चिडचिडे प्रसंगात शांत राहणं म्हणजेच आपला ‘लॉजिकल मेंदू’ चा पुरेपूर वापर करणं.
टीम आपलं मानसशास्त्र
खूप गहन विषय आहे. खरेच चिडचिडे प्रसंगात शांत राहता येते का ?? म्हणणे सोपे असते चिडू नको .. शांत रहा. प्रत्यक्षात मात्र खूप अवघड असते. पण आपण ‘लॉजिकल मेंदू’ चा पुरेपूर वापर करून चिडचिड होणाऱ्या प्रसंगातून शांत राहून होणारे पुढचे परिणाम नक्की टाळू शकतो.
आता कसे ? पडला ना हा प्रश्न?? एकीकडे म्हणले आहे की चिडचिड करू नका सांगणे सोपे असते. शांत रहा सांगणे सोपे असते पण प्रत्यक्षात अवघड आणि दुसरीकडे चिडचिड प्रसंगात शांत राहणे केवळ लॉजिकल मेंदू चा वापर करून शक्य आहे. कसे बरे ?
मानवी क्षमता ज्या आहेत त्यात thinking म्हणजे विचार क्षमता , समजणे , चिंतन , प्रोब्लेम solving – समस्या निवारण क्षमता, तार्किक म्हणजेच लॉजिकल क्षमता या सर्वांचा समावेश आपल्या cognitive capacity – संज्ञानिक क्षमते संदर्भात अभ्यासल्या जाणाऱ्या मानसिक विकासाचा भाग आहे. Jin Piget.. जीन पियाजे यांनी ही cognitive theory मांडली. त्यांनी बालकाच्या बुध्दीचा विकास कसा होत जातो याचा अभ्यास केला आणि त्यावर आधारित सिद्धांत , theory मांडली. त्यांनी आपल्या मुलांचा अभ्यास केला.
१. प्रत्येक बालक मुल हे छोटे वैज्ञानिक असते. कारण सुरुवातीला बालक हे काही तरी नवीन गोष्टी शोधत असते. खेळत असताना , तोड फोड करत असताना काही अभ्यास करत असते. काही नवीन गोष्टी शिकत असते. त्यात काही तरी शोध घेत असतात त्यातून त्यांच्या मानसिक बुध्दीचा विकास होत असतो. त्याकरिता बालकाला मोकळीक दिली पाहिजे जिथे तो शोध घेवू शकेल आणि आपल्यातली बुध्दी वाढवू शकेल.
२. पीयाजे यांनी त्यांच्या cognitive theory मध्ये असे मांडले की , बालकाचा मानसशास्त्रीय विकास , बुध्दी चा विकास हा त्याच्या वयानुसार होत असतो. खूप details सांगत नाही. पण संक्षिप्त रुपात सांगायचे तर हे विकास स्टेप बाय स्टेप होत असतात. काही sensory organs through होणारे ,जसे पाच ज्ञानेंद्रिये त्वचा sense , डोळे बघणे , जीभ चव , स्वाद, कान ऐकण्याचे काम तर नाक वास घेण्याचे काम करत असते. बालक सुरुवातीला बोलू शकत नाही .आपले विचार भावना भाषेत व्यक्त करू शकत नाही.
sensory organs through होणारे ,जसे पाच ज्ञानेंद्रिये यांच्या माध्यमातून ते बालक समजत असते. शिकत असते. Reflex actions संपतात.
Goal directed behaviour ..एखादी वस्तू बघितली तर त्याला हात लावून बघणे. अनुभव घेणे .जसे की मेणबत्ती लावली असेल तर तो ती जावून धरेल. ती पेटलेली आहे , त्याने भाजेल हे विचार हात लावल्यावर पक्के होतात. जेव्हा चटका बसतो तेव्हा विचार पक्का होतो की मेणबत्ती ला हात लावू नये त्याने भाजते. पुढे जावून बालक अनुकरण शिकते.
दोन वर्ष ते सात वर्ष हा कालावधी तर्क पूर्व अवस्था मानले जाते या अवस्थेला. या वयात काही विचारले मुलांना तर त्याला काही लॉजिक नसते. तर्क नसतो. या वयात भाषेचा ही विकास होत असतो. त्यानंतर symbolic thoughts निर्माण होतात. जसे लाकडी ठोकळा वापरून घर केले तर त्याला घर हे नाव देणे. एखादे चित्र काढले तर त्याला नाव देणे.
