कुटुंब आनंदी ठेवण्याच्या दहा टिप्स.
सोनाली जे.
मनुष्य , प्राणी असेल तरी एक आपले कुटुंब असतेच प्रत्येकाचे. आणि प्रत्येकाची धडपड असते की आपले कुटुंब सगळ्यात जास्त आनंदी असावे. सध्या प्रत्येकाचे आयुष्य एव्हढे ताण , तणाव आणि धावपळीचे झाले आहे. कामाकरीता दूर अंतरावर जाणे , त्याची धावपळ , परत वेळेत पोहचणे याचा मानसिक ताण , कामाच्या ठिकाणी कामाचा ताण असतो.
मुलांना अभ्यासाचा , वाढत्या competition चा ताण , घरची स्त्री ही नोकरी करणारी असेल तरी घरच्या कामाचा , ऑफिस कामाचा आणि मुलांचा शिवाय अनेक जबाबदाऱ्या त्यांचा ताण पडत असतो. अशावेळी प्रत्येकाला या
मनावरचा मानसिक ताण आणि शरीराचा शारीरिक त्रास दूर करून घरी आल्यावर काही क्षण सुखाचे , आनंदाचे ,तणावरहित घालवायचे असतात.
कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी असतील तेव्हा संपर्ण कुटुंब आनंदी असते. एक सदस्य जरी तणावग्रस्त असेल तर संपूर्ण कुटुंब आनंदी राहत नाही.
कुटुंब आनंदी ठेवण्याच्या दहा टिप्स बघुयात :-
१. प्रत्येकाची जबाबदारी : आपले कुटुंब आपले आहे हे समजून घेणे . आणि ते आनंदी राहण्याकरिता, ठेवण्या करिता प्रत्येकाने जबाबदारी उचलली पाहिजे.
२. सर्वांनी सोबत राहा. वेळ द्या : सर्व कुटुंबातील सदस्यांनी शक्यतो एकत्र राहावे. एकमेकांशी संवाद , चर्चा केली पाहिजे. एकमेकांना वेळ देणे गरजेचे आहे. मोबाईल , सोशल मीडिया मुळे एकमेकात खूप दुरावा येत आहे.तरी सर्वांनी त्यातून वेळ काढून एकमेकांना प्रायोरिटी दिली पाहिजे. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली पाहिजे. मार्गदर्शन करणे जरुरी. वेळेला मदत ही . आणि सोबत राहिले पाहिजे.
३. Breakfast , जेवण याची एक वेळ ठेवा : या निमित्ताने सर्वजण एकत्र येतात. Attachment वाढते. कधी काही महत्वाचे सांगायचे असेल तर त्यावेळी शेअर केले जाते.
४. राग, चिडचिड , वाद ,भांडणे टाळा. बाहेरचा कोणाचा राग घरी येवून काढू नका. घरात ही कोणावर चिडचिड करू नका. वाद घालू नका. घरातले वातावरण शक्यतो सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा.
Negative गोष्टी वरून वाद घालू नका. तू हे केले नाहीस, तुला हे येत नाही यापेक्षा सगळ्यांनी मिळून ते कसे करता येईल हे बघणे गरजेचे. Positive राहणे गरजेचे.
५. घरातल्या लहान मुलांच्या सोबत वेळ घालवा . मुलांना नवीन गोष्टी शिकवा . त्यातून सगळे घर मुलांच्या भोवती फिरते आणि लहान मुलांच्या सारखे छोट्या गोष्टीतले आनंद मिळवितात.
६. घरातल्या सदस्यांचे दोष काढू नका. चांगल्या गोष्टी बघा. बायको कडून स्वैपाक करताना मीठ कमी पडले .चव बिघडली तर तिला स्वैपाक येतच नाही. इथून सुरुवात होते आणि मग सगळे दोष च दोष काढले जातात. त्यापेक्षा चांगल्या गोष्टी बघा आणि त्या चे कौतुक करा. अजून उत्साहाने ती सदस्य काम करेल. आणि स्वतः सोबत ती इतरांनाही आनंदी ठेवेल. आणि सर्व कुटुंब ही . कारण शांतता मेन्टेन करणे शक्य होत असते.
