Skip to content

खरंतर ती एक शारीरिक गरज नसतेच, ती एक भावनिक गरज असते.

खरंतर ती एक शारीरिक गरज नसतेच, ती एक भावनिक गरज असते.


सोनाली जे.


Developmental psychology मधून माहितीच आहे की भ्रूण निर्मिती होण्यापूर्वी सुध्धा जोडीदार कोणत्या परिस्थिती किंवा वातावरणात एकत्र येतात, त्यांचे तेव्हाचे विचार, मानसिकता , प्रकृती , आनंदी आणि सकारात्मकता , उत्साही, वातावरण , भावनिक attachment असेल तर तसे गुण भ्रूणामध्ये ही येतात..

याउलट जर तुमची मानसिकता ठीक नसेल,वाद विवाद , चिडचिड , विचार ही नकारात्मक , वातावरण उत्साही , आनंदी नसेल तर बरेचदा याचा नकारात्मक परिणाम च भ्रूणामध्ये ही येतात..

बाळ पोटातून बाहेर आल्यावर जेव्हा ते रडते तेव्हा आपण त्याला कुशीत घेतो , जवळ घेतो तेव्हा त्याला शरीराची ऊब तर मिळतेच पण एक प्रकारचा भावनिक आधार मिळत असतो त्यातून बाळ रडण्याचे थांबते.

तसेच आहे मुले थोडी मोठी होवू लागतात ..बाहेर बरोबरचे मित्र – मैत्रिणी यांच्या सोबत खेळताना भांडणे , मारामारी होते मग लगेच कट्टी होते. थोड्या वेळाने खेळता खेळता विसरून ही जातात तेव्हा भावनिक होवून त्या भावनेच्या भरात कट्टी केलेली होती तो भावनांचा आवेग ओसरला की लगेच बट्टी होते..

आपण खेळता खेळता पडलो की कधी गुडघे फुटतात तर कधी हाताचे कोपर मग आपल्याला झालेल्या जखमे चे दुःख तर असतेच पण आई बाबा जवळ घेवून त्यावर डेटॉल ने साफ करून औषध लावतात तेव्हा ती गरज जखम बरी होण्याकरिता गरजेची असतेच पण मनातून आपण पडलो ही भीती असते , तेव्हा आई बाबा जी भावनिक सहानुभूती देतात , आपलेपणाची जाणीव देतात ती खूप महत्वाची असते.

हॉस्पिटल मध्ये कचरा साफ करणारा , झाडून , पुसून घेणारा मक्सुद्भाई हॉस्पिटल मधल्या आवरातली फरशी पुसताना ओल्या फरशी वरून कोणी गेले की चिडचिड करत असतो , बडबड करत असतो, तुम्हाला काय मलाच वरतून ओरडा खायला लागतो असे म्हणून चिडतो , मुन्नाभाई बघतो आणि ऐकतो ही हे त्याचे बोलणे , त्याच्या जवळ जावून त्याला Sorry म्हणतो , म्हणतो की तुमचे नाव काय ? यावर त्या सफाई करणाऱ्या व्यक्तीची इतक्या पटकन प्रतिक्रिया येते की , का नाव का पाहिजे? वरती तक्रार करायची म्हणून का ??

मकसूद भाई हे नाव सांगितल्यावर , मुन्नाभाई म्हणतो नाही, पण तुम्ही खरेच खूप चांगले काम करता, हॉस्पिटल ची साफ सफाई, कचरा उचलणे ..स्वच्छता ठेवण्याचे मोठे काम करता तुम्ही पण नेहमी डॉक्टर ना महत्व दिले जाते तुम्हाला नाही असे म्हणून एक जादू की झप्पी देतो ..ज्यातून खर तर ती शारीरिक जवळीक साधण्याची गरज ही एवढ्याच करिता की त्यातून मक्सुद भाई आणि त्यांचे काम तर आहेच पण त्यांच्या भावना ..त्यांच्या एवढ्या स्वच्छता ठेवण्याचे कोणी कौतुक , कदरही करत नव्हतेच पण साधी माणुसकी ही दाखवत नव्हते. त्यांच्या कडे बघण्याचा दृष्टिकोन .

