Skip to content

कसंही वागलं तरी ही दुनिया नाव ठेवतेच!

कसंही वागलं तरी ही दुनिया नाव ठेवतेच!


मिनल वरपे


ही गोष्ट तर सर्वांनीच ऐकली असेल ना की एक माणूस गाढवाच्या पाठीवर ओझ ठेवून चालला असतो तेव्हा लोक म्हणतात किती निष्ठुर माणूस आहे मुक्या जनावराच्या पाठीवर ओझ ठेवून स्वतः मस्त मोकळा जात आहे मग तो माणूस गाढवाच्या पाठीवर ठेवलेलं ओझ उचलतो आणि स्वतःच्या पाठीवर ठेवून चालतो तेव्हा लोक बघतात आणि हसतात कसला वेडा माणूस आहे बघा गाढवाच्या पाठीवर ओझ ठेवायचं तर स्वतः ओझ घेऊन फिरतोय..

चार माणसात तुम्ही उभे राहाल तर लोक म्हणतील बघा कसा उभा आहे चार माणस बोलत आहेत तर जरा बसून बोलावं आणि तेच जर तुम्ही बसलात तर म्हणतील काय माणूस आहे हा चार लोक बोलत आहेत आणि हा मस्त बसला आहे काही मान ठेवायची पद्धत आहे की नाही.

म्हणजे तुम्ही काहीही करा उठा नाहीतर बसा.. चाला नाहीतर पळा.. काहीही करा पण लोक काहीतरी म्हणानारच… मग आपण ठरवावं की आपल्याला कोणाचं ऐकायचं आहे लोकांचं की स्वतःच..

कारण आपलं वर्तमान आपल्याच हातात आहे आणि आपलं भविष्य आपणच घडवणार आहोत तर यामधे लोकांची काय भूमिका आहे सांगा बर…?? जर मला एखादी गोष्ट योग्य वाटतेय तर ती योग्य आहे की नाही ते मी तपासून बघणार आणि तीच गोष्ट करणार जर मी लोकांचं ऐकायला लागलो तर कोणतीच गोष्ट कोणातच काम आपण कधीच यशस्वीपणे पार पाडू शकणार नाही.

लग्न जमत नसेल तर मिळेल त्या मुलासोबत/ मुलीसोबत लग्न कर म्हणणारे लोक जर आपण मिळेल त्या मुलीसोबत/ मुलासोबत लग्न केलं तर याला याच मुलगी/ मुलगा मिळणार होताका.. इतकी काय घाई झाली होती..थोडा धीर धरला असता तर अजून चांगलं स्थळ मिळालं असत अस म्हणत आपल्याला त्रास देतात.

मग आपण किती आणि कुठपर्यंत लोकांचं ऐकावं हे आपल्याला कळायला हवं ना..!!

जर आपल्याला आपण घेतलेल्या निर्णयावर ठाम राहायचं असेल, प्रगती करायची असेल, पुढे जायचं असेल आणि स्वतःला उत्तमरीत्या घडवायचं असेल तर लोकांचं नाही स्वतःच्या बुद्धीला स्वतःच्या आवडिंना महत्त्व द्या..

जर आपण योग्य वागत असू.. नीतीनियमांच पालन करून वागत असू..आपल्या आयुष्यात आनंदी आणि समाधानी असू तर लोक काय म्हणतील यांची आपल्याला परवा नसेल..

म्हणून लोक काय म्हणतील याकडे दुर्लक्ष करायचं कारण लोक कायम नावच ठेवणार..आपलं वागणं आपल्याला पटलं पाहिजे आणि आपले निर्णय हे आपल्याला घ्यायचे आहेत कारण आपलं आयुष्य आपल्याला जगायचं आहे दुनियेला नाही…

 


 


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “कसंही वागलं तरी ही दुनिया नाव ठेवतेच!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!