Skip to content

एखाद्याला वाईट ठरवण्याआधी त्या व्यक्तीची पार्श्वभूमी समजून घ्या!!

एखाद्याला वाईट ठरवण्याआधी त्या व्यक्तीची पार्श्वभूमी समजून घ्या!!


सौ. मिनल वरपे


कॉलेजच्या मैत्रिणीच्या लग्नात सगळेच वर्ग मित्र मैत्रिणी येतात आणि तिथेच काही मुलांची चर्चा सुरू असते…सायली आणि मानसी तिथेच उभ्या असतात … त्यामधे एक मुलगा सायलीकडे बघून म्हणतो.. अरे तुला माहितीये का.. आपल्या मित्राची सूरजची ही प्रेयसी.. नंतर त्याला सोडून दुसऱ्याच्या मागे गेली आणि आज बघावं तर भलत्याशीच लग्न केलंय तिने.. काय पोरगी असेल किती जणांच्या मागे फिरते आणि आज लग्न केलय पण कायमाहीत त्या बिचाऱ्या नवऱ्याला सोडून अजून कोणाच्या मागे लागते … आचरण खराब बाकी काय..

हे कानावर पडताच सायलीला खूप वाईट वाटलं.. पण ती काहीच न बोलता तिथून लांब गेली पण तिची मैत्रीण मानसीला मात्र गप्प बसतात आलं नाही.. कारण मानसी आणि सायली जिवलग मैत्रिणी.. एकमेकांना मनातल सगळं सांगणाऱ्या.. त्यांनी एकमेकांपासून कोणतीच गोष्ट लपवली नाही.. सतत एकमेकींना सुख दुःखात साथ द्यायच्या.. म्हणूनच सायली बद्दल कोणी वाईट बोललेल तिला अजिबात सहन झालं नाही.

मानसीने त्या मुलांना जाऊन प्रश्न विचारला.. तुम्ही जीच्याबद्दल इतकी काळजी व्यक्त करत आहात तिचा स्वभाव, तीच वागणं, तिच्या आयुष्यात घडलेल्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला माहित आहेत का.. तीच जाऊदेत तुमच्या ज्या जिवलग मित्राची बाजू घेता तुम्ही .. पण त्याच वागणं तुम्हाला माहितीयेका.???

मानसी अस बोलताच ते कुठे शांत बसणारे.. ते उलट तिलाच बोलले जा तू नको आम्हाला शिकवुस.. आमचा मित्र आम्हाला माहितीये आणि तुझ्या बिघडलेल्या मैत्रिणीला सुद्धा आम्ही ओळखतोच चांगल…तू तिची मैत्रीण, तिचीच बाजू मांडणार…

त्यावर मानसी म्हणाली कोणाबद्दल बोलण्या आधी एकदा विचार तरी करावा.. हो माझी मैत्रीण चुकलिये हे मला आणि तीलासुद्धा माहितीये पण तुमचा मित्र कुठे चुकला हे नसेल माहीत तुम्हाला..

खूप प्रेम होत सायलीच तुमच्या लाडक्या सूरज वर… कॉलेज मधे शिकत असल्यापासून त्यांच्यात प्रेम होत आणि हे मला सोडून कोणाला माहित सुद्धा नव्हत.. कारण कोणाला सांगू नकोस नाहीतर प्रॉब्लेम होतील.. कारण मी अजून शिकतोय नोकरी करत नाही आणि जर आपल्या घरी आताच कळलं तर आपल्याला एकेमकांपासून कायमच दूर जावं लागेल अस सांगून सूरज मानसीला त्यांच्यातील प्रेम लपविण्यासाठी भाग पाडायचा..

त्यांच्यातील नात ३ वर्ष कोणाला माहीत नव्हतंच.. पण नंतर हळूहळू सर्वांना कळत गेलं.. ती नेहमी त्याला लग्नाचं विचारायची.. घरी सांगुयात..घरच्यांनी नकार द्यायला काय कारण नाही.. पण तो मात्र मला पहिले नोकरी तर करूदेत अस म्हणत उत्तर टाळायचा..

पण तुमच्या मित्राने मानसीला शारीरिक संबंधांसाठी हट्ट केला.. प्रेमाच्या ओघात तिच्याकडून ते घडल कारण त्यावेळी तो तिला गोड शब्दात लग्नाची वचन द्यायचा.. आणि ती एकच विचार करायची की इतके वर्ष आमचं प्रेम आहे जर मी याला आता नाही म्हटलं तर याला राग येईल आणि मला हा सोडून जाईल.. सूरज नंतर नेहमीच तो आग्रह करू लागला.. आणि त्याच्याशी संबध झालेत आता मी दुसर कोणाशी लग्न कस करू म्हणून ती त्याला कधीच नाराज करत नव्हती..

