुटमळत असतो.इतकं कसलं टेन्शन घ्यायच एखाद्या गोष्टीच…??? सकाळच्या ब्रशपासून ते रात्रीची लाईट बंद करण्यापर्यंत आपल्याला टेन्शन असतं.एखादी खूप मोठी गोष्ट घडली आहे…आणि तिच टेन्शन आलय.तर ठीक आहे. पण…..आपण तर अगदी क्षुल्लक गोष्टींच टेन्शन घेतो…..

काही रोजच्या जगण्यातील उदाहरण पाहुयात——–

१)
“आज उठायला उशीर झाला,आता ऑफीसला उशीर होईल, आणि उशीर झाला म्हणून बॉसचे बोलणेही खावे लागतील…………आणि बोलणे खाल्ल्यावर तर पूर्ण दिवस खराब जाईल…….” फक्त उठायला उशीर झाला आणि या एका गोष्टीमुळे पूर्ण दिवसाच्या टेन्शनच “Schedule” च आपण ठरवून टाकतो.

२)
“आधीच उशीर झालाय नी मुलांच्या नादात सगळी फोडणी जळाली… आता भाजी कशी लागेल काय माहीत…??नीट लागेल ना…??नाहीतर दुसरी भाजी करायला पटकन…” फोडणी जळाली म्हणून किती ते टेन्शन……!! ठिक आहे चव बदलते , पुन्हा करायच म्हटल तर वेळ आणि साहित्य दोन्ही लागणारच….पण म्हणून या जळालेल्या फोडणीच इतकं टेन्शन घ्यायच का आपण…..???

३)
“ए आई गं…माझी वही सापडत नाहीये.आज शाळेत मला दाखवायची आहे वही.मी कालच लिहून इथे ठेवली होती.पण आत्ता सापडत नाहीये.please please आई गं दे ना शोधून…… मला खूप टेन्शन आलय…एकतर त्या टिचर खूप Strict आहेत….” या एका वहीवरून किती गडबडतात मुलं…किती ते टेन्शन…!!

४)
“किती पाऊस पडतोय…मी जाऊ कशी..??किती तो चिखल वगैरे… माझा व्हाईट ड्रेस पण खराब होईल…आत्ताच यायच होतं का या पावसाला???” किती किती गोंधळतो आपण..किती विचार करतो छोट्या छोट्या गोष्टींचा……

५)
“गहु दळायला द्यायचे होते,थोडच पिठ राहीलय,उद्या परत गुरूवार आहे…गिरण बंद राहणार…आणि अचानक कुणी आलं तर………..???” आपल्या सगळ्यांची लाडकी आई तर किती टेन्शन घेते.

६)
मी विसरलोच, आज वीजबिल भरायचा शेवटचा दिवस होता… आता लाईट कट केली तर घरातले घर डोक्यावर घेतील….असा कसा विसरलो मी…..???

इतकी मोठी गोष्ट नाहीच ओ ही टेन्शन घ्यायला….यासारख्या अजून… जसं की , गाडीतलं पेट्रोल संपलय,उद्या शाळेत मीटिंग आहे..वेळेवर पोहोचायचय….पाहूणे येणार आहेत…घरातल सामान संपत आलय….

पाणी सारख जातय,पाण्यामुळे किती कामं तशीच राहतायेत…आजपण ट्रेन लेट आली , पसारा आवरायचा राहिलाय,कसा दिसतो तो पसारा…कुणी आलं तर काय म्हणेल…???..,आज जरा जास्तच शॉपिंग झाली…वगैरे वगैरे गोष्टींच आपण किती टेन्शन घेतो.या गोष्टी खरच टेन्शन घेण्यासारख्या आहेत का…??अहो या छोट्या छोट्या गोष्टींचच आपण असं इतकं टेन्शन घेत राहिलो तर आपलं कसं होणार….?? या छोट्या गोष्टींचच आपण इतक मोठ काही झाल्यासारखं टेन्शन घेतो…..मग मोठ्या गोष्टींच टेन्शन आल्यावर आपली अवस्था कशी असेल……???

त्याची तीव्रता अगदी टोकाची असेल कदाचित.या छोट्या छोट्या गोष्टींच भलमोठ्ठ…..ओझं डोक्यावर घेऊन आपण फिरत असतो.या गोष्टींचा किती विचार करावा…किती टेन्शन घ्यावं आपल्याला काही एक समजत नाही. एवढस काही झालं तर घे टेन्शन…… दिवस रात्र फक्त टेन्शनमध्येच…..!! छोटासा तो मेंदू… किती ताण आणतो आपण त्याच्यावर… कोणत्याही गोष्टीच उगाचच टेन्शन घेतो.आणि आयुष्यातले अर्धे दिवस तर असेच टेन्शनमध्येच घालवतो.

टेन्शन प्रत्येकालाच असतं.प्रत्येकालाच येतं. पण कोणत्या गोष्टीच टेन्शन घ्यावं हेही आपल्याला समजायला हवं.नाहीतर उगाचच छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून त्यांच एवढ टेन्शन घ्यायच की त्याला काही ताळमेळच नाही.आयुष्यात टेन्शन असतच पण मग या अशा छोट्या छोट्या गोष्टींच आपण मोठ्ठ मोठ्ठ टेन्शन घ्यायला लागलो तर जगायच कसं….??आयुष्यच या टेन्शनभोवती गुंडाळायच का…??

रोजच्या जीवनात असच करत राहीलो तर आपलं खरच खूप अवघड आहे. या छोट्या छोट्या गोष्टींच मोठ मोठ टेन्शन घेत राहीलात तर आयुष्य कधीच “टेन्शन फ्री” वाटणार नाही.थोडासा विरंगुळा असतो आपल्याला पण त्यातही आपण असं बारिक-सारिक गोष्टींच टेन्शन घेत राहिलो तर….जगणं उदास होईल…..”Life is full on tension” असचं वाटत राहील….. कायमच..!!

म्हणून छोट्या छोट्या गोष्टींच मोठ्ठ मोठ्ठ टेन्शन घेऊ नका…आपल्यामुळे दुसरेही टेन्शनमध्ये जातात…त्यांनाही त्रास होतो. त्यामुळे “टेन्शन लेने का नहीं… और टेन्शन देने का भीं नहीं….!! बस् छोटीसी हैं जिंदगी इसे खुल के जिने का…!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!