केवळ पैसा कमविण्याच्या नादात आपण या १३ महत्वाच्या गोष्टी गमावतोय!!
सोनाली जे.
आताचे लाईफ हे खरेच खूप धावपळीचे आहे. आणि uncertain .. झाले आहे. वाढती महागाई, अवास्तव अपेक्षा , उच्च राहणीमान , शैक्षणिक सोयी सुविधा याकरिता खर्च होणारा खर्च , महागड्या वैद्यकीय सोयी आणि सुविधा , आणि चंगळवाद.दिखावा.स्पर्धा., स्टेटस, किंवा संपत्ती संचय असेल , भविष्यकालीन तरतूद असेल.
आता अंबानी यांच्या दृष्टीने दोन चार कोटी केवळ वाढदिवसाला खर्च करतात..तर नीता अंबानी यांच्या चाळीस चाळीस लाखाच्या साड्या ..हे काय आहे तर स्टेटस चा विषय आहे …किंवा दिखावा आहे.
मध्यमवर्गीय किंवा उच्चभ्रू लोकांनी स्पर्धा म्हणून , अनुकरण करून जरी थोडा फार हजारो , लाखो खर्च केला तरी तो मिळविण्याकरिता किती धावपळ, कष्ट किंवा त्याग करावे लागले असणार आहेत.
आपल्याला ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत त्या आता तरी मिळवू किंवा आपल्याला ज्या मिळाल्या उशिरा मिळाल्या किंवा मिळाल्याचं नाहीत त्या पुढच्या पिढीला सहज उपलब्ध व्हाव्यात , त्यांना आपल्या सारखे कष्ट करावे लागू नयेत म्हणून आपण पैसा कमविण्या च्या मागे असतो.
तसेच आपल्याला पैशाअभावी अनेक गोष्टींचे sacrifice करावं लागले म्हणून तर सगळ्यात चांगल्यातली चांगली शाळा, विद्यापीठ मुलांना मिळावी मग किती ही पैसे खर्च करावे लागले तरी तयारी पाहिजे म्हणूनच प्रयत्न किंवा याउलट दैनंदिन खर्च एव्हढे जास्ती आहेत की ते पूर्ण करता करता नाकी नवू येते..
जसे घरखर्च , लाईट बिल,पाणी बिल , घरभाडे किंवा गृह कर्ज असेल ते किंवा इतर कर्ज, travelling expenses रोजचे , मग मुलांची ही स्कूल बस असेल किंवा इतर ही.school fees , college fees, क्लासेस , छंद वर्ग , असे असंख्य वाढते खर्च भागविण्यासाठी आपल्याला नेहमी जे इन्कम मिळते त्यव्यतिरिक्त पैसे मिळावे असे वाटते म्हणून तसे प्रयत्न ही करतो आपण.
पण केवळ पैसा कमावण्याच्या नादात आपण किती गोष्टी गमावतो हेच आपल्या लक्षात येत नाही..जसे की..
१. आपल शारीरिक स्वास्थ्य..भरपूर कामाच्या नादात वेळी अवेळी जेवण, जागरण , शारीरिक कष्टाची कामे असतील तर आपल्या कुवती किंवा क्षमतेपेक्षा जास्त करणे. त्याचा परिणाम अशक्तपणा , acidity , डायबेटिस , हृदयविकार , b.p. अशा प्रकारची शारीरिक दुखणी मागे लागतात.सतत स्क्रीन वर बघून डोळे दुखणे ,डोळ्यांची ताकद कमकुवत होणे.डोके जड होणे
२. बुध्दी चे काम किंवा बौध्दिक काम : – अती जास्त प्रमाणात बुध्दीचे काम केल्याने ही मानसिक ताण , तणाव ,स्ट्रेस , वाढतो.anxiety वाढते..आणि बैठ काम असल्याने व जर बसण्याची सोय व्यवस्थित नसेल तर पाठदुखी ,. मान , कंबर दुखी , सतत एकटे आणि कामात राहून मानसिक एकटेपणा ,
३. काही वेळेस जास्त आर्थिक प्राप्ती करिता बाहेर गावी , देशी , जावे लागते ..जसे I.T .company किंवा इतर ही कंपनी तर्फे , on-site जावे लागते त्यात जास्त आर्थिक प्राप्ती होते परंतु फॅमिली पासून दूर राहावे लागते किंवा मग family सकट जायचे तर तिकडे त्यांची राहण्याची सोय, तिथली भाषा, तिथले शिक्षण , संस्कार यांचा होणारा परिणाम याला तोंड द्यावे लागते.एकटे गेल्यास बाहेरून वस्तू घेवून येण्यापासून , जेवण करण्यापासून ,सगळी स्वच्छता आणि मेंटेनन्स स्वतः च करावे लागते.
४ . कुटुंबापासून दूर राहिल्या ने होणारी मानसिक ओढाताण किंवा छोट्या छोट्या आनंदाना मुकावे लागणे.. त्यांच्या सोबत खेळ असतील वेळ देणे असेल किंवा बाहेर घेवून जाणे.ट्रिप असेल किंवा एखादे छान नाटक सिनेमे बघणे अस.जसे की शारिरिक आणि भावनिक दृष्ट्या लांब असणे .जवळीक असेल तर कुठे तरी रिलॅक्स होवून परत नवीन उत्साह निर्माण होतो .काम करताना नवीन energy मिळते.
