‘कितीही वेगाने पळालो तरी आपल्या पुढे कोणीतरी असणारच….!!’
आकांक्षा किरणराव आळणे
लातूर.
स्पर्धा-माणसाला प्रेरीत ठेवणारी तर कधी माणसाला औदासीन्य अवस्थेत नेणारी ठरते.स्पर्धेमूळे प्रगती साधता येते.जगात स्पर्धा आहे म्हणूनच चढा-ओढ आहे.प्रत्येक व्यक्ती,प्रत्येक कंपनी स्वतःला स्पर्धेत अव्वल ठरावे म्हणून स्वतःमध्ये अनेक सुधारणा करू पाहतात,कार्यक्षमता वाढवतात.स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी होईल ती मेहनत आपापल्या परीने सर्वजण च करतात.
सकारत्मकतेणे स्पर्धेकडे बघितले तर प्रगती होते पण जण नकारात्मकरित्या विचार केला तर कुठेतरी आपण किती मागे आहोत,किती मागासलेले आहोत म्हणून आजची तरुण पिढी upset होते.
खरे पाहता प्रत्येकाचे आयुष्य विधात्याने वेगळे लिहिलेलं असते.काही घडामोडी,काही achievements एखाद्याच्या खूप लवकर आणि सुरळीत घडतात पण काही जणांचे आयुष्य खूप च खडतर असते.अनेक लहान-मोठ्या संकटाना सामोरे जाऊन मग कुठे आयुष्याचा एक milestone ते गाठतात.अश्यावेळी माणसीकरित्या भक्कम असणे खूप गरजेचे असते.एक उदाहरण बघूयात-
अशोक नावाचा मुलगा.खूप मेहनती,खूप हूशार पण आजारपणामुळे तो इतरांच्या तुलनेत शैक्षणिक टप्प्यात जरा मागे राहिला.त्याचे शिक्षण सुरू आहे पण त्याच्या सोबतची batch graduate झाली आहे.अश्या वेळेस अशोक ने स्वतःला किती ही कोसले,कितीही त्रागा करून घेतला तरी काय होणार आहे.सर्वच गोष्टी आपल्या हातात नसतात.
शारीरिक आजारपणामुळे त्याचे शैक्षणिक नुकसान झाले तो स्पर्धेत इतरांच्या तुलनेत मागे राहिला हे कटू सत्य आहे.पण तो आता छान अभ्यास करून graduation पूर्ण करू शकतो हे एक च मार्ग त्याच्या हाती आहे आणि हेच त्याने केले पाहिजे.अश्या situation मध्ये माणसिक रित्या स्वतःच स्वतःला सांभाळता आले पाहिजे.
अनेक भावना आल्या असतील त्याच्या मनात guilt,insecurity,inferiority complex,future चे tension..!! बॅच चे कोणी मित्र-मैत्रिणी भेटले तर तो चक्क avoid करायचा कारण काय तर तो मागे राहिल्यामुळे embarass feel करत होता.आणखी एक उदाहरण पाहुयात-
कंपनी मध्ये सोबतच्या colleague ला प्रोमोशन ऑफर होते तेव्हाची एक स्वाभाविक प्रतिक्रिया.न ठरवताच आपण आपल्या सोबतच्या मित्र-मैत्रिणी,colleagues सोबत मनोमन तुलना होतेच ह्या तुलनेला आपण positively पण घेऊ शकतो आणि negatively पण स्वरूप देऊ शकते.
अंकिता आणि सरिता ह्या दोघी एकाच कंपनी मध्ये काम करणाऱ्या colleague.पण अंकीताला promotion मिळाले मात्र सरीताला promote करण्यात आले नाही.आता सरिता ह्या घटनेला कशी react करते हे ती positively competitive आहे की negatively competitive आहे ह्यावरून ठरते.
म्हणजे सकारत्मकता जर सरिता मध्ये जास्त असेल तर हीच स्पर्धा तिला अजून मेहनत करावी ह्यासाठी प्रवृत्त करेल पण ती नकारात्मक असेल तर हीच स्पर्धा तिला अंकिता विषयी घृणा,द्वेष ह्याध्ये गुंतून ठेवेल आणि तिचा ऊर्जा वाया घालवेल.
अश्या वेळेस आपली प्रगती खुंटली,आपण आयुष्यात कुठेतरी stuck झालो अशी feeling येते आणि सुरू होतो तो ‘दोषारोपांचा आलाप’…!!! कधी स्वतःच स्वतःला दोष देतो तर कधी इतरांवर आपण खापर फोडत असतो.
पण मित्रांनो आपले emotions आपल्या स्वतःला deal करता यायला हवेत.’Self-help is the best solution’.आयुष्याच सत्य पुर्णपणे जाणून घेता आले पाहिजे की प्रत्येकाला की आपण कुठूनही सुरुवात केलेली असो स्पर्धेत आपल्या पुढे कोणी ना कोणी असणारच आहे.सर्वश्रेष्ठ बनण्याचा अट्टाहास कोणी ही बाळगायला नाही पाहिजे.
प्रत्येकाने आयुष्याचे चढ-उतार बघितलेले असतात.प्रत्येकाचा संघर्ष वेगळा.स्पर्धा करावी ती स्वतःच स्वतःशी.काल मी कुठे होतो आणि आज माझी कितपत प्रगती झाली अशी healthy competition स्वतःच स्वतःशी केली पाहिजे.इतरांशी स्पर्धा कराल तर शक्यता जास्त आहे की आपल्यात negativity वाढीस लागू शकते.
Negative Thoughts चे circuit असे असते की ते थांबवायला बराच माणसिक थकवा जाणवू शकतो.म्हणजे काय तर negativity मध्ये आपली बरीचशी ऊर्जा खर्च होते.त्यापेक्षा स्पर्धा करा पण स्वतःच स्वतःशी तुलना करून प्रगतीचा आढावा घ्या.
जेवढे positive रहाल तेवढे आयुष्यात positivity राहील.जेवढे स्पर्धे मागे धावाल,स्पर्धेसाठी धावाल तेवढी negativity आणि अशांती,मानसिक अस्थैर्य ह्या गोष्टींचा सामना करावा लागणार.
कश्याला हवी इतरांशी तुलना,इतरांशी स्पर्धा आपण आपली प्रगती साधत राहायची.खूप मेहनत करायची,खूप सकारात्मक राहायचे आयुष्यात आपोआप यशाचा शिखर आपण एक दिवशी नक्की गाठू ह्या आत्मविश्वासाने आयुष्य जगायचे..!!
“का कोणाशी वैर,का कोणाशी स्पर्धा,का कोणाचा हेवा;
आयुष्य सुंदर आहे,सकारात्मक रहा,स्वतःवर विश्वास ठेवा”
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

