कोणतेही नातेसंबंध जोपासताना या लेखात दिलेल्या बाबी नक्की मदत करतील.
सौ. मिनल वरपे
ती व्यक्ती जेव्हा आपल्या बाजूने विचार करते.. आपल्या मनाप्रमाणे वागते बोलते तेव्हा ती व्यक्ती खूपच चांगली आणि तीच जर आपल्या मनाविरुद्ध, इतरांच्या बाजूने विचार करत असेल, बोलत असेल तर आपल्याला ती व्यक्ती क्षणातच आपल्याला खटकते..
आता याच साधं उदाहरण द्यायचं झालच तर बघाना आपला एखादा मित्र जो नेहमीच आपल्यासोबत असतो.. आपण जे बोलू तेच तो खर मानतो.. आपल्या विरुद्ध कधी काही बोलत नाही.. पण जर तो कधी आपल्याला आवडणार नाही अस काही बोलला तर लगेच आपल्याला तो परका वाटू लागतो..
खरं तर अशावेळी ती व्यक्ती तीच्याजागी योग्य असू शकते.. नेहमी आपण योग्य निर्णय घेतो.. चुकीचे विचार करून कोणते निर्णय घेत नाहीत म्हणून ती व्यक्ती आपल्याला कायम साथ देत असते आणि ज्यावेळी आपण चुकीचे वागतोय किंवा चुकीचे विचार करतोय अस त्या व्यक्तीला वाटते त्यावेळी ती व्यक्ती आपल्याला साथ न देता आपल्याला तिचे विचार बोलून दाखवते पण आपण आपल्याच जगात असतो त्यामुळे आपल्याला ते विचार पूर्ण समजून न घेता.. ती व्यक्ती अस का बोलत असेल याची कारण जाणून न घेता त्या व्यक्तीलाच दोष देऊन आपण मोकळे होतो.
प्रत्येक व्यक्ती ही कायमच बरोबर असेल अस नसते.. कधी कोणी चूक करू शकतो … रागात असताना चुकीचे अर्थ लावून चुकीचे विचार करू शकतो.. तर कधी भावनेच्या आहारी जाऊन नकोते निर्णय घेऊ शकतो.
कधी आपण खूपच आनंदात असतो त्यावेळी आपल्याला आपला आनंद सोडून काहीच दिसत नाही मग त्यावेळी आपल्याला सगळच चांगल वाटू लागते.. आजूबाजूचे माणसं, त्यांचे विचार हे सुद्धा आपल्याला चांगले वाटतात. पण तेच जेव्हा विरुध्द स्थिती असते म्हणजेच दुःखात आपल्याला खूप एकटं वाटू लागते.. कोणीच माझ्या सोबत नाही . जो तो आपल्या जगात आहे.. माझा कोणीच विचार करत नाही अस आपल्याला वाटते मग अशावेळी कोणी कितीही चांगल वागत असेल तरी आपल्याला ते पटतच नाही.
आपण जेव्हा रागात असतो त्यावेळी आपण कोणाचं ऐकून घेण्याच्या स्थितीत नसतो.. सगळेच माझ्या विरोधात आहेत अशी आपण तक्रार करत राहतो .. आपल्याला कोणाचेच विचार आणि कोणाचं वागणं आवडत नाही.. कारण आपण रागात असतो
म्हणजेच आपली जशी मनस्थिती असेल तसे आपले विचार असतात आणि तसेच आपण वागत असतो.. आपण चांगल्या मनःस्थितीत तर आपल्याला सगळं सकारात्मक जाणवते आणि आपण जेव्हा वाईट म्हणा किंवा चुकीच्या मनःस्थितीत असतो त्यावेळी आपल्याला आजूबाजूला सगळच नकारात्मक वाटू लागते..
आजूबाजूच्या व्यक्ती, त्यांचे विचार, त्यांची वागण्याची पध्दत ही खर तर तिचं असते पण आपल्या मनःस्थितीनुसार आपण त्यांना बरोबर किंवा चुकीचं ठरवत असतो…
आपण इतरांना योग्य किंवा अयोग्य ठरवण्यात आपला वेळ घालवण्यापेक्षा आपले विचार आपलं वागणं योग्य आहे की अयोग्य याची पडताळणी केली तर आपल्याला आपण चुकतोय की बरोबर वागतोय हे लक्षात येईल..
कोणाची साथ हवी असेल तर पहिले आपण आपली साथ दिली पाहिजे.. पाहिले स्वतःची ओळख आपल्याला असेल तर आपणच आपल्याला साथ अगदी चांगल्या प्रकारे देऊ शकतो . पण नेहमी माझंच खर.. मीच योग्य.. अशी आपली भूमिका असेल तर आपल्याला आपण चुकीचे असताना इतर सगळे चुकीचे जाणवतील.
म्हणून पाहिले आपल्याला आपण काय वागतोय हे कळायला हवं .. जेव्हा आपण त्याच परीक्षण करू आणि जर चुकत असू तर सुधारणा करून तस वागत असू तेव्हा इतरांच्या काही बोलण्याने किंवा वागण्याने आपल्याला काहीच फरक पडणार नाही.आपल्याला कोणी आपल किंवा कोणी परक असे कोणतेच विचार आपल्या मनात न येता आपण आपल्या दिशेने प्रवास करणार….
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


