खूपच निगेटिव्ह फिलिंग येत असतील तर काय करावे??
सोनाली जे
खूपच निगेटिव्ह फिलिंग येत असतील तर म्हणजे काय तर सकारात्मक फिलिंग ची कमतरता. अंधार म्हणजे काय तर उजेडाच अस्तित्व नाही तो अंधार. जिथे उष्णता नाही ते थंड. थंड अशी वेगळी कॉन्सेप्ट नाही.
जिथे भावना नाहीत तिथे व्यवहार.
नकारात्मक विचार तुम्हाला घेरतात . तणाव, चिंता, गतिहीन जीवनशैली आणि धूम्रपान हे सर्व तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात, विशेषत: तुमच्या मानसिक आरोग्यावर. तुम्हाला बहुतेक वेळा दुःखी वाटू शकते आणि फोकसच्या बाहेर राहू शकता. अलीकडील ब्रेकअप, आपण काही काळापासून तळमळलेली पदोन्नती वगळली आहे आणि विषारी कार्य संस्कृती आपल्याला दुःखी, महत्वहीन वाटू शकते आणि ती रिक्तता भरून काढणे कठीण आहे.
तथापि, तुमच्यासाठी हे महत्वाचे आहे की या नकारात्मक विचारांना घेरू देऊ नका आणि तुमच्यावर वर्चस्व गाजवा. जीवनाचा उजळ दृष्टीकोन पहा. कोणतीही व्यक्ती, नोकरी किंवा एखादी विशिष्ट पदोन्नती तुमच्या आयुष्याला ठरवू शकत नाही. जगणे म्हणजे लढाई. डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत लक्षात ठेवा ज्याने योग्यतेचे अस्तित्व सुचवले? हे आजही तितकेच प्रासंगिक आहे जसे पूर्वी नव्हते, जर नाही तर.
गाडी चालवताना सिग्नल आला आणि थांबायचे असेल तर गाडीचा स्पीड कमी करायचा असतो म्हणजे काय तर स्पीड कशाने वाढतो आणि कमी कशांनी होतो तर Accelator.
Accelator कमी केला की गाडी slow मग ब्रेक हलकेच दाबून सोडून दिला की ती सिग्नल पर्यंत जाईल.
काय झाले हसलात ना सगळे ?? काय उदाहरण दिले .
बघा विचार करा ना की तुम्ही तुमच्या मनात धडाधड येणाऱ्या negative विचारांचा स्पीड कमी केलात. आणि त्यातून वाढणाऱ्या मनातल्या negative विचारांची वाढणारी संख्या योग्य वेळी ब्रेक लावून कमी करावी लागते.
आपण सगळेच नेहमी काय करतो की जे नाही ते count करतो. जे आहे त्याचा विचार करतच नाही. त्याची किंमत नसते आपल्याला. पाण्याचा ग्लास अर्धा रिकामा याकडे लक्ष जावून मन विचलित होते. तर अर्धा भरलेला आहे ही सकारात्मक गोष्ट ही विसरून जातो.
देवाने दोन हात , पाय , डोळे, कान , नाक , मेंदू सगळे अवयव धडधाकट दिले आहेत हे विसरून जातो. त्याचा वापर करून अनेक गोष्टी करू शकतो या गोष्टी विचारात घेतल्याचं जात नाहीत. जे दिले नाही , किंवा जे कमी त्याकडे लक्ष जाते.
उदाहरणार्थ : आज माझ्याकडे गाडी नाही म्हणून मी नकारात्मक भाव निर्माण करून घेते. पण माझ्याकडे हातपाय धड आहेत , टू व्हीलर आहे. मी चालत जावू शकते . दुचाकी वर जावू शकते. पण ज्यांच्याकडे हात , पाय , डोळे नाहीत ते चालत किंवा गाडीवर कसे जाणार ?
खूपच निगेटिव्ह फिलिंग येत असतील तर काय करावे??
