Skip to content

कोणाच्याही सावलीखाली उभे रहाल तर स्वतःची सावली गमावून बसाल.

कोणाच्याही सावलीखाली उभे रहाल तर स्वतःची सावली गमावून बसाल.


टीम आपलं मानसशास्त्र


आपल्याला आयुष्यात आपल्या स्वतः वर विश्वास नसतो तेवढा इतरांवर असतो. आपल्या knowledge , निर्णय , क्षमता यांची खात्री नसते. अनुभव नसतो. प्रत्येकवेळी आपल्या सोबत कोणी तरी आहे. आपल्याला आधार आहे. त्यांचे छाया छत्र आहे याची जाणीव होत असते. आणि मग आपण comfort zone मध्येच राहणे जास्त पसंत करतो.

एकदा एक राजा दुसऱ्या राज्यात जातो. तिथे त्याला एका शेतकऱ्याकडून दोन सुंदर पक्षी भेट म्हणून मिळतात. तो राजा खुश होतों आणि त्या दोन्ही पक्षांना घेवून येतो आणि आपल्या बागेत सोडतो . त्यातला एक पक्षी त्याचे सुंदर रंगी बेरंगी पंख पसरवून उंच झेप घेवून हवेत स्वच्छंद भराऱ्या घेत असतो. आणि त्याचे खाणे ही गोळा करून आणत असतो.

परंतु दुसरा पक्षी मात्र उडायला ही शिकत नाही. तो त्याच्या फांदीवर बसून राहतो. तेव्हा राजाला आश्चर्य वाटते असे का ?? म्हणून तो प्रधानजी ना बोलवतो आणि अशी चिंता व्यक्त करतो..आणि म्हणतो त्या शेतकऱ्याने आपल्याला फसविले . एकच पक्षी चांगला दिला. प्रधानजी राजाला शांत करतात आणि म्हणतात मी बघतो. तुम्ही थांबा. मला वेळ द्या थोडा.

काही दिवसात तो दुसरा पक्षी ही त्याचे सुंदर , रंगी बेरंगी पंख फुलवून आकाशात उंच भरारी घेत मुक्तपणे फिरतं असतो . हे बघून राजा प्रधानजी ना म्हणतो हे कसे शक्य झाले. तेव्हा प्रधानजी म्हणतात. पहिला पक्षी सामर्थ्यवान होता. त्याचा त्याच्या पंखांवर , त्याच्या स्वतः वर विश्वास होता.

सुरुवातीला तो ही छोटी छोटी भरारी घेवून झाडावर परत येवून बसे. हळूहळू त्याने थोडे थोडे अंतर वाढवून , आपली क्षमता वाढविली , आणि जसजसे त्याच्या पंखात मधले बळ वाढत जाईल तसे तसे आकाशात मोठ्या उंच भरारी घेण्यास सुरुवात केली. तर दुसरा पक्षी मात्र या झाडावर सुरक्षित असल्याचं समाधान मानत होता. त्याला तो पहिला पक्षी खाण्या करिता फळे , छोटे कीटक आणून देत होता त्यामुळे हा स्वतः उडण्याचे प्रयत्न ही करत नव्हता.

पहिल्या पक्षाच्या सावलीत स्वतः ला सुरक्षित समजत होता. त्याच्या मदतीने आपल्या गरजा बसल्या जागी पूर्ण करीत होता. त्याच्या मध्ये नवीन काही करावे , आपण स्वतः प्रयत्न करून आपल्या साठी खाणे मिळवावे , आपण उंच भरारी घेवून आकाशातल्या गमती जमती ची मजा घ्यावी ..आनंद घ्यावा असे वाटत असून तो प्रयत्न करत नव्हता.. भीती वाटत होती त्याला उडण्याची.

राजा विचारतो मग अचानक कसा तो उडायला लागला??

