Skip to content

कोणावर चिडणार असाल तर विचार करून चिडा, कारण समजून घेण्याची पद्धत बंद झालीये.

कोणावर चिडणार असाल तर विचार करून चिडा, कारण समजून घेण्याची पद्धत बंद झालीये.


संयोगीता महाजन


राग.. राग…ओ.. हो.. कोणा कोणाला येतो…??सगळ्यांनाच येतो.कोणाला जास्त, कोणाला कमी ,कोणाला सारखाच तर कोणाला कधीतरी, पण चढतो सरसरसर….आणि उतरायला नाकीनऊ आणतो.

आणि काहींचा राग येतोही पटकन अन जतोही भुर्रकन…..!या रागाचे किती प्रकार सांगावे तितके थोडेच जस की नैराश्य, अपयश, मत्सरापोटी केलेला राग,इर्षेखोर स्वभाव असलेने राग राग… काळजी,प्रेमापोटी केलेला राग,स्वभावाचा गुणधर्म म्हणून केलेला राग…!

आज आपण या लेखातूनही समजून घेऊया काळजी, प्रेमापोटी झालेल्या चिडचिडेपणा….राग, राग..!

आमची सावी सुद्धा अशीच आहे. हसरी,बोलकी,आपल्या माणसांना जीवापाड जपणारी… हवं नको सगळं पाहणारी पण त्यांच्या काळजीपोटी चिडचिड करणारी.तिच्या नवरा विकीला तरी ती टिफिन,त्याच्या खाण्याच्या सवयी,कामाचं शेड्युल यावर ती हमखास चिडचिड करायची.

पण तिची ही काळजी, प्रेम विकीला कमीच कळायच.”मी आता लहान नाही ,सतत हिची भुणभुण ऐकायला “म्हणून तो तिला टोकाचं ओरडायचा.तिला मग खूप एकटं वाटायचं …कुणासाठी करतेय सगळं???इतकी चिडचिड, जीवाचा आटापिटा करूनही ,पुढील व्यक्ती काडीमात्र ऐकत नाही की ऐकायचंच नसतं????माझ्या प्रेमात काही कमी आहे का की मीच नकोशी???अस म्हणून ,तिला खूप वाईट वाटून रडू यायचं.

असं कित्येकदा आपल्या आजूबाजूला, आपल्या आयुष्यात घडतं. की खूप जीव लावतो,प्रेम करतो,आपलं आपलं म्हणतो पण काही मोठया आवाजात ,कधी नकळतपणे रागात सांगितले तर त्याचा विपर्यास केला जातो. अस का बरं होत असावं???

1.बदलती जीवनशैली
2.स्वतः बद्दल कमी जास्त ऐकण्याची सवय नसणे.

3.नकार पचवण्याची क्षमता विकसित नसणे.
4.समोरील व्यक्तीचे म्हणणे समजपूर्वक न ऐकता फक्त त्याला उत्तर कसे देता येईल या भावनेनं ऐकणे.

5.फक्त समोरचाच चुकतो, पुढचा चुकतो मी नेहमी बरोबर ही भावना
6.स्वतः बद्दल नको तितका अभिमान
7.रागवण्या पाठीमागील भावना न लक्षात घेता शब्दांतील तीव्रता लक्षात ठेवणे

अशावेळी आपलं कोण परकं कोण हेच कळत नाही. मुलं अभ्यास करत नाहीत म्हणून देसाई मॅम नी मुलांना रागावले तर त्यातील काही पालक आमच्या मुलाचा इन्सल्ट झाला म्हणून हमरीतुमरीवर…….! सईने आपल्या जावेच्या बारा वर्षाच्या मुलीला ताटातील सर्व अन्न खावे.

अस वाया घालवू नये म्हणून सांगितले. त्यावर तिच्या जाऊ अन मुलीने ,”घरात तू एकटी कमवत नाहीस…आमच्या खाण्यावर उठली का??” म्हणून आकाशपाताळ एक केलं. अशावेळी मग काय करावं???घरोघरी,कामाच्या ठिकाणी असे प्रसंग निर्माण होतात.आपली वाटणारी नातीचं यात जास्त त्रासदायक ठरू पाहतात.

अशावेळी आपल्या जवळच्या पहिल्या,दुसऱ्या, तिसऱ्या वर्तुळात कोण आहे ते फिक्स करावं.ज्यांच्या शिवाय आपल्याला अन त्यांनाही करमत नाही.चिडचिडेपणा केला तरी त्यातील भावना समजून घेतात अन नात्यांचा ओलावा टिकून राहतो ते पहिलं वर्तुळ. जे सतत सोबत असतात पण आपल्या चिडचिडेपणाला बऱ्यापैकी समजून घेतात.अन पुढील म्हणजे दुरून डोंगर साजरे असे बरं का…!मग अशी चिडचिड करणार असाल तर आपलं वर्तुळ तपासा आतलं,बाहेरचं, इकडून तिकडे,तिकडून इकडे उड्या मारणार शोधून काढा मग चिडचिडेपणा करा हक्काने..!

समजून घेणारी मन खरंच दुर्लभ होत आहेत.पुढचा मलाच का बोलतोय, तेही इतक्या बेंबीच्या देठापासून, हे समजून जगणं अत्यावश्यक आहे.त्यात सामावलेले प्रेम,काळजीची मऊ दुलाई असणारी अशी माणसं हृदयांतरीच्या कुपीत जपणं खूप आवश्यक आहे त्यातच स्वर्गसुख आहे.

कोणीतरी आपल्याला हक्काने रागावते,चिडते ही भावनाही सहज अन सुंदर आहे.त्यात काळजी,प्रेम,वात्सल्य भरलेलं असतं ही भावना का बरं कळू नये आपल्याला???किती दिवस त्या इगोला धरून राहणार????इर्षेखोर मत्सरापोटी केलेला राग वेगळा ….पण निरपेक्ष प्रेम,काळजी मायेपोटी केलेला राग राग समजून ते घ्यायला हवा ना!

माझी मैत्रीण रोहिणीने ही या व्हॅलेंटाईन डे ला एक पत्र पाठवलं त्याचा आशय ही खूप काही सांगतो.रोहिणी लिहते…” मी रागावणार,चिडणार तुझ्यावर अन तू लगेच सॉरी म्हणणार मग माझा राग जाणार…”त्यावर माझे उत्तर….”हो आतापर्यंत तेच करतेय ,पूढेही सॉरी म्हणेन पण तू माझे खूप हट्ट अन लाड पुरवायचे…! मग वाटलं ही स्पिरीट आपल्या लाईफमध्ये आली कोठून??? जगण्याचा दृष्टिकोन….. देऊन जातो… जो मला मिळाला…

तुम्हाला ही मिळेलच पण त्यासाठी समजूतदारपणा अन समोरच्या व्यक्तीबद्दल काळजी,प्रेम,आदर असावा लागतो..जो तुमच्याकडे आहे….मग घेऊ समजून अन जे कोणी आयुष्यात असे हक्काने चिडचिड करणारे आहेत त्यांना दिल से दिल तक जपूया. हीच खरी मानसिक बळ देणारी संपत्ती.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “कोणावर चिडणार असाल तर विचार करून चिडा, कारण समजून घेण्याची पद्धत बंद झालीये.”

  1. Khup chan, tumhi mhanta tas, samjhun n gheta veglach arth kadla jato, he nehmi ghadta majhya babtit,,,

  2. खूपच छान 👌👌👌 अगदी आमच्या मनातलं कागदावर उतरवले आहे…☺️☺️👏👏👏

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!