वयाच्या सातव्या वर्षापासून बालक logical reasoning तार्किक क्षमता त्याच्यात निर्माण होतात. गोष्टी समजू लागतात. फरक समजू लागतो. जसे पाण्याचे दोन ग्लास मध्ये समान पाणी भरले. नंतर ग्लास चे size आणि आकार बदलले तरी पाणी दोन्ही मध्ये समान आहे याची ओळख ..तर्क क्षमता वाढते. तसेच transivity , संक्रामिता गुण वाढतो.जसे A>B आणि B > C तर A आणि C मधले मोठे काय. A >C यानंतर बालक , व्यक्ती हळूहळू आपली तार्किक क्षमता वाढवू लागते. जसे १. संरक्षण २ . वर्गीकरण
३. क्रमबद्धता: जसे ग्लास मधले समान पाणी दुसऱ्या कोणत्याही निमुळत्या ग्लास मध्ये भरले , आकार बदलला तरी पाणी तेवढेच राहते. पाण्याची मात्रा बदलत नाही .म्हणजे ते पाणी तेवढेच संरक्षित असते. हे लॉजिक पक्के होते. वर्गीकरण करण्यास शिकतो जसे ड्रॉइंग ची वही आणि गणिताची वही यात फरक ओळखून त्याचे वेगळे वर्गीकरण करतो.
त्यानंतर बालक क्रमबद्धता शिकतो ..जसे वाढता क्रम किंवा घटता क्रम या प्रकारे ठोकळे लावतील .अंक लावतील. त्यानंतर ११ ते १५ या वर्षात बालक अमूर्त विचार करू लागते. जी वस्तू समोर नसते. ज्या गोष्टींना तो हात ही लावू शकत नाही अशा गोष्टींचे विचार मनात येवू लागतात. तार्किक क्षमता वाढीस लागतात.
आता जेव्हा आपण एखाद्या प्रसंगात शांत न राहता चिडचिड करतो .म्हणजे काय होते ? तर आपण , आपला मेंदू जे विचार करत असतात. किंवा तर्क लावत असतात त्यात distortion येते. आणि ते नकारात्मक भावनांना प्रेरणा देतात. ते कसा बघा हुं .
मी एखादी गोष्ट जवळून बघते आहे पण माझ्या डोळ्यात दोष आहे तर ती वस्तू ही मला तशीच faulty दिसणार. तसेच आहे माझ्या मनातले विचार त्यात distortion येते.
१. Polorized thinking
या मध्ये आपण एक गोष्ट गृहीत धरून जात असतो की south आणि नॉर्थ पोल सारखे. एक तर व्यक्ती श्रीमंत आहे किंवा दुसरे टोक म्हणजे एकदम गरीब . म्हणजे गरीब आणि श्रीमंत याच्या मध्ये दुसरे काही असू शकते हा विचारच नसतो. हुशार किंवा माठ विद्यार्थी.
या situation च तोटा म्हणजे आपल्याकडे जे चांगले आहे त्याचा आपण त्या परिस्थिती मध्ये विचारच करू शकत नाही. जरी आपल्या मनासारखे घडले नसले तरी हे नाही याचाच विचार करतो पण माझ्याकडे हे नक्कीच आहे पण आपण याचा विचार करत नाही. आणि आपल्याला तेच पाहिजे होते म्हणून अडून राहतो त्याच्या खालचे काहीच नको असे विचार करतो आणि तसे वागत असतो.
२. Catastrophizing distortion :
शब्दश : अर्थ जगबुडी. सध्याचे राजकीय वातावरण असेल , Covid वातावरण . पण आपण विचारांच्या बाबत म्हणले तर एकदम टोकाचे विचार. याच्या बरोबर आता मला deal करताच येणार नाही असे. उदाहरण : विद्यार्थी परीक्षा अवघड गेली तर आता माझे आयुष्य संपले , करियर संपले असेच गृहीत धरून जातो, आता मी काहीच करू शकणार नाही , माझे आयुष्य खराब झाले . जरी मार्क कमी पडले तरी त्यातून आयुष्य खराब झाले असे म्हणणे चुकीचे .
३. Over generalizations .. एक intence घेवून त्यावरून सगळे analysis बांधणे. म्हणजे एका गोष्टीवरून अनेक गोष्टींचे तर्क करणे. एकदा माझी मैत्रीण उशिरा आली तर ती दरवेळी उशिरा येणार हे माझे तर्क . जसे एखादा नेहमी असाच वागतो .ती नेहमी अशीच वागते . तिला कधीच समजतच नाही हे issue आहेत. एका छोट्या गोष्टीवरून मोठ्या गोष्टींचे conclusion काढतो आपण . राई चा पहाड म्हणतो तसे.
