Skip to content

कमजोर कोणीच नसतं, विषय फक्त वेळेचा असतो!!

कमजोर कोणीच नसतं, विषय फक्त वेळेचा असतो!!


टीम आपलं मानसशास्त्र


तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार !!

प्रत्येकाच्या बाबतीत असेच आहे. गुरू जरी असेल तरी पाण्यापर्यंत वाट दाखवील . तळ्यात ले असेल , नदी मधले असेल किंवा विहिरीतील पाणी कसे काढायचे आणि कसे प्यायचे हे तरी प्रयत्न शिष्या ने केलेच पाहिजेत.

कमजोर कोणीच नसतं, विषय फक्त वेळेचा असतो!! लहान मूल मोठे होत असताना त्याच्या अवती भवती जे काही चालले आहे ते तो निरीक्षण करत असतो. त्यांना आपण जे शिकवू , मोठे जे काही शिकवत असतात तेच ते शिकत असतात .अनुकरण करत असतात. ज्या विविध गोष्टी शिकवल्या जातील. इतरांनी केल्या जातील तेवढे जास्त विविध विषय ही मुल शिकत असतात. फक्त कसे होते वेळीच त्यांना विविध गोष्टी , विषय शिकविले , समजावले तर. त्याचे नावीन्यपण असते. शिकण्याची जिज्ञासा असते. आणि grasping power ही सुधा चांगली असते. अशा वेळी काही ही शिकण्याची तयारी असते.

पण जस जसे मुले मोठी होवु लागतात तसतसे त्यांची आवड निवड बदलू लागते. खेळण्याकडे जास्त कल वाढतो . थोडा हट्टीपणा वाढतो. अशावेळी जर पालकांचे ही दुर्लक्ष झाले. काही नवीन विषय शिकविणे जमले नाही. ते त्यांच्या रूटीन मध्ये बिझी असतील . तर सुरुवातीला हुशार असणारे मुल हे ही त्याच त्याच गोष्टी करत राहिल्याने नवीन गोष्टी शिकुच शकत नाही. त्याची माहिती नसते. आणि त्यामुळे कमजोर होवू लागतात.

उदाहरण : तिसरी चौथी पर्यंत पालक त्यांना जमेल तसे अभ्यास घेत असतात. गणित विषय ज्यांचा पक्का असे पालक कमी पडत नाहीत शिकविण्यात. पण जे गणित सोडून इतर विषय घेतले ले पालक असतात त्यांचे स्वतः चे गणित खूप कच्चे असते. किंवा शिकविण्यात मर्यादा . त्यामुळे मुलाला तेव्हाच जर क्लास किंवा इतर guidance मिळाला तर मुलाची प्रगती होते. आवड ही continue राहते.

पण पालक स्वतः ला येत नाही म्हणून शिकवत नाहीत आणि शालेय शिक्षणात ही ठराविक तास , एकावेळी अनेक मुले असतात वर्गात म्हणून शिक्षकांच्या मर्यादा यामुळे मुलाकडे दुर्लक्ष होवून विषय कच्चा राहतो. त्या विषयात तो कमजोर होतो. आणि base कच्चा राहिला तर पुढचे समजणे अवघड जाते. आणि अजून जा त्या विषयात मुल जास्त कमजोर होत जाते. त्याचमुळे वेळीच जर विषय पक्का केला तर कमजोर कोणी राहत नाही.

अगदी च बुद्धिमत्ता कमी असेल , काही अपघात या सारख्या कारणाने उणिवा , कमतरता आल्या असतील तरच . जन्मजात मानसिक दोष , असतील तर च कमजोर असतात.

पालकांना काय वाटतं असते. मुलं थोडे मोठे झाले . आता शाळेत जावू लागले म्हणजे आपली जबाबदारी संपली. पण खरे तर असे नसते. इथेच पालक चुकतात. शाळेत गेल्यावर उलट जास्त जबाबदारी वाढते पालकांची. शाळेत शिकविले ते समजले का याची खात्री करून घेणे नसेल तर स्वतः समजून घेवून तसे शिकविणे. आपल्याला जमत नसेल तर क्लास लावून तिथे पाठवून तयारी करून घेणे. Class लावला म्हणून ही जबाबदारी संपत नाही. तिथे ही समजते ना. जमते ना. विषयाची गोडी वाढली का हे तपासणे त्यावर लक्ष ठेवणे गरजेचे असते.

म्हणजेच काय तर खरे तर कमजोर कोणी नसते पण त्या त्या वेळी त्या त्या गोश्टी केल्या पाहिजेत. शिकविल्या पाहिजेत. समजविल्या पाहिजेत.

आयुष्यात ही असेच आहे . पुढे जावू तसे अनुभव येतात आणि त्यातून काही वेळेस भीती वाटतें. तर नवीन गोष्ट कशी करू , जमेल का या आत्मविश्वासाचा अभाव यातून निर्णय घेतला जात नाही. आणि मग व्यक्ती कमजोर पडते.

