घरी बसूनही करता येण्यासारखे १०० मोफत कोर्स !!
टीम आपलं मानसशास्त्र
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यापासून देश परदेशात ऑनलाईन शिक्षण तसेच निरनिराळे कोर्स ऑनलाईन घरबसल्या करता येतात. अशा ऑनलाईन कोर्सेसमध्ये मशीन लर्निंग कोडिंग, स्टोरी टेलिंग यासारख्या १०० पेक्षा जास्त मोफत कोर्सेसचा समावेश आहे.
हे मोफत कोर्स केवळ शाळा, कॉलेजचे विद्यार्थीच नव्हे, तर पालक, शिक्षक आणि प्रोफेशनल्स सुद्धा हे ऑनलाईन कोर्स घरबसल्या आणि तेही मोफत करू शकतात. त्यात शॉर्ट टर्म सर्टिफिकेट कोर्स सोबतच डिप्लोमा आणि पदवी कोर्ससुद्धा उपलब्ध आहेत.
आता कोरोना हळूहळू आटोक्यात येत आहे. पण शाळा-कॉलेज कधी सुरु होतील, दैनंदिन जीवन कधी पूर्ववत होईल, याबद्दल अजूनही कोणालाच निश्चित अशी ग्वाही देणे खूप कठीण आहे.
दिड वर्षाच्या या कोरोना काळात भल्याभल्यांची आर्थिक स्थिती बिकट झालेली आहे. अशा स्थितीत घरी राहून बोअर होण्यापेक्षा किंवा कोरोना लॉकडाऊन, कर्फ्यूला शिव्या देण्यापेक्षा देश-परदेशातील टॉप युनिव्हर्सिटीज आणि कॉलेजचे कोर्स ऑनलाईन करून घरबसल्या अर्थी उत्पन्नाचा स्रोत निर्माण करता येईल.
यासाठी मद्रास आयआयटी चा मशीन लर्निंग कोर्स १२ महिन्यांचा असून हा कोर्स ३० जूनपासून सुरु होत आहे. या कोर्ससाठी बॅचलर डिग्री आवश्यक आहे.
राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या ई-पोर्टलवर स्टोरी टेलिंग, प्रेझेंटेशन ट्रेनिंग, जॉब इंटरव्ह्यु यांसारख्या इंडिया वेबसाईट e-skillindia.org वर लॉग इन करू शकतात. परदेशात सुद्धा असे मोफत कोर्स उपलब्ध आहेत.
त्यात मिशिगन विद्यापीठ तसेच भारताचे बनारस हिंदू विद्यापीठाने १७ मे २०२१ पासून फंडामेंटल ऑफ सोशल डिझाईनचा कोर्स सुरु केला आहे. यासाठी www.bhu.ae.in वर क्लिक करु शकतो. आणि अधिक माहिती घेऊ शकतो.
स्वयं पोर्टलवर ९ व्या इयत्तेपासून तर ग्रॅज्युएशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फ्री ऑनलाईन कोर्स आहेत. त्यात व्हिज्युअल इफेक्ट आणि एनिमेशन, डिझायनिंग, इंजिनिअरिंग, गेम, टेक्नॉलॉजीमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी www.swayam.gov.in या वेबसाईटवर मोफत कोर्स उपलब्ध आहेत.
याशिवाय परदेशातील गुगल प्लॅटफॉर्मवर मशीन लर्निंग आणि डिजिटल मार्केटिंग यांसारखे अनेक कोर्स learn digital हे गुगल वर उपलब्ध आहेत.
याशिवाय गुगल एआय वेबसाईट www.ai.google/education वर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगचे १३ कोर्स उपलब्ध आहेत. त्यात एआय फॉर सोशल गुड गाईड, टेस्टिंग अँड डी-बग्गीन्ग इन मशीन लर्निंग, डेटा इंजिनिअरिंग ऑन गुगल क्लाऊड कोर्स मोफत उपलब्ध आहेत.
तसेच ऑनलाईन मॅनेजमेंट कोर्स साठी कोर्सेस ऑनलाईन लर्निंग आणि टिचिंग फोरम उडेमीचे ६५ भाषेतील पॉडकास्ट असून ते ५७ हजार इंस्ट्रक्टर्स शिकवितात.

Online Counseling साठी !
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

