Skip to content

कोणाचंही स्वप्न आपल्या सहवासाने उध्वस्त होऊ नये, ही काळजी घ्या.

कोणाचंही स्वप्न आपल्या सहवासाने उध्वस्त होऊ नये, ही काळजी घ्या.


सोनाली जे.


आयुष्यात प्रत्येकाची काही ना काही स्वप्ने असतातच..आई वडिलांची स्वप्ने स्थिर स्थावर, मुले बाळे चांगली शिकावीत, स्वतच्या पायावर उभी राहावी , प्रगती करावी , या जगात जगण्याकरिता आवश्यक गोष्टी कराव्यात मुलांनी , आर्थिक स्थैर्य , कौटुंबिक , शारीरिक आणि मानसिक निरोगी राहावे, , त्यांचे लग्न , कुटुंब , नातवंडे , आपल्या म्हातारपणी गरज असते तेव्हा आपल्या सोबत असावे..

ही सर्वसामान्य लोकांची स्वप्ने असतात..मग काहीं वर्ल्ड टूर, करायची स्वप्ने बघतील, काही आपले छंद जोपासना, काही आपल्या ज्ञान आणि शिक्षण , knowledge चे उपयोग इतरांना व्हावेत याकरिता classes काढतील किंवा विनामूल्य मार्गदर्शन करतील, काही समाजात राहतो त्या समाज आणि गरजू लोकांना मदत करण्याचं स्वप्न बघतील..काही आपल्या नातेवाईक , मित्रं मंडळी यांसोबत वेळ घालविण्याचे स्वप्न बघतील..
थोडक्यात म्हणजे आर्थिक स्थिरता आली की बाकी गोष्टी करण्याची स्वप्ने बघत असतात.

प्रीती आज आई – बाबांना भेटायला गेली होती..खूप आनंदात होती आई बाबांना भेटायचे म्हणून..जाताना लक्षात ठेवून त्यांना आवडतात त्या सगळ्या गोष्टी आवरजुन घेवून गेली..आई बाबा ही खूप खुश…आई जेवून जायचे म्हणून नेहमी सारखा आग्रह ..प्रीती थांबली आईंना मदत करू लागली..बाबा खरे तर कशातच नसत..जे आहे त्यात आनंदी राहणे हा स्वभाव..

कोणाला कधी फार खोलात जावून चौकशी नाही किंवा कोणाला कडक शब्दात बोलणे नाही .त्यांचे ते आणि रूटीन ठरलेलं.दोघेही प्रचंड उत्साही.आई हौशी , विविध पदार्थ करायची आणि खावू घालण्याची आवड, पण त्याचमुळे इतर कोणी काही केले की ते पसंत पडत नाही त्यामुळे सूना ही थोडे अंतर ठेवूनच..एकाच शहरात असून तिघांचा त्रिकोण आणि आता अजून एक नातू पुण्यात आला त्याचा चौथा ..म्हणजे चौकोन..

अर्थात बाबांचे दुसरे लग्न ..आधीचा एक मुलगा त्याची दोन मुले..आईं ना सात बहिणी त्यामुळे जे योग्य स्थळ वाटले तिथे लग्न करून दिले .पण आई सुरुवातीपासून त्या बाबतीत थोड्या नाराज की दुसरे पण..तरी ही सगळे आवडीने करणे , नीटनेटके राहणे ..त्यांनाही दोन मुलगे च आता त्यांच्या स्वप्ना प्रमाणे दोन्ही मुले छान शिकली मोठ्या कंपनी मध्ये , हुशार , दोघांची दोन दोन घरे..सूना , नातवंडे सगळ्यात छान स्वप्न पूर्ती ..एकत्र नसतील राहत तरी अडी नडीला किंवा कोणाचे वाढदिवस असतील सर्व जण एकत्र नाही तर मग हॉटेल मध्ये आनंदाने साजरे करत ..सगळे सण वार एकत्र..पिकनिक एकत्र..सगळे आर्थिक दृष्ट्या कौटुंबिक दृष्ट्या स्थिर होते..

अचानक त्यांच्या आयुष्यात प्रीती आली.. तसे प्रीती आणि प्रसाद दहावीत एकमेकांच्या प्रेमात होते पण प्रत्यक्षात बोलणे नाही झाले..प्रेम अव्यक्त च राहिले.

पण ते प्रेम कदाचित खूप strong होते..दोघांच्या लग्नानंतर ही दोघांना एकमेकांविषयी खूप ओढ होती..दोघं ही ती दहवितीली नजर जपून होते..त्यात खूप खोल प्रेम दडले होते..

