Skip to content

चूक नसूनही चुकीचे ठरवले जाते, अशा वेळी काय करावं??

चूक नसूनही चुकीचे ठरवले जाते, अशा वेळी काय करावं??


सोनाली जे.


चूक म्हणजे काय ?? अगदी साध्या भाषेत जे बरोबर नसते ते चूक . अभ्यासातले चूक किंवा बरोबर हे कसे ठरते तर जो अभ्यासक्रम असतो त्यानुसार ठरते. ट्रॅफिक नियम हे त्यांच्या नियमानुसार चूक का बरोबर ते ठरतात..तसे चोरी, लुटमार असेल , फसवणूक असेल , बलात्कार अशा प्रकारचे वागणे म्हणजे चुकीचे म्हणजे हा गुन्हा आहे हे कोण ठरविते ? कायदा ठरवितो.

चूक अनेक प्रकाची असू शकते पण हा ग्रुप आपलं मानसशास्त्र , म्हणजे मनाचे शास्त्र किंवा वर्तन ठरविणारे शास्त्र आहे म्हणून आपण वर्तन आणि त्यातून होणाऱ्या चुका याविषयी बघू.

वर्तन हे बरोबर आहे का चूक हे कोण ठरविते ?? आपण ज्या समाजात राहतो तो च समाज आणि खरे तर सगळ्यात जास्त करून आपल्या जवळचे , घरातले , नातेवाईक यांचाच समावेश असतो ना..!!!

अर्थात कसे आहे की कोणत्या समाजात , कोणत्या स्टेटस मध्ये आपण वावरतो त्यावर ही चूक किंवा बरोबर हे ठरविले जाते..जसे की दारु पिणे हे सर्वसामान्यपणे आपण चुकीचे आहे असं मानतो , पण उच्च वर्गीय आहेत त्यांच्यात दारू पिणे , किंवा त्यांच्या पार्टी , celebrations मध्ये दारू पिणे म्हणजे स्टेटस चा विषय आहे..

म्हणजे सर्वसामान्य कुटुंब असतील तर दारू पिऊन आलेला चूक करतो असे होईल ना आणि याउलट उच्च वर्गीय कुटुंबात गेलो, celebrations मध्ये गेलो तिथे त्यांच्या ड्रिंक्स ची पार्टी सुरू असताना तिथे दारू पिणे चुकीचे किंवा पित नाही म्हणणे ही चुकीचे ठरेल ना???
समाजाच्या काही जाती आणि त्यांचे प्रांत आहेत तिथे लग्ना मध्ये आदले दिवशी पूर्ण बॅरल भर भरून दारू पितात आणि येणाऱ्या आमंत्रिकाना ही पाजतात..ही त्यांची प्रथा आहे..ती त्यांच्या दृष्टीने बरोबर पण इतर समाजाच्या , जातीच्या लोकांच्या दृष्टीने चूकच ना.

आपल्या ही बाबतीत बरेचदा असे होते आपले काही चूक नसते, आपण बरोबर च असतो आपल्या दृष्टीने, पण इतरांच्या दृष्टीने आपले चुकलेले असते..आपण चूक असतो.मग आपण काय म्हणतो माझी काही चूक नसूनही मला चुकीचे ठरविले.

आपलं चूक नसताना ही आपल्याला चुकीचं ठरविले तर अशा वेळी काय करावं?? तुम्ही ही तुमच्या दृष्टीने विचार करा. कारण वरती म्हणले तसेच मला एखादी गोष्ट बरोबर वाटेल पण ती तुम्हाला चूक वाटू शकते.

लोकमान्य टिळकांचे शालेय जीवनातले शेंगांच्या टरफलांचे स्पष्टपणे पण विनम्रतेने केलेले विधान ” मी शेंगा खाल्ल्या नाहीत , मी टरफले उचलणार नाही” हे विधान सर्वश्रुत आहे.

पण सर्व साधारणपणे विचार केला तर आपली चूक नसूनही आपले बोलणे , आपले वागणे वेळेनुसार , सोयीनुसार चुकीचे ठरवले जाते, अशा वेळी काय करावं ते बघुयात..

१. स्वाभिमान किंवा आत्मसन्मान जागा ठेवा ..जागा करा..:

पहिली गोष्ट आपण जर खरेच चुकीचे नाही असे जर वाटत असेल तर मग आपल्या मतावर ठाम राहावे…इतर कोणी काय म्हणेल या गोष्टींचा विचार करू नये..त्यांना काय वाटते चूक का बरोबर याला ही मग आपण फारसे महत्त्व देण्याची गरज नाही .आपला आत्मसन्मान अशावेळी तुम्हाला त्यातून बाहेर पडण्यास मदत करेल.