१. नकारात्मक विचार / भावना / घटना काढून टाका ..खूप च negative विचार मनात येत आहेत तर तो किंवा ते विचार दूर सारून पुढे जा.
उदाहरणार्थ : रॉकेट जेव्हा अंतराळात सोडतो तेव्हा पुढे जाताना step by step त्याचे एक एक part विलग होत जात. आणि रॉकेट एकदम स्पीड ने अंतराळात जाते. तसे वेळीच जे नको आहेत ते विचार काढून टाका.
२. सकारात्मक विचार , गोष्टी यांची भर घाला : – आपण सतत negative गोष्टींचे विचार करून त्यात अजून negative विचारांची च भर घालत असतो. म्हणून ते negative विचार काढून positive सकारात्मक विचारांची भर घाला. जसे एका बरणीत चांगले टोमॅटो भरले पण दोन तीन दिवसांनी त्यातला एखाद दुसरा खराब झाला तर ते काढून नवीन चांगले टोमॅटो भरा.
जर ते खराब टोमॅटो काढले नाहीत तर ते खराब टोमॅटो इतर चांगले टोमॅटो ही खराब करतील. तसेच आहे जर नकारात्मक विचार , भावना डोक्यातून काढून त्या जागी चांगल्या भावना निर्माण करून त्या भरल्या पाहिजेत. किंवा ज्या चांगल्या गोष्टी घडल्या तेव्हा जे सुख आनंद मिळविले आहे त्या लक्षात घेवून वाईट गोष्टी , झालेले दुःख दूर केले पाहिजे.
३. सतत negative फिलिंग येत असेल तर थोडे मूड बदलण्याकरिता वातावरण निर्मिती करण्याकरिता वातावरणात बदल पाहिजे. मग कधी सुट्टी काढून नातेवाईक , मित्र मैत्रिणी यांना भेटून या. तर कधी movie बघा. कधी मित्र मैत्रिणी यांच्या सोबत , नातेवाईक यांच्या सोबत , ऑफिस मधले सहचारी यांच्या सोबत पिकनिक ला जा , ट्रिप ला जा. तिथले निसर्ग सौंदर्य , समुद्र किनारा असेल तर तो , हवा तुम्हाला परत उत्साही करेल , आनंदी करेल . आणि negative भावनांवर नियंत्रण मिळविता येते.
४. Comparision / तुलना करू नका. : एखाद्या कडे एखादी गोष्ट आहे आणि ती माझ्या कडे नाही या मुळे वाईट वाटते, त्रास होतो , दुःख होते , कधी कधी jealousy ही निर्माण होते. या negative feelings कायमच्या घालविण्या करिता कधी ही तुलना करू नका. कायम लक्षात ठेवा ज्या गोष्टी आहेत त्या इतरांच्या कडे ही नसतात .
आणि त्या गोष्टी ज्यांच्याकडे आहेत त्यांना अनेक प्रयत्न करून , काही वेळेस त्याग करून , मग कधी कुटुंब , मुले यांच्यापासून दूर राहावे लागते. प्रसंगी स्वतः सगळ्या गोष्टी करण्यापासून सगळे बघावे लागते. आपल्याला फक्त त्यांच्याकडे असणाऱ्या वस्तू , सुख , घर , दिसते पण त्यांनी कोणत्या कष्टातून दिवस काढले ते माहिती नसते. म्हणूनच त्यांच्या बरोबर comparision कधीच करू नका.
तुम्ही तुमच्या स्वतः मध्ये बघा. स्वतः ची शुन्यापासून सुरुवात करत आज कुठे पोहचले आहात ते बघा आणि आनंदी , सुखी , उत्साही राहा.
५. कधी तरी एकटे रहा , : आपला आनंद स्वतः मध्ये स्वतः शोधा. इतरांच्या मध्ये आपला आनंद शोधू नका. त्यांच्यावर आपला आनंद अवलंबून ठेवू नका. आवडत्या ठिकाणी जा , कधी मस्त कॉफी शॉप जा , फिरायला जा . स्वतः करिता वेळ द्या . बरेच वेळा सध्याच्या धावपळीच्या काळात आपण आपल्याच करिता वेळ देवू शकत नाही. आणि मग उगीच च negative फिलिंग येत राहतात.
