“कौटुंबिक आनंद हाच अमूल्य ठेवा”
ज्योत्स्ना शिंपी
उद्योग जगतात यशस्वी कंपन्या व्यवसाय वृद्धीसाठी, उत्पन्न वाढविण्यासाठी तसेच जास्तीत जास्त नफा मिळविण्यासाठी निरनिराळ्या युक्त्यांचा, स्ट्रॅटेजीचा वापर केला जातो. सध्याच्या काळात “ग्राहक हा राजा आहे” या अनुषंगाने सगळ्या स्ट्रॅटेजी आणि ऍक्टिव्हिटी सगळ्याच व्यवसायात होत आहे.
ग्राहक राजा जास्तीत जास्त आनंदी, समाधानी कसा होईल या गोष्टीकडे कल असतो. मार्केटिंग मॅनेजमेंट मध्ये विक्री वाढवण्यासाठी “Customer Delight” (“ग्राहक आनंद”) म्हणून एक संज्ञा आहे.
ग्राहक आनंद एक आश्चर्य आहे. ज्यात ग्राहक त्याच्या किंवा तिच्या अपेक्षा अधिक आणि सकारात्मक भावनिक प्रतिक्रिया तयार करणे. ही भावनिक प्रतिक्रिया तोंडाच्या शब्दांकडे जातो.
ग्राहकांचा आनंद कंपनीच्या विक्री आणि नफा यावर थेट परिणाम करतो. कारण स्पर्धेतून कंपनी आणि त्याची उत्पादने आणि सेवा यात फरक करण्यास मदत होते. असे आढळून आले आहे की केवळ ग्राहकांच्या समाधानामुळे ब्रँड निष्ठा निर्माण होत नाही किंवा तोंडी सकारात्मक शब्दांनाही प्रोत्साहन मिळत नाही. तर त्यासोबत संवाद साधून ग्राहकांना आनंद प्रदान केला गेला पाहिजे.
संवाद हा आनंद निर्माण करण्याच्या संधींचा एक महान स्त्रोत आहे कारण ते वैयक्तिकृत केले जाऊ शकते आणि ग्राहकाच्या विशिष्ट गरजा आणि इच्छेनुसार बनते. .
ग्राहकांनी आपले उत्पादन, ब्रँड किंवा दुकान, तथाकथित तोंडाच्या शब्दांबद्दल सकारात्मक बोलावे. जागरूक ग्राहकांच्या जगात, 92% ग्राहक तोंडाच्या शब्दांना माहितीचा विश्वासार्ह स्त्रोत मानतात. आनंदित ग्राहक हे कंपनीसाठी जाहिरातीचे मौल्यवान स्रोत असू शकते. यशस्वी कंपन्या या भावनिकरीत्या लोकांशी संवाद साधतात.
थोडक्यात ग्राहक आनंद मध्ये ग्राहकांच्या अपेक्षेपेक्षा त्याला जास्त लाभदायक गोष्टी देण्यावर भर असतो. जसे काही त्याच्यासाठी ते सरप्राईज गिफ्ट च असते….
इथे फक्त एकच मुद्दा नमूद करावासा वाटतो की नफा वाढविण्यासाठी, बाजारात आपली पत वाढविण्यासाठी आणि टिकविण्यासाठी आपण एवढा आटापिटा करत असतो, आपण अशा ग्राहकांसाठी या गोष्टी करतो ज्याची त्याक्षणी आपल्याला शाश्वती नसते पण भविष्यात ते आपले ग्राहक होतील या आशेवर आपण नक्कीच वर्तमानकाळात त्यांना बऱ्याच गोष्टी देत असतो आणि त्यात दिवसेंदिवस भरही घालत असतो.
आणि जर आपल्याला या सगळ्या गोष्टी कळतात, उद्योग जगतात तसेच सगळ्याच यशस्वी कंपन्या याचा वापर करून आपले ध्येय साध्य करतात तर आपल्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका निभावणारे आपले कुटुंबीय, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी तसेच आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्ती यांना गृहीत न धरता आपण थोडेसे व्यक्त व्हावे.
(कारण असे आढळून आले आहे की बऱ्याच व्यक्तींच्या मनात प्रेम असते पण ते समोर व्यक्त करत नाही किंवा त्यांना व्यक्त करायला जमत नाही)
आणि सकारात्मक भावनेने आनंद, कौतुक, सुख, समाधान, प्रेम दिले तर आणि कधीकधी अपेक्षेपेक्षाही थोडेसे जास्तच दिले तर, तसेच त्यांनी आपल्यासाठी केलेल्या लहान सहान गोष्टींची नोंद घेऊन सकारात्मकरीत्या, प्रामाणिकपणे, खुल्या दिलाने त्यांना जर व्यक्तिशः त्याची पोचपावती दिली तर आपण त्यांच्या आयुष्यात पर्यायाने आपल्याही आयुष्यात भरपूर आनंद, सुख, समाधान, प्रेम अगदी सहजगत्या निर्माण करू शकतो.
तरी ही लहानशी कृती जी उद्योगजगतात यशस्वी ठरली आहे तर ही आपल्या आयुष्यभराची ही सर्वात अमूल्य पूंजी/ठेवा होऊ शकत नाही का??