दुसरे म्हणजे आज तुम्हाला माहिती की तुम्ही चूक केली नाही आणि तरी ही इतरांनी चुकीचे ठरविले आणि इतरांच्या समाधानासाठी तुम्ही जर माफी मागितली तरी मग तुमच्या स्वभावाचा ते गैरफायदा घेण्याची शक्यता असते. ते मग कायमच तुम्हाला पडती बाजू घेण्यास भाग पाडतील.. तशीच अपेक्षा ठेवतील तुमच्याकडून, भले तुम्ही तुमच्या दृष्टीने बरोबर असलात तरी, असे होवू नये म्हणून स्वाभिमान जागा ठेवा..जागा करा..त्याकरिता प्रयत्न करा.

स्वाभिमान आणि आत्मसन्मान याच्या बळावर तुम्ही सहजपणे जिंकू शकता..मग लोकांची मने ही.

२. आत्मविश्वास वाढवा :

चूक नसूनही चुकीचे ठरविले जाते तेव्हा आपला आत्मविश्वास कमी होतो ..म्हणून काही ही झाले तरी आत्मविश्वास ढळू देवू नका ..उलट तो वाढविण्याकरिता प्रयत्न करा..motivational videos बघा, मोठ्या लोकांसह चर्चा करा.. मोठ्या लोकांची चरित्र वाचा , पुस्तके वाचन करा ..कारण असे म्हणतात की पुस्तकातून जीवनाकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळतो, वैचारिक प्रगल्भता येते. आत्मविश्वास वाढविण्याकरिता ऑनलाईन व्हिडिओज आहेत ..तसेच योगा , प्राणायाम यातून एक वैचारिक शांती ही मिळते.आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी मदत ही.

३. React करू नका, शांत आणि तटस्थ रहा :

हत्ती चालतो आणि कुत्री भुकंतात भुकंतात आणि गप्प बसतात हा अनुभव लक्षात घेता लोकांना चूक किंवा बरोबर काय म्हणायचे ते म्हणू देत तुम्ही काहीच react करू नका..शांत , तटस्थ रहा. Neutral रहा.

कारण तुम्ही काही ही बोललात अगदी तुम्ही शंभर टक्के बरोबर असलात तरी समोरील व्यक्ती तुम्हाला चूकच मानत असेल तर तुम्ही किती ही , काही ही सांगितले तरी त्यांना ते पटणार नाही.

४. कधी समोरचा व्यक्ती किंवा अनेक व्यक्ती वरील सगळे उपाय करून ही तुम्हीच चूक असे म्हणत असेल तर शांतपणे समोरच्याचे सगळे मुद्दे ऐकून घ्या ..त्याचे बोलणे पूर्ण होवू देत त्यानंतर भांडणं न करता , न रागावता , अतिशय शांतपणे आणि मुद्देसूद रित्या हे पटवून सांगा की तुम्ही कसे चुकीचे नाही आणि तुम्ही कसे बरोबर आहात..आणि समोरच्या नी जे जे मांडले त्याला शांतपणे त्याला समजेल अशाच भाषेत प्रतुत्तर देवून शांत करा.

५. स्वीकार :

जेव्हा तुमची चूक नाही , आणि इतरांकडून तुम्हाला तुमची चूक नसूनही चुकीचे ठरवले जाते, तेव्हा तुम्ही चुकीचे नाही हे सांगण्याचा , सिध्द करण्याचा , दाताच्या कण्या करून ही तुम्ही सांगितले तरी काही ही केले तरी त्याला त्या वेळेला समजू शकत नाही , पटू शकत नाही किंवा तो पटवून घेण्याच्या मनस्थितीत नसतो तेव्हा आहे ह्या परिस्थितीचा स्वीकार करा..आणि तरी ही निराश किंवा हताश होवू नका कारण परिस्थिती ही बदलत असते..आजची परिस्थिती उद्या राहणार नाही यावर विश्वास ठेवून कणखरपणे सामोरे जा..

६. वेळ द्या :

जेव्हा खूप वेळा explainations देवून ही समोरच्या ला त्या क्षणी , त्यावेळी समजत नसते, पटत नसते अशा वेळी त्याला आपली बाजू मांडून विचार करण्याकरिता वेळ द्या..वेळ जाईल तसे त्याला आपली चूक नाही हे लक्षात येईल.

७. दूर जा.