४ . Future predictions :
आपण ज्योतिषी ठरवितो तसे पुढं काय घडणार हे सांगत असतो. आणि तसेच पुढे घडणार असे आपण गृहीत धरून जाती .जसे हा मला माहिती पुढे काय घडणार ते .हे असेच घडणार. जसे paper अवघड गेलेला विद्यार्थी परीक्षेसाठी tensed आहे तो म्हणतो मला माहिती पुढे काय होणार आहे ते मला चांगले मार्क नाही मिळाले. मला माहिती की मी किती पण अभ्यास केला तरी मी पास होणार नाही. मला माहिती की माझा boy friend आता माझ्याबरोबर चीट च करतो आहे.
५ इमोशनल reasoning :
भावनेच्या भरात आपण म्हणत असतो मला हे असे वाटते म्हणजे हेच खरे. समजा मी बाहेर आहे आणि बाहेर एक व्यक्ती समोर दिसली .पण मला वाटले की ती व्यक्ती माझ्याकडे चिडचिड करून बघत आहे. कदाचित तो व्यक्ती इतर काही कारणामुळे चिडला असेल तरी मला असे वाटते की तो माझ्यामुळे चिडला आहे.
चांगली मैत्रीण असेल तिने आपला फोन उचलला नाही तर ती मुद्दाम आपला फोन उचलत नाही. बाकीचे लोक तीच्यकरिता महत्वाचे मी महत्वाची नाही असे विचार सुरू होतात. कारण विचारले तर मला हे असे वाटते. म्हणजे च मला असे वाटते म्हणजे असेच म्हणजे असेच असणार. असा विचार.
६. Magnification .:
आता तुम्ही magnifying glass धरली आणि तुमच्या आयुष्यात काय नाही , काय तुमच्या मनाविरुद्ध आहे त्याच्यावर magnifying glass ने बघत राहिलात तर तेवढीच एक गोष्ट दिसत राहते. सगळ्या भिंतीला सुंदर रंग दिला आहे पण त्यात एक छोटासा डाग आहे आणि मी जार अख्खी भिंत सोडून तो खराब डाग च बघत बसले तर अख्खी भिंत सुंदर रंगसंगती असलेली आहे त्याकडे दुर्लक्ष करून केवळ त्या डागावर focus करणार
७. Minimazation :
magnification मध्येच हे दडलेला आहे. चांगल्या गोष्टींना छोटे करणे. वाईट गोष्टींना मोठे करणे . आता चिडचिड म्हणजे काय ? तर आपल्या मनात काही विचार असतात. आपण आपल्या पद्धतीने काही विचार करत असतो, अपेक्षा करीत असतो , व्यक्ती विषयी आपली काही मतं बनवीत असतो. जेव्हा व्यक्ती , परिस्थिती , वेळ , समोरच्याचे विचार आपल्या विचारांपेक्षा वेगळे असतात, अपेक्षे पेक्षा वेगळे असतात , आणि आपण आपल्या विचारांमध्ये distortion येते. याला कारणे ही वर सांगितलेली जसे की, Polorized thinking , Catastrophizing distortion , Over generalizations ., Future predictions , इमोशनल reasoning , Magnification, Minimazation
यातून मग आपण म्हणू तसेच विचार आपण सतत करत असतो . पण यावर नियंत्रण राहत नाही. चिडचिडे प्रसंगात शांत राहणं म्हणजेच आपला ‘लॉजिकल मेंदू’ चा पुरेपूर वापर कसा करायचा बघुयात.
१. आपल्या विचारांची दिशा ओळखा..
बरेचदा आपण जे तळ्यात तर तळ्यात च मळ्यात तर मळ्यात च असे विचार करतो .मधले अधले काही नसतेच. मला हे असे वाटते म्हणजे असेच . हे तुम्हाला वाटते ते विचार , त्याची दिशा योग्य आहे का हे तपासून बघा. नसेल तर जे योग्य आहे. योग्य दिशा शोधा . सल्ला घ्या. मग शांतपणे आपल्यात बदल घडवून आणा.
२. मला वाटते म्हणून असे.. : Polorized thinking मधुन बाहेर पडा. मला वाटते म्हणून हेच बरोबर यातून बाहेर पडा. इतरांना ही काही वाटत असते. त्यांचे ही काही विचार करा. त्यांची मते समजून घ्या. त्यांचे अनुभव असतात. बरेचदा गणितात पद्धती वेगळ्या असतात. त्या पद्धतीचा ही विचार आपण करत नाही. आणि आपलेच बरोबर म्हणून आपल्या पद्धतीचा वापर करत असतो.
तर मला वाटते म्हणून हा हट्ट सोडून द्या.
३. Catastrophizing distortion
कोणती ही गोष्ट आता आपल्या हाताबाहेर गेली.. आपण अनेकवेळा सांगून ही समोरच्याला समजत नाही. म्हणून आपण चिडचिड करतो. तेव्हा खरेच शांत रहा. थोडा वेळ द्या , समोरच्या ला ही विचार करण्याची संधी मिळते. आणि आपल्या ला सुधा. त्यातून त्याक्षणी जे temper चढले असते ते शांत झाले की योग्य काय ते समजू लागते. आणि मग मार्ग निघू लागतात.
एक लक्षात घ्या शेवट कशाचा नसतो. ती नवीन सुरुवात असते.
४. Future predictions :
पूर्व अनुभव असतो त्यातून पुढे असेच घडेल हे तर्क करून आपल्या हातात काही नाही , आपण काही करू शकत नाही म्हणून आपण चिडचिड करतो. अशावेळी शांत राहून एवढेच मनाला बजवा की तेव्हा जी परिस्थीती असेल त्यानुसार ठरवू. वागू. विचार करू. निर्णय घेवू असे मनाला बजावत रहा. पुढे असेच घडेल हे ठरवून चिडचिड करण्यात काही अर्थ नसतो.
५. इमोशनल reasoning..
भावनेच्या भरात आपला समतोल बिघडतो. आणि समोरची व्यक्ती मुद्दाम असे करते , वागते हे डोक्यात पक्के करत जातो . आणि जरी ती व्यक्ती इतर कोणाला बोलली असेल , चिडली असेल दुसऱ्यावर तरी आपल्यावर चिडली असे गृहीत धरून आपण उगीच चिडचिड करतो. अशावेळी शांत रहा. React करू नका ..आणि respond ही करू नका. ते आपल्या करिता नाहीच असे च विचार करा आणि दुर्लक्ष करा.
६.७. Magnification .: Minimazation
हे एकमेकांवर आधारित आहे. प्रत्येकजण दुसऱ्याला आपल्या चष्म्यातून बघत असतो. त्यामुळे दृष्टिकोन बदला. जसे चांगले विचार कमी केले जातात आणि त्याची जागा वाईट विचारांनीच भरते. त्या ऐवजी वाईट विचार कमी करा आणि त्याची जागा चांगल्या विचारांनी भरून काढण्यासाठी वेळीच प्रयत्न करा .
टोमॅटो चे उदाहरण सर्व परिचित आहे. चांगले टोमॅटो बरणीत भरले तर एक दोन दिवसांनी त्यातले वेळीच खराब झालेले बाहेर काढून चांगले भरले तर सगळे टोमॅटो चांगले असतील. याउलट खराब तसेच ठेवले तर बाकीचे खराब होत जातील.
दुसऱ्यावर चिडचिड करून आपण आपला कमकुवतपणा सिद्ध करत असतो. दुसऱ्याच्या वर्तनाचा आपण त्रास करून घेतो कारण ते आपण बदलू शकत नाही. परिस्थिती , व्यक्ती आपल्या नियंत्रणात नाही याची जाणीव होते. आणि सगळ्यात महत्वाचे ती वेळ जाते निसटून ती परत येत नाही म्हणून आपल्या हाताबाहेर परिस्थिती गेली म्हणून हतबल होतो. आता मार्ग नाहीच म्हणून हताश , निराश होवून त्याची चिडचिड दुसऱ्यावर किंवा स्वतः वर करतो ..अशावेळी शांत राहिलात . लॉजिकल मेंदू’ चा पुरेपूर वापर केलात , असे का घडते हे विचार केलेत तर नक्कीच त्या परिस्थिती मध्ये ही शांत राहता येते.
काही वेळेस सगळे प्रयत्न करूनही एकमेकांची समजून घेण्याची आणि समजून सांगण्याची मानसिकता राहत नाही. किंवा परिस्थिती आटोक्यात येण्याची शक्यता राहत नाही तेव्हा अलिप्त होणे ही चांगले.
आयुष्य सुंदर आहे. आपल्या ‘लॉजिकल मेंदू’ चा पुरेपूर वापर करून भरकटलेल्या विचार किंवा हाताबाहेर परिस्थिती जात आहे यात अडकण्यापेक्षा practically , आता काय समोर आहे ते बघा त्यातून मार्ग काढा. म्हणजे चिडचिडे प्रसंगात शांत राहणं जमेल.
दाट धुके बघितल्यावर आपण थांबतो आता मार्ग सापडणे अवघड म्हणून थांबतो. पण हळूहळू पुढे जात राहिलात तर आपोआप धुक्यातून ही मार्ग दिसायला लागतो. तसे आपले विचार तिथेच थांबू न देता त्याला योग्य विचारांची जोड देत गेलात. तर आपोआप चिडचिडेपणा मधून शांततेचा मार्ग ही दिसत जाईल.
आयुष्य सुंदर आहे . चिडचिड करून स्वतः आणि इतरांची मनस्थिती खराब करण्यापेक्षा शांत राहून सर्वांना आनंद आणि सुख , शांतता द्या.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


