Skip to content

खरंच मेंटल प्रॉब्लेम्स हे आपल्यापासून कायमचे दूर राहू शकतात का?

खरंच मेंटल प्रॉब्लेम्स हे आपल्यापासून कायमचे दूर राहू शकतात का?


सोनाली जे


मेंटल प्रॉब्लेम्स मध्येही प्रकार आहेत जे जन्मजात आहेत ते बरे होतील याची शाश्वती नसते. ते आपल्यापासून कायमचे दूर राहण्याची शक्यता फार कमी म्हणजे जवळजवळ नसतेच.

परंतु जे आपणच निर्माण केलेले मेंटल प्रॉब्लेम्स आहेत . जसे एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही , इतरांकडून तशी झाली नाही , आपण चांगले वागलो तरी समोरचा / ची आपल्या बरोबर चांगली पाहिजे ही अपेक्षा , तसे ती वागली नाही. म्हणून अपेक्षाभंग , त्रास , राग , चिडचिड करून घेतो ..आणि म्हणून मग आपण ही आपला चांगुलपणा सोडून देतो , पण का ?

कारण आपण अपेक्षा करत असतो चांगल्या वागण्याची असेल , कधी वस्तुरुपी असेल किंवा एखाद्याने / ने आपल्याला वेळ देण्याची असेल , कधी आपले च इतरांनी ऐकावे , इतर कोणी आपल्या मनाप्रमाणे वागले नाहीत , त्यांना योग्य वाटते तसे वागले तर किंवा आपल्याला आधी विश्वास देवून नंतर तसे नाही घडले , वागले तर विश्वासघात ..असे का? सगळ्याचे कारण आपणच आहोत ना .. आपण सगळ्या गोष्टी सहज सोप्या रीतीने accept करत नाही. आणि त्याचा त्रास स्वतः आणि इतरांनाही देतो.

कामाचा , शिक्षणाचा , व्यवसायाचा , भविष्याची काळजी याचा तणाव हा आपणच निर्माण करत असतो.अपयश यातून येणारी निराशा, प्रेमभंग , विश्वासघात यातून निर्माण होणारे औदासीन्य , इतरांच्या वर त्यांनी आपल्या मनासारखे वागले नाही म्हणून राग ही प्रतिक्रिया. चिडचिड. अविश्वास असेल , हे सर्व मानवनिर्मित च मेंटल प्रॉब्लेम्स आहेत ना??

परिस्थितीमुळे आलेलं नैराश्य, समोरच्याच्या वागण्यामुळे झालेली चिडचिड, अनिश्चिततेमुळे वाटणारी चिंता…. ह्या असह्य भावनांना ‘सह्य’ पातळीवर आणायचं !….. पहिला मंत्र…… I can stand it….

खरंच मेंटल प्रॉब्लेम्स हे आपल्यापासून कायमचे दूर राहू शकतात का ? तर हो !! कसे ?? याविषयी बघू. काही टिप्स चा उपयोग होतो का बघुयात : –

१. समजून घ्या : जी परिस्थिती आहे तिचा सारासार विचार करा , समोरच्याला त्याच्या भूमिकेत शिरून समजून घ्या.

२. शांत रहा पटकन react होवू नका . : एखादी व्यक्ती , परिस्थिती हाताबाहेर गेली तर आपण अस्वस्थ होतो , समोरच्याला दोष देतो, आणि स्वतः चे आणि समोरच्या चे ही मानसिक संतुलन बिघडवून टाकतो. यापेक्षा त्याक्षणी शांत रहा , काहीच react करू नका.

प्रतिक्रिया तात्कालिक , क्षणिक आहे आणि त्यात कोणतीही विचार प्रक्रिया समाविष्ट नाही म्हणून कोणत्याही परिस्थितीवर , परिस्थितीनुसार प्रतिक्रिया देऊ नका / react होवू नका.. त्याऐवजी परिस्थितीला योग्य विचार प्रक्रियेने प्रतिसाद / response द्या … ” React होणे हे अगदी लगेच घडू शकते परंतु प्रतिसाद देण्यास वेळ घ्या , तो देण्यास वेळ असतो .

प्रतीक्रिया तात्पुरती असते आणि ताबडतोब चुकीची प्रतिक्रिया देवून होणारा परिणाम आणि आपल्या हातातून गोष्टी कंट्रोल बाहेर जावून , कधी इतरांना त्रासदायक शब्द , कृती यातून पश्चात्ताप करून घेण्यापेक्षा , विचार करून , शांत राहून , वेळ घेवून प्रतिसाद द्या, प्रतिसादासाठी जबाबदार रहा, पश्चात्ताप करून कोणताही खेद बाळगू नका … मनाने हलके आणि मानसिकरित्या मुक्त व्हा …

३. मनावर कंट्रोल ठेवण्याकरिता काही techniques आत्मसात करा : जसे योगा , प्राणायाम , व्यायाम , mindfulness Technique शिकून ते आत्मसात करा. Motivational videos बघा , विपश्यना , रोज आज दिवसभरात काय झाले , कसे घडले आणि आपण काय करायला पाहिजे होते आणि काय केले याचे आत्मपरीक्षण करा. आपले वागणे , विचार बदलण्याकरिता नक्कीच उपयोगी पडेल.

