कुणाच्याही आयुष्यात शिरायचं असेल तर आनंद घेऊन शिरा!
सोनाली जे
आयुष्यात दोन प्रकारच्या लोकांपासून कायम सावध रहा .
१. जे तुमच्यात जी कमतरता , उणीव , कमी आहे हे सांगतात पण तुमच्यात ती कमतरता , उणीव , कमी नाहीच मुळी.
२. जे तुमच्यातली खुबी , खासियत , गुण सांगतात .पण ती खुबी, खासियत , ते गुण तुमच्यात नाहीतच.
कित्येकवेळा आपल्याला स्वतः ला माहिती नसते की आपल्याकडे खूप चांगल्या गोष्टी आहेत. आणि आपण आपल्या सोबत इतरांना ही खूप आनंदी ठेवू शकतो.
असे म्हणतात की ,
कुणाच्याही आयुष्यात शिरायचं असेल तर आनंद घेऊन शिरा!
याचे कारण काय की प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार हे असतातच. काही लोक सगळे असून आनंदी नसतात. तर काही लोकं हे काही नसून ही आनंदी असतात. शेवटी कशातून आनंद घ्यायचा हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून आहे.
सागर सकाळीच त्याच्या छोट्या पाच वर्षाच्या भाचीला भेटायला गेला तेव्हा तिच्या सोबत तो खूप आनंदी होता. तिच्या बरोबर खेळत होता. दंगा मस्ती सुरू होते. दोघेही खूप खुश होते.
हे बघून सागर ची काकू सिया ला म्हणाली बघ तो किती खुश आहे लहान मुला मध्ये. बघा तुम्ही विचार करा , आता सगळे प्रयत्न संपले असले तरी adopt करा. तो ऑप्शन आहे.
सिया ला काकुंचे टोचून बोलणे थोडे वाईट वाटले पण तसे तिच्या ऑप्शन चा विचार ही करावा वाटले.
सिया ती तिच्या खोलीत गेली व्हॉटसॲप ग्रुप वर नेमकी एक बातमी वाचली की , पाच वर्षाची मुलगी कोणी adopt करणारे आहे का ? या पाच वर्षाच्या मुलाचे आई वडील आता covid मध्ये गेले.
तेव्हा सिया ने विचार केला खरेच जर आपण तिला adopt केले तर ..
आणि तेवढ्यात तिच्या सासूनी तिला चहा पिण्यासाठी खाली हाक मारली. सिया गेल्यावर गप्पा मारत चहा पीत असताना . सासू ने ही ग्रुप वरची तीच त्या मुलीची बातमी सांगितली आणि तू आणि सागर का घेत नाही तिला adopt असे विचारले. तेव्हा सासू आणि सून दोघी ही मोकळेपणाने बोलू लागल्या तुम्हाला चालेल का ? तेव्हा त्या अगदी आनंदाने हो म्हणाल्या.
सिया आणि सागर ने त्या मुलीला दत्तक घेतले आणि जिया नाव ठेवले. आणि तिच्यावर जीवापाड प्रेम करू लागले , तिच्या सोबत दंगा मस्ती , तिचे लाड पूर्ण करताना ती आधी जी बावरली होती. आई वडील गेल्यावर आपले कोणीच नव्हते . ते सिया आणि सागर ने आपलेसे केल्यावर , तिला आपल्या आयुष्यात आणल्यावर आणि तिच्या आयुष्यात शिरल्यावर भरभरून प्रेम दिले, आनंद दिला , तिला आपलेपणा दिला, तिच्या सर्व गरजा भागवू लागले. तिच्या सोबत खेळताना तेही एका आनंदी बालकाच्या भूमिकेत जावू लागले.
जिया ला काही कळत ही नव्हते इतकी लहान होती ती. मात्र तिला एक खंबीर आधार सागर आणि सिया ने दिला. तिच्या आयुष्यात पसरलेला अंधकार , असुरक्षितता , अनाथ याचा नाश करून आनंदाची ज्योत पेटविली .तिला ते दोघेही खूप आनंदी ठेवू लागले.
बरेचदा काय होते की आपण आपले आपले असे म्हणणारे लोक च आपल्याला त्रास देतात , दुःख देतात , वरून जरी गोड बोलत असतील तरी आतून मात्र द्वेष करतात. Compare करत असतात. त्यामुळे चांगले असलेले संबंध , आनंदी क्षण , नाती ही सुधा दुःखात बुडून जातात.
कुणाच्याही आयुष्यात शिरायचं असेल तर आनंद घेऊन शिरा!
आपण ही सगळ्यांनी असे आनंद एकमेकांना दिले पाहिजेत, बोलून चालून , विचार मांडून , एकमेकांना भेटून निखळ ,निरागस आनंद देण्याचा आणि त्यातून घेण्याचा ही प्रयत्न करा.
कोणाच्या आयुष्यात खूप त्रास असतात. गरीबी असते. तर कोणी एक अंथरुणाला खिळून असलेला पेशंट असतो. तर कधी कोणाची जोडीदार नसते. जोडीदार नसतो. अशावेळी त्यांचे दुःख कमी होण्याकरिता , त्रास कमी होण्याकरिता मोकळेपणाने बोला , ज्या आनंदी गोष्टी करता येतील त्या करा.
जसे ३ idiots मध्ये रांचो ला माहिती असते तो केवळ इथे अभ्यास करायला आणि शिकायला आला आहे. त्याला त्या डिग्री चा ही हव्यास नसतो. ती त्या खऱ्या रणछोड दास चांचड ला मिळणार असते. पण त्याला त्याचा आनंद मिळवून देण्याचा या रांचो चा प्रयत्न असतो. तर आपल्या चांगल्या मित्रांना ही योग्य मार्गदर्शन करून त्यांच्यातला आत्मविश्वास वाढवून त्यांच्या आवडत्या क्षेत्रात त्यांना काम करण्याचा आनंद हा रांचो मिळवून देतो.
आयुष्य सुंदर आहे . कुणाच्याही आयुष्यात शिरायचं असेल तर आनंद घेऊन शिरा! त्यांनी कायम तुमची चांगली आठवणच काढली पाहिजे. तुमचे नाव जरी समोर आले तर चेहऱ्यावर एक आनंदाची लहर दिसली पाहिजे.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