विषय असतो त्या वेळेला तो आत्मविश्वास दाखविण्याचा , त्यावेळी ती गोष्ट करण्याची. , एकदा वेळ गेली तर परत ती वेळ येत नाही. नोकरी मध्ये दुसऱ्या चांगल्या कंपनी मध्ये प्रयत्न करताना मिळणारी संधी घेवू का नको , पुढे कसे होईल हे विचार करण्यात वेळ घालविला , निर्णय क्षमता कमजोर पडली तर वेळ निघून जाते हातची संधी गमवावी लागते.

असेच नात्याचे ही आहे. अगदी चांगली नाती असतात नात्यात कधी काही गैरसमज होतात , विश्वासाला तडा जातो , कोणी कधी अपेक्षा असते त्यापेक्षा वेगळे वागतात आणि ते accept होत नाही. तर कधी एकमेकांना वेळीच मदत केली जात नाही. त्यात ही अनेक कारणे , priorities असतात. तर काही नाती गृहीत धरून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. ते आपलेच आहेत ..

कधी लागेल गरज तेव्हा आपले आहेत म्हणून इतर गोष्टींकडे जास्त लक्ष दिले जाते. इतर नाती जास्त जपली जातात आणि जे आपले हक्काचे असतात ते इतरांच्या जवळ येण्याने पेक्षा ते दूर झाल्याने दुरावतात. हक्काची नाती कमजोर पडतात कारण वेळीच त्यांना बांधून ठेवले जात नाही. आपल्या प्रेमाची , आपुलकीची , शब्दांची , भेटीची , विश्वासाची घट्ट मिठी सुटू लागते.

अनेकदा समजते ही की ही नात्याची घट्ट मिठी सैल , ढीली पडू लागली आहे पण ती घट्ट करू करू असे म्हणून वेळ जातो किंवा कसे याचे मार्ग शोधण्यात वेळ जातो. आणि ही नात्यांची विण , मिठी सैल पडत जाते. फाटत जाते नाते जसे वस्त्र वेळीच धागे पक्के केले नाहीत , टीप टाकली नाही. जी विण उसवली ती वेळेत घट्ट करू शकले नाहीत तर ते वस्त्र फाटते. आणि आपण कधीच वापरू शकत नाही भले ते आपले आवडते असेल तरी. ते वस्त्र कमजोर होत जावून निकामी होतें तसेच नाती ही वेळीच लक्ष दिले नाही. तर कमजोर होत जातात.

असेच असते जीवनसाथी नाती बिघडतात. वेळीच समजून घेतले नाही की कमजोर पडतात आणि भांडणे , वाद यातून घटस्फोट आणि कायमचा दुरावा येत जातो.

वेळीच जर काही बिघडत चालले आहे याकडे लक्ष दिले नाही. मूळ काय भांडणाचे हे समजून घेतले नाही तर वाद वाढतात , दुरावा वाढत जातो. काही वेळेस सांगूनही दुर्लक्ष केले जाते. किंवा इतर गोष्टी च जास्त महत्वाच्या म्हणून त्याच गोष्टींना priority दिली जाते .यातून वेळ निघून जाते आणि घटस्फोट होवून कायमचा दुरावा निर्माण होतो. आयुष्यभरासाठी तन , मन याने एकत्रित आलेली जोडपी ..आपली नाती कायमची टिकविण्यास कमजोर पडतात. केवळ वेळ सांभाळली नाही.

मिलिटरी मध्ये वेळ पाळणे जसे महत्वाचे तसे त्यांचे नियम कडक आहेत पण एखादा कमजोर पडला , रोज तेच तेच काय करायचे म्हणले तर तो त्याची नोकरी कायमची घालवून बसेल.

गायक ,खेळाडू , announcer , चित्रकार त्याने विचार केला काल आपले performance उत्कृष्ठ झाले आज आता सरावाची गरज नाही . असे म्हणून त्या एकच उत्कृष्ट performance चेच गुणगान रोज गात बसून रोजचा सराव दुर्लक्षित केला तर तो नक्की नवीन परॉर्मन्स मध्ये कमजोर पडणार .. म्हणजे प्रयत्नपूर्वक केलेल्या गोष्टी ही जरी आपले त्यावर कमांड असेल तरी वेळीच सराव केला नाही म्हणून ही परत कमजोर होवू शकतात.

आयुष्य सुंदर आहे . कमजोर कोणीच नसतं, विषय फक्त वेळेचा असतो!! वेळीच गोष्टी समजणे , शिकणे आणि तसे बदल घडविणे , वर्तन घडणे , निर्णय घेणे जरुरी असते . वेळ , व्यक्ती , परिस्थिती तिथेच थांबून राहत नाही. त्यामुळे वेळीच योग्य निर्णय , योग्य शिक्षण , अनुभव घेतले तर आपण कमजोर राहूच शकत नाही.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!