काही माणसं आयुष्यभर न मिळालेल्या गोष्टींचा विचार करून दुःख ओढवून घेतात.
मयुरी महाजन
आपण सर्वात आधी बघु, कि दुःख काय असतं, त्यामध्ये शरीराला झालेली इजा असेल, कुणीतरी मनाला दुखावलं त्याचं दुःख असेल, किंवा कितीही नाकारलं तरी काही गोष्टी आपल्या हातात ह्या कधीच नसतात, त्या अनामिक ओढवणार्या गोष्टींविषयीचे असलेले दुःख असेल, किंवा आपणच आपल्या आयुष्यात नको त्या गोष्टींना ओढुन आपल्या दुःखाला कारणीभूत ठरतो,
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की दुःख काय कोणाला हवे आहे, की ती व्यक्ती स्वतःहून ओढवून घेईल, तर दुःख कुणालाही नकोच आहे ,परंतु सुखाच्या शोधात आयुष्यभर चालणारी धडपड मात्र कधीही संपत नाही ,माणूस स्वतः त्यात संपून जातो,तो प्रवासा मात्र असाच निरंतर सुरू असतो,
प्रत्येकाला जे मिळालेले आहे, त्यापेक्षा जास्तीचेचं हवे असते,यात काहीच चुकीचे नाही, परंतु सर्वात आधी जे मिळालेले आहे, त्याचा पूर्णपणे आनंद तरी घ्यायला हवा ,प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने आपल्या आयुष्याला परफेक्ट करण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु ते सर्व करूनही आयुष्य परफेक्ट होतं का??? नाही ना ,कारण ज्याच्याकडे भरपूर काही उपलब्ध आहे ,पद,पैसा, प्रतिष्ठा परंतु जर त्याचे आरोग्य त्याला साथ देत नसेल, तर त्याला त्या गोष्टींची कमी आहे, त्या ठिकाणी त्याला त्या न मिळालेल्या गोष्टींचे दुःख आहेच ना…
आजच्या लेखात आपण बघणार आहोत, की आपल्यातील काही माणसं आयुष्यभर न मिळालेल्या गोष्टींचा विचार करून दुःख ओढवून घेतात, त्यांच्यासाठी त्यांच्या आयुष्याला एक वळण देण्यासाठी ,त्यांच्याकडे असलेल्या गोष्टींचे महत्त्व पटवून देणाऱ्या काही गोष्टी,
आपल्याला जर आपल्या आयुष्याविषयी तक्रारी असतील, तर कधीतरी काही ठिकाणांना भेटी अवश्य द्या, बघा आयुष्याने आपल्याला काय काय दिले आहे ,याची आपल्याला ओळख होईल, एक म्हणजे अनाथ आश्रम हो कधीतरी त्या अनाथ आश्रमाला भेट द्या, तेथे जी मुलं मुली असतात, त्यांना भेटा, त्यांच्याशी संवाद साधा ,बघा आपल्याला कळेल की आपल्याकडे आपले कुटुंब आहे, सर्व नाती गोती आहे, आणि विशेष म्हणजे आई वडील आहे, ज्यांच्या छत्रछायेखाली आपण वाढलो, घडलो ,आपला जन्म गरीब कुटुंबातला असेल, असू द्या ना …काय फरक पडतो, पण आपल्या जवळ आपल्याला छातीशी कवटाळणारे आई-वडील तर आहेत, ज्यांनी कधी आपल्या आई-वडिलांचा चेहरा बघितलेला नाही, त्या आश्रममधल्या त्यांच्या जीवनाला जवळून बघा…. आपल्याकडे आयुष्यातील किती मोठी संपत्ती आहे,हे कळेलं…..
कधी कधी मुलं हट्ट करतात, एखाद्या गोष्टीसाठी ,आणि आई-वडिलांनी जर त्या गोष्टी नाही पुरवल्या, तर मुलांना त्या गोष्टीचे दुःख होते ,आणि आई-वडिलांनाही असं वाटतं की आपण आपल्या मुलांना हव्या असणाऱ्या गोष्टी पुरवण्यासाठी इतके सक्षम नाही ,त्याचं त्यांनाही वाईट वाटतं ,परंतु आवश्यक गरजा सोडल्या ,तर अनावश्यक गरजांसाठी या गोष्टी मोठ्या प्रमाणात दिसून येतात, परंतु दुसऱ्या मुलांकडे खूप काही आहे, आणि आपल्या मुलांना मात्र एकाच गोष्टीत, आपले समाधान आणि आनंद मानायला सांगतोय, याच आई-वडिलांनाही दुःख होतं, हे ते जाणवू देत नसले, तरीसुद्धा परंतु पालक म्हणून आपली ही जबाबदारी असायला हवी, की आपण कुणाकडे बाईक आहे, म्हणून आपल्या मुलांना सायकल चालवण्यात कमीपणा का समजावा, उलट आपण त्यांना हे दाखवायला हवं, की नशीब चांगलं तुझ्याकडे तरी सायकल आहे ,हे बघ हे लोकांना ते कितीतरी मैल पायी चालतात,
” मला देवाने दिलेल्या पायांवरती खूप आनंद झाला ,
कारण जेव्हा मी पाय नसलेल्या माणसाला बघितले” .
खरं तर देवाने आपल्याला सुंदर आयुष्य दिलेलं आहे, आपले सर्व अवयव खूप चांगल्या प्रकारे काम करतात ,दोन हात आणि डोकं दिलेलं आहे, कष्ट करायचं आणि थाटात राहायचं, एकदम स्वच्छंदपणे ….
न मिळालेला गोष्टींसाठी आपण उगाच चिंता करत बसतो, परंतु मिळालेल्या गोष्टींकडे बघण्याचा प्रयत्नही करत नाही,
कारण बघा हात नसलेल्या मुलीला मी लिहिताना बघितले, पाय नसलेल्या मुलाला कॉलेजच्या पायर्या चढताना बघितले ,ज्यांच्याकडे हात नाही ते पायाने लिहून आपल्यातल्या कमतरता पूर्ण करू शकतात, ज्यांच्याकडे पाय नाही, तो मुलगा हाताच्या जोरावरती पायरी चढू शकतो, तर आपल्याकडे सर्व काही असताना आपण का??? नाही काही करू शकतं…???
कारण की जेव्हा मी अशा मुला-मुलींना भेटते ना, तेव्हा कळतं, या साऱ्यांनीही जर आपल्याला न मिळालेल्या गोष्टींचाचं विचार केला असता ,तर त्यांच्याकडे ही आयुष्यातील दुःख ओढून घेण्या व्यतिरिक्त काही पर्याय नसता, परंतु मिळालेल्या गोष्टींच्या जोरावरती अशी मुलं-मुली आपल्या नशीबालाही बदलवण्याची हिम्मत ठेवतात, त्यासाठी आपल्याकडे जे आहे ते सर्वोत्तम आहे, त्याचा योग्य त्या पद्धतीने वापर करायला हवा…हो…ना…
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

खूपचं छान
Very inspiring me.nice.👌👌👌🙏🙏