Skip to content

कामाचा कंटाळा येवू न देण्याकरिता काय करावे ?

कामाचा कंटाळा येवू न देण्याकरिता काय करावे ?


सोनाली जे.


हा लेख खूप मोठा आहे तरी वाचण्याचा कंटाळा करू नये. बरेचदा काम करताना कोणतेही असेल , घरगुती , ऑफिस , किंवा अगदी अभ्यास ..खूप कंटाळा येतो .. का बरे ? काही सर्वसामान्य कारणे :

१. काहीच न करणाऱ्यांना कंटाळा येतो.

२. पुढे काही तरी interesting आहे म्हणून एखादे काम , अभ्यास करत राहिलो , आता चे काम करण्याऐवजी आपण पुढचा विचार करत राहिलो तर मग आपल्याला पुढच्या कामात जास्त महत्व आहे असे वाटेल आणि आताचे काम करण्याचा कंटाळा येईल.
याउलट पुढे काही तरी चांगल्या opportunities आहेत म्हणून प्रयत्न करत राहिलो आणि पुढे म्हणजे किती पुढे हा प्रश्न पडतो ? कारण असे असते की दहावी पर्यंत board exam म्हणून पालक सतत अभ्यास कर. चांगले मार्क्स मिळव म्हणून मागे लागतात. दहावी नंतर तर अजून अभ्यास वाढतो आणि मग खरेच सतत अभ्यास करण्याचा कंटाळा येतो. आणि मग मुले अभ्यासात मागे पडू लागतात.

३. तोच तो पणा कामात आला . अभासात आला तरी कंटाळा येतो.

४. काही वेळेस झोप पूर्ण झाली नसते. उत्साह नसतो .

५. मलाच करायला लागते ही मानसिकता वाढते आणि काम , अभ्यास करण्याचा कंटाळा.

६. Comparison .. काही लोक, मुले कधीच काही करताना दिसत नाहीत. तेवढेच अनुकरण किंवा तेवढीच तुलना केली जाते. परंतु ते त्यांचा अभ्यास कधीच पूर्ण करत असतील .काम कधीच पूर्ण करत असतील आणि आपण मात्र ते काही करताना दिसत नाहीत म्हणून कंटाळा करतो.

आपण हे सगळे वरवरचे ठोकताळे बांधतो. आज मी प्रत्यक्षात यावर मानसशास्त्रीय दृष्टीने कसा अभ्यास केला जातो आणि त्याकरिता कसे प्रयत्न केले जातात याचे detail मांडणार आहे. काही लोकांनीं मध्ये ग्रुप वर विचारले असते एवढ्या गोष्टी कशा काय समजतात बरे तुम्हाला. कसे काय अभ्यास असतों एव्हढा त्याकरिता थोडे खोलवर स्पष्टीकरण . आणि काही लोक कदाचित इंटरेस्ट नसणारे ही असतील. हे काय असे विचार ही करतील.

जेव्हा आमच्या सारख्या psychologist कडे कोणतीही तक्रार घेवून कोणी येते तेव्हा वरवर बोलून लगेच आम्ही कधीच त्यावर सल्ला किंवा उपाय देत नाही.

एक आई आपल्या ९ वर्ष ११ महिन्याच्या मुलीला घेवून आली.
तक्रार काय विचारले ?
आई : – शाळेतल्या शिक्षकांनी सांगितले अभ्यासाचा कंटाळा करते. आताच्या इयत्तेत रिपीट करायला सांगितले आहे.
ठीक म्हणले काही गोष्टींची detail माहिती लागेल , काही गोष्टींची टेस्ट करावी लागेल.