तिला सुरजच वागणं त्याचे घाणेरडे विचार लक्षात येत होते पण आता काहीही होऊ शकत नाही मला याच्याशीच लग्न करावं लागेल म्हणून ती मनाविरुद्ध आणि नाईलाज म्हणून नात टिकवायचा प्रयत्न करत होती.. पण एक दिवस सूरज बाहेरगावी निघून गेला.. तिने खूप प्रयत्न केले त्याला भेटण्यासाठी.. त्याच्याशी बोलण्यासाठी पण तो तिचे फोन उचलत नव्हता.. मेसेजचे उत्तरं देत नव्हता.. ती खूप रडायची.. तिला काहीच कळत नव्हत की पुढे काय होणार.. ती पूर्ण खचून गेली होती.. घरच्यांना नको कळायला म्हणून रात्री अंथरुणात रडायची..

त्यावेळी नेमकी मी सुद्धा तिच्यासोबत नव्हती.. कारण दहावी नंतर आमचे शिक्षण वेगवेगळ्या कॉलेज मधे त्यामुळे मला बाहेरगावी जाव लागलेलं… आणि त्यामुळे मला तिला भेटण् शक्य नव्हत.. आणि मला तिच्याशी बोलायला जास्त वेळ सुद्धा मिळत नव्हता..

त्यावेळी तिच्यासोबत दुसर कोणी नव्हत जे तिला धीर देतील.. समजून घेतील.. तिचा रोजचा दिवस एकाच आशेने उगवायचा की आज त्यांचं बोलणं होईल.. पुन्हा पूर्वीसारखं सगळं होईल.. पण मात्र दिवस मावळायचा तो तिच्या डोळ्यातील अश्रुने.. आणि त्याच वेळी सागर … तिचा कॉलेज मधील मित्र तिला फोन करायला लागला.. पण ती काही त्याला मनातल सांगत नव्हती..

पण त्याने तिची अवस्था ओळखली होती.. त्याला माहित होत की सूरजने सायलीला फसवल… शेवटी त्याने तिला बोलत केलं.. जेव्हा सायलीने त्याला सांगितल की सूरज भेटत नाही, बोलत नाही तेव्हा थांब मीच त्याच्याशी बोलतो, त्याला समजावतो अस म्हणत त्याने सायलीला आशेचा किरण दाखवला..

सागर सगळं नीट करेल.. सूरज ला समजावेल.. म्हणून सायली रोज त्याला फोन करून विचारायची.. पण अग मी सूरजला फोनवर खूप समजावले पण तो काही ऐकायला तयार नाही अस म्हणत तो बाकीच्या विषयावर तिच्याशी बोलायचा..

त्यावेळी सायलीला फक्त सूरज आयुष्यात पुन्हा येणं महत्वाच होत म्हणून ती सुद्धा त्याला एक चांगला मित्र समजून सगळं सांगू लागली.. पण जेव्हा तिला हे कळून चुकलं की आता सूरज पुन्हा माझ्या आयुष्यात येणार नाही तेव्हा ती रडली नाही कारण सागर तिला धीर देत होता..

नंतर तीच सतत एकाच विषयावर बोलण असायच.. सूरज असा का वागला असेल..पण त्यावेळी सागर मात्र भलत्याच विषयावर बोलून तिला भरकटवायचा.. पण दुःखात बुडालेली सायली त्याच्या बोलण्यात अडकत गेली.. सांत्वणाच्या नावावर सागर तिला स्वतःकडे आकर्षित करत होता.. पण तीला कसल भान नव्हत गरज होती आधाराची.. म्हणून ती सुद्धा त्याच्यात अडकत गेली.. नंतर त्याने तिला प्रेमाची कबुली दिली त्यावेळी तिला वाटलं की मला कोणाशीतरी लग्न करायचं आहेच.. आणि ज्याच्याशी लग्न करेल त्याला माझा भूतकाळ कळला तर काय होईल… आणि मी कोणाला फसवू शकत नाही.. सागर माझा चांगलं मित्र झालाय.. मला समजून घेतोय.. त्याला माझा घडलेला भूतकाळ माहीत आहे..मग त्याच्याशी लग्न केलं तर काहीच फसगत नाही होणार आणि सगळं नीट होईल…

तिने त्याला होकार तर दिला पण त्याचवेळी तिच्या एका वर्ग मित्राने तिला फोन करून सांगितलं.. की सागर पैज जिंकण्यासाठी हे सगळं करतोय.. त्याच तुