घरातली चिडचिड आणि बाहेरचे हेवेदावे आपल्याला सामान्यपणे जगू देत नाहीत.
गीतांजली जगदाळे
आजच जग हे स्पर्धेचं जग आहे. स्पर्धा इतकी वाढली आहे की बऱ्याच वेळा एकाच कलेत किंवा क्षेत्रात पारंगत असणं पुरेसं ठरत नाही. त्यासाठी बरेच गुण अंगी असण्याची गरज भासते. आत्ताच्या राहणीमानाचा दर्जा ही इतका उंचावला आहे की अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण याच माझ्या मूलभूत गरज आहेत ह्याचा विसर पडलेला दिसतो.
या उपर जाऊन माणसांना बंगला,गाडी,अमाप पैसा आणि बऱ्याच अशा शोभेच्या वस्तू ज्या कितपत गरजेच्या असतात हे त्याच त्यालाच कळत नाही. तो या वस्तूंच्या मागे इतका धावायला लागतो की त्यामध्ये बऱ्याच गोष्ट मागे पडतात मग तो जवळची माणसे असो किंवा आपण स्वतः देखील, इतरांसोबत स्वतः बरोबर चा संवाद हो कुठेतरी तुटलेला असतो आणि हेच खऱ्या प्रॉब्लेम च मूळ असत बाकी चिडचिड असो राग असो ते याच गोष्टीतून उत्पन्न होत.
आजकाल बऱ्याच घरांमध्ये चिडचिडीच वातावरण बघायला मिळत. आधी तरी असं नव्हतं म्हणजे अगदी माझ्याच लहानपणी १९ वर्षांपूर्वीचा काळ. तेव्हा माणसाकडे एक वेळेस पैसे कमी असायचे पण तरी माणसं कुठेतरी त्यात सुद्धा सुखी समाधानी असायची आणि आज मात्र सगळं असणारी माणसं सुद्धा दुःखी, चिडचिडी आणि बैचेन असतात. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधन हे ही कमी झालेलं दिसत.
पहिल्या लोकांची आयुष्य जगण्याची पद्धत आणि आत्ताची जगण्याची पद्धत यात खूप तफावत आढळते. पूर्वी मनोरंजनाची साधने देखील कमी होती. पण आता कुठेतरी त्यांचं प्रमाण वाढलंय, पण आत्ताच जे प्रमाण आहे त्याची खरंच आपल्याला किती गरज आहे हा देखील प्रश्नच आहे, कारण इंटरनेट असो किंवा आजकालची नवीन टेकनॉलॉजि हे सगळं जग जवळ आणण्यासाठी आपण आपल्या आयुष्यात येऊ दिल होत पण आता त्याच अत्याधुनिक तंत्रज्ञानाने माणसामाणसांत दुरावा आलेला दिसतो.
एकाच घरात राहणारी माणसे दिवसभराच्या आपापल्या कामा नंतर जेवायला, टीव्ही बघायला का होईना एकत्र यायची त्यातून गप्पा गोष्टी करणं, एकमेकांच्या आयुष्यातल्या चार गोष्टी कळणं व्हायचं पण आता मात्र एकाच घरात राहणारी माणसे सुद्धा इतक्या जवळ राहून मनाने दुरावलेली दिसतात त्यांच्यात संवाद कमी आणि बाकी वाद, किरकिर, चिडचिड हे जास्त बघायला मिळत.
आजच्या जगात माणसाला इतर माणसानं जवळ आणणारी खूप साधने सापडतील पण तरी त्या साधनांचा उपयोग होण्यापेक्षा त्यानेच कुठेतरी माणूस माणसापासून दुरावत चाललेला दिसतो. घरातली चिडचिड आणि बाहेरचे हेवेदावे याची बरीच कारण असू शकतात पण सगळ्यात मुख्य कारण हेच की जेवढा संवाद असायला हवा तेवढा होत नाही, पुरेसा वेळ एकमेकांना देता येत नाही आणि त्यामुळे गैरसमज वाढतात आणि त्यांचं रूपांतर हे चिडचिडी मध्ये आणि भांडणांमध्ये होत. आंतरिक शांती किंवा आनंद हेच कुठेतरी लुप्त झाल्याने माणसाला समाधानाने जगन अशक्य होऊन बसत.
आजकाल बाह्य सुखाकडे माणसाचा जास्त ओढा दिसून येतो आंतरिक सुखापेक्षा त्याला सुखसोयी, पैसे, आर्थिक सुबत्ता, इत्यादी गोष्टी महत्वाच्या वाटतात आणि मग ते मिळवण्यासाठी तो योग्य-अयोग्य मार्गातला फरक सुद्धा दुर्लक्षित करतो. पण हे सगळं जरी मिळालं तरी आतून मात्र सुख, शांती आणि समाधान मात्र त्याला मिळत नाही.
बाहेरचे हेवेदावे आणि घरात होणारी चिडचिड माणसाचं मानसिक स्वास्थ्य बिघडवून टाकणारी असते. एका जरी ठिकाणी शांती मिळाली तर माणूस दुसऱ्या ठिकाणी तोंड द्यायला मोकळा असतो. पण बाहेर ही तेच आणि घरी ही तेच वातावरण म्हंटल्यावर त्याला सुख-समाधानाने जगन अशक्य होऊन बसत.
त्यामुळे बाहेरच्या जगातील स्पर्धा असो किंवा आणखी काही आपण प्रत्येक गोष्ट आपल्यावर घेता काम नये. कष्ट करणं ही आपली जबाबदारी पण यश मिळेल की नाही याचा विचार करण्यापेक्षा आपण केलेले कष्ट पुरेसे आहेत का आणि ते योग्य दिशेने केलेले आहेत का हे जास्त महत्वाचं.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