७. घरातल्या सर्व सदस्यांनी मिळून activity करावी.
रोज थोडा वेळ मनोरंजन असेल , खेळ खेळा. पत्ते असतील , बुद्धिबळ , किंवा कधी नाव गाव यांच्या भेंड्या किंवा इतर अनेक गोष्टी एकत्र कराव्यात जेणेकरून वातावरण आनंदी राहते. कारण तेव्हा सगळे विसरून सगळे जण मनोरंजन किंवा इतर गोष्टीत गुंतून सगळे विसरून जातात.
८. सहली , प्रेक्षणीय स्थळे , मंदिर .. धार्मिक गोष्टी एकत्र करा. ज्यातून एक वेगळी उत्साह निर्मिती होत असते. त्याच त्याच वातावरणातून , कामातून बदल घडत असतो. आणि थोडे रिलॅक्स होवून बाकी गोष्टीतून , निसर्ग स्थळे .प्रेक्षणीय स्थळे यातून अजून मजा येत असते. आणि आनंद निर्माण होतो.
९. कुटुंबातल्या सर्व सदस्यांचा आदर करा आणि विश्वास ठेवा. प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व वेगळे असते. विचार वेगळे असतात. क्षमता , भावना वेगवेगळ्या असतात. त्यामुळे प्रत्येक सदस्य हा महत्वाचा असतो त्यामुळे प्रत्येकाचा , वडीलधारी असतील किंवा लहान मुले प्रत्येकाचा आदर करा. त्यांचे मत ही विचारा. त्यांना बोलू द्या. त्यांच्यावर विश्वास ठेवा.
१०. आर्थिक , सामाजिक , मानसिक , भावनिक आधार द्या. घरातल्या कोणत्याही व्यक्तीला कधी insecure feel होवू देवू नका. आर्थिक दृष्ट्या प्रत्येकाचा विचार करा. त्यांना त्या दृष्टीने आधार द्या. मानसिक आधार द्या.
काही समस्या असतील तेव्हा मदत करा.
प्रत्येकाच्या भावना समजून घ्या. आपल्या माणसांची काळजी घ्या. संवाद साधा.
आयुष्य खूप सुंदर आहे. आपले कुटुंब हे आपले आहे. त्यात आपल्याला सुख , समाधान , आपलेपणा आहे. आणि प्रेम , वात्सल्य ,काळजी या सगळ्या गोष्टी आहेत . आपल्या लोकांची ओढ असते . आपली धडपड सगळी कुटुंबाला सुखी , आनंदी ठेवण्याकरिता च तर असते. म्हणून च आपण नेहमी नवीन opportunity घेत असतो. नोकरी मध्ये असेल , नवीन गोष्टी शिकण्यात असेल . किंवा समाज आणि आजूबाजूच्या लोकांमध्ये आपल्या कुटुंबाला एक विशिष्ट दर्जा मिळवून देण्याकरिता सगळ्यांची धडपड असते.
आपल्या कुटुंबाला आपण चांगले ओळखत असतो. आजकाल पूर्वी सारखे कुटुंब प्रमुख राहिले नाही .प्रत्येकाला आपण च मुख्य वाटत असतो. गाडी ड्राईव्ह करणारा जसा ड्रायव्हर असतो तसा कुटुंब ही पुढे नेणारा कुटुंबाचा एक कर्ता असावा. त्याच्यावर सगळ्यांनी विश्वास ठेवणे गरजेचे आणि त्याच्या शब्दाला respect देणे गरजेचे आहे. त्यामुळे बारकावे लक्षात घेवून अजून आनंदी कसे ठेवता येईल याकडे लक्ष द्या. आयुष्य सुंदर आहे . आनंदी कुटुंब सोबत असेल तर अजून च त्याची सुंदरता वाढते.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



खूपच छान प्रबोधन झाले आहे