Skip to content

काही जणांचेच नशीब जोरावर का असते ??

काही जणांचेच नशीब जोरावर का असते ?


मयुरी महेंद्र महाजन


“नशीब’ नशीब, नशिबावर चकवाँ,
कसला मावा ,नी कसला खवा,”

नशीबापेक्षा कमी किंवा निशिबापेक्षा जास्ती, कोणालाच मिळत नाही, असे बरेचदा म्हटले जाते, काहींना नशिबाशी खुप भांडावं लागतं, संघर्ष करावा लागतो, असे नाही की सर्वचं गोष्टी नशिबावर सोडून द्याव्या, परंतु जुळून आलेली नशिबाची साथ, इतक्या जोरावरती असते, की हाती घेतलेले प्रत्येक काम, पूर्णत्वास जाते, नशीब म्हणजे तरी काय??? काहीही न करता सर्व काही मिळणे याला जर तुम्ही नशीब म्हणतं असालं, तर तो नशिबाचा दोष आहे,

जीवनाच्या प्रवासात जर सर्वचं आपलं होत गेलं असतं ,तर जगण्यात गंमत आणि देवाला किंमत राहिलीचं नसती, बोलताना बरीच लोकं म्हणतात तुझं नशीब तरं लई जोरात आहे, त्याच्या जवळ जी काही सुबत्ता आहे, ते आपल्या जवळ नाही, आणि त्याला जे प्राप्त झालेले आहे, ते त्याच्या नशिबाच्या जोरावरती प्राप्त झाले आहे, अशी आपली समजूत असते, परंतु त्यामागे प्रारब्ध असते, कारण प्रारब्धामध्ये केलेल्या चांगल्या कर्माचे ती फळ असतात, ती नशिबाच्या रूपाने त्या व्यक्तीला मिळतात,

आपल्या सर्वांच्या नशिबा बद्दलच्या समजुती ,धारणा, चुकीच्या आहेत, कारण की नशिब फक्त एकमेव गोष्ट नाही, ती विविध आणि वेगवेगळ्या अंगांनी मिळून तयार झालेली रचना आहे ,विविध धाग्यांनी बनलेली आहे, त्यात आपले प्रारब्ध ,प्रारब्धातीलं कर्म, आपले कष्ट, मेहनत ,चांगुलपणा, आपली विचार प्रक्रिया, थोरामोठ्यांचा आशीर्वाद, आपण जोडलेल्या किती नात्यांकडून आपल्याला मिळालेली दुवा( ब्लेसिंग), गरजवंताला केलेली मदत ,आणि आपल्या आई-वडिलांची पूर्व पूण्याई,

आपले नशीब हे सर्वस्वी आपल्या कर्माचा भाग आहे, परंतु ते बदलण्यासाठी जर प्रयत्नांमध्ये सातत्यता, आणि प्रयत्न दमदार असतीलं तर नशिबाला सुद्धा झुकावंचं लागतं, नशिबाच्या जोराने बर्‍याच जणांना बरचं काही मिळालेले असते, परंतु ते टिकवण्यासाठी तितकी पात्रता अंगी ठेवावी लागते, नाहीतर दैव देते, आणि कर्म नेते ,अशी परिस्थिती व्हायला वेळ लागत नाही, म्हणून नशिबाच्या जोरावरती नक्की विश्वास ठेवायला हवा, नशीब कधीही बदलणार असते, पण आपल्या कर्माची गती ठरवते, की आपल्या नशीबाला सोडायचे कुठे आहे,

मी बर्‍याचं जणांना असं म्हणतांना पण ऐकलेलं आहे, माझं नशीबचं फुटक आहे, करायला जातो काही आणि होतं काही, त्या वेळेस फक्त इतकच म्हणायचं, जर नशिबात यापेक्षा काही वेगळं आणि भन्नाट असेलं तर…. त्यासाठी माझा हा रस्ता मोकळा झाला …असं म्हणून पुढे निघावं… थांबू नये, कारण जो इ नशिबाच्या भरोश्यावरती थांबला, त्याचं नशीबचं थांबलं….असं म्हणावं….,

ईतरांच्या नशीबाचा हेवा दावा न करता, आपण ज्या गोष्टीला खरं तर त्यांचे नशीब म्हणतोय, हा फक्त बाहेरून दाखवण्याचा मुखवटा असेलं तर ,कारण वरच्या झगमगाटाला आपण नशिबाची उपमा देऊन कसे चालेलं, जर त्याला त्याचे समाधान त्याच्या आतून नसेल तरं, त्याला असलेल्या गोष्टी सुद्या नसल्यागत असतीलं, मिळालेले वैभव नशिबाचा भाग असू शकतं,

पण त्याला त्याचे अंतर्मनातून असलेले समाधान त्याच्या कर्माचा भाग आहे, येथे प्रत्येकाच्या दृष्टीने नशीब वेगवेगळे आहे, नशीब की ज्याला आकारही नाही, ज्याचे अस्तित्व सांगता येत नाही, परंतु त्याच्या असण्याला प्रत्येकाजवळ खूप महत्त्व आहे,

नशीब कमवावे लागते ,आपल्या स्वभावाने, कर्माने ,कधीही न ठरवलेल्या आपल्या अंतकरणाने… काही जण नशिबावंत असतात, जीवनाच्या प्रत्येक टप्यावरती, ते आपल्या नशिबाने जिंकतात, आपल्या विल पावरच्या जोरावरती बरीच जण, आपल्या नशिबाची रचना करताना दिसतात, तर काहींची साधना आणि भक्ती त्यांना खूप मोठ्या उंचीपर्यंत पोहोचवते…


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!