कामाची लाज वाटणं या एका गुणामुळे आज अनेक तरुण-तरुणी घरी बसून आहेत.
सोनाली जे.
कामाची लाज वाटणं या एका गुणामुळे आज अनेक तरुण-तरुणी घरी बसून आहेत. कामाची लाज वाटणे हा गुण का अवगुण ?? का दोष ? का इगो ? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. कामाची लाज वाटणं या एका गुणामुळे आज अनेक तरुण-तरुणी घरी बसून आहेत.
याची कारणे बघुयात :
१. पूर्वी जाती नुसार कामातली उच्च नीचता : –
पूर्वी जातीव्यवस्था होती. त्या नुसार लोकं पारंपरिक पद्धतीने प्रत्येकाने कोणत्या स्वरूपाचे काम करायचे हे ठरलेले असे. त्याच्या बाहेर जावून काम करू नये असे एक मोठ्यांचे मत , दरारा असे. आणि तसेच समाजाचा नियम ही. बंधने ही असतं. त्यामुळे आपले काम सोडून दुसरे काम करण्याची लाज वाटत असे.
२. शैक्षणिक प्रगती : –
वंश परंपरागत असे प्रत्येकाला ते काम मिळत ही असे. परंतु शिक्षण आणि इतर स्किल , कोर्सेस जसे शिकण्याची संधी मिळू लागली . पण आपल्या शिक्षणाच्या तुलनेत, पात्रता असताना , आपल्या क्षमतेच्या तुलनेत कमी दर्जाचे काम करण्याची लाज वाटते. उदाहरणार्थ : पदवी / पदविका झालेला / ली त्यांना शिपायाची नोकरी आली तर ती त्यांच्या पात्रतेच्या तुलनेत कमी दर्जा असणारी त्यामुळे ती नोकरी स्वीकारणे याची लाज वाटते. आणि आहे ती संधी ही निघून जाते.
३. अनुभव नसतानाही जास्त ctc ची अपेक्षा :
आपण शिक्षण घेतले म्हणजेच आपल्याला सगळे काम जमते हा भ्रमाचा भोपळा असतो. शिक्षण आणि प्रत्यक्ष काम यात खूप तफावत असते. परंतु नोकरी चे इंटरव्ह्यू देताना कामाचा अनुभव नसताना ही आपल्याला एव्हढा तरी पगार मिळावा हीच अपेक्षा आणि त्याप्रमाणे आकडा नाही मंजूर झाला तर नोकरीचा स्वीकार, अनुभव घेण्याकरिता ही नकार देणारे आहेत. आणि तेव्हा कमी पगार घेण्याची लाज वाटून संधी दूर लोटून घरी बसणारे तरुण तरुणी आहेत.
४. परिस्थिती आणि लोक काय म्हणतील , समाज , नातेवाईक काय म्हणतील याची लाज :
सध्या corona सारखी महामारी आणि त्यातून आलेली आर्थिक मंदी यातून जुने च जॉब टिकून राहणे अवघड असताना , काढून टाकले जात असताना, कमी केले जात असताना , नवीन जॉब मिळणे ही अवघड झाले आहे. आणि जॉब गेला असेल तर आधीच्या पगारापेक्षा कमी पगार घेवून अशा वेळी तडजोड म्हणून कोणता तरी जॉब स्वीकारणे म्हणजे समाज , आपले नातेवाईक , बरोबरचे मित्र. मैत्रिणी काय विचार करतील , काय म्हणतील म्हणून इतरांच्या विचाराने , लाज वाटते त्यामुळे कुठे तरी तडजोड म्हणून चा ही जॉब स्वीकारला जात नाही.
५. आपली मानसिकता : –
बरेचदा आपणच आपल्या मनाशी गृहीत धरून ठेवलेले असते की हे काम आपल्या योग्य , ते काम आपल्या पात्रतेचे नाही. कमी दर्जाचे आहे . आणि यातून बरेचदा आपल्याला मिळालेली संधी विषयी ही आपल्या मनात शंका निर्माण होते त्यामुळे आणि तसे काम आले तर त्याची लाज वाटून त्याचा ही स्वीकार केला जात नाही. उदहरणार्थ :- मी सायन्स मध्ये पदवी घेतली आणि commerce related काम करण्याची मला लाज वाटते म्हणून ही हातची संधी जाते.
६. भविष्यकालीन भीती :
सुरुवातीला आपण आपल्या क्षमतेपेक्षा , शिक्षणापेक्षा कमी दर्जाचे काम स्वीकारले तर पुढे जावून आपल्या दर्जाचे काम आपल्याला मिळणार नाही या भविष्यकालीन भीतीमुळे , जसे की या जॉब मधून नवीन जॉब शोधताना नवीन ठिकाणी interview देताना आपल्याला आपल्या पात्रते पेक्षा कमी दर्जाचे काम करत होतो हे सांगण्याची लाज आणि भविष्यातील नोकरी ला मुकावे ही लागेल.
कामाची लाज वाटणं या एका गुणामुळे म्हणण्यापेक्षा दोषा मुळे आज अनेक तरुण-तरुणी घरी बसून आहेत.
आयुष्य सुंदर आहे, हे काम माझे नाही , मी कसे करू , माझ्या दर्जाचे नाही , हे करताना मला लाज वाटेल , लोकांपुढे ही जाताना लाज वाटेल , असे नकारात्मक विचार टाळा , मिळणारी संधी घ्या, अनुभव घ्या , कोणतेही काम करताना लाज बाळगू नका. मिळणाऱ्या अनुभवातून संधीचे सोने करा.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”


