Skip to content

कोणीतरी सांगतं म्हणून करू नका, कारण त्या कोणीतरीला आणखीन कोणीतरीने सांगितलेलं असतं.

कोणीतरी सांगतं म्हणून करू नका, कारण त्या कोणीतरीला आणखीन कोणीतरीने सांगितलेलं असतं.


सोनाली जे


आपली सगळ्यांची च मानसिकता ही असते की कोणी तरी काही तरी सांगितले म्हणजे ते बरोबरच आहे. त्यांना तो अनुभव च आला आहे . त्यांना खात्री आहे . म्हणून मग आपण ही ते जसे सांगतील तसे वागतो . तसे प्रयत्न करतो. त्या प्रमाणे इतरांच्या विषयी आपले मत बनवितो.

बरेचदा बघा यश येत नसेल , कामात काही अडचणी येत असतील तर एखादी जवळची व्यक्ती काही उपाय सांगते किंवा एखाद्या जोतिषमार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तींचा reference देते.

आपण मात्र असा विश्वास ठेवतो की ज्या व्यक्तीने आपल्याला सल्ला दिला तिला खरेच अनुभव किंवा प्रत्यंतर आले असेल. आपण तेही प्रयत्न करून बघतो पण जेव्हा यश मिळत नाही .कामात येणाऱ्या अडचणी कमी होत नाहीत तेव्हा आपण ही गोष्ट आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगतो की काहीच फरक नाही पडत तेव्हा ती व्यक्ती सांगते. अग, / अरे मला खरेच काही अनुभव नाही त्यांचा . माझ्या ओळखीतल्या त्या अमुक तमुक ..त्यांना तो अनुभव आला म्हणून मी सांगितले.

म्हणजे काय झाले कोणतरी तिसऱ्या व्यक्तीला नशिबाने असेल, किंवा सततच्या प्रयत्नाने यश आले असेल किंवा जेव्हा आता अगदी सगळे प्रयत्न संपले असे वाटले तेव्हा या ज्योतिषांनी दिलेला मानसिक आधार , सल्ला त्या कमकुवत मनाला आधार देवून पुढे जिद्दीने. प्रयत्न केले त्यामुळें ही यश आले असते.

पण प्रत्येकच वेळी असं होत नाही ना ?

सीमा : अग , सेंट्रल मॉल मध्ये सेल लागला आहे. खूप छान variety आली आहे.

मीना : हो का ग, मी आजच जाते.

मीना : अग , सीमा जावून आले काल सेंट्रल मॉल काही नाही ग , तू सेल म्हणालीस म्हणून उत्साहाने गेले. बघितले तर फक्त वेस्टर्न कपड्यांवर सेल तो ही फक्त २० टक्के. आणि तुला माहिती मी तर वेस्टर्न फार कमी वापरते. मी जे कपडे select केले त्याकरिता एक तास घालविला आणि त्यानंतर बिलिंग ला गेले तर त्यांनी याच्यावर ऑफर नाही ..त्याच्यावर नाही असे करून त्यातला एकच ड्रेस ठेवला आणि बाकी परत जावून select करा सांगितले. परत एव्हढा वेळ वाया घालवण्यापेक्षा मी परत आले.

सीमा : नाही म्हणजे मी नव्हतेच गेले , गीता गेली होती तिकडे तिने मला सांगितले म्हणून मी तुला सांगितलें . Sorry ग. ती sorry म्हणाली पण यातून काय मीना चा वेळे पायी वेळ गेलाच आणि परत मानसिकता बिघडली . कारण एव्हढा वेळ कपडे size , feeting , trial घेवून शेवटी ऑफर नाही म्हणाल्यावर नाराज , निराश तर झालीच. पण परत जावून select करा म्हणल्यावर चिडचिड ही झाली. आणि इतके करून शेवटी काही न घेताच आली त्यामुळे उत्साह ही मावळला. म्हणून कोणीतरी सांगतं म्हणून करून नका, कारण त्या कोणीतरीला आणखीन कोणीतरीने सांगितलेलं असतं.

तसेच आजारपणं असते. कोणाला संधिवात , डायबेटिस , अगदी कोणाला कॅन्सर. असेल काही ना काही उपचार , औषधे कोणी तरी सुचवत असतात. कॅन्सर झालेली व्यक्ती मन , शरीर याने आधीच थकलेली असते. आणि औषधांचा , ट्रीटमेंट चे परिणाम याने पुढचे उपचार नकोत अशी मानसिकता झालेली असते.

तरी मग लोक काही उपचार सुचवितात की गव्हांकुर घे , अगदी होमिओपॅथी , आयुर्वेदिक , असेल किंवा शिवांभू असेल ..आणि वर सांगतात. ते सगळे प्रयत्न करून ही जेव्हा गुण येत नाही म्हणून सांगितल्यावर , माझ्या मैत्रिणीचे सासरे आहेत त्यांनी असेच काही काही प्रयोग केले होते. औषधोपचार केले होते. आता बरे आहेत. म्हणून मी सांगितले . आता तुला फायदा नाही झाला त्यावर मी काय करू ? म्हणजे कशाची खात्री नसताना ही उगीच दिशाभूल केल्यासारखे च ना ??

