Skip to content

कुणाच चुकलं यापेक्षा काय चुकलं यावर भर द्या…!!

कुणाच चुकलं यापेक्षा काय चुकलं यावर भर द्या…!!


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


चुका…..!! या कुणालाच चुकल्या नाहीत. कधी नकळतपणे , अनावधानाने चुका होतात.काही अपवाद आहेत.(चुका मुद्दाम करणारीही काही लोकं असतात.)आणि चुका होणं ठीक आहे.पण सारख्या सारख्या त्याच चुका होणं चांगल नाही. एकदा चुक झाली तर माणसाने ती सुधारली पाहिजे. नाहीतर चुकांवर चुका…आणि त्याच चुकांवर पांघरूण घालायच म्हणजे फार अवघड….याने आयुष्य कधी चुकीच होऊन जाईल याचा मागमूसही लागणार नाही.

आणि आपल्याला तर खूप घाणेरडी सवय असते.काय चुकलय यापेक्षा कुणी माती खाल्ली… कोण चुकलय यातच जास्त रस असतो.असा सामंजस्याने कधी विचार नाही करत की…असं का झालं…?नक्की काय चुकलं असेल…?? इतके समंजस तर आपण नाहीच न…??

तुझं चुक की माझं चुक…??तुझं माझं तुझं असा पकडापकडीचा खेळ या चुकांच्या बाबतीत पहायला मिळतो.अर्धा निम्मा वेळ तर तुझं चुक की माझं चुक यातच निघून जातो.इतका वेळ असतो का आपल्याकडे…?

बापरे..! खरच कधीकधी या चुकांच्या खेळात वेळेच महत्त्व आपण विसरून जातो. वेळ निघून जातेही पण तरीही तुझं चुक की माझं चुक हे कोडं काही केल्या सुटत नाही.आणि आपणही ते कोडं सोडवल्याशिवाय शांत बसत नाही. खरच नं…कित्ती तो आपला हट्टीपणा…!

माझाही आजचा दिवस माझी चुक की त्याची चुक हे शोधण्यातच गेला.मी त्याला दोष देत राहिले आणि तो मला.आणि यातून साध्य तर काही झालच नाही.उलट अमूल्य असा वेळ वाया गेला होता.(माझ्याच हट्टी स्वभावामुळे)आणि मला यावेळी वेळ वाया गेल्याच दुःख अजिबात नव्हतं.दुःख होतं ते शोध न लागण्याचं.

असच होत असेल न तुमच्या बाबतीतही…,,,??कुणाच चुकलं हे जरूर शोधावं पण त्याहीपलीकडे जाऊन काय चुकलं हे शोधायला हवं.ते जास्त गरजेचं आहे. पण आपण कुणाच नि किती चुकलं हेच शोधत बसतो.

घराघरात सतत काही ना काही वादविवाद होत असतात. पण मग आपण अशा वेळी तु असं नव्हतं करायला पाहिजे… तुझ्यामुळेच असं झालं असे एकमेकांना बोल लावून मोकळे होतो.पण नेमकं काय झालं..??काय नि कुठे चुकलं..?? याचा विचारच करत नाही.

आणि मग काय जे चुकलय ते शोधायच राहतं नी सुधारायचही राहतं.कधी कधी अगदी बेसिकही आपण लक्षात घेत नाही.मान्य आहे , की प्रत्येकवेळी आपणच चुकतो असं नाही… किंवा नेहमीच समोरचा चुकतो असही नाही.आणि काही लोकं अशीही आहेत की स्वतःची चुक नसताना केवळ कोणतीही गोष्ट ताणली जाऊ नये म्हणून अगदी सहजपणे ‘Sorry’ म्हणतात.तर कुणी तुझीच चुक आहे असं म्हणून अजून भांडणाला भर पाडतात.

खरच..कुणाचं चुकलं याऐवजी आपण काय चुकलं यावर भर का देत नाही…?? काय चुकलं यावर भर दिला तर चुका सुधारण्याला चालना मिळेल.आणि त्याच चुका पुन्हा होणार नाहीत याची आपल्याला काळजीही घेता येईल.तुझी चुक की माझी चुक यामध्ये खर्च होणारा वेळही वाचेल. तोच वेळ योग्य ठिकाणी खर्च करता येईल.

आणि कोण चुकलं हे कळायलासुद्धा हवं….म्हणजे ज्याची चुक ज्याला त्याला कळायला हवी..आणि ती त्याने मान्यही करायला हवी.पण….कोणाच चुकलं हा विचार न करता आपलं काय चुकलं….किंवा नेमक कुठे चुकलं हे लक्षात घ्यायला हवं. म्हणून कुणाच चुकलं यापेक्षा काय चुकलं यावर भर द्या…त्याने आयुष्यातील अर्ध्या चुका तर सहजपणे सुधारतील…….!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!