४. आपल्या मनाला जाणून घ्या , मैत्री करा मनाशी .. काय होते मनात ? कशी प्रोसेस असते मनाची? Step by step बघुयात. सर्वप्रथम आपल्या मनात काय निर्माण होतात.

A. Thoughts.. विचार…

इतर वेळा किंवा परिस्थितीनुरूप आपण कसे विचार करतो , त्यांना कशी direction देतो , आणि आपले विचार भरकटू न देता त्यांना नियंत्रणात कसे ठेवायचे , हे आपण च आत्मसात केले पाहिजे. आणि तसे बदल घडविले पाहिजेत ..जसा अभ्यास करून पुढे तुम्ही करियर करिता पाहिजे ती ऑप्शन निवड करता तसेच आहे. तुमचे आयुष्य घडविण्याकरिता विचारांची योग्य निवड आणि त्यांना योग्य दिशा देणे , नियंत्रण ठेवणे गरजेचे.

B. Knowledge :

तुम्ही knowledge , भरपूर माहिती मिळवीत रहा , ज्ञान प्राप्ती करून घ्या , कोणतेही knowledge वाया जात नाही. तुम्हाला तुमच्या विचार , वागण्याच्या मागे काय कारण आहे हे सहज समजेल . तुमचे तार्किक , बौद्धिक ज्ञान तुम्हाला योग्य direction देईल. सारासार विचार करण्याची क्षमता तुमच्यात निर्माण होईल.

C. Wisdom : तुम्ही knowledge मिळविले , ज्ञान प्राप्ती ही करून घेतली . पण ज्ञान आणि माहितीचा वापर करणे म्हणजे wisdom ..शहाणपण. कसे विचार करावेत , दिशा द्यावी हे सर्व तोंड पाठ पण प्रत्यक्ष व्यवहारात त्याचा वापरच होत नसेल तर काय उपयोग ? जसे बघा..
Knowledge – Tomato is a fruit.

Wisdom – Not putting it into fruit salad. हे एक साधे उदाहरण झाले.

तसेच mindfulness techniue , stress and anger management technique याची माहिती करून घेतली . पण वेळप्रसंगी वापरणे गरजेचे ना. Knowledge : एखादी व्यक्ती चिडली तिला राग आला हे समजणं हे knowledge झाले.

wisdom : ती व्यक्ती रागावली म्हणून आपण आपली मनस्थिती बिघडवू द्यायची का ? तर नाही .. मग आपण काय करायचे. एक तर शांत राहून जसा तापलेला तवा असतो त्यावर तेल टाकले तर अजून भडका उडणार म्हणून तो तवा थंड होण्याची वाट बघायची. शांत राहायचे.

अगदी साधे आणि सोपे बघा. Yesterday I was clever now I am wise….

आपल्या विचारांचा असा प्रवास आहे. तो प्रवास कसा एन्जॉय करायचा , ते क्षण कसे आनंदी आणि उत्साही करायचे .. मग आपण प्रवास करतांना काय करतो , कधी आवडती गाणी ऐकतो, कधी निसर्गाचं सौंदर्य न्याहाळत , कधी मस्त खात पित , कधी सगळ्यांच्या बरोबर गप्पा टप्पा करीत, एकमेकांचे अनुभव शेअर करत. कधी गाण्याच्या भेंड्या असतील .

एकटेच प्रवासात असू तर कधी पुस्तक वाचन , कधी मस्त झोप काढून किंवा शांत राहून ही अनेक गोष्टी डोक्यातून काढून नवीन काही करता येईल असे प्लॅन्स .. भरपूर जन वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचा प्रवास सुखकर कसा होईल हेच बघतात. तसे आपण ही आपल्या मनाचा प्रवास सुखकर करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपले सगळे मेंटल प्रॉब्लेम्स कायमचे दूर होतील ना !!!

व्यक्ती तितक्या प्रकृती असे म्हणले जाते. प्रत्येक व्यक्तीचा वागण्याचा , बघण्याचा, विचार करण्याचा दृष्टिकोन हा भिन्न असतो. एखादी व्यक्ती आपल्या दृष्टीने चुकीचे वागते , विचार करते असे आपल्याला वाटत असते पण म्हणजे ती चूक आहे का ? त्या व्यक्तीच्या दृष्टीने ती बरोबरच असते.