Case Details :

I. CASE HISTORY
II. INTERVIEW WITH CLIENT
III. PSYCHOLOICAL EVALUATION
IV . GOALS OF THERAPY
V . TREATMENT PLAN
VI .CONCLUSION

साधारणपणे या एवढ्या स्टेप्स येतात . आणि एव्हढे मुद्दे वर वर ठळकपणे दिसणारे , पण प्रत्येक मुद्द्यात परत अनेक बारीक details .
I . case history मध्ये परत
A. १. Demographic detail येतात. जसे
१. नाव : सिमरन
२. जन्मतारीख :
३ age : ९ वर्ष ११ महिने
४. Sex : female
५. मातृभाषा : हिंदी
६. Ordinal position : १st child
७. Address :
८. Occupation : student

२.REFFEED BY . Dr..

३. INFORMANT : Mother

B. ABOUT THE ILLNESS OF THE PATIENT / CLIENT

१. PRESENT COMPLAINTS : .

A. अभ्यासाचा कंटाळा .
B. अभ्यासात मागे पडते.
C. वर्तन समस्या. Behaviour problem
D. ADHD एकाग्रता करता येत नाही. हायपर ॲक्टिव.
E. Visio perceptual problem
F. Stubborn .. हट्टी

आता ही खूप प्राथमिक माहिती दिली.
यापुढे अनेक details येतात. जसे
१. आजाराचा कालाविधी.
२. फॅमिली history . घरात किती व्यक्ती , कोण कोण . त्यांचे occupation , वय इतर details.

३. घरात इतर कोणाला या सारखे किंवा इतर मानसिक आजार ?
४. फॅमिली interaction. म्हणजे परस्पर संवाद . परस्पर नाते.

५. घर .. घरातल्या खोल्या .. आणि सिमरन कोणासोबत कुठे जास्त वेळ असते. तिची झोपण्याची खोली तेव्हा ती एकटी असते का . का तिच्या सोबत . असे अनेक बारकावे
६. Parents marital history .. arrange marriage आहे का लव्ह ..त्यात प्रॉब्लेम्स. किंवा अजून काही अडचणी .

७. Personal history of the client

A. Birth and development history
मुल पहिले आहे का ?delivery कशी झाली नॉर्मल का सिझरियान,? जन्माच्या वेळी बाळ रडले का ? नाळ गळ्याभोवती गुंडाळली गेली होती का ? अजून काही problems होतें का झाले ? यातून बाळ जन्माला येताना , आल्यावर ऑक्सीजन पुरविठा व्यवस्थित झाला होता का नाही ते समजते. त्यातून मेंदू मध्ये जन्मतः काही दोष निर्माण झाले का ते समजते आणि ते खूप महत्वाचं असते.

दुसरे महत्वाचे असते Health History ..
बाळाच्या जन्मापूर्वी आणि जन्मानंतर काही आजारपणं , ताप डोक्यात चढणे किंवा इतर काही अपघात असे काही झाले असेल . Major काही प्रॉब्लेम्स झाले होते का यावरून नक्की काय प्रोब्लेम झाले असतील हे क्लिअर होते.

– educational history ..

या मुलीच्या दृष्टीने ही महत्वाची माहिती आहे. ‌घरातली मोठी मुलगी ही सिमरन तिला लहान बहीण. दोघींच्या मध्ये दोन वर्षाचे अंतर . २.६ yrs अडीच वर्षाची असताना सिमरन ला शाळेत घातले. इंग्लिश मिडीयम. आता ती चौथी मध्ये आहे. सुरुवातीला ७० टक्के मिळविणारी सिमरन आता ५० ते ६० टक्के कसे बसे मिळविते. शाळेत शिक्षकांनी तिला परत रिपीट करा नाही तर शाळा बदला असा सल्ला दिला आहे.

* Sexual History : काही ही नाही.

* Occupational history .. विद्यार्थी.

* Special habits . ती खाण्यात खूप slow आहे.

* Interests and Habits : तिच्या आवडी निवडी काय आहेत.
सिमरन ला टीव्ही बघणे आवडते. बास्केटबॉल , स्विमिंग , डान्सिंग आवडते.

