क्षणभराच्या रागासाठी आयुष्यभर प्रेम करणाऱ्या व्यक्तींना गमावू नका!
सोनाली जे
प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी कोणा ना कोणावर रागविण्याची कोणाच्या तरी रागाचा सामना करण्याची वेळ येतच असते. आपण कोणावर रागावतो ? कधी विचार केलात का ?
आपण परक्या माणसावर कधी रागावत नाही . आपल्याच माणसावर रागावतो. आणि कधी हा राग लटका असतो जसे मुलांनी अभ्यास केला नाही तर त्यांनी तो करावा , शिस्त लागावी , सवय लागावी म्हणून आई रागावते पण तिच्या रागवण्यात ला हेतू चांगला असतो. पण मुलांनी ही हे लक्षात घेतले पाहिजे की आई आपल्या चांगल्या करिता आपल्यावर रागावत आहे.
आता रागवणारी हीच आई आपल्यावर खूप प्रेम करते , आपली काळजी घेते, आपल्या आवडी निवडी जपते, वेळप्रसंगी आपल्या सोबत आपली आईच असते. म्हणजे आपली आई क्षणभरासाठी आपल्यावर रागावते . का? तर आपण अभ्यास करावा , शिस्त लागावी आणि अभ्यासातून चांगले मार्क्स मिळवून आपल्या मुलांनी काही तरी ध्येय ठेवून ते पूर्ण करून आपल्याला सिध्द करावे.
मग एक चांगला नागरिक , चांगले व्यक्तिमत्त्व , नोकरी व्यवसाय यात यश मिळवून आपल्या पायावर उभे राहावे , जबाबदारी स्वीकारावी. पुढे जावून त्यांची घडी बसली की ते त्यांच्या संसार करण्यास ही सक्षम होतील हे पुढचे विचार तरी असतातच परंतु पूर्वी चे त्यांचे अनुभव , काबाड कष्ट करून घेतलेले शिक्षण , पदोपदी खाल्लेल्या ठेचा , आणि स्वतः काही तरी व्हायचे असेल तर स्वतच्या जिद्दीवर केलेले struggle असेल.
आपल्याला मार्गदर्शन नव्हते कोणाचे , आपल्याला support नव्हता , आपण जी दिव्य पार पाडली ती मुलांना लागू नयेत त्यांचे जीवन सुखकर व्हावे ,त्यांना शिक्षणात अडचणी येवू नयेत म्हणून आर्थिक आणि बाकी सगळ्या गोष्टींची काळजी , guidance आई वडील करत असतात. आई वडील आपल्या भल्या करीतच रागावत असतात. त्यांचे रागावणे चांगल्या अर्थाने, दृष्टीने बघा, त्यातून गैरसमज निर्माण करून घेवू नका , ते रागावले म्हणून तुम्ही उलट त्यांच्यावर रागवू नका. अनेकवेळा मुले घर सोडून निघून जातात, काही वेळेस आत्महत्या या सारखे अघोरी प्रकार करतात. म्हणून क्षणभराच्या रागासाठी आयुष्यभर प्रेम करणाऱ्या आई वडील , आपले बहीण , भाऊ , जवळच्या व्यक्तींना गमावू नका!
एक बुद्ध भिक्षुक असतात त्यांच्या कडे त्यांचे दोन शिष्य असतात.एक शिष्य खूप senior असतो एक खूप ज्युनिअर. एकदा बुध्द या शिष्यांना भिक्षा मागण्याकरिता दुसऱ्या गावात पाठवितात. दोघे शिष्य निघतात. जाताना एक ओढा ओलांडून पलीकडच्या गावात जावे लागे. ते तिथे पोहचतात. तर एक स्त्री तो ओढा ओलांडण्याचा प्रयत्न करत असते. पण त्यातले दगड घसरडे असतात त्यावरून ती पडते. तिला पुढे जाताना कष्ट होवू लागतात.
