आपल्या एकटेपणावर आपणच मात करू शकतो.
मिनल वरपे
आयुष्यात कधीना कधी अनेक मार्गातून एकटेपणा प्रकर्षाने जाणवतो आणि कालांतराने आपली मानसिकता पूर्ववत सुद्धा होते. परंतु हा एकटेपणा जर दीर्घकाळापर्यंत राहिला तर तो आपल्यामध्ये अनेक मानसिक समस्या निर्माण करू शकतो.
सगळ्यांच्या आयुष्यात एक ना एक दिवस हा रितेपणा येतोच. आणि तो एकदाच येतो असंही नाही, तर अनेकदा येतो. काहींना तर या एकटेपणाची इतकी सवय झालेली असते, घर माणसांनी भरलेलं असतं परंतु अशा व्यक्तींना मात्र एकटेपणा जाणवत राहतो. मुळात त्याची त्यांना सवय झालेली असते.
अशा सवय झालेल्या व्यक्तींचे जर तुम्ही निरीक्षण केले तर अनेक मानसिक आणि शारीरिक समस्या त्यांच्यामध्ये आढळतात. म्हणून या लेखात आपण एकटेपणावर काय करायला हवं, यावर बोलण्यापेक्षा अशी मानसिक अवस्था येण्यामागची नेमकी काय कारणे आहेत याचा तपास करूया. जेणेकरून त्यावर उपाययोजना आपल्याला करायला सोपं होईल.
एकटेपणा हा कधी जाणवतो, त्याची कारण काय??
१) घडलेले प्रसंग
आपल्या आयुष्यात एखादा असा प्रसंग घडतो की ज्यातून बाहेर पडणं आपल्याला अजिबात सोप नसते. त्यावेळी आपण त्या प्रसंगात इतके गुरफटून जातो की आपल्याला कसलच भान नसते आणि अशावेळी आपण स्वतःच सर्वांपासून लांब राहतो आणि नंतर आपल्याला एकटेपणा जाणवतो.
२) आपलं मत कोणी विचारात घेत नसेल
जेव्हा आपण ज्यांच्यासोबत राहतो.. घर असो,मित्र परिवार असो किंवा कामाच्या ठिकाणी असो.. त्या ठिकाणी जर कोणताही निर्णय घेताना आपलं मत विचारलं जात नसेल, आपण काही बोललं तरी त्याचा विचार केला जात नसेल तर अशा ठिकाणी आपल्याला एकटं पडल्यासारखं जाणवते.
३) एखाद्या ठिकाणी अड्जस्ट व्हायला जमत नसेल
जागा नविन असेल किंवा जुनी, माणसं सुद्धा तेच असो अथवा नविन पण त्यावेळी आपल्याला त्यांच्यासोबत मोकळेपणाने हसता बोलता येत नसेल त्यांच्यातले आपण असूनसुद्धा त्यांच्यात राहणं आपल्याला अवघडल्यासारखं वाटत असेल तर अशावेळी एकटेपणाची भावना वाढत जाते.
४) अस्पष्ट कारण
सगळं व्यवस्थित चालू असताना अचानक आपल्याला एकाकीपणा जाणवतो. जास्त भावनिक होतो. तिथे आपल्यालाच कळत नाही की आपल्याला इतकं एकटं असल्यासारखं का वाटते पण याच कारण शोधून सुद्धा मिळत नाही.
५) समजून घेणार कोणी नसेल
आपल्याला जे सांगायचं आहे ते ऐकणार आणि ऐकून सुद्धा समजून घेणार जवळपास कोणी नसेल तर अशावेळी आपल्याला एकटेपणा जाणवतो. अशावेळी आपण जास्त विचार करतो आणि या विचारांच्या गर्दीत आपलं कोणीच नाही हे मनाशी ठाम करतो आणि तेव्हा जास्त एकाकीपणा आपल्याला जाणवतो.
६) अपेक्षा पूर्ण होत नसतील
जेव्हा आपल्याला जे हवं आहे अपेक्षित आहे मग ते स्वतःकडून असो किंवा इतरांकडून.. पण मनासारखं घडलं नाही. घडत नाही म्हणून जास्त चिंता करत राहिल्याने आपण सर्वांपासून दूर होत जातो.
७) जगण्याचा आशावाद कमी झाला तर
येणारा प्रत्येक दिवस हा नविन आशा घेऊन येतो. आणि या प्रत्येक दिवसाला जे आज नाही झालं ते उद्या होईल , जे आज नाही मिळालं ते उद्या मिळेल, करता येईल हा आशावाद आपल्याला जगण्याची प्रेरणा देतो. पण आता सगळं संपलं काहीच उरलं नाही असे निराशावादी विचार जेव्हा आपल्या मनात येतात तेव्हा आपल्याला एकटेपणा जाणवतो.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


बरोबर आहे.पण लेखात त्यावरा उपाय सुचवणे आवश्यक होते…
Mala ma
मग यावर काय उपाय योजना केल्या पाहिजे 🤔