Skip to content

का आपल्याला एकापेक्षा जास्त व्यक्ती आकर्षित करतात ??

का आपल्याला एकापेक्षा जास्त व्यक्ती आकर्षित करतात ??


सोनाली जे.


आकर्षण हे नेहमीच प्रत्येकाला असते. जिवंतपणाचे लक्षणं म्हणावे लागेल.

व्यक्ती तितक्या प्रकृती हे आपल्याला सर्व परिचित आहेच. का बरे आपल्याला एकापेक्षा जास्त व्यक्ती आकर्षित करतात ? प्रत्येक व्यक्ती मध्ये काही ना काही वैशष्ट्ये असतात. काही ना काही वेगळेपणा असतो. जसे काहींमध्ये गुण असतात तसे त्यांच्यात दोष ही असतात. ते दोष दिसले की समोरच्या व्यक्ती मध्ये जे चांगले ते आकर्षित करून घेते.

फुलपाखरू बघितले का एका फुलातला मकरंद चव घेते लगेच दुसऱ्या फुलावर तसेच काही से . कदाचित फुलपाखरांना त्या विविध फुलांचे सुंदर रंग , सुगंध आणि त्यातला वेगवेगळ्या प्रकारचा मध आकर्षित करत असतो तसेच काहीसे व्यक्तींमध्ये ही होते.

१. बाह्य व्यक्तिमत्त्व : कोणाचे बाह्य व्यक्तिमत्त्व अतिशय सुंदर , आकर्षित करून घेणारे असते. जसे कोणाची उंची , भारदस्त खांदे , एखाद्याची आकर्षक दाढी , झुपकेदार , पिळदार मिशी , एखाद्याची हेअर स्टाइल , आकर्षक आणि पाणीदार डोळे. सुडौल बांधा , स्त्री असेल तर कमनीय बांधा , चाफेकळी नाक , गालावरची खळी , सुंदर केशसंभार या गोष्टी आकर्षित करतात.

अर्थात सगळ्यांच्या मध्ये हे सगळे फार कमी वेळा आढळते. त्याचमुळे ज्याच्यात जे चांगले ते आकर्षित करते.

२. राहणीमान : एखाद्याला मोजकेच कपडे असतील तरी तो कपड्यांचा चॉईस आकर्षित करणारा असतो. साधे जरी असतील तरी उठावदार रंग , त्याचे फिटिंग , तर एखादी फॅशन आकर्षित करून घेते. किंवा साधा हलकासा मेकअप असेल, कधी एखादा मंद पण धुंद करणारा परफ्यूम असेल. छान ड्रेस , त्यावर matching साजेशी jewellery म्हणा ornaments.

Belt , Shoes , मोहक चप्पल , पर्स , स्त्री चे घड्याळ तेही छान नाजूक , रंगीत . तर पुरुषाचे घड्याळ मोठे पण उठून दिसणारे आणि त्याच्या पुरुषी मनगटाला शोभणारे.

या वस्तू ही त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व खुलवत असतात आणि ते आपल्याला आकर्षित करत असते. मग प्रत्येक व्यक्तीचे राहणीमान हे भिन्न असते. त्यामुळे त्यातल्या काही ठळक गोष्टींमुळे आपण भिन्न भिन्न व्यक्तींकडे आकर्षित होत असतो.

३. बाह्यरुपा पेक्षा अंतरंग आकर्षित करते : काही व्यक्ती रोजच्या संपर्कात येत असतात. त्यांचे बाह्यरूप नेहमीच सुंदर असते असे नाही. काही लोकांचे बाह्यरूप ही सुंदर असते आणि अंतरंग , अंतर्गत व्यक्तित्व जास्त आकर्षक असते. त्यांचे विचार अतिशय प्रगल्भ असतात. बोलणे प्रभावी असते. सकारात्मक असते. Maturity असते. विविध प्रकारे एकच गोष्ट विचार करण्याची क्षमता असते. प्रत्येक वेळी बोलताना खूप नवीन विषय समजत असतात. किंवा तेच विषय परत ऐकताना अजून त्यातून deep knowledge मिळत असते.

