Skip to content

एखाद्या व्यक्तीची आपल्याला सवय झालीये, हे कसं ओळखावं?

एखाद्या व्यक्तीची आपल्याला सवय झालीये, हे कसं ओळखावं?


मिनल वरपे


आपण दोन गोष्टी आवर्जून करतो त्या म्हणजे जे आपल्याला आवडते तेच आपण करतो आणि जे आपल्याला नाही आवडत त्यापासून आपण लांब राहतो,टाळतो किंवा ते दुर्लक्षित करतो. आपल्याला काय आवडते तर ज्यातून आपल्याला आनंद मिळतो.

अगदी असच आपल आपल्या आजूबाजुला वावरणाऱ्या माणसांबद्दल सुद्धा असते. काही व्यक्ती आपल्याला आवडतात, त्यांचं वागणं, बोलणं, आपल्याला योग्य वाटते आणि ज्याचं वागणं बोलणं आपल्याला नाही आवडत ते व्यक्ती आपल्याला नाही आवडत.

आणि मग जे व्यक्ती आपल्याला आवडतात त्यांच्या सहवासात राहायला आपल्याला खूप आवडते. ती व्यक्ती आपल्या कायम जवळ राहावी, ती व्यक्ती जे बोलेल ते ऐकायचं, व्यक्ती जर आपल्याला दिसली नाही..त्यांच्यासोबत बोलणं झालं नाही की आपला वेळ जात नाही. आणि यालाच आपण त्या व्यक्तीची सवय झाली असे म्हणतो.

कोणाची आपल्याला सवय झाली असेल आणि त्यातून आपल्याला त्रास होत नसेल तर ती नक्कीच चांगली सवय म्हणता येईल. ती व्यक्ती आपल्याला कायम चांगलं सांगत असेल,. आपल्याला आलेल्या अडचणीत कस वागावं हे शिकवत असेल, आपल्याला काय चुकीचं आणि काय बरोबर हे सांगत असेल तर ती व्यक्ती सुद्धां बरोबर आहे.

आणि कधी ती व्यक्ती जरी आजूबाजूला नसली तरी सुद्धां यावेळी या प्रश्नांचं उत्तर तिने मला काय दिलं असत.. त्या व्यक्तीने माझ्या या अडचणीत मला काय सल्ला दिला असता .. मला काय सांगितल असत असा विचार करून आपण योग्य ते वागतो. म्हणजेच त्या व्यक्तीची आपल्याला झालेली सवय ही आपल्याला कायम प्रेरणा देणारी आहे.

पण जर एखादी व्यक्ती अशी असेल ज्याची आपल्याला सवय असेल पण ती आजूबाजूला नसेल तर आपल्याला काहीच सुचत नाही. काय बोलावं काय, वागावं कळत नाही. समोर आलेल्या अडचणीत, परिस्थितीत काय करावं हे सुद्धा आपल्याला जमत नाही तर ही सवय आपल्यासाठी चांगली नाही कारण ही फक्त भावनिक सवय आहे. आणि अशी सवय आपल्याला आयुष्यात निर्णय घेताना, पुढे जाताना त्रास देते.

म्हणून अशा व्यक्तिपासून आपण लांब राहील नाही तरी चालेल, टाळलं नाही तरीसुद्धा चालेल पण आपण भावनेत अडकणार नाही याची आपण काळजी घ्यावी.

आज आपल्याला शाळेतले दिवस आठवतात जरी शिक्षक आपल्या आजूबाजुला नसले तरी आपल्याला त्यांनी काय शिकवलं आणि त्यावेळी आपल्याला त्यांची म्हणजेच त्यांच्या शिकवणीची झालेली सवय आपल्याला आज सुद्धा प्रेरणा देते.

म्हणून आपण अशा व्यक्तींच्या सहवासात राहावं, सवय असावी ज्यांच्यामुळे आपल्याला जगण्याची प्रेरणा मिळेल. ती व्यक्ती आजूबाजूला असो अथवा नसो पण त्या व्यक्तीने सांगितलेल्या गोष्टीतून कधी.. कुठे..कस… वागावं , काय करावं हे कळेल.



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “एखाद्या व्यक्तीची आपल्याला सवय झालीये, हे कसं ओळखावं?”

  1. कोणतीही साथ संगत फार महत्त्वाची.
    एक तत्ववेत्ता, म्हणतो तुम्ही तुमचे सोबती सांगा
    मी तुम्हाला तुमचा स्वभाव सांगतो ,”
    तात्पयॅ: जशी संगत तसा स्वभाव.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!