* Personality :
तिच्या आईने दिलेल्या माहितीनुसार सिमरन खूप गप्पिश्ट आहे. Talkative. अति उत्साही आहे. तिला एखादी गोष्ट करण्याकरिता सतत मागे लागावे लागते. परत परत instructions द्याव्या लागतात. ती फक्त तिच्या आईचे ऐकते. ती खूप हट्टी आहे. आणि सतत irritate करत असते.
वर्गात पण खूप बोलते त्यामुळे इतर मुले ही खूप डिस्टर्ब होतात . आणि तिचे ही अभ्यासात लक्ष नसते. मागे पडते.

* Imoression of Informant :
सिमरन ची माहिती तिच्या आईने दिली. आई स्वतः खूप talkative आहे. Well – educated आहे. खूप anxious आहे. पण ती सुधा unstable आहे. सिमरन बोलत असताना , थेरपी sessions सुरू असताना आई खूप डिस्टर्ब करत होती सिमरन ला .सतत सूचना देत होती.
Play थेरपी मध्ये ही आई सांगेल तेच खेळ खेळायचे. सिमरन ने सुचविले तरी ते नाहीच .

आई सुधा ते कोणतेही गेम पटकन संपविण्या मागे असे. आई आणि तिचे वडील दोघेही ही गोष्ट मान्य करायला तयार नव्हते की त्यांच्या मुली मध्ये काही तरी कमतरता आहेत.ती एका वेळी एका गोष्टी वर focus करू शकत नाही. Concentrate करू शकत नाही. ती ADHD child आहे हे accept करत नाहीत. आणि करण्याची तयारी नाही.

II . INTERVIEW WITH CLIENT

* Mental state examination .
तिचा appearance छान होता. ड्रेस व्यवस्थित. Manners ही चांगले. पण poor handling होते. आणि खूप बारीक होती.

* Behaviour : talative , short attention span with clumpsy actions. जसे गोंधळलेली आणि छोटे लक्ष. गोष्टी ..मोठ्या गोष्टीकडे दुर्लक्ष.

* Attitude :
सिमरन खूप dull , डोळे निस्तेज , co – operative नव्हती. तिला गोष्टी रिपीट करायला आवडत नव्हतं . त्याच त्याच गोष्टी परत करण्यात किंवा एखादा गेम जास्त वेळ खेळण्यात इंटरेस्ट नव्हता.
* Orientation : तिला वेळ , व्यक्ती , जागा याचे चांगली जाणीव होती.

५. Thoughts : organised cohereant. संघटित आणि सुसंगत होते.
* Contents – relevant होतें.
* Stream – correct आणि uninterrupted होते.

६ . Perception – delusions किंवा hallucinations ची कोणतीही लक्षणे नव्हती. कोणतेही भ्रम नव्हते. किंवा भास होणे , आवाज येणे नव्हते.

७. Mood : anxious.

८. Speech : भाषा शुद्ध आणि स्पष्ट होती.

९. Memory : तिची recent म्हणजे अलीकडील memory आणि रिमोट memory ही खूप अशक्त होती.

१०. Handendness : राईट handed..उजव्या हाताचा वापर जास्त करणारी.

III. PSYCHOLOICAL EVALUATION / Assessment

१. Bender gestalt test वापरली.
यात visual आणि motor coordination कसे आहे , किती आहे हे समजते.

२. WISC ..(Wechsler Intelligence Scale for Children)
यात IQ टेस्टिंग होतेच शिवाय cognitive strengths आणि weakness काय आहेत हे समजते.

३. Draw man Test :
ही टेस्ट Cognitive development समजण्यकरीता. भाषे वर किती प्रभुत्व ते समजण्याकरिता किंवा अजून काही स्पेशल needs आहेत का हे समजण्या करिता उपयुक्त आहे.

