Skip to content

काहीतरी नविन सुरुवात करायला कधीही घाबरू नका.

काहीतरी नविन सुरुवात करायला कधीही घाबरू नका.


सोनाली जे.


“तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार”. सर्वांना परिचित आहे च. ज्याच्या मनगटात वेळ सुद्धा बदलायची क्षमता तो बंद पडणाऱ्या घड्याळावर अवलंबून राहत नाही. काही तरी नविन सुरुवात करताना थोडी भीती ही वाटतं असते च.

जसे शाळेच्या पहिल्या दिवशी मुल तिथले वातावरण , नवीन मुले , नवीन शिक्षक , building नवीन यामुळे आणि सगळ्यात महत्वाचे आपल्या पालकांची सवय झालेले आपले पालक आजू बाजूला दिसत नाहीत म्हणून गांगरून जातात. घाबरतात.रडतात.पण जशी जशी सवय होवू लागते तसे बरोबरची मुले, नवीन गोष्टी रोज शिकायला मिळतात यातून शाळेची ओढ लागते..शाळा आवडू लागते.

तसेच आहे नवीन कोणती गोष्ट सुरू करताना थोडी भीती वाटते..घाबरायला होते.. नवीन बिझनेस असो , व्यवसाय असो त्यात यश मिळेल का , त्यातले संभाव्य धोके, अपयश आले तर , नुकसान झाले तर, किंवा नोकरी मध्ये नवीन काम मला जमेल का? माझ्या शिक्षण आणि स्किल नुसार मला काम मिळेल का ? असे आणि अनेक प्रश्न आपल्याला मनातून भीती निर्माण करत असतात..

अशावेळी आपली स्किल develop तर करावी च परंतु इतरांच्या टीका जरी असतील तरी आपण त्याने खचून न जाता त्याकडे motivation किंवा प्रेरणा म्हणून बघावे.त्याकडे सकारात्मक दृष्टीने बघावे आणि त्यातून आपले प्लॅन्स execute करावेत.टीका ही पण संधीच समजावी..त्याला घबरलात , भीती वाटली तर पुढे जाताना पाय डगमगत राहतील. याउलट आपल्याला त्यातून एक clue मिळाला आहे आणि पुढे जाण्याकरिता कारण आणि प्रेरणा असे बघून न डगमगता पुढे जा.

नवीन मैत्री करताना ही आपण सुरुवातीला घाबरत असतो , कसे बोलू, त्याला किंवा तिला कसे वाटेल ? आवडेल का? ते आपल्या बरोबर बोलतील का? काही वेळेस असेही होते पहिल्या भेटीत बोलत नाहीत.पण मग एकमेकांचे स्वभाव , समजून घेण्याची कुवत , हुशारी , helping nature लक्षात आले की चांगली मैत्री होते.

तसेच आहे नवीन नाती निर्माण होताना किंवा साधताना आपल्याला भीती वाटते..जसे मुलगी दुसऱ्या घरी देताना तिकडची माणसे, संस्कार, रीतिरिवाज, आणि सगळ्यांच्या मध्ये आपली मुलगी कशी adjust होईल का ही सुरुवातीला भीती वाटत असते पण हळूहळू स्वभाव माहिती होतात आणि जुळवून घेण्याच्या क्षमता वाढत जातात.

रण भूमीतून पलायन केल्यावर महाराणा प्रताप हे हळदी घाटात लपून बसले होते. नैराश्य तर होतेच , पुढे परत नव्याने सेना कशी जमा करायची याचे अनेक प्रश्नचिन्ह होती..एके रात्री एका झाडावर कोळी त्याचे घर म्हणजे जाळे बांधण्याचा प्रयत्न करत होता.सुरुवातीला दोन तीन वेळा त्याचे जाळे विणताना तुटले. एक दोन वेळा तो कोळी खाली पडला, पण तरी परत नव्या जिद्दीने तो कोळी परत त्याचे जाळे विणायचा प्रयत्न करत होता. आणि रात्रीतून शेवटी त्याने जाळे विणले च.

प्रचंड जिद्द, धडपड , पडलो तरी माघार नाही घ्यायची आणि जे ध्येय ठरले आहे ते पूर्ण करायचे ही त्या कोळ्याची चिकाटी आणि परत परत न हारता , न थांबता परिश्रम करण्याची तयारी, त्याची positivity यातून महाराणा प्रताप यांनाही प्रेरणा मिळाली ..त्यांनी पुढे तिथल्या भिल्लांची मदत घेवून एक सेना तयार केली..त्यानंतर अकबराने तीन वेळा महाराणा प्रताप यांच्या वर .मेवाड वर हल्ला चढविला परंतु अकबर एकदाही महाराणा प्रताप यांना हरवू शकला नाही..

म्हणजे च काय करायचेच ठरविले तर नवीन सुरुवात कोठूनही करता येते. आधीचा अनुभव कसाही असो त्याचा पुढचे ध्येय प्राप्ती करिता उपयोग करा. ध्येय निश्चित करा..त्याकरिता आराखडा तयार करा..येणारे संभाव्य धोके आणि अडचणी या ही गृहीत धरा..काही वेळेस अचानक उद्भविनाऱ्या अडचणी ही असतील त्यावर मात करून गरज पडली तर नव्याने पूर्ण ताकदीने उभे राहण्याचा प्रयत्न करा..जिथे पडाल तिथून ताबडतोब उठून नव्याने सुरुवात करा. तेवढे flexible रहा.

