Skip to content

एखाद्या गोष्टीचं कौशल्य येण्यासाठी सराव का महत्वाचा आहे? जाणून घ्या याचं शास्त्रीय कारण..

एखाद्या गोष्टीचं कौशल्य येण्यासाठी सराव का महत्वाचा आहे? जाणून घ्या याचं शास्त्रीय कारण..


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


कौशल्य, skill अशी गोष्ट ज्याने एरवी कठीण वाटणारी गोष्ट ही चांगल्या पद्धतीने करता येते. कौशल्याची जर व्याख्या पाहिली तर दिसून येईल की “व्यक्तीची क्षमता जी सरावातून प्रशिक्षणातून विकसित झालेली असते ज्याद्वारे एखादे विशिष्ट काम चांगल्या पद्धतीने करता येते, सरलतेने करता येते.”

प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या गोष्टीच कौशल्य अवगत असतं. काहीजणांच बोलण्याचे कौशल्य चांगलं असतं, काहीजण जेवण उत्तम बनवतात, त्यातही विविध भाज्यांचं डिझाइन केलं जातं त्याला carving म्हणतात ते बरेच जणांना अवगत असतं. खेळामध्ये बरेच जण कुशल असतात.

आपण विचारही करू शकत नाही इतक्या प्रकारची कौशल्य माणसाला अवगत असतात. पण हे कौशल्य माणसाला आपोआप प्राप्त होतं का? आज मी ठरवले एखादी गोष्ट शिकून त्यात प्रवीण व्हायचं आणि उद्या मी लगेचच त्यात skilled झाले असं होतं का? नाही.

कारण कोणतीही गोष्ट यायला शिकायला कालावधी लागतो कष्ट लागतात आणि महत्त्वाचा लागतो तो सराव. हो सराव. एखाद्या गोष्टीत निपूण होण्यासाठी, ती गोष्ट चांगल्या पद्धतीने जमण्यासाठी सराव महत्त्वाचा असतो. कौशल्याच्या व्याखेतही हेच दिसतं की सरावातून मिळालेली क्षमता.

आपण लहानपणापासूनच सरावाबद्दल ऐकत आलेलो आहोत. नवीन सायकल आणली चालवायचं सराव करा, एखादा विषय समजत नसेल गणित जमत नसेल तर रोज सोडवा, त्याचा सराव करा. विचार केला तर लक्षात येईल आपल्याला रोज गृहपाठ दिला जात असे त्याचा उद्देश आहे आपला त्या विषयाचा सराव व्हावा यासाठीच. क्रीडा स्पर्धा असू देत, त्यांच्या सुरुवातीच्या खूप आधीपासूनच मुलांना प्रशिक्षण दिले जातात त्यांच्याकडून रोज सराव करून घेतला जातो जेणेकरून त्यांनी स्पर्धेत उत्तम कामगिरी करावी.

कोणतेही काम जमत नसेल तर आपल्याला नेहमीच सांगितलं होतं की प्रॅक्टिस, सराव करायचा. इंग्लिश मध्ये यावर एक वाक्य पण आहे ते म्हणजे “practice makes man perfect.” सरावाचे महत्त्व अगदी प्राचीन काळापासून चालत आलेली आहे अगदी गुरुकुलापासून. का इतका जोर दिला जातो सरावावर? कारण यातून आपल्याला ती गोष्ट चांगली जमावी म्हणून.

शाळेतही आपण सुरुवातीला जात असतो आपल्याला नीट लिहिता येत नसतं. पण सरावाने आपण ते कौशल्य मिळतो. त्यामुळे सराव का करावा तर प्राविण्य मिळवण्यासाठी हे सर्वांना माहीत आहे. पण या सरावाला इतक महत्त्व देण्यामागे किंवा सरावातून आपण चांगली कामगिरी करतो त्यात एक शास्त्रीय कारण देखील आहे जे आपण जाणून घेतले पाहिजे.

