घाणेरडे व्हिडिओ सलग दोन दिवस बघितल्यास काय होऊ शकतं??
टीम आपलं मानसशास्त्र
आता घाणेरडे व्हिडिओज म्हणजे काय असा ही एक विचार प्रत्येकाच्या मनात येतो. बरेचवेळा जे समाज , घरातल्यांच्या पासून लपून छपून बघितले जातात असे व्हिडिओज म्हणले तरी हरकत नाही. पण जे लोक हे बघतात त्यांच्या दृष्टीने यात गैर काहीच नसते. किंवा त्यांच्या दृष्टीने त्यात घाणेरडे असे काहीच नसते. आता सोशल मीडिया चे वेड तरुण पिढी च काय वयस्क लोकांच्यात ही तेवढेच आहे. त्यात स्त्रिया ही कुठे मागे नाहीत. घाणेरडे व्हिडिओज सलग दोन दिवस बघितल्यास काय होऊ शकतं?? यात ही प्रत्येक वयोगट वेगळा विचार करण्यासारखा आहे.
१. अल्पवयीन वयोगट :
जर सलग दोन दिवस घाणेरडे व्हिडिओज बघितले किंवा त्यांना दाखविण्यात आले तर त्यांच्यात एक अनामिक भीती निर्माण होते. कारण यापूर्वी असे काही असते हे माहितीच नसते.
A. . तर आपण काय बघतोय याची भीती वाटते. त्यात कोणाला समजले तर ही भीती वेगळीच. पण जे समोर दृष्टीला पडते ते कधी माहिती नसते. बघितले नसते. आपल्या शरीरा बाबत असेही काही होते ही कल्पना किंवा ते बघणे त्यांना त्रासदायक ठरते. त्यांच्या कोमल मनावर , विचारांवर परिणाम होवून भीतीचा पगडा बसतो.
B . किळस वाटते : लाज वाटते. हे असे घाणेरडे व्हिडिओज सलग बघून एक प्रकारची किळस वाटते. त्यातून मुली असतील तर लाज ही वाटते.
C. नकारात्मक भावना निर्माण होणे : अज्ञान किंवा अर्धवट माहिती यात असे काही घाणेरडे व्हिडिओज सलग समोर आले तर जिथे सकारात्मक भावना निर्माण व्हायला पाहिजे ..जे नैसर्गिक आकर्षण निर्माण व्हायला पाहिजे त्या ऐवजी घृणा निर्माण होते. नकारात्मक भावना निर्माण होतात.
बरेचवेळा केवळ भिन्न लिंगी , समलिंगी संबंध , वस्त्र विरहित व्हिडिओज असे विविध प्रकार ही त्या मध्ये असतात जे बघितले की अघोरी काही तरी बघत आहोत असे वाटून पुढे कायमची संबंधा बाबत नकारात्मक भावना निर्माण होते.
D. एकलकोंडी होणे : मुले असोत मुली ती एकलकोंडी होत जातात. कोणाच्या मध्ये मिसळणे ही टाळू लागतात.
F. एकाग्रता कमी होणे : जे सलग बघितले त्याचेच विचार येवून लक्ष विचलित होते. आणि त्याचा परिणाम एकाग्रता होत नाही. सतत मनात तेच तेच विचार , डोळ्यासमोर तीच दृश्य येत असतात. मग अभ्यास असो. किंवा कोणतेही काम असो त्यात लक्ष लागत नाही.
२. कॉलेज चे तरुण / तरुणी :
ऑफिस किंवा सम व्यवसायात ले तरुण / तरुणी / मित्र मित्र , मित्र मैत्रिणी , मैत्रिणी मैत्रिणी : या वयात साधारणपणे सर्व गोष्टींची माहिती असते. पण कधी गोष्टी बघितल्या नसतात. त्यात एकमेकांच्या आग्रहामुळे तर कधी force मुळे असे घाणेरडे व्हिडिओज बघितले ही जातात.
A. लाज : पहिल्यांदा असे व्हिडिओज बघताना मुले मुली किंवा तरुण तरुणी यांना थोडी लाज वाटते कारण त्या दृष्टीने एवढी जवळीक कोणाशी नसते. एकत्र असताना एक आकर्षण वाटत असतें . भेटणे , बोलणे , हलकासा स्पर्श ही सुखावह असतो . पण त्या पलीकडे जावून विचार किंवा कृती केली नसते. त्यामुळे थोडी लाज वाटते. सुरुवातीला. पण बरेचदा घाणेरडे व्हिडिओ सलग दोन दिवस बघितल्यास हीच लाज कमी ही होवून जाते. आणि मोकळेपणा येतो.
B.. सवय / चटक लागणे : घाणेरडे व्हिडिओ सलग दोन दिवस बघितल्यास काय होऊ शकतं?? तर त्याची सवय , चटक लागते. मग ते व्यसन बनून जाते. कामातून, अभ्यासातून वेळ मिळाला की ते बघावे असे वाटते.
C. शारीरिक संबंध निर्माण होण्यास चालना : लहान वयात , लग्नापूर्वी , किंवा लग्नानंतर ही शारीरिक संबंध , अनैतिक संबंध निर्माण होतात. त्याला प्रोत्साहन मिळते. उद्दीपन मिळते. नुसते आकर्षण मग शारीरिक संबंधांमध्ये रुपांतरीत होते. आणि एकदा झाले की ते परत परत ते पाहिजे असे addiction होते. नाही मिळाले तरी अस्वस्थ होते. मग त्यातून हस्तमैथुन , कधी बलात्कार , फसवणूक , तात्पुरते गोड बोलून एकमेकांच्या गरजा भागवून घेणे असेही होते.