प्रधानजी :- राजा जी मला माफ करा , मला पक्षाला दुखविण्याचा ,त्रास देण्याचा उद्देश नव्हता , तो ज्या फांदीवर बसला होता ती फांदी मी तोडून टाकली तेव्हा तो पक्षी फांदीवरून खाली पडणार या भीतीने त्याने त्याच्या सर्व सामर्थ्य शक्तिनिशी आकाशात उंच भरारी घेतली.
मी फांदी तोडून फक्त त्याला त्याच्या comfort zone मधून बाहेर काढले. त्याला त्याच्यातल्या स्व ची , क्षमतेची जाणीव झाली..आणि आपल्या पंखांची उघड झाप करून , पंख फडफडविल्या शिवाय , उंच उडण्याशिवय पर्यायच नाही हे लक्षात आल्यावर त्याने प्रयत्न पूर्वक आपला comfort zone सोडला आणि आकाशात सामर्थ्य , बळ लावून उंच भरारी घेतली. मी बाकी काहीच केले नाही फक्त त्याला प्रोत्साहन दिले.

प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी अशी एखादी संधी येतेच येते जी तुमचं आयुष्य बदलू शकते, जिच्यात तुम्हाला जगण्याचा एक वेगळा अनुभव देण्याची , स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची क्षमता असते पण दुर्दैवाने आपण मात्र आपला “कंफर्ट झोन” सोडायला तयार नसतो.

प्रत्येकालाच आकाशाला गवसणी घालण्याची इच्छा असते. उंच भरारी घेण्याची इच्छा असते. काही तरी करण्याचे ध्येय असते. पण स्वतःलाच स्वतः विषयी नसलेली खात्री, विश्वास त्याने आपणच संधीला हुलकावणी देतो… पुढे जाऊन जेव्हा हाच कंफर्ट झोन नकोसा होतो आणि नाविन्यपूर्ण काही तरी करावसं वाटत तेव्हा वेळ निघून गेलेली असते….

कोणाच्याही सावलीखाली उभे रहाल तर स्वतःची सावली गमावून बसाल. प्रत्येकवेळी ज्याच्या सावली खाली असाल त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागावे लागेल. त्याचे ऐकावे लागेल. काही वेळा तुमची स्वतः ची बुध्दी असून ही ती बंद पेटीत कुलूप लावून अजून बंदिस्त करावी लागते.

बरेचदा स्वतः ची हुशारी , प्रयोगशीलता , नावीन्यपूर्ण काही करायचे असेल , आपल्या इच्छा , किंवा आपल्यात कुवत , क्षमता असून ही त्यापेक्षा कमी क्षमतेचे काम करून त्यातच समाधान मानावे लागते. आपली प्रगती खुंटते . नवीन संधी मिळत नाहीत. स्वतः चा आत्मविश्वास कमी होतो. Comfort zone आहे ना जावू दे सुरक्षित आहोत. नवीन कोणत्या गोष्टीची रिस्क नको घ्यायला ही भावना , मनोवृत्ती आणि बिनधास्त पणा निर्माण होतो. स्वतः चे अस्तित्व सिद्ध करायचे असेल तर हातपाय कायम हलवत राहिले पाहिजेत.

युद्धात रक्तबंबाळ झालेला सैनिक ही शेवटपर्यंत म्हणजे त्याच्या श्वासात श्वास असेपर्यंत युद्ध जिद्दीने , त्याच्यातल्या पूर्ण ताकदीने लढण्याचा प्रयत्न करतो. युद्धात मरण आले तरी चालेल पण परकीय सैन्याच्या तावडीत सापडायला नको, त्यांच्या सावली खाली जगणे नको म्हणून तो शर्थीने शेवटपर्यंत लढतो. काही वेळेस त्यातून तो स्वतः वाचतो आणि देशाला ही वाचवित असतो. काही वेळेस शहीद ही होतो परंतु इतरांच्या गुलामगिरीत राहणे मंजूर नसते त्यांना.

आयुष्य सुंदर आहे. कोणाच्याही सावलीखाली उभे रहाल तर स्वतःची सावली गमावून बसाल.म्हणून स्वतः ला ओळखा , स्व जागे करा, छोटी छोटी गोल पूर्ण करत जा. तर तुमचे मोठे goal achieve करू शकाल. स्वतः वर विश्वास ठेवा.नाविन्याचा ध्यास घ्या. आयुष्य सुंदर आहे. मुक्तपणे , मोकळेपणाने स्वच्छंदी भरारी घ्या.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!