काही वेळेस नोकरी जाते , व्यवसाय त्यात तोटा होतो , नाती बिघडतात , मैत्री तुटते, आर्थिक , शारीरिक नुकसान होते..अशावेळेस आधीचे सगळे सोडून द्या..पूर्णविराम द्या आणि ती सगळ्याची नव्याने सुरुवात करा तेव्हाही मनात शंका येणारच ..नाती जुळतील का परत. नवीन नोकरी मिळेल का , व्यवसाय कोणता नवीन सुरू करता येईल. नुकसान होईल का , किती वेळ लागेल जम बसण्याकरिता .असे विचार मनात येत राहतात. म्हणून आपण संभाव्य परिणामांना घाबरत असतो.

हे खरे आहे की नवीन गोष्ट सुरू करताना भीती ही वाटणारच…पण म्हणून पुढे पावूल टाकायचे च नाही असे करू नका..पाण्याच्या काठावर उभ राहून हातपाय कसे मारतात याचे प्रशिक्षण जरी दिले तरी प्रत्यक्ष पाण्यात पडल्यावर स्वतः ला हात पाय मारवेच लागतात , सुरुवातीला गटांगळ्या खाल्या तरी पाण्याचा अंदाज घेवून हातपाय मारले की त्या पाण्याच्या प्रवाहावर ही मात करता येते..

चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट बघतात. अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात.पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात.घाबरु नका..प्रयत्न करत रहा..नवीन गोष्ट करायला गेलात तर दोन गोष्टी होतील एक तर काही चुकले तर पुढच्या वेळेस ती चूक करायची नाही याचा अनुभव , बरोबर असलात तर घोडदौड यशस्वीरीत्या पुढे चालू राहील.अपयश आले तरी खचून जावू नका पुन्हा ती गोष्ट पहिल्यापासून , शुन्यापासून सुरुवात करा.घाबरु नका..भीती वाटली तर पावूल पुढे टाकताना क्षणभर विसावा घ्या.. बाणाचे उदाहरण कायम लक्षात ठेवा.. बाण पुढे जोरात जाण्याकरिता धनुष्याची प्रत्युंचा जेवढी मागे ओढली जाईल तेवढा बाण जास्त पुढे जातो..

तसेच आहे आपलेही पुढे वेग घेण्याकरिता आधी थोडे थांबा , मग हळूहळू वेग घ्या.. घाबरलात तरीही थांबू नका पुढे जा..पुढे जात रहाल तसे मार्ग सापडतील. अनुभव घ्यायला लाखो पुस्तके लागत नाहीत, परंतु पुस्तक लीहिण्याकरिता अनुभव च लागतो. काम करण्यासाठी नाव असावे लागतेच असे नाही , पण नाव करण्यासाठी काम करावे लागतेच.

काहीतरी नविन सुरुवात करायला कधीही घाबरू नका.आणि घाबरला च तर त्या भीतीवर मात करून पुढे जायला शिका..काही नवीन करण्याकरिता ध्येय निश्चित करा आणि ते ध्येय पूर्ती करिता प्रेरणा मिळावी लागते..ज्याला च आपण motivation म्हणतो ते छोट्या गोष्टीतून ही जागरूक राहून मिळवा..एकदा का प्रेरणा मिळाली की ध्येय पूर्तीची यशस्वी वाटचाल सुरू झाली च समजा.

आयुष्य सुंदर आहे ..मिळालेली संधी म्हणून प्रत्येक गोष्टी कडे सकारात्मक दृष्टीने बघा.घाबरला तर त्या भीतीवर मात करून पुढे जा..नवीन गोष्टी जाणून घेण्याकरिता लहान मुलांसारखी जिज्ञासू वृत्ती ठेवा.. वृध्द ही आजकाल कोरोणा काळात पूर्वी कधी ही न वापरलेले मोबाईल , लॅपटॉप सारखी गॅजेट्स वापरायला शिकले आहेत.भीती पोटी थांबले तर आहे तिथेच राहू..भीती चे रूपांतर जिज्ञासा किंवा काही तरी नवीन शिकण्याची धडपड , नवनिर्मिती यात कराल तर कोणत्याही गोष्टीची कधी ही. नवीन सुरुवात करताना वय , स्थल, व्यक्ती , व्यवसाय , आजू बाजूचे वातावरण याचा परिणामही होणार नाही..

जे असेल त्याला जिद्दीने तोंड देण्याची तयारी ठेवा..स्पर्धांमध्ये खेळाडू कशी खिलाडू वृत्ती ठेवतात..पडलो तरी लगेच उठून पुढचे क्षेत्र रक्षण करण्याकरिता तयार..किंवा पुढचा गोल करण्याकरिता तयार.. तसेच आपण ही खिलाडी वृत्तीने पुढे जात राहिले पाहिजे..

बोगद्यात अंधारातून पुढे जात राहिलात तर पुढे जावून प्रकाश किरणे ही दिसतीलच.तसे नवीन सुरुवात करा मार्ग सापडत जातील..नाही सापडले तर ते शोधावे लागतील..नाही तर निर्माण करावे लागतील.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!