बरेचदा अमुक एक व्यक्ती अशी आहे हुं ..तमुक एक व्यक्ती अशी आहे असे एकमेकांकडून एकमेकांना सांगितले जाते. खरं तर खरा अनुभव कोणालाच नसतो ती व्यक्ती कशी आहे. यावरून च एक गोष्ट आठवते.

सुहास रोज संध्याकाळी मैखाना , पब किंवा अगदी साध्या भाषेत दारूचा गुत्ता म्हणले तरी चालेल तिकडे जात असतो . आणि तिथून पुढे वैश्या असतात तिथे. सुरेश हे बघतो आणि त्याच्या इतर मित्रांना सांगतो की सुहास असे असे रोज तिकडे जातो. हळूहळू गावभर चर्चा होते. त्यामुळे सुहास आणि त्याचे कुटुंब यांना वाळीत च टाकले असते. सुहास ची बायको नेहमी त्याला सांगत असे. त्याला समजावत असे पण सुहास ने कधी ऐकले नाही.

एकदा रस्त्यात रात्री पासून सुहास चे प्रेत बेवारस पडले असते. कोणी तिकडे बघत नाही. मदत करत नाही. राजा नेहमीप्रमाणे पाहणी करण्यासाठी बाहेर पडतो तेव्हा बघतो की त्याचे प्रेत कोणी बघत नाही . त्याच्या घरी कोणी कळविले नाही. तो इतर लोकांना कारण विचारतो तर ते म्हणतात की तो वाईट चाली चा होता. कायम दारू मय खाना आणि वेश्यांकडे जायचा. अशा माणसाला कोण मदत करणार?

शेवटी राजा त्याच्या सैनिकांना सांगतो त्याचे प्रेत त्याच्या घरी घेवून जावून नंतर त्यावर अंत्यसंस्कार करण्यास . स्वतः राजा त्याच्या घरी जातो. सुहास ची बायको राजाला बघून आणि सुहासचे प्रेत बघून म्हणते महाराज मला नाही पण सुहासला खात्री होती, की निदान तो मेल्यानंतर तरी नक्कीच कोणी ना कोणी त्यांना मदत करेल . सुहास अतिशय चांगला होता. इतरांना मदत करणारा होता. त्याला कोणी समजून घेतले नाही.
राजा आश्चर्यचकित होतो ..राजा विचार करतो हीचा नवरा गेल्यामुळे तिला दुःख होवून तिच्यावर मानसिक परिणाम झाला असावा. तेव्हा तो म्हणतो बाई शांत व्हा. आम्हाला त्याच्या विषयी सर्व माहिती समजली आहे.

तेव्हा ती म्हणते जी समजली ती इतरांकडून असेल ना ? एकाने दुसऱ्याला दुसऱ्याने तीसऱ्याला अशी सांगितलेली. खरे काय ते मला विचारा महाराज . माझा नवरा अतिशय चांगला , मेहनती होता. त्याचे रोजचे काम झाले की तो रोज सगळ्या दारूच्या गुत्त्यावर जावून तिथली दारू पैसे देवून ओतून देत होता का ? तर लोकांना व्यसन नको लागायला. दारू संपली आहे म्हणले की लोक माघारी जात.

त्यानंतर तो रोज वैश्यांकडे जात असे. त्यांना पैसे देवून त्यांना मजबुरी ने करावे लागणारे काम यापासून दूर ठेवत असे. त्यांना त्यांच्या दिवसाची कमाई दिली की त्यांना आपले शरीर विक्री करावे लागत नसे. महाराज खरेच जावून सगळीकडे चौकशी करतात तर वैष्या त्या सुहासला देव माणूस मानत होत्या. त्याच्या निधनाची बातमी समजताच सगळ्या अतिशय दुःखात बुडाल्या.

महाराज पुढे जेव्हा दारू गुट्ट्यावर गेले तेव्हा तिथे सुहास येवून पैसे देवून रोज सगळी दारू ओतून टाकायचा. कधी ही थेंब भर दारू प्यायला नाही हे समजल्यावर महाराजांना ही सुहास बद्दल खात्री पटली. त्याने शाही इतमामात त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.