जेव्हा सगळे पर्याय संपतात , आपण आपली बाजू मांडून , शब्द आणि भाषा , उदाहरणे देवून अगदी पुराव्या निशी सिध्द करून , अनेक वेळा पटवून देवून ..अनेक चर्चा करून ही जर ती व्यक्ती किंवा त्या व्यक्ती तुमची चूक नसताना तुम्ही चुकीचे आहात हाच निर्णय देवून रिकामे होतात , तुम्हाला पुढे लक्षात येते की ते आपले ऐकून घेण्याच्या मनस्थितीत ही आता नाहीत आणि तुम्ही तुमचे मुद्दे पटवून सांगून तुमच्या लक्षात येते की हे waste of time आणि waste of energy आहे..तेव्हा काही ही बोलू नका ..

काही ही वाद नको ..काही सांगू ही नका ..शांतपणे तिथून आणि त्यांच्या पासून दूर निघून जा..कारण तुमच्या असण्याने ज्यांना फरक पडत नाही त्यांना तुमच्या नसण्याने ही महत्व कळणार नाही ..किंवा काही वेळेस असेही होईल की तुमच्या दूर जाण्यानंतर त्यांच्या लक्षात त्यांची चूक येवू शकते…

सध्याच्या परिस्थितीत corona महामारी मुळे घरोघरी रुग्णांची संख्या वाढत आहे..पण यात आपल्या सारख्या निष्पाप लोकांची काय चूक आहे ?? तसेच ते डॉक्टर ही जे आपल्या करीता एव्हढे प्रयत्न करत आहेत त्यांची काय चूक आहे ??. त्यांनाही करोना आणि त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणाम यांना सामोरे जावे लागत आहे..

परंतु घरा घरातून आपल्याच लोकांची जी मानसिकता होत वाढीला लागली आहे ती अशी की जो corona ग्रस्त रुग्ण असेल त्याची चूक आहे असेच घरच्यांना वाटते. Corona मुळे वाढणारे आर्थिक खर्च , मनःस्वास्थ्य बिघडणे , घरातल्या इतरांना भीती वाटणे , यातून ही मानसिकता वाढत आहे की , घरातला जो corona positive रुग्ण झाला त्याची चूक आहे.

परंतु त्या रुग्णाच्या दृष्टीने विचार करा ना !! त्याची काय चूक ?? जेवढी गरज तेवढ्यापुरते तो ही बाहेर पडणार ना , ऑफिस करिता , गरजेचे काही घेवून येण्या करिता बाहेर पडावे लागणार ना ., तेवढे तर तो ही कुटुंबा करिता च तर करत होता ना ??? आधीच तो शारीरिक दृष्ट्या त्रास सहन करत आहे , त्यात अजून तो बाहेर पडताना काळजी घेत असून ही घरच्या करिता ज्या गोष्टी आहेत त्या टाळू शकत नसताना त्याची चूक म्हणून त्याला घरातले दोष देतात..त्याला चुकीचे ठरवितात..असे आता घरोघरी दिसते आहे..

त्यामुळे corona महामारी वर जेव्हा कायमची मात करणे शक्य होईल तेव्हाच रुग्ण संख्या ही आटोक्यात येईल आणि घरचे आपल्याच लोकांना चुकीचे समजणार नाहीत..थोडक्यात वेळ हेच सर्व काही ठीक करेल.

आपल्या आजूबाजूचे लोक कधी कधी आपल्याला चुकीचे ठरवतील पण त्यावर तुम्ही मात्र आत्मपरीक्षण करा..नाण्याच्या सर्व बाजूंनी विचार करा..अगदी थ्री डी इमेज जशी बघतो तसे सर्व पैलू परत परत बघा..विचार करा आणि तेव्हाची परिस्थिती याचा ही जरूर बारकाईने विचार करा…CID सारखे समोरील व्यक्तीच्या अनुषंगाने काय घडले असेल, काय विचार केले असतील आणि प्रत्यक्ष काय याचा ताळमेळ तुम्ही मात्र तुमच्या बाजूने पक्का करा..सर्वांगीण विचार करण्याची तुमची क्षमता वाढवा..इतकेच काय त्यांच्या जागी तुम्ही असतात तर काय विचार केले असते हे सुध्दा तपासून बघा..

त्यातूनच तुम्हाला परिस्थिती ची अनुभूती येईल की व्यक्ती , विश्वास , काळ , स्थल आणि वातावरण , विचार , वर्तन, मन आणि त्याची मानसिकता याचा प्रभाव आपल्या मत निर्मिती मध्ये किती महत्वाचा असतो.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!