त्यांची अभ्यासू वृत्ती , नाविन्याची आवड , त्यात काही खास गोष्टी ज्या ते कधी ही प्रदर्शित करत नसतात पण जस जसे त्यांच्या संपर्कात येवू लागतो तसे नवनवीन पैलू उलगडत जातात. जसे एखादी व्यक्ती संगीत आणि वाद्य यात मास्टर असेल , तर एखादी हस्तकला , चित्रकला , गणित , शास्त्र , समस्या निवारणााठी खास असेल .

असे अनेक अंतर्गत गुण असतात , अंतरंग स्वच्छ , निर्मळ असते . कोणा बद्दल द्वेष नसतो , असूया नसते. हेवेदावे नसतात. कोणाशी वाद नाहीत विवाद नाहीत. कोणत्याही परिस्थिती मध्ये शांत राहून विचारपूर्वक पुढे पावूल उचलणे . ही त्यांची वृत्ती अनेकदा आकर्षित करून घेते.

४. काही लोकांची श्रीमंती , त्यांची बौध्दिक क्षमता , हुशारी , त्यांचे पद , समाजात असलेले मान , याकडे ही आकर्षित होतात. जसे काही लोकांच्या कडे आर्थिक स्थैर्य , चिकाटी , त्यांची बौध्दिक क्षमता , ब्रँडेड वस्तू मिळविण्याकरिता धडपड .

जसे मग Maslow यांच्या theory चे विचार करता त्यांची आधी physiological needs , safety needs , belongings and love needs , self esteem आणि सेल्फ actualization या स्टेप्स मधून जस जसे व्यक्ती त्याच्या गरजा fulfill करताना स्वतः ला सिद्ध करत जातात तसे तसे त्याच्या या नवनवीन गुणांकडे व्यक्ती आकर्षित होत असतात.

कसे आहे की आपल्याला एकापेक्षा जास्त व्यक्ती आकर्षित करतात कारण की त्यांच्यात आपल्यापेक्षा काही तरी वेगळेपण जाणवत असते. आपल्यातल्या कमतरता आपल्याला महित असतात. आणि जेव्हा समोरच्या कडे त्या गोष्टी आहेत याची प्रकर्षाने जाणीव होते. तेव्हा आकर्षित होत असतात.

तर काही वेळेस आपल्याच सारखे व्यक्तिमत्त्व दुसऱ्या मध्ये दिसून येते. काही common गोष्टी सापडतात. मग वैचारिक पातळी असेल, एकमेकांना मदत करणे हा स्वभाव असेल , एखाद्याला समजून सांगणे आणि समजून घेणे हा स्वभाव असेल. कधी तरी हक्काने समजावे म्हणून थोडे रागावून , चिडून बोलणे असेल जेणेकरून समोरच्याला योग्य काय आणि चूक काय याची जाणीव होईल .

तर काही वेळा शांत , संयम , सहनशील , परोपकारी वृत्ती . आपलेपणा , ओढ , प्रेम हे गुण , स्वभाव एकमेकांशी जुळणे असतील. अशा अनेक गोष्टी आपल्याला अनेक लोकां मधल्या आकर्षित करतात.

आपल्याला एकापेक्षा जास्त व्यक्ती आकर्षित करतात , याचा अर्थ प्रत्येक वेळी आपण त्यांच्या प्रेमातच पडलो असतो असे नाही. प्रत्येक वेळी आपण जोडीदार या दृष्टीने विचार करतो असे नाही.

पण प्रत्येकालाच नाविन्याची ओढ असते. व्यक्ती आहे . जसे चवीत आंबट , गोड , तिखट , खारट , कडू या चवी आपण स्वाद घेतल्यावर , खावून बघितल्यावर समजतात. तसे व्यक्तीमध्ये ही आहे. जसजसे एक किंवा अनेक व्यक्ती संपर्कात येतील.. मग शेजारी असतील , ऑफिस मध्ये असतील, मित्र मैत्रिणी असतील , नातेवाईक , किंवा त्याहून एखाद्या किंवा एखादी विषयी प्रेम निर्माण झाले असले ..तर त्या इतर व्यक्ती मधली विविधता , गुण , plus points , सकारात्मक गोष्टी आपल्याला आकर्षित करत असतात.