प्रीती आणि प्रसाद यांनी एकमेकांना अखेरीस शोधलेच ..आणि आश्चर्य म्हणजे एकाच शहरात ..हळू हळू भेटी वाढल्या..जवळीक वाढली..आणि दोघे ही कायम एकमेकांच्या सोबत .बडी celebrations असो किंवा सहज भेटी वाढू लागल्या आणि ती जवळीक खूप पुढे गेली..दोघांनाही विवाहित असून मुले असून ही एक स्टेप पुढे गेले पण आनंदी होते…उत्साही होते..आणि एकमेक खरेच सुखी होते ..काही गोष्टींची बंधने होती..आणि काही गोष्टींच्या मर्यादा होत्या..

काही प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या…कधी तरी मधून मधून वाद ही होत ..भेटी किंवा संवाद यात अंतर पडले तर किंवा मग काही अपेक्षा , priorities त्यात बसले नाही की प्रीती प्रचंड वाद घालत असे..मग चिडचिड, अबोला परत त्यातून एकमेकांस समजून. घेवून माफी आणि परत जवळीक ..असे होत होते..पण प्रीती आणि आईंची ओळख झाली ..प्रीती ला त्यांनी जरी स्वीकारलं तर ते तात्पुरते ..कायमचे नाही..प्रीती आई बाबांच्या करिता खूप मनापासून सगळे करायची ..हा एक धागा ही प्रसाद आणि प्रीतीला परत जवळ आणत असे..

अधून मधून आई बाहेर भेटत..घरी ही बोलावत..पण प्रत्येकवेळी प्रीतीला तिची चूक जाणवून देत..स्त्री ने मर्यादा पाळल्या पाहिजेत..पुरुष काय स्त्री कडे आकर्षित होणारच ना..लोण्याशेजरी विस्तव ठेवला तर लोणी पाघळणारच ना..

इकडे तर कायम कौतुक ही करायच्या पण एक कुठे तरी सोनाराची टोचणी असायचीच.. नातवंडे मोठी होत आहेत त्यांची काळजी व्यक्त होत असे..तर कधीं आम्ही तिला सून म्हणून करून आणले तिची काय चूक..तिची काळजी.तर कधी लोक काय म्हणतील याची काळजी…मोठ्या कंपनी मध्ये हुद्द्यावर असलेल्या मुलाची प्रसाद ची काळजी..त्याच्या ऑफिस मध्ये कोणी बघितले कोणाला समजले तर त्याच्या reputation ची काळजी…नातेवाईक त्यांची काळजी..

तर कधी तरी हे तपासून बघायचे की प्रीती ला प्रसाद मध्ये इंटरेस्ट आहे का त्याच्या पैशात..मग मधून मधून गोड बोलून मनात नसलेले प्रसाद बद्दल विचार की प्रसाद चे ही कर्तव्य आहे तुझ्याबद्दल , तुझ्या भवितव्य त्याकरिता त्याने काही तरी तुला दिले पाहिजे केले पाहिजे..तरी ही जर प्रीती ने त्याच्याकडून कोणत्याच अपेक्षा नाहीत असे म्हणले की थोडे दिवस शांत.

मग पुढच्या वेळी प्रसाद ने बायकोला एव्हढे कपडे , साड्या घेतल्या , मुलांना कपडे ..सोने घेतले भरपूर पैसे आहेत सारखे काही ना काही घेत असतो त्यांना कायम खुश ठेवत असतो…तुझ्या मुलांना पण करत असेल..तुझ्या कडे पण केवढे कपडे आहेत तो घेतो का तुला असे नकळत विचारून त्याचा ओढा मुलांकडे किती…बायको कडे किती..आणि किती ही झाले तरी तो तुझ्या पेक्षा जास्त त्यांच्या करिता करणारच ..

हे जसे वारंवार घडू लागले तसे प्रीती चे आई बाबा, प्रसाद यांच्या बरोबर भेटणे , बोलणे कमी होवू लागले त्यात सध्याच्या corona pandemic परिस्थिती मध्ये प्रसाद चे work from home सुरू झाले तसे त्याने प्रीतीला फोन करणे पूर्णपणे बंद केले .त्यावरून खूप वाद होवू लागले ..रोज दोन तीन वेळा तास तासभर बोलणारा प्रसाद आता फोन नाही कधी तरी मेसेज ..मुले घरी असतात फोन बघतात म्हणून अंतर ठेवून वागू लागला प्रीती ला या गोष्टी खूप त्रासदायक ठरू लागल्या..त्यातून सतत वाद..