दुय्यम दर्जा ..ही मकसुद भाई ना जाणवणारी खंत , त्यांच्या भावना मुन्ना भाईने समजून घेतल्या आणि भावनिक दृष्ट्या support करताना एक जादू की झप्पी त्यांना खूप आनंद , समाधान , आणि त्यांची काम करण्याची मानसिकता बदलून टाकते..की ते मुन्ना भाई ला म्हणतात ” बस अब रुलायेगा क्या”!! . आणि जा जा मी पुसतो ओल्या फरशीवर उठलेले shoes चे डाग..

म्हणजे काही क्षणापूर्वी चिडचिड करणाऱ्या या मकसुद भाईंच्या भावना , त्यांचे दुःख , राग , चिडचिड सहज समजून घेतल्याने त्यांची काम करण्याची इच्छा आणि उत्साह ही परत किती वाढला हेच जानविते ना!!

तसेच आहे प्रेमात ही जेव्हा पडतात तेव्हा ते प्रेम एकमेकांना आकर्षित करत असते. एकमेकांच्या मध्ये ओढ निर्माण करत असते.. लोहचुंबक माहिती ना त्याचा नियम कसा दोन विरुद्ध पोल attract करतात एकमेकांना.opposite poles attarct.

तसेच आहे स्त्री आणि पुरुष हे भिन्न लिंगी एकमेकांकडे आकर्षणाच्या नियमाने नैसर्गिकरीत्या च आकर्षित होणार..एकमेकांचे बोलणे ऐकत राहावे असेच वाटणार , भेटत राहावे वाटणार ..भेटीतून सहवास वाढणार..छोटे हलके स्पर्श ही सुखावणारे…त्यातून शारीरिक जवळीक ही वाढते..हे नैसर्गिक आहे….खरे तर यात भावनिक ओढ जास्त असते..आपल्यावर प्रेम करणारे आपले , स्वतःचे , हक्काचे कोणी तरी आहे, आपल्याला समजून घेणारे आहे.

आपल्या आवडी निवडी लक्षात घेवून , ठेवून आठवणीत ठेवून एखादी गोष्ट देणारे ..जसे मोग्र्याचा गजरा असेल किंवा गुलाबाचे फुल हे प्रेमाचे प्रतीक तर आहेच पण छोट्या छोट्या भावना जपण्याचे प्रतीक आहे..आणि जेव्हा या प्रेमात आपण एखाद्या सोबत नुसते असणे हे सुधा खूप secure feel करतो..किंवा समोरचा जेव्हा आपल्याला खात्री देत असतो , देत असते की मी कायम सोबत आहे तेव्हा कधी कधी नुसते शब्द अपुरे पडतात ..कदाचित शब्दातून तेव्हढ्या भावना थेट पोहचविता येत नाहीत जेवढ्या हलक्या स्पर्शातून ..

एखाद्या घट्ट मिठीतुन असतील खूप लवकर पोहचतात ..भावनांची नुसती शाब्दिक खात्री न होता ही शारीरिक जवळीक कदाचित आपल्या भावनिक गरजांवर , विश्वासावर शिक्कामोर्तब करत असते.खरंतर ती एक शारीरिक गरज नसते च, ती एक भावनिक गरज असते. भावना ना अतूट बांधून ठेवण्याचा किंवा कधी कधी भावनाना मुक्तपणे बाहेर काढण्याचा मार्ग ..माध्यम म्हणता येईल..एकमेकांविषयी ची आत्मीयता.. आपुलकी ..प्रेम व्यक्त करण्याचे माध्यम म्हणले तरी चालेल, तेव्हा आपण भावनिक दृष्ट्या प्रेमाची कबुली देत असताना सहजच हातात हात घट्ट पकडुन ते एक जणू एकेमकांच्या प्रेमाचे आश्वासन च देत असतो .