या दोघा शिष्यांना गुरुजींची शिकवण असते , परस्त्री ला स्पर्श करायचा नाही. Senior जो शिष्य असतो तो त्या स्त्री कडे दुर्लक्ष करतो , पण ज्युनिअर सुरुवातीला दुर्लक्ष करून ही त्याचे मन त्याला स्वस्थ बसणे जमू देत नाही. तो ज्युनिअर शिष्य त्या स्त्रीला हात धरून उठवतो आणि तिला खांद्यावर बसवून पलीकडे घेवून जातो. यावर senior जो शिष्य असतो तो ज्युनिअर शिष्यावर खूप रागावतो , पूर्ण रस्त्यात , मग दुसऱ्या गावातून भिक्षा मागून परत आपल्या गुरुजींना भेटे पर्यंत तो त्या ज्युनिअर शिष्याकडे थोड्या थोड्या वेळाने रागाने बघत असतो.
गुरुजींना बघितल्या बघितल्या तो senior शिष्य पहिले रागारागाने त्या ज्युनिअर शिष्याची तक्रार गुरूजीं कडे करतो. गुरुजी त्या ज्युनिअर शिष्याला बोलावतात. आणि त्याला विचारतात की तू परस्त्री ला स्पर्श केलास का ?
तेव्हा तो म्हणतो कोण. मग त्याच्या लक्षात येते आणि तो म्हणतो हो, आणि घडलेली घटना गुरुजींना सांगतो आणि म्हणतो की त्या स्त्रीला मी पलीकडे गावात सोडले पण आणि तिचे ओझे मी तिथे रिकामे करून आलो. पण हा senior जो शिष्य आहे तो अजून ही ते ओझे बाळगतो आहे. इथे येईपर्यंत आल्यावर ही अजून त्याच्या डोक्यात तेच विचार सुरू आहेत. तोच राग ठेवून आहे तो माझ्यावर. पण मी आश्रमात आल्यावर माझे रूटीन पण मार्गी लागले आणि मी सगळ्यांच्या करिता स्वादिष्ट जेवण ही बनविले आहे.
तेव्हा गुरुजी सीनिअर शिष्या ला समजावून सांगतात. बघ बाळा, असे आहे की तू माझ्या शिकवणूक आणि त्याचे पालन म्हणून योग्य वागलास , विचार केलास. पण या ज्युनिअर शिष्याने ही शिकवण आचरणात आणणे गरजेचे होते पण त्याने त्या स्त्री ला कोणताही अविचार करून किंवा मनात कोणता लोभ ठेवून स्पर्श केला नाही. त्याने तिची मदतच केली. आणि तो ते विसरून ही गेला. पण तू ही त्याच्यावर जे रागावला आहेस ते तू senior आहेस , त्याने काही चुकीचे वागू नये , त्याच्या हातून चुकीचे घडू नये म्हणूनच ना !!
तेव्हा त्या सीनिअर शिष्याचा राग ही मावळला. आणि त्याने ज्युनिअर शिष्यची माफी मागितली. ही गोष्ट सांगायचे तात्पर्य काय तर आपण ही आयुष्यात एखाद्याच्या चुकीच्या वागण्याने , आपल्या अपेक्षेप्रमाणे न वागल्याने , कधी अपेक्षाभंग झाल्यामुळे , कधी गैरसमजातून आपल्याच लोकांवर रागावून त्यांच्यापासून कायमचे दूर जाण्याचा , किंवा त्यांना कायम दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असतो . आयुष्यभर रागाचे ओझे घेवून ते बाळगत असतो.एकमेकांच्या कडून आपण ठेवलेल्या अपेक्षा आणि अपेक्षाभंग हे आपल्यातल्या रागाचे कारण असते. त्यांनी कसे वागावे हे आपण ठरवू नये. आपल्या दृष्टीने आपण योग्य वर्तन करावे. समोरचा रागावला म्हणून रागाची प्रतिक्रिया देवू नये.
या सगळ्या घटना या परिस्थितीनुसार आपण दिलेल्या प्रतिक्रिया च असतात. आणि परिस्थिती ही कायम सारखीच राहत नसते ती बदलत असते. एखादी व्यक्ती आपल्यावर त्या वेळी रागावली म्हणजे आपण तो राग आयुष्यभर धरून ठेवावे असे नाही ना ?? ..एक लक्षात घ्या , परिस्थिती ही क्षणिक आहे , ती आता काही क्षण , तास, दिवसात बदलणारी असते . पण तुमची प्रतिक्रिया जो तुमचा राग आहे तो एकमेकांना कायमचे दूर करू नये. तुमच्या मनात एकमेकांच्या विषयी तिरस्कार ,द्वेष निर्माण करू नये. तुमचे चांगले संबंध बिघडवू नयेत. दोघात दुरावा निर्माण करू नये. तुमची प्रतिक्रिया तुम्हाला एकमेकांपासून कायमचे गमावू नये म्हणून प्रयत्न करा.