याउलट बघा ना , नकारात्मक व्यक्ती पासून तुम्ही दूर राहता. किंवा त्याच त्याच गोष्टी असतील , तोचतोचपणा असेल तर आकर्षण नक्कीच कमी होते. प्रत्यक्षात कसे आहे की प्रत्येक व्यक्तीची आवड निवड ही भिन्न आहे. कोणाला कोणत्या गोष्टीचे , व्यक्तीचे आकर्षण वाटेल आणि त्याचे कारण काय हे व्यक्ती नुसार बदलत जाते.

व्यक्ती ज्या वातावरणात वाढली आहे ते वातावरण , वैचारिक किंवा इतर गोष्टीचे अनुभव आणि त्याकरिता घडलेली जडणघडण , आवड निवड , माहिती. बऱ्याच वेळीं एखाद्या गोष्टीची माहिती नसतेच. ती गोष्ट आपण पहिल्यांदा बघत असतो , अनुभवत असतो त्यामूळे ही आकर्षणं निर्माण होतें. एखाद्याला काळया रंगात आकर्षण वाटेल तर दुसऱ्याला तो आवडणार नाही. असे ही होवू शकते.

आपल्याला एकापेक्षा जास्त व्यक्ती आकर्षित करतात कारण त्यात काही तरी खास गुण , वेगळी वैशिष्ठ्ये असतात तर काही वेळेस भिन्न लिंगी व्यक्ती आणि त्यांचे गुण . हे सुधा आकर्षण ठरते. हे सगळे व्यक्ती नुसार बदलणारे आहे. त्यामुळे प्रत्येकाला आकर्षित करणाऱ्या व्यक्ती या भिन्न ही असतात किंवा एकच व्यक्ती पण त्यात एकाला त्याच्यात एखादा गुण आवडेल , दुसऱ्याला दुसरे काही आवडतील ..एखाद्याला सगळेच आवडतील .एखाद्याला कोणतेच आवडणार नाहीत.

ज्याला जे गुण आवडतील तसे ते आकर्षित होत जात असतात. मग कधी एकच व्यक्ती असेल किंवा अनेक व्यक्ती मध्ये अनेक गुण . किंवा एकच गुण अनेक व्यक्तींमध्ये असे ही आकर्षित होवू शकते.

बरेचदा पुरुष अनेक स्त्रियांकडे आकर्षित होवू शकतात. कारण त्यांना नावीन्य पाहिजे असते. प्रत्येक स्त्री ही वेगवेगळी , तिचे रूप वेगळे , भाषा वेगळी , फिगर वेगळी , तर डोळे वेगळे , नजाकत वेगळी , राहणीमान वेगळे , कुशलता वेगळी , ज्या पुरुषाला आकर्षित करतात. आणि ते पुढे वेगवेल्या पद्धतीने वाढू शकते. जसे मैत्री होईल , ऑफिस मध्ये कामात तरबेज असेल तर ते आकर्षण वेगळे , तर एखादीच सौंदर्य प्रेमात टाकेल ते वेगळे आकर्षण .. मग कधी प्रेम , लग्न तर कधी relationship ही हे पुरुष वाढवू शकतात.

परंतु स्त्री ही मर्यादा शील असल्यामुळे अर्थात काही अपवाद आहेत. ती जरी अनेक गोष्टींमुळे अनेक पुरुषांकडे आकर्षित झाली तरी त्या मर्यादा पाळते.

कालच झिम्मा सिनेमा बघताना त्यातल्या प्रत्येक पात्राची विविधता , त्यातून त्या कशा घडल्या , प्रत्येकाचे अनुभव त्यांना कसे घडवत गेले. मग त्या सगळ्यांच्या काही इच्छा , अनुभव घ्यायचे बाकी होते ते अनुभव घेताना ती सगळी पात्रे काही ना काही कारणाने एकमेकांच्या जवळ येतात. प्रत्येकी मधले काही गुण त्यांना आकर्षित करतात. कायमचे बांधून ठेवतात. अगदी त्या tour arranger कबीर ला सुधा त्यांच्या मैत्रीचे, चेष्टा मस्करी चे आकर्षण वाढते आणि तो कायमचा बांधला जातो त्यांच्या सोबत.

आकर्षण हे समान लिंगी व्यक्ती असतील भिन्न लिंगी ..ते नक्की व्यक्तीनुरुप, व्यक्ती नुसार च आकर्षण निर्माण होते.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!