तसेच कोणाच्या दुःखात , कोणाची जवळची व्यक्ती गेली तर आपण शाब्दिक शब्दांचा आधार घेत असतोच पण त्या सोबत समोरच्याचे दुःख वाटून घेताना त्याला , तिला जवळ घेवून थोपटले तरी दुःखाच्या भावना शांत करताना , सांत्वन करताना ते नुसते वरवरचे नाही तर ते आतुंन आले आहे..खरेच आपल्याला व्यक्ती गेल्याचे दुःख तर आहेच पण आपण भेटायला गेलेलो ती व्यक्ती आता एकाकी आहे , तिचा आधार गेला असला तरी आपण सोबत आहोत हेच तर हा हलकासा स्पर्श जाणवून देतो ना…

भावनाना मुक्तपणे बाहेर काढण्याचा जसे मुक्तपणे ती व्यक्ती आपल्या सोबत अश्रू बाहेर गाळून ..म्हणजे कोंडलेल्या भावनाना वाट मोकळी करून देते आणि त्याक्षणी त्याची गरज असते..एकवेळ काही दिवसांनी त्याची गरज पडणार नाही ..पण त्याक्षणी सांत्वन करताना भावनिक , शाब्दिक आधार यासोबत समोरच्याचा हुंदका थोपविताना दिलेली हातावर हात ठेवून किंवा एक घट्ट मिठी असेल किंवा थोपटून जवळ घेणे ही भावनिक गरज असते..

तो क्षण च महत्वाचा असतो नंतर व्यक्ती वेळ जाते तसे स्वतः सांभाळते च .. कारण ते व्यक्त करताना खरंतर ती एक शारीरिक गरज नसते च, ती एक भावनिक गरज असते.पण ती भावना किती strong आहे आणि ती डायरेक्ट हृदयास भिडली जावी म्हणून वापरण्यात आलेले माध्यम म्हणजे हळुवार, कळत नकळत झालेला शारीरिक स्पर्श ..फक्त किती ही भावनिक झालो तरी या शरीराच्या आश्र्वासात्मक स्पर्शाला वासनेच्या आहारी जावू देवू नका..प्रेम आणि आपुलकी , ओढ , विश्वास , सुरक्षितता या भावना शारीरिक आकर्षण यातली मर्यादा यांची विण मजबूत होवू द्यात..

आपल्याला समजून घेणारी व्यक्ती आपल्या सोबत आहे..तिची साथ आपल्याला कायम लाभणार आहे तिच्या विषयी ओढ , प्रेम , विरह , विश्वास , आदर आणि कदर या भावना मजबूत करताना, strong होतं असताना पुरुषाने स्त्री ला डोकं टेकण्याकरिता दिलेला आपल्या मजबूत खांद्याचा आधार ही आपल्याला आयुष्यभर साथ देणारा आणि आपले रक्षण करणारा ..एक सुरक्षित , भक्कम आधार आहे हीच भावना strong करत असतो..तो खांद्याचा आधार म्हणजे भावनिक गरज असते ती आपलेपणाची जाणीव देणारी..

जसे दिवाळी सारख्या सणाला नवरा बायको करिता सुंदर साडी भेट देतो किंवा दागिना त्यातून ती वस्तू नाही तर तिच्या प्रती ते प्रेमाचे प्रतीक असते..तसेच काहीसे .. जसे आपल्याला परिचित असलेले प्रसिद्ध गाणे ” शब्दांवाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले ” ..शब्दांना मर्यादा असतात, पण भावना ना नसतात..मग त्याकरिता देहबोली , एखादी नजर ..त्या नजरेत दडलेले गूढ भाव ,

हलकासा स्पर्श ही व्यक्त होण्याचे माध्यमच आहे..म्हणजे शब्दांसोबत भावना पोहचविण्याकरिता , भावनांची गरज समजून घेण्याकरिता मार्ग ही आहेत..त्याचा अवलंब करून मुक्त व्हा, मोकळेपणाने जगा.

आपल्या आणि समोरच्याच्या भावना समजून घ्या… आयुष्य खूप सुंदर आहे ..


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!