एन्जॉय करण्याची एकही संधी सोडू नका, ऍन्जिओग्राफी करण्याची गरज पडणार नाही.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
मैं ज़िंदगी का साथ निभाता चला गया
हर फ़िक्र को धुँएं में उड़ाता चला गया
बरबादियों का सोग़ मनाना फ़िज़ूल था
बरबादियों का जश्न मनाता चला गया
जो मिल गया उसी को मुक़द्दर समझ लिया
जो खो गया मैं उसको भुलाता चला गया
ग़म और खुशी में फ़र्क न महसूस हो जहाँ
मैं दिल को उस मुक़ाम पे लाता चला गया
मैं ज़िंदगी का साथ निभाता चला गया
हर फ़िक्र को धुँएं में उड़ाता चला गया….
हम दोनो या देवानंदच्या मुव्ही मधील आणि मोहम्मद रफी यांनी गायलेले हे सुप्रसिद्ध साँग जे इतक्या वर्षांनंतरही तितकच लोकप्रिय आणि प्रेरणादायी आहे. काय सांगत हे गाणं? हेच की चिंता, ताण काळजी हे सर्व आयुष्यात येणारच आहे. ते आपण टाळू शकत नाही. पण त्याला मागे टाकून आपण पुढे नक्कीच जाऊ शकतो.
आपण अनेकदा आपल्याला जे मिळालं त्याकडे लक्ष देत नाही. पण तेच खर महत्त्वाचं आहे. जे मिळालं ते आपलं आणि जे नाही ते जर आपण विसरत जाण्यातच आपलं शहाणपण असत. थोडक्यात काय तर सुख असुदे किंवा दुःख आपण आपली आपल्या आयुष्याची साथ सोडता कामा नये. आपण नदीच्या प्रवाहासारख पुढे जात राहील पाहिजे.
आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेत, तो एन्जॉय करत.
आपण आपल्याकडे जे नाही त्याकडे लक्ष देऊन नुसता त्रागा चिडचिड करून घेतो. यातून आपल्या मनावर तर परिणाम होतात पण शरीरावर पण परिणाम होतात. चिंतेचा सर्वात जास्त परिणाम आपल्या एकंदरीतच आरोग्यावर तर रागाचा परिणाम आपल्या हृदयावर होत असतो.
संशोधनाने हे सिद्ध केले आहे की cardiac arrest असणाऱ्या लोकांमध्ये जास्त करून रागाचं प्रमाण होत. हे कुठेतरी कमी व्ह्यायला पाहिजे ना! आपल्याला कितीही वाटलं तरी शरीर आणि मन हे दोन्ही वेगळे नाहीत. या दोघांचाही एकमेकांशी संबंध आहे. या दोघांची काळजी नीट घ्यायची असेल तर आपला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला पाहिजे.
यासाठी आधी आयुष्यावर प्रेम करायला शिका. आता बरेच जणांना अस वाटू शकत की आयुष्यात इतके सर्व प्रॉब्लेम चालू असताना प्रेम तरी कसं येणार. पण हेच प्रॉब्लेम कमी करण्याचं उत्तर आहे. ते त्यावर रुसून, त्यापासून पळ काढून नाही मिळणार. त्यासाठी आपण आपल्या आयुष्यात येणारा क्षण परत येणार नाही असं समजून तो जगला पाहिजे. चांगला असुदे की वाईट तो एक अनुभव असतो जो क्षणिक आहे.तो काहीतरी शिकवून जात असतो.त्यासाठी तो तसा जगाला पाहिजे.
एक व्हीलन या मूव्ही मधील श्रद्धा कपूर ला कॅन्सर असतो.पण तरी ती चेहेऱ्यावर हास्य आणून प्रत्येक क्षण एन्जॉय करत असते.आपली बकेट लिस्ट पूर्ण करत असते. या गोष्टीचं जेव्हा सिद्धार्थ ला आश्चर्य वाटत तेव्हा तिच वाक्य खूप प्रेरणा देणार आहे.
“जिंदगी को ऐसी पार्टी की तरह जीना चाहती हू की मौत जब आये ना तो साथ बैठकर दो ड्रिंक मारकर जान लेकर चली जाये.”
अनेक जण शेवटी कधीतरी आयुष्य आनंदाने राहू म्हणून कष्ट उपसून उपसून थकतात. त्यात आताचा क्षण पाहतच नाही. त्याचा आनंद घेत नाहीत. आणि जेव्हा शेवट येतो आणि मागे पाहिलं जात तेव्हा लक्षात येत की आपण जो आनंद शोधत होतो तो मागेच पडला. तो आपण जगलोच नाही.
म्हणूनच लाईफ एंजॉय केलं पाहिजे. काहीजणांना वाटत आता माझं किती आयुष्य राहिलय? आता काय करणार? पण अस नाही. जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत आपण ते एन्जॉय करू शकतो. कोरोना काळात जरी आपल्याला त्रास झाला असला तरी यातून बरेच जणांना एक नवीन आयुष्य पण मिळालं. लॉकडाऊन मध्ये जेव्हा सर्व जन घरी होते. अनेकांनी आपले जुने छंद जोपासले. अनेकांनी नवीन गोष्टी शिकून घेतल्या. कामामुळे ज्यांना आपल्या माणसांना कधी फार वेळ देता आला नाही. त्यांनी आपल्या लोकांसोबत मस्त टाईम स्पेंड केला. वाईटातही चांगलं असते ते याला म्हणता येईल.
आयुष्याला लव्ह यू म्हणत पुढे जात राहील पाहिजे. आपण कामाच टाईम टेबल करतो. पण सुट्टीच कधी करत नाही. त्यासाठी कधी वेळ काढत नाही. तो काढला पाहिजे. काम, त्रास हे सर्व येत राहणार. या सर्वांना सोबत घेऊन आपल्याला लाईफ एंजॉय करायची आहे.
आणि आनंदी राहायला टॅक्स पडत नाही. तो फ्री असतो. आपण कश्यातून मिळवतो यावर तो अवलंबून आहे. मग नवीन मूव्ही पाहणं असेल, gardening, घरातल्या लोकांसोबत वेळ घालवण, मस्त सोलो ट्रिप काढणं या गोष्टी खूप आनंद देतात. आपण तो फक्त घेतला पाहिजे. आपल्या आयुष्यातला का आपण शोधला पाहिजे. नित्शे म्हणतो,
He who has a why to live can bear almost anyhow..
ज्याला का जगायचे याचा उलगडा झाला त्याला कश्याही पद्धतीने जगता येते.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

छान खूपच छान.
आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा बघा प्रत्येक क्षणाचा आनंद घेता येईल..खूप छान लेख आहे
excellent
खूप छान लेख आहे धन्यवाद