६. स्वतः फ्रेश रहा , छान आवरून , कधी हलका मेकअप करा , कधी नवीन ड्रेस , साडी आवडते outfits घ्या . ते घालून छानसे आवरा . आरशात बघून म्हणा मी किती सुंदर दिसते. फ्रेश दिसते. हा ड्रेस ही माझ्यावर खुलून दिसतो.
माझी एक पेशंट होती जी खूप नकारात्मक भावना बाळगून होती. मी दिसायला छान नाही. माझ्या कडे कोणी बघत नाही. मी काळी च आहे.
मग मी तिला सांगितले घरी असो की बाहेर जाताना असो खूप छान आवर . जसे तुला आवडेल तसे. छान कपडे .हलकासा मेकअप कर. जुन्या कपड्यांचा ही वापरून वापरून कंटाळा येतो थोडे नवीन आवडीचे कपडे घे. तिची beauty parlour करिता मस्त appointment घेतली . तिचा मस्त हेअरकट , हेअर कलर केले आणि तिच्यातला बदल बघून तीच तिच्या प्रेमात पडली. तिचा आत्मविश्वास एकदम वाढला. आणि ती खूप उत्साही झाली. थोड्या दिवसांनी तिने सांगितले तिला खूप compliments मिळतात. आणि आता ती कॉलेज मधल्या प्रत्येक activity मध्ये भाग घेते.
तिच्या सगळ्या नकारात्मक भावना , भीती , निराशा इतर लोक दुर्लक्ष करतात , आपण छान दिसत नाही , काळे आहोत ही सगळी नकारात्मकता पळून गेली ..आता उत्साही , आनंदी , सगळ्यांच्या मध्ये मिसळणार अशी आणि active झाली.
नुसता एक गुरुमंत्र दिला की जेव्हा जेव्हा तुला निराश वाटेल तेव्हा खूप छान ड्रेस घाल .मस्त आवर. आणि आरशात बघून म्हण मी किती सुंदर दिसते. आता तिला ती जगातली सुंदर वाटते.
७. मन आणि शरीर दोन्ही निरोगी राहण्याकरिता एक टाइमटेबल आखा : बरेचदा शरीर आजारी असते. किरकोळ दुखणी असोत , किंवा कायमस्वरूपी दुखणी , दुर्धर असोत , सततची औषधे , स्वतः वर येणारी बंधने जसे हालचाल असेल , खाण्या पिण्यावर येत असतात. खर्चाचे प्रमाण वाढत असते . त्यातून नकारात्मक भावना निर्माण होत असतात.
तर कधी कधी मन निराश असते. एकटेपणा , इतरांच्या वागण्याचा त्रास होतो. आपण काही अपेक्षा ठेवत असतो आणि इतर त्यांच्या मनाप्रमाणे च वागतात आणि त्याचा स्वीकार मन करू शकत नाही. त्यातून निराशा , औदासीन्य , एकटे पणाची भावना , म्हणजेच सगळे नकारात्मक विचार येतात.
अशावेळी रोजची दिनचर्या ठरवा. सकाळी उठण्याची आणि रात्री झोपण्याची एक वेळ निश्चित करा. कमीत कमी आठ तास झोप घ्या. खाण्या पिण्याच्या वेळा पाळा. नियमित व्यायाम करा , ध्यान धारणा , meditation करा. प्राणायाम करा. यातून मन शांत होईल. एकाग्रता वाढेल . अगदी काही नाही तर रोजचे वॉकिंग , running करा. यातून मन आणि शरीर ही स्वास्थ्य लाभेल आणि मन उत्साही होईल.
