Skip to content

कितीही केलं तरी लोकांना कमीच असतं !!

कितीही केलं तरी लोकांना कमीच असतं !!!


टीम आपलं मानसशास्त्र


पुष्कळ वेळा आपली अशी धारणा बनत जाते की मी आजपर्यंत एवढं केलं तरी मागून लोकं नावंच ठेवत असतात किंवा लोकांकडून बहुतेक वेळा आपल्याला गृहीत धरले जाण्याची संख्या ही वाढत जाते.

सततची अशी वागणूक दिल्यामुळे आयुष्य जगण्याबद्दलची निगेटिव्हीटी मनात पसरते. मग काहीच करण्याची इच्छा होत नाही. ज्यांना आत्तापर्यंत वेळ दिला किंवा ज्यांच्यासाठी दिवस रात्र एक करून काम केले त्यांचे चेहरे डोळ्यासमोर येऊच वाटत नाहीत.

किंबहुना नविन लोकांशी सुद्धा ओळख करताना भिती वाटते, तिटकारा येतो. एकंदरीत अखंड मनुष्य जाती विषयी प्रचंड राग यायला लागतो.

ही जी काही नकारात्मकता मनात पसरते, ती काही वास्तव नाही. कारण तुमच्या मनात असणारी नकारार्थी भावना ही तुमचे व्यक्तिगत आणि सामाजिक आयुष्य उध्वस्त करत असते. शिवाय पुढचे येणारे आनंदी प्रसंग यांपासून तुम्हाला दूर ठेवते.

म्हणून नेमकं तुमच्या आयुष्यात हे असं का घडतंय याचा कानोसा घेणे जरुरीचे आहे. कोणत्यातरी घडलेल्या पहिल्या प्रसंगानुसार मिळालेल्या नकारार्थी अनुभवाची चैन अशीच पुढे सुरूच असते. त्यामुळे ही चैन मध्ये ब्रेक करावी लागते.

ब्रेक करण्याआधी त्यावर आत्मचिंतन होणे आवश्यक आहे. उदाहरणं म्हणून काही ठराविक गोष्टी खाली दिलेल्या आहेत. जे तुम्हाला ओळखण्यास मदत करतील.

१) सतत पुढे – पुढे करणं

काही व्यक्तींना सतत पुढे – पुढे करण्याची हौस असते. त्यानुसार लोकांच्या वागण्या – बोलण्यातून अपेक्षित समाधान न वाटल्यास त्याचा या व्यक्तींना खूप त्रास होतो. म्हणून तुम्ही प्रत्येक ठिकाणी पुढे जरी असाल तरी तुमचा विचार आणि तुमची वागणूक मुळात योग्य असायला हवी.

२) स्वतःचा दर्जा खालवणे.

तुम्ही इतरांसाठी भरपूर करत असताना स्वतःचा दर्जा किंवा अस्तित्व याची जपणूक करायला हवी. म्हणजेच छंद, आवडी, निवडी, योगा ई गोष्टी सोडून जर तुम्ही इतरांसाठी झटत असाल तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही.

३) गृहीत धरले जाणे.

ही व्यक्ती अशीच आहे, ती व्यक्ती तशीच आहे असे लोकं तेव्हाच बोलण्याची शक्यता असते जेव्हा त्या व्यक्तीला स्वतःचे असे काहीच अस्तित्व नसते. म्हणून कोणीही तुम्हाला लेबल लावेल अशी वागणूक ठेऊ नका आणि जरी लेबल लागले असेल तरी त्याचा अतिवीचार करू नका.

४) जास्त अपेक्षा ठेवणं.

तुम्ही जेव्हा इतरांसाठी स्वतःचा वेळ देता किंवा श्रम घेता, त्यावेळी समोरची व्यक्ती सुद्धा माझ्यासाठी भविष्यात वेळ काढेल अशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आपण अपेक्षा बाळगून असतो. त्यामुळे याठिकाणी परतीची अपेक्षा ठेऊ नका. जर योगायोगाने एखाद्याकडून परतफेड झाल्यास त्याला पुढची प्रेरणा समजावी. किंवा क्षमतेबाहेरची मदत अजिबात करू नये.

५) वेळ देताना वाहवत जाणे.

अनेक प्रसंगांत आपण स्वतःला खूप वाहून घेतो. त्यावेळी वेळेचे भान अजिबात उरत नाही. कालांतराने लक्षात आल्यावर आपण खूपच वेळ दिलाय, ज्यामुळे आपली सगळी कामे अर्धवट राहिलीत असा सुद्धा प्रकार अनेकांच्या आयुष्यात घडतो.

वरील या ५ गोष्टी तुम्हाला तुमच्यातला अतिरेक कमी करण्यास मदत करतील.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!