आपल्या आयुष्यात नेहमीच असे घडते. आपण कधी खूप कोणाजवळ असू तर इतरांना त्याची असूया असते. आपण का तेवढे जवळ होवू शकत नाही हा विचार नसतो परंतु ती व्यक्ती का जवळ हा विचार नक्की असतो. आणि मग त्या व्यक्तीला दूर करण्याकरिता प्रयत्न केले जातात. त्या विषयी इतरांना काही काही सांगितले जाते. आणि जेव्हा त्या व्यक्ती पर्यंत ही गोष्ट येते तेव्हा ती व्यक्ती पारखी असल्याने समोरच्याला काय पाहिजे हे बरोबर समजते. आपले या व्यक्ती सोबत असणे कोणा तरी व्यक्ती ला नको आहे म्हणून या गोष्टी ..पण कशाकरीता ना ..मग आपणहून ती व्यक्ती दूर होते सगळ्यांच्या.

नेहा fail झाली . तर ती हुशार नाही. ती अभ्यासू नाही असे तिच्या मित्र मैत्रिणी नी पसरविले. अगदी नातेवाईक सुधा नेहा ला त्यावरून तिच्या माघारी बोलत असतं. एकदा जेव्हा नेहाची आई रस्तातून जात होती तेव्हा नेहाच्या आईच्या कानावर हे आले .तेव्हा नेहा तिचीच मैत्रीण हे दुसऱ्या मित्राला सांगत होती. त्यावेळी नेहाची आई थांबली आणि तिने दोघांना घरी नेले.

नेहाच्या रूम मध्ये घेवून गेले. नेहा निपचित बेड वर पडली होती. ती मानसिक आजारी होती. तिच्यावर रात्री घरी येत असताना कोणी चांडळाने बलात्कार केला ..तिच्या शरीराचे नुकसान तर झालेच पण मनावर मोठा आघात झाला आणि गेल्या वर्षी त्याही परिस्थिती मध्ये आम्ही तिला परीक्षा देण्यास प्रोत्साहन दिले. मध्ये थोडी बरी असते पण परत बिघडते. ती नापास का झाली हे केवळ आम्हाला माहिती होते. आणि तुम्ही जवळचे असून तिच्याविषयी इतरांकडे असे सांगत सुटता याचे वाईट वाटले.

कोणीतरी सांगतं म्हणून करून नका, कारण त्या कोणीतरीला आणखीन कोणीतरीने सांगितलेलं असतं. कोणाविषयी चांगले किंवा वाईट मत असेल , किंवा एखादी कामवाली चांगली आहे पण खरेच ती विश्वासू असते का ..तर बरेचदा ती फसवून ही जाते.

कोण कसे आहे हे इतरांच्या सांगण्यावरून ठरवू नकाच. पण बरेचदा स्वतः चे कान जे ऐकतात , डोळे जे बघतात , जे आपल्याला जाणवते ते ही तसे नसते. आपण कशावरून तरी तर्क बांधून समोरच्या व्यक्तीला नावे ठेवतो , दोष देतो .. पण बरेचदा अभ्यासू वृत्ती ठेवा. प्रत्येक परिस्थिती मागे काही ना काही कारणे असतात. आणि अनेकदा आपण मुळ कारणे बाजूला ठेवतो.. म्हणजे ती आपल्या लक्षात येत नाहीत आणि केवळ कृती कडे बघतो.

म्हणूनच बरेचदा खून करणारी व्यक्ती पळून ही जाते आणि खून झाला हे सांगणारी किंवा त्या स्थळी उपस्थित असणारी व्यक्ती दोषी मानली जाते.

कोणीतरी सांगतं म्हणून करून नका, कारण त्या कोणीतरीला आणखीन कोणीतरीने सांगितलेलं असतं. आणि आपण आंधळेपणाने , आपल्या वैचारिक क्षमता बाजूला ठेवून त्यावर विश्वास ठेवतो. आणि आपल्या लोकांना अनेकदा गमावतो.

त्यापेक्षा प्रत्येक गोष्टी कडे डोळसपणे बघायला शिका. इतरांची मते असतील , अनुभव असतील तरी स्वतः निरखून , पारखून मग निर्णय घ्या.
बरेचदा असे होते दिसते तसे नसते म्हणून तर जग फसते. मग चांगल्या गोष्टी असतील किंवा वाईट गोष्टी .दोन्ही बाबत हा नियम . चांगले वाईट , एखाद्या विषयी घाईत ठरविलेले मत बरेचदा चुकीचे असू शकते. आणि त्यावरून आपण व्यक्ती ला कायमचे दोषी ठरवू शकतो. वस्तू वाईट ठरवू शकतो.तसेच वास्तू ही.

कोणीतरी सांगतं म्हणून करून नका, तर स्वतः सजग रहा. तारतम्य वापरा. परिस्थिती चे गांभीर्य तुम्ही शांत राहून बदलू शकता. नक्कीच कारणे, परिस्थिती बदलण्याकरिता प्रयत्न करू शकता. ती ही वेळीच कारण एकदा response दिला गेला , reaction झाली की ती बदलता येत नाही .

आयुष्य सुंदर आहे. स्वतः वर विश्वास ठेवा आणि डोळसपणे जगा.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!