Skip to content

एखाद्यावर अधिक रुसण्यापेक्षा आपल्या आयुष्यातल त्यांचं महत्त्व कमी करुन टाका.

एखाद्यावर अधिक रुसण्यापेक्षा आपल्या आयुष्यातल त्यांचं महत्त्व कमी करुन टाका.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


रुसवे फुगवे, लटकी भांडण हे नात्यात असतातच. यातून नात्याची गोडी वाढत असते. नुसतं छान छान, खूपच चांगलं अगदी आदर्श नात अस असत नाही. पण तरीही आपण सर्वांवर रुसतो का? सर्वांना लाडी गोडी लावायचा प्रयत्न करतो का? नाही.

आपण कोणावर रूसतो तर आपल्या माणसावर. मग यात फक्त रक्ताची नाती येतात अस अजिबात नाही. ज्या माणसाला आपण मनापासून आपल मनात असतो, ज्याला जीव लावत असतो त्यावरच आपला रुसवा, राग, प्रेम हट्ट निघत असत.

आता ह्या जवळच्या, आपल्या माणसामध्ये काही सर्व माणसांचा समावेश होत नाही. कामाच्या ठिकाणची, एरवी कुठेतरी भेटलेली, नुसती ओळख असलेली लोक यात येत नाहीत. यात काही मोजकी लोकच येतात. सर्वसामान्य लोकांच्या बाबतीत तरी अस असत.

पण काही लोक मात्र याच्या उलट असतात. त्यांना नाती बनवायची सवय तर असतेच. जी चांगली गोष्ट आहे. आपल्या सामाजिक कौशल्याचा भाग आहे. पण यातही कोणत नात कोणत्या मर्यादेपर्यंत ठेवावं, त्याला किती महत्त्व द्यावं हे ही तितकंच गरजेचं आहे.

कामाच्या ठिकाणी बॉस सोबत जर आपण अति सलगी ठेवली तर त्याचा कामावर परिणाम होणार, तसच घरातल्या लोकांशी जर आपण बाहेर सारख, औपचारिक रीतीने वागायला लागलो तरी त्याचा परिणाम होणार.

म्हणून माणूस पाहून तस नात ठेवावं लागतं. पण ही जी काही लोक असतात ती अस करत नाहीत. जो दिसेल तो चांगला, जो दिसेल त्याच्याशी जवळच नात तयार करायचं, त्याला आपलं मानायच, अगदी मनाच्या जवळ करायचं असा यांचा स्वभाव असतो. ही लोकं मनाने निरागस असतात.

समोरचा माणूस जरा चांगल वागला, बोलला तरी त्यांच्याबद्दल यांचे विचार दृढ होतात आणि ही लोकं त्यांना आपलं मानायला लागतात आणि आधी म्हटल आपण रुसतो कोणावर? आपल्या माणसावर. इथेही अगदी तेच होत. येता जाता सर्वांनाच आपलं मानल्याने आपण कळत नकळत त्याच्यावर हक्क गाजवू लागतो आणि त्या माणसांकडून आपल्या अपेक्षाही वाढतात. त्या पूर्ण झाल्या नाहीत की हा रुसवा वैगरे येतो.

पण अस गरजेचं नाही आपण समोरच्या व्यक्तीला आपलं मनात आहोत, तेवढ महत्त्व देत आहोत तेवढ तीही आपल्याला देत असेल, जवळच समजत असेल. अनेकदा अस होत की ती व्यक्ती आपल्यासोबत जेवढ्यास तेवढ नात ठेवून असते. त्यांना समजत ही नसतं आपण त्यांच्यावर रुसलो आहोत, काही अपेक्षा करत आहोत. कारण त्यांच्या आयुष्यात मुळातच आपलं तितकं महत्त्व नसतं की त्यांनी आपल्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यावं.

पण आपण मात्र विनाकारण त्रास करून घेत राहतो. उगाच त्या माणसावर रुसून राहतो. त्यातच गुंतून पडतो. खरतर त्या माणसाला यातील काहीही माहीत नसत आणि फारसा फरकही पडत नसतो. म्हणून इथे लक्षात घेतलं पाहिजे की कोणाला किती महत्त्व द्यावं. माणूस कितीही चांगला असला तरी प्रत्येक माणूस आपल्या जवळचा असू शकत नाही.

समोरच्या व्यक्तीच्या चांगुलपणाचा जर आपण गैरसमज करून घेतला तर नुकसान आपलं होणार त्याच नाही. म्हणूनच उगाच जो दिसेल त्याला आपलं म्हणण्यापेक्षा, उगाच त्यावर रुसण्यापेक्षा आपल्या आयुष्यातील त्याच वाढलेले महत्त्व कमी करा.

कारण बरेचदा आपण अश्या व्यक्तीसाठी वाईट वाटून घेत असतो जी आपल्या आयुष्यात काही योगदान देत नसते. ना चांगलं ना वाईट. मग अश्या माणसांना अगदी जवळ करून वाईट वाटून घेण्यात काय अर्थ राहतो. म्हणून नाती जरूर बनवावीत पण कोणत्या नात्याला किती महत्त्व द्यायचं, कोणाला किती जवळ करायचं हे आपल्याला योग्य त्या वेळी लक्षात आल पाहिजे.

हे एक कौशल्य आहे जे जितक्या चांगल्या पद्धतीने आपण आत्मसात करू तेवढ आपल्यासाठी चांगलं ठरतं.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

7 thoughts on “एखाद्यावर अधिक रुसण्यापेक्षा आपल्या आयुष्यातल त्यांचं महत्त्व कमी करुन टाका.”

  1. It’s very very important thought due to how maintain our relationship. 👌👌

  2. Chan sagitale mi tr sarvanch lavuna geyla jate ani swatha trass karun gete
    Mast vatal kekh

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!