चुकून प्रसाद बाहेर पडला काही कामासाठी तरी आई प्रीतीला फोन करत तुला भेटला का तुझ्या सोबत आहे का..भले त्यांना माहिती असेल प्रसाद कुठे आहे तरी असे की प्रीतीला कुठे तरी आशा वाटायची की प्रसाद आज भेटेल ..पण मग निराशा पदरी पडायची..

सारखे व्हेरिफिकेशन, खात्री याचेही प्रीतीला त्रास होत..आणि आता तर मागच्या वेळी भेटली प्रीतीं प्रसादला तेव्हा आई चक्क म्हणाल्या , तुझ्या बरोबर एवढं वेळ बाहेर असला तर मुलांना काळजी वाटते..सुनेला काळजी वाटते ते इकडे फोन करतात तुमच्याकडे बाबा आहेत का ..वेळेत घरी जावे ना…मुलांच्या जबाबदाऱ्या त्याच्यावर आहेत..खूप प्रेम आहे , बायको मुलांवर त्याचे ..तू त्यांच्या मध्ये का येतेस…एखाद्याचा संसार त्याची स्वप्ने अशी मोडू नयेत …पाप लागते ..मुले मोठी होणार त्यांची शिक्षणे , लग्न हे सगळे दोघांची स्वप्ने असणारच ना काही तरी मग असे कोणाची स्वप्ने का भंग करायची …

त्यात प्रीती आणि प्रसाद ही या pandemic मध्ये कुठे भेटणार हे प्रश्न च पडत..एक तर कामे , घरात मुलांच्या मध्ये बिझी असलेला प्रसाद तसाही प्रीती करिता वेळ देवू शकत नव्हता आणि वेळ असेल तरी जागा कुठे भेटण्याकरीता त्यातून दर वेळी आई बाबांकडे भेटले की तेवढ्यापुरते पॅच अप ..

एकदा तरी कोणताही विषय नव्हता आईनी काही सांगण्याचा तरी मुद्दाम फोन करून सांगितले की प्रसाद सगळ्यांना घेवून बाहेर फिरायला गेला आहे पिकनिक ..बघ किती आनंदी असतो ..काळजी घेतो सगळ्यांच्या करिता एव्हढे करतो. आई प्रत्येक वेळी एकीकडे जवळीक ही साधत होत्या प्रीती बरोबर आणि एकीकडे कानउघाडणी…त्यातून व्हायचे तेच झाले प्रीती प्रसादच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या आनंद , स्वप्ने यापासून कायमची दूर गेली..त्यानंतर तिने प्रसाद ला कधी ही भेटण्याचा प्रयत्न केला नाही…किंवा फोन नाही , मेसेज ला reply नाही..

आज खूप वर्षांनी आई बाबांना भेटायला म्हणून प्रीती गेली होती..ते ही आईनी बोलावले होते म्हणल्या जसे ठरले होते ना प्रसाद आणि त्याची बायको आता परत खूप आनंदात आहेत…त्यांच्या सारखे सुखी कोणीच नाही ..दृष्ट नको लागायला हो आता कोणाची ..ही आनंदाची बातमी देईन तुला तेव्हा पेढे वाटेनं म्हणाल्या होत्या…आज पेढे खायला ये नक्की…

आई बाबा यांचं सोबत असणे ..मोठ्यांचा आशीर्वाद असणे आणि त्यांची आपल्या कुटुंबा विषयी स्वप्ने हे प्रीती सारख्या आई बाबा नसलेल्याला मुली पेक्षा अजून कोण चांगले समजू शकते…

स्वतः ची स्वप्ने पूर्ण होत नसतील तरी इतरांच्या स्वप्नांना उध्वस्त करू नका…तुमची स्वप्ने पूर्ण करण्याची ताकद , सामर्थ्य, त्याकरिता तयारी …तुम्ही स्वतः करा…

इतरांनी त्यांची स्वप्ने बाजूला ठेवून तुमची पूर्ण करावीत अशी अपेक्षा ही ठेवू नका ..परिस्थिती ला सामोरे जा…accept करा वास्तव आणि तुम्ही तुमच्या स्वप्नांना पूर्ण करा…इतरांना दुःख देवून , त्यांचा हेवा किंवा द्वेष करून नाही…तुमची जेवढी कुवत आहे तेवढी स्वप्ने बघा..अंथरूण बघून पाय पसरा..नाही तर अंथरूण मोठे घेण्याची क्षमता निर्माण करा.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!