८. रोज डायरी लिहा : रोजच्या दिवशी डायरी लीहिण्या चे फायदे म्हणजे रोज ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात , चूक बरोबर , याची जाणीव होते. चांगल्या गोष्टीतला आनंद घेता येतो. आणि ज्या गोष्टी चुकल्या आहेत किंवा काही उणीव आहे तर ती सुधारण्याकरिता काय केले पाहिजे याची जाणीव होते. तुमच्यात कोणत्या गोष्टी मुळे ताण तणाव आले आहेत हे लक्षात येते. त्यावर उपाय शोधले जातात.
आणि नकारात्मक विचार सकारात्मक विचारात बदलले जात असतात.
९. नकारात्मकता ही फक्त एक भावना आहे, आणि जीवन जगण्याचा मार्ग नाही. बरेच लोक नकारात्मक भावनांना बळी पडतात कारण ते बोगद्याच्या शेवटी प्रकाश पाहण्यात अपयशी ठरतात. ते, बर्याचदा, ते कायमस्वरूपी आणि अपरिवर्तनीय म्हणून पाहतात. पण तुम्ही हे बदल घडवू शकता. कधी motivational videos बघा. कॉमेडी , फनी सीरियल , movie , नाटक बघा. सभोवतालचे वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा.
१०. आवडते छंद जोपासा.. ड्रॉइंग असेल , painting असेल , खेळ असतील , music ऐकणे असेल किंवा एखादे वाद्य वाजविणे असेल . त्यात creativity वाढते . आणि नकारात्मक भावना दूर होवून सकारात्मक भावना निर्माण होतात.
११. Relationship मधून येणारी नकारात्मक भावना : काही वेळेस आपण अगदी आपल्या जवळच्या लोकांना खूप जपण्याचा प्रयत्न करतो, आपली प्रेमाची व्यक्ती किंवा नातेवाईक ,पण काही तरी कुठे तरी बिनस्ते आणि ठिगळ वेळेत न लावल्याने कापड जसे जास्त फाटत जाते तशी अवस्था नात्यांची होते. काही वेळेस ठिगळे लावली ही जातात पण तोपर्यंत कापड च विरले असते. त्यामुळे ते टिकत नाही ..तशीच अवस्था नात्यांची होते . आणि त्यातून त्रास होतो ..मन निराश होते . नाराज होते.
अशावेळेस नाती जोडण्याचा प्रयत्न करावा.पण आपल्या सारखी समोरच्याला ही गरज आहे हे का हे नक्की तपासून बघावे. नाती तिकण्याकरिता परत परत संधी ही द्यावी परंतु काही वेळेस संधी देवून ही समोरचा त्याला पाहिजे तसेच वागत असेल. आपल्या भावनांची कदर नसेल तर अशा नात्या पासून विरक्त व्हावे. सुरुवातीला खूप त्रास होतो आपण त्यांना कधीच विसरू शकत नाही परंतु नंतर आपण आपल्याला इतर कामात गुंतवून ठेवले की त्याची तीव्रता कमी होते. किंवा मग आपल्या जवळची आपल्याला कायम साथ देणारी आपली नाती आई – वडील , भावंडे , मित्र मैत्रिणी यांच्यात मन रमवा.
१२. प्रयत्न करा . नवीन गोष्टी करा..साध्य करा. ज्या गोष्टी नाहीत याचे दुःख होत असेल त्रास होत असेल आणि त्या पाहिजेत असा आग्रह असेल तर स्वतच्या क्षमता वाढवा , प्रयत्न करा , प्लॅन्स आखा आणि नवीन गोष्टी शिकून घ्या. त्यातून इच्छित गोष्ट साध्य करा.
आयुष्य खूप सुंदर आहे. खूप च निगेटिव्ह फिलिंग येत असतील तर त्या negative फिलिंग काढून सकारात्मक फिलिंग मनात भरा. आनंदी जीवन जगा.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



खुप छान माहिती दिली पण उदाहरणं योग्य वाटत नाही