बाह्य गोष्टींचा आपण आपल्या मनावर किती परिणाम करून घ्यायचा हे आपण ठरविले पाहिजे ना !! त्यावर नियंत्रण ठेवणे आणि परिस्थिती शी समायोजन करणे गरजेचे.

Jack Welch said: “If the rate of change on the outside exceeds the rate of change on the inside, the end is near.”

Techology – engineering मध्ये कसे formula same राहतो . कायमच A+ B = C पण भावनिक जगात , मनाच्या , विचारांच्या , अनुभवांच्या जगात प्रत्येक व्यक्तीनुसार फॉर्म्युला बदलत जातो. A + B = C , कधी D किंवा काही ही होवू शकते. याचा अंदाज ही कोणी लावू शकत नाही. तुमच्या मनात आता या क्षणी नेमके काय सुरू हे तुमच्या सोबत कायम असणारी व्यक्ती ही सांगू शकत नाही ओळखू शकत नाही.

थोडी फार accuracy पाहिजे असेल तर सतत मनाचा , विचारांचा , वागण्याचा , परिस्थितीचा विचार करून ती कंट्रोल मध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे .

५. मुक्तपणे , मोकळेपणानं जगायला शिका : प्रत्येक वेळी इतरांच्या , स्वतः जे वर्तन करतो त्याचे काही अर्थ लावले च पाहिजेत असे नाही ना ?? लहान मुलांसारखे मुक्तपणे , मोकळेपणाने जगायला शिका.

६. Assumptions and expectations : आपण नेहमी काही तरी assume करतो , गृहीत धरतो आणि त्यातून अपेक्षा वाढतात. आणि ते तसे झाले नाही की निराशा येते.

म्हणून जे आहे त्याचा स्वीकार करत रहा. आकाशातले तारे तोडत बसू नका.. जे कधीच शक्य नाही.ते कल्पना ही करू नका.. आपल्या क्षमता ओळखा , त्या वाढविण्याचा प्रयत्न करा. पण जे अशक्य च असेल ते कधी ही expect करू नका. जसे चिरंजीव राहायचे आहे. शक्य आहे का ? नाही ना!! Expectations are silent killer.

७. ज्या प्रमाणे expectations या silent किलर आहेत तसेच आपले विचार ही silent killer त्यावर कायम नियंत्रण ठेवा.
अमेरिकेत एक खूप मोठा गुन्हेगार असतो ..अनेक मोठ्या गुन्ह्यात त्याचा हात असतो .पोलिस बरेच दिवस त्याच्या शोधात असतात , शेवटीं एकदा तो सापडतो. कोर्ट त्याला फाशीची शिक्षा देते.

हे तिथल्या सायंटिस्ट ना समजते. ते त्या क्रिमिनल ला भेटतात आणि तू तसाही मरणार आहेस , फाशी होणार आहे तर आम्ही तुझ्यावर एक प्रयोग करू इच्छितो तू जर संमती दिलीस तर. तो विचार करतो. असेही मरणार आहोत कोणाला आपला उपयोग झाला तर बरेच आहे.
तो प्रयोगा करिता तयार होतो.

तो प्रयोग असतो की विषारी कोब्रा सोडायचा त्या criminal ला बंदिस्त खोलीत ठेवून . तो क्रिमिनल विचार करतो असे काय तसे मरण हे आहेच. चार दिवसांनी प्रयोग करण्याकरिता ते सायंटिस्ट येतात. किंग कोब्रा वरून सोडतात. पण तो खूप दूर असतो. या गुन्हेगाराला ते टोकदार पिन ने दोन ठिकाणी टोचतात. तो क्षणात मरतो ..जेव्हा हे सायंटिस्ट सांगतात की किंग कोब्रा ने त्याला काही ही केले नव्हते. पण त्याने चार दिवसात जे विचार केले आपण एकटेच असणार आणि तो किंग कोब्रा आपल्याला चावला तर , हे जे विचार होते ते त्या किंग कोब्रा मधल्या विषा पेक्षा ही खूप विषारी होते. आणि नुसती पिन टोचली तरी त्याचा केवळ या त्याच्या विषारी विचारांनी मृत्यु झाला.

खरंच मेंटल प्रॉब्लेम्स हे आपल्यापासून कायमचे दूर राहू शकतात , म्हणूनच कायम सांगते , भावना आणि मन , विचार, आपल्या इतरांच्याकडून असलेल्या अपेक्षा , आपल्या मनातले खयाली पुलाव यावर आपला स्वतः चा कंट्रोल ठेवायचा. अवघड आहे पण प्रयत्न करून जमविता येते.भावनांचे योग्य नियोजन करायला शिकायचे.

आयुष्य सुंदर आहे. त्याच्यावर प्रेम करायला शिका.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “खरंच मेंटल प्रॉब्लेम्स हे आपल्यापासून कायमचे दूर राहू शकतात का?”

  1. खूप छान explain करता तुम्ही खूप सुंदर लिहिता thank you so much

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!