आपल्या मेंदूमध्ये मज्जातंतूंचे मोठे जाळे पसरले आहे. हे मज्जातंतू आपल्या विचार, भावना, वर्तनावर प्रभाव टाकत असतात. ज्याला न्यूरॉन्स असेही म्हणतात. तर हे न्यूरॉन्स प्लास्टिक सारखे असतात म्हणजेच प्लास्टिक जसं तापल्यावर आकार बदलत तसच आपण कष्ट घेऊन न्यूरॉन्सना हवं तसं वळवू शकतो. ज्याला “न्यूरोप्लास्टिसिटी” असे म्हणतात.

जेव्हा आपण एखादी नवीन गोष्टी शिकायला घेतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये त्याचा रस्ता तयार होऊ लागतो. ज्याला “neuropathway” असे म्हणतात.जितकी आपण ती गोष्ट जास्त शिकतो तितका तो रस्ता पक्का होत जातो. उदाहरणार्थ, एखादी पायवाट जी धुळीने माखलेली आहे.

सुरुवातीला फार कमी लोक त्यावरून जात असतात. नंतर नंतर लोकांचा वावर त्या पायवाटेवरून वाढू लागतो आणि त्या वाटेचे महत्त्व लक्षात घेऊन त्याचे डांबरीकरण केले जात व त्याच पक्क्या रस्त्यामध्ये रूपांतर होतं. हे कशामुळे होतं? तर तिथे सातत्याने चालल्यामुळे, प्रवास केल्यामुळे. तसेच जेव्हा आपण एखादी नवीन गोष्ट शिकतो सातत्याने त्याचा सराव करतो तेव्हा आपल्या मेंदूमधील या मज्जातंतुंचा रस्ता पक्का होत जातो, स्ट्रॉंग होत जातो. जितका जास्त आपण सराव करू तितका neuropathway स्ट्रॉंग होत असतो.

ज्यामुळे आपल्याला ती गोष्ट चांगली जमू लागते. आपल्या सवयीची होते. आता इथेही एक गंमत आहे. जसा चांगल्या गोष्टीचा असतो neuropathway असतो तसाच चुकीच्या गोष्टींचाही neuropathway असतो. कारण neurons कधी भेदभाव करत नाहीत. त्यांना चांगलं वाईट यातला फरक माहित नाही. आपण ची गोष्ट सातत्याने करणार त्याचा रस्ता आपल्या मेंदूमध्ये पक्का होत जाणार.

आपल्याला लागलेल्या चुकीच्या सवयी जसे की आळस करणे, उशिरा उठणे, खोटे बोलणे हे याचाच भाग आहेत. आता जेव्हा आपण एखादी नवीन गोष्ट चांगली गोष्ट शिकत असतो आणि मधेच सोडून देतो तेव्हा त्याचा जो रस्ता जी पाऊलवाट मेंदूमध्ये नुकतीच तयार होऊ लागलेली असते ती weak होऊन जाते आणि इतक्या वर्षांच्या चुकीच्या सवयी ज्यांचा neuropathway आधीपासूनच स्ट्रॉंग असतो तो अजून स्ट्रॉंग होतो.

मग यावर उपाय काय? तर परत सरावच. जसं आधी म्हटलं की न्यूरॉन्स हे प्लास्टिकसारखे असतात. आपण हवे तेव्हा त्यांना हवं तसं नव्याने वळण लावू शकतो म्हणूनच एखादी चांगली सवय लावून घ्यायची असेल, जर कौशल्य शिकायचं असेल तर सातत्याने सराव करणं, शिकत राहणं हा त्यावरचा उपाय आहे. यातून नक्कीच आपल्या चुकीच्या सवयींचे neuropathway weak होतात आणि आपल्या चांगल्या गोष्टींचे neuropathway strong होऊन आपण त्यात निपुण होतो.

म्हणूनच जर आपल्याला आपल्या चुकीच्या सवयींना वरचढ होऊ द्यायचे नसेल तर चांगल्या गोष्टींचा न थांबता सराव केला पाहिजे आणि त्यात सातत्य ठेवले पाहिजे. हे होते ते शास्त्रीय कारण जे सराव का महत्वाचा आहे ते सांगत.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!