तर कोणाला काही झाले दुखणे खुपणे , हॉस्पिटल मध्ये असतील तर शारीरिक दृष्ट्या लांब असल्यामुळे काहीच करू शकत नाही हतबल वाटते..भावनिक दृष्ट्या ही डळमळीत होतोच …आणि अशावेळी सगळ्यांसोबत असताना वेगळे की इतर सर्वांचा आधार असतो इथे एकटे पडतो.
मुलांच्या किंवा इतर घरातल्या कोणाच्या छोट्या गोष्टी पासून मोठ्या गोष्टी पर्यंत आनंद गमवावे लागतात दूर राहावे लागते त्यामुळे अगदी मुलांचे जन्म असतील ..त्यांचे पहिले पालथे पडणे असेल, चालणे , बोलणे या सकट रोजच्या जीवनातल्या घडामोडी ..आनंद , दुःख, त्रास या सगळ्यात आपण त्यांची साथ देवू शकत नाही अशा अनेक गोष्टींना मुकतो आपण.ते आनंद गमावतो आपण.
काही गोष्टी शिकवायच्या असतील ..प्रॅक्टिकल हेल्प असेल तर त्या ही शिकविणे सांगणे याकरिता वेळ नसतो , कमी पडतो किंवा प्रत्यक्ष समोर नसल्याने शिकवता येत नाहीत.
५ कधी कधी कामाच्या व्यापात कमी संवादाचा अभाव येतो आणि एक अंतर निर्माण होते..मग नवरा बायको असतील मुले असतील किंवा आई वडील कोणी ही..
६. आपण या सगळ्यात आपल्या स्वतः ला ही हरवत चाललो आहे..स्वतः पासून दूर होत चाललो आहोत ..आपल्या आवडी निवडी , छंद जोपासायला वेळ मिळत नाही त्यातून मिळणारी energy आपण गमावत आहोत.
७ . मित्र मैत्रिणी , नातेवाईक या पासून दूर जात आहोत..केवळ इच्छा असून आठवणी असून फोनवर बोलण्याकरिता, भेटण्याकरिता वेळ नसतो..त्यातून गैरसमज वाढून दुरावा ही निर्माण होतो.समजून घेणारी घेतात ही.
८.सतत ची पैसा कमावण्याची स्पर्धा निर्माण होत राहते…आपल्याकडे हे नाही त्याच्या कडे ते आहे त्याकरिता अजून कमवा असे होत राहते..आणि स्टेटस , ब्रँड , स्टँडर्ड यात पूर्ण अडकून पडतो आपण जसे ३ इडियट मध्ये चतुर…
९ . नवीन गोष्टी शिकण्या करिता वेळ मिळत नाही ..कमी पडतो..स्किल develope करण्याकरिता वेळ कमी पडतो.
१०. समाधान , शांतता घालवून बसतो ..जसे एक छोटा फ्लॅट असेल तर मोठा घेवू मग बंगला मग रो हाऊस घेवू असे करत आहे त्या गोष्टी मधले समाधान मिळवीत नाहीच पण त्या गोष्टींकडे आपण बघत राहतो आणि आपली कमावण्याच्या मागे मुळची शांतताच घालवून बसतो.
११. हव्यास ..स्वार्थ …सतत हे घ्यायचे ते घ्यायचे या गोष्टींचे हव्यास वाढतात.कपडे असतील मोबाईल असेल ब्रँडेड वस्तू असतील जसे की आज काय अँड्रॉइड मोबाइल, उद्या आय फोन पाहिजे यातून सतत हव्यास वाढत जातो आत्मिक समाधान संपुष्टात येते.
१२. घरचे गृहीत धरतात…तुम्ही कोनाकरिता काही केले तर त्यात काय म्हणजे ते गृहीत धरतात त्यांना त्यात काहीच कौतुक राहत नाही उलट आपल्याकडून अपेक्षा च वाढत राहतात आणि केलेच पाहिजे तुम्ही कमावलेच पाहिजे मानसिकता राहते किंवा मानसिकता वाढीस लागते.
१३. काही वेळेस पैसा कमविण्यासाठी इतर ही मार्ग अवलंबिले जातात..काही वेळेस अवैध मार्ग असतील, चोरी, कधी शरीर विक्री ही असेल किंवा तसेच नाही पण शरीराची हवास भागवून ही ..यात स्वत्व गमावल्या सारखेच ना!!
थोडक्यात पैसा हा किती ही कमावला तरी कमीच पडतो ..मग कुठे थांबायचे किंवा कुठे आवर घालत राहायचे आणि कोणत्या गोष्टींना महत्व द्यायचे priority द्यायची , आनंद मिळवायचा हे आपण ठरवायचे असते…कमावता कमावता सर्वस्व गमावण्याची वेळ नको.
आयुष्यात वेळ, व्यक्ती, संधी गमावली तर ती परत मिळत नाहीत…मुले मोठी झाल्यावर त्यांचे बोबडे बोल ऐकता येतील का?? सायकल शिकताना मागे धरून पळन्याची संधी ते सायकल शिकल्यावर मिळेल का? त्या क्षणी तुम्ही तिथे नसाल तर वेळ , व्यक्ती, वाढ थांबून राहत नाही..
पैसा असेल तर सगळ्या गोष्टी मिळतील हे जितके खरे तितकेच पैशाचे नियोजन करा आणि त्यातून आपला मिळणारा आनंद , आपली माणसे , सोबत ,छंद सगळ्यांना ही जपा. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सगळ्यात महत्वाचे…आहे त्यात आनंद द्विगुणित कसा करायचा ते शिका…गरजेपुरता नक्की कमवा..पण गरजा वाढवून नाही ..
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


