कोणाच्यातरी सांगण्यावरून आपलं मत बनवणं महाभयंकर!!
टीम आपलं मानसशास्त्र
मितालीच लग्न झालं.. सासरची सर्व माणसं खूप छान.. समजून घेणारी ..तिला राग येईल ती वैतागेलं अस कधीच वागत नव्हते. ती लहान आहे तिला अनुभव कमी आपण वडीलधारे माणसं आपणच समजून घेतलं पाहिजे असं म्हणत सगळं सांभाळून घेणारे तिचे सासरचे माणसं. पण त्यांना समजून सांभाळून घेताना ती कमी पडत होती.. आणि याच कारण म्हणजे मितालीच्याआजूबाजूची माणसं…
मितालीची मैत्रीण होती तीचसुद्धा लग्न झालेलं..दोन वर्ष झाले तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला.. तिच्या सासरची माणसं चांगले नाहीत.. सतत त्रास देतात .. वरून गोड बोलतात पण मागे फक्त नाव ठेवणारी अशी सासरच्या मंडळींची ओळख तिच्या मैत्रिणीने केली होती .
तिच्या मैत्रिणीने तिला फक्त स्वतःचीच बाजू सांगितली. ती कुठे चुकते, ती काय बोलते, तीच स्वतःच वागणं कस आहे हे ती मितालीला कधीच सांगत नव्हती. आणि गरज नसताना नकोते उपदेश द्यायची, चुकीचे सल्ले द्यायची आणि मिताली सुद्धा
ती मैत्रीण जे सांगेल ते पटायचं.
खरं तर प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात.. प्रत्येकाचे विचार वेगळे, वागणं सुद्धा वेगळं असते आणि मग त्यातून आपण काय शिकायच काय ऐकायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. पण आपण बहुतेकदा पूर्ण जाणून न घेता आहे त्यावर विश्वास ठेवतो आणि समोरची व्यक्ती चुकीची की बरोबर हे परस्पर ठरवून त्याच्याशी तसच वागतो.
आज मिताली ची मैत्रीण सांगते की तिच्या घरचे चांगले वागत नाही पण तिची मैत्रीण सुद्धा चांगलं वागते की नाही हे कोणाला माहित. कदाचित तिच्याही घरचे स्वभावाने चांगले असतील, तिला चांगल वागवत असतील पण तिच्या मनात चुकीचे विचार असू शकतात,काही चुकीचे पूर्वग्रह तिच्याही मनात असतील म्हणून ती ते चुकीचे वाटत असतील.
मितालीने सासरची माणसं खूप चांगली असूनसुद्धा मैत्रिणीने जे सांगितलं त्यावर विश्वास ठेवून घरात नीट वागत नव्हती. आपल्या घरचे सुद्धा वाईट आहेत अस परस्पर ठरवून ती मोकळी झाली. आणि यामुळेच मितालीबद्दल तिच्या सासरच्या माणसांच्या मनात असलेलं प्रेम, तिच्याबद्दल असलेली काळजी सर्व कमी झालं. तिच्याशी वागताबोलताना त्यांनां विचार करावा लागत असे.
एखादी व्यक्ती ही कधीच सर्वांशी सारखं वागत नसते. आणि प्रत्येकाचे अनुभव हे वेगवेगळे असतात. प्रत्येकाच्या अवतीभोवती असणारी माणसं त्यांचा स्वभाव हा वेगळा असतो. म्हणून आपण कोणाला पूर्ण जाणून न घेता त्याला कोणत लेबल लावणं साफ चुकीचं. म्हणून कोणाच्या सांगण्यावरून आपण आपल मत बनवायचं नाही. आपण स्वतः जवळून जाणून घ्यायचं. कारण जर पूर्ण ओळख न घेता परस्पर विचार केले तर कोणतीच नाती कायमची टिकणे तर दूर पण लवकरच तुटण्याची शक्यता वाढते.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