४. Sentence completion.

२. Behaviour during Testing :

सिमरन friendly होती आई सोडून बाकी कोणाची मदत घेण्यास तयार नव्हती.
ती खूप गप्पा मारत होती त्यामुळे inattentive होती. बेफिकीर होती. हट्टी होती आणि irrritate करत होती. शॉर्ट attention span होते.
तिला कोणतीही टेस्ट पूर्ण करण्या करिता force करावा लागत होता. वारंवार सांगावे लागत होते.

३. Test findings :
१. Draw man Test :
तिचा score बघता अजून काही गोष्टींचा अभ्यास करणे जरुरी आहे. इमोशनल disturbance आहे का याची तपासणी करणे गरजेचे आहे हे समजले.

२. WISC ..(Wechsler Intelligence Scale for Children)
यात तिचा I.Q. ८९ आला. तो ती dull normal child आहे असे दर्शवित होती.

३. Sentence completion test करिता तिला सतत आई force करत होती. तिची आई तिला मदत करत होती .. आणि त्यामुळे तो score नाही count केला.

४. Bender gestalt test :
तिचे मोटर age तिच्या वया पेक्षा कमी आहे. ते ७ वर्ष च आहे. Instability आणि poor visio – motor coordination आणि personality सुधा. याव्यतिरिक्त confused होती. Planning आणि instability आणि संघटन ही नियंत्रित नव्हते. मेंटल confusion . गोंधळ होता.
ती एकावेळी एक गोष्ट करण्याचा ही कंटाळा करत होती कारण तिचे concentration होत नव्हते. अति चंचल होती. Attention span कमी होता. डोळे आणि हातची हालचाल यात coordination खूप कमी होते. Visio motor.

तीला जर proper guidance दिला नाही तर तिच्यात अजून जास्त इमोशनल disturbance निर्माण होईल.
याकरिता अजून counselling , therapy sessions, play therapy गरजेचे आहेत.

४ . Recommandation
१. Parent counselling :
accept करत नाहीत तिला काही गरज आहे therapy ची किंवा तिच्यात काही उणीवा आहेत. याकरिता पालकांचे counselling करणे गरजेचे आहे.
२. Prognosis – रोग निदान : सूचक आणि सकारात्मक
मदत केली तर नक्की बदल घडून येणारे.

IV . GOALS OF THERAPY

१. Long term goals : तिच्या मधले भावनिक disturbance जे आहेत ते कमी करूंन तिचा attention span वाढविणे. म्हणजे तिचे लक्ष विचलित होण्यापासून कमी करणे.

२. Short term goals
Attention span म्हणजे लक्ष केंदित करून एकाग्रता वाढविणे आणि तिचा शाळेतला progress ,achievement positive , सकारात्मक वाढ करणे.

V . TREATMENT PLAN
* Medicine prescribed –
Medication for ADHD behaviour.

* Other treatment :
१. Play session .. लक्ष केंद्रित आणि एकाग्र होण्याकरिता खेळ, बुद्धिबळ , puzzles , मेमरी वाढविण्याकरिता विविध memory गेम्स , याशिवाय तिच्या भाषिक क्षमता वाढविण्याकरिता गेम्स आणि पझल्स

२. Parental counseling. पालकांचे counselling
मुळात आपली मुलगी ADHD आहे याचा स्वीकार करून मुलांना कसे हाताळले पाहिजे याकरिता सल्ला .

VI . CONCLUSION

सिमरन ही नॉर्मल dull personality ची मुलगी आहे. तिला वर्तन behavior problem आहे. ADHD , त्यामुळे ही शाळेत मागे पडते. Concentration आणि लक्ष दिले जात नाही. एकाग्र होत नाही. घरात हिंदी भाषा आणि शाळेत इंग्लिश यामुळे समजण्यास अवघड जाते. आणि confusion वाढते. शाळा जर बदलायची नसेल तर घरी सुधा इंग्लिश मध्ये बोलण्याची गरज आहे .