एखादी व्यक्ती , परिस्थिती हाताबाहेर गेली तर आपण अस्वस्थ होतो , समोरच्याला दोष देतो, आणि स्वतः चे आणि समोरच्या चे ही मानसिक संतुलन बिघडवून टाकतो. यापेक्षा त्याक्षणी शांत रहा , काहीच react करू नका.
प्रतिक्रिया तात्कालिक , क्षणिक आहे आणि त्यात कोणतीही विचार प्रक्रिया समाविष्ट नाही म्हणून कोणत्याही परिस्थितीवर , परिस्थितीनुसार प्रतिक्रिया देऊ नका / react होवू नका.. त्याऐवजी परिस्थितीला योग्य विचार प्रक्रियेने प्रतिसाद / response द्या … ” React होणे हे अगदी लगेच घडू शकते परंतु प्रतिसाद देण्यास वेळ घ्या , तो देण्यास वेळ असतो .
प्रतीक्रिया तात्पुरती असते आणि ताबडतोब चुकीची प्रतिक्रिया देवून होणारा परिणाम आणि आपल्या हातातून गोष्टी कंट्रोल बाहेर जावून , कधी इतरांना त्रासदायक शब्द , कृती, राग यातून पश्चात्ताप करून घेण्यापेक्षा , विचार करून , शांत राहून , वेळ घेवून प्रतिसाद द्या, प्रतिसादासाठी जबाबदार रहा, पश्चात्ताप करून कोणताही खेद बाळगू नका … मनाने हलके आणि मानसिकरित्या मुक्त व्हा …
आपल्याच लोकांवर तात्कालिक , क्षणिक रागावून त्यांना कायमचे गमावू नका.
क्षणभराच्या रागासाठी आयुष्यभर प्रेम करणाऱ्या व्यक्तींना गमावू नका तर त्यांना जपा !! आयुष्य सुंदर आहे. रागाच्या भरात आपले आणि आपल्या जवळच्या लोकांचे जीवन आणि मनःस्वास्थ्य बिघडवू नका , आणि स्वतः बिघडवून घेवू नका. मोजकेच लोक आपले असतात, आपले त्यांच्यावर आणि त्यांचे आपल्यावर प्रेम , माया , आपुलकी , भावना असतात . त्यामुळे अशा आपल्या लोकांना आयुष्यभर जपा.
हे सगळे सांगणे सोपे आहे , पण प्रत्यक्षात करणे अवघड आहे.
काही वेळेस परिस्थिती खूपच हाताबाहेर जाते. काही ही केले तरी दोघांच्यात समजून घेण्याची मानसिकता संपते. रागात पारा एव्हढा चढतो , temper चढते तेव्हा काही ही केले तरी पटवून सांगितले तरी पटवून घेण्याची मानसिकता राहत नाही. अशावेळेस खूप क्वचित वेळेस एकमेकांना गमाविण्या शिवाय पर्याय च नसतात. दूर राहा. पण तेव्हाही एकमेकांना स्पेस द्या. वेळ द्या. शांत रहा. ही तात्कालिक परिस्थिती , क्षणिक राग हा कधी ना कधी शांत होईलच. . परिस्थितीची जाण येईलच.
सुबह का भुला अगर शाम को घर आ जायें तो उसे भुला नहीं कहते !!
आपणहून कोणाला दुखवू नका आणि गमावू नका. आयुष्यात आपले लोक आपलेच असतात. जे कायम आपली साथ देतात, त्यांच्या शिवाय आपले सुख , दुःख , आनंद, यश अपुरे असते. आपले कौतुक करणारे आपलेच असतात आणि आपल्यावर रागवणारे , आपली काळजी घेणारे ही आपलेच असतात.
म्हणून च क्षणभराच्या रागासाठी आयुष्यभर प्रेम करणाऱ्या व्यक्तींना गमावू नका!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



nice