D. In future शारीरिक संबंधातून संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता ही असते.
E. तरुण / तरुणी , सहकारी घरी किंवा एकमेकात ही खोटेपणा वाढतो. / कार्यक्षमता कमी होते. आपली हवस भविण्यासाठी , घाणेरडे व्हिडिओज बघुंन उत्तेजीत करून घेण्यासाठी घरी खोटे बोलून ही तरुण पिढी , जिथे मिळेल तिथून हे व्हिडिओज बघतात. बाहेर जातात. अभ्यास , काम या नावाखाली सतत बाहेर राहतात. आणि वेळ अनाठायी वाया गेल्याने त्यांची कार्यक्षमता कमी होते.
३. वयस्क लोक / वृध्द पिढी :
बरेचवेळा केवळ वय आणि इतर जबाबदाऱ्या , मुले , सूना , नातवंडे काय म्हणतील यातून या पिढीचे परस्परात जोडीदार त्या सोबत संबंध हे कमी होत जातात. एकमेकांची इच्छा असेल तर काही बंधने यामुळे दुरावा येत असतो.
१. घाणेरडे व्हिडिओ सलग दोन दिवस बघितल्यास त्यांच्यामध्ये परत चांगले relations ही निर्माण होवु शकतात. किंवा अगदी स्वच्छ सांगायचे तर हे व्हिडिओज बघायची सवय लागते. आणि दुधाची तहान ताकावर भागविणे म्हणतो तसेही केले जाते.
२. ज्यांचे जोडीदार जग सोडून गेले त्यांच्या बाबत : बरेचवेळा वयस्क पुरुषांनी जर सलग असे व्हिडिओज बघितले तर ते कामोद्दीपित होतात आणि मग कंट्रोल नाही करू शकले नाहीत तर बरेचवेळा घरी काम करणारी मोलकरीण असो , शेजारी पाजारी लहान मुली असोत ते त्यांचा गैरफायदा घेतात.
बरेचवेळा एक दोन दिवस सलग व्हिडिओज बघून ही काही लोकांच्यात काहीच फरक पडत नाही. कारण त्याची त्यांना आवड नसते. काय घाणेरडे पणा आहे अशीच प्रतिक्रिया असते.
तर काही त्याने खरेच उद्दिपित होतात. काही तरी नवीन आहे याचा शोध लागतो म्हणून परत परत ते बघण्याचा प्रयत्न आणि त्यातून सुख शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यात काही थ्रील आहे असे वाटून तेच परत परत बघतात. आणि त्यापुढे ही जातात. काही वेळेस ते बघताना अजून उत्साह , उत्तेजना मिळण्यासाठी सिगारेट , दारू , ड्रग यासारख्या व्यसनांच्या आहारी ही जातात.
काही लोक फक्त दोन दिवस तेवढीच मजा , आनंद म्हणून त्याकडे बघून सोडून देतात. परत आपले routine सुरू ठेवतात. तर काही त्यात पूर्णपणे बुडून जातात. सवय होवून जाते त्यांना. आणि मग त्याच त्याच साध्या व्हिडिओज पेक्षा पुढची अजून काही विविधता , नावीन्य आहे याचे शोध घेतात त्याकरिता प्रसंगी पैसे जास्त करून ही ते व्हिडिओज मिळवितात. प्रसंगी कर्जबाजारी ही होतात.
तर तरुण तरुणी एकत्र हे व्हिडिओज बघत असतील आणि त्यापुढे त्यांच्यात शारीरिक संबंध निर्माण होत असतील तर एकमेकांच्या नकळत ते अशा अस्ताव्यस्त रुपात , कधी नग्न रुपात व्हिडिओ रेकॉर्ड ही करतात. त्याचा गैरवापर एक तर नकार दिला तर पैसे किंवा परत परत संबंध ठेवण्याकरिता ही करतात. त्यात मुले ही आणि मुलीही कुठे कमी नाहीत.
घाणेरडे व्हिडिओ सलग दोन दिवस बघितल्यास काय होऊ शकतं?? हे आपण बघितले ..पण हे केवळ सलग दोन दिवसाचे नसते मुळात. एकदमच याची सुरुवात होत नाही तर आधी कुठे तरी मानसिकता तयार होत असते. त्याची सुरुवात आधीच कुठे तरी झालेली असते. खत पाणी मिळते आणि अंकुर फुटतो जमिनीत मुळे जोमाने वाढू लागतात. तसे च काहीसे हे ही असते. आणि एकदा वृक्षात रूपांतर झाले की फांद्या , मुळे या कशावर च नियंत्रण ठेवता येत नाही. स्वातंत्र्य या नावाखाली स्वैराचार नक्कीच वाढत जातो.
जे समाजाला घाणेरडे वाटते ते अशा काही लोकांना आवडीचे असते. त्यामुळे हे विचारसरणी , वातावरण , संगत यावर , संस्कार , मर्यादा , बंधने यावर अंकुश असणे , ठेवणे गरजेचे आहे.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