तसे केल्यावर तिला अभ्यासाची ही थोडी आवड निर्माण झाली कारण शाळेत इंग्लिश आणींघरात हिंदी यातून होणारे confusion कमी झाले. एकच भाषा नीट समजू लागली. त्यामुळे communication आणि लँग्वेज skill ही develop झाले. तिला तिची energy तिच्या आवडत्या छंद hobbies मध्ये गुंतविली. डान्स मुळे, स्विमिंग मुळे तिची energy तिकडे जावू लागली. पण visio motor skill ही develop होताना दिसले .

इथे काही थेरपी sessions , play therapy दिल्यावर तिच्या मध्ये बरीच सुधारणा दिसून आली. एका जागी जास्त वेळ बसू शकत नव्हती पण तिच्या बरोबर तिला समजेल असे guide केले तर ती एका जागी जास्त वेळ बसू लागली. त्यामुळे तिची hyperactivity कमी झाली आणि शाळेत ही परफॉर्मन्स चांगला झाला.

वरती खूप गोष्टी सांगितल्या. अभ्यास केला गेला. सिमरन चा अभ्यासात येणारा कंटाळा दूर करण्याचे प्रयत्न केले गेले.

अर्थात हा जो अभ्यास केला गेला तो एका भेटी मध्ये कधीच शक्य नसतो. त्याकरिता वेगवेगळी sessions , test चे वापर करून नक्की काय समस्या आहेत त्या शोधण्यास मदत झाली. समजून घेण्यास मदत झाली. आणि मग नक्की कोणता प्रोब्लेम आहे यावर ठाम मत झाले त्यानंतर ट्रीटमेंट काय आणि कशी हे ठरले.

आपल्याला या गोष्टी खरेच माहिती नसते. की एक मानसिक समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणे म्हणजे खूप वेळ द्यावा लागतो. समजून घ्यावे लागते. आणि तासा सल्ला घरचे आणि पेशंट यांना द्यावे लागतात. आणि त्याचा किती उपयोग होतो किती बदल घडून येतो याचे निरक्षण परत टेस्ट करणे ही गरजेचे असते.

कामाचा कंटाळा येवू न देण्याकरिता काय करावे ?

तेच तेच काम असेल तरी विविधता आणावी. कधी ब्रेक घ्यावा. जसे कधी चहा असेल , जेवण असेल ..पण थोडा कामातून बदल होण्याकरिता एखादे हलके फुलके गाणे असेल .किंवा शेजारी काम करणाऱ्या सोबत थोड्या गप्पा टप्पा. किंवा कधी इतरांचे मार्गदर्शन घेणे गरजेचे. मुळात कंटाळा का येतो तर आपल्याकडे जास्त capacity आणि energy असेल आणि त्यापेक्षा कमी capacity चे काम असेल तर काम कसेही लगेच पूर्ण करू शकतो हा विश्वास असतो. म्हणून मग आपल्या capacity पेक्षा जास्त capacity चे काम घ्यावे. म्हणजे नवीन शिकताना उत्साह ही येतो. आणि वेळ बिझी ही राहतो.

याउलट एखदायला त्या कामाची आवड नसते. पैसे मिळतात म्हणून करायचे असे ही असते त्यामुळे कंटाळा येत असतो. तर एखाद्याला तेवढे काम ही जमत नसते म्हणून ही कंटाळा येतो. किंवा एखाद्याला काम करून त्यात पुढे काही progress दिसत नाही म्हणून कंटाळा येतो.
अशी विविध कारणे आहेत.

आयुष्य सुंदर आहे . मानसिक समस्या या डॉक्टरनी ताप आला म्हणून गोळ्या दिल्या आणि दोन चार दिवसात बरे झाले असे इथे नसते. नक्की आजार किंवा समस्या समजून घेवून मार्ग शोधणे आणि त्याकरिता पेशंट आणि घरच्यांना ही सकारात्मक दृष्टीने सामील करून घेण्याची गरज असते. वेळ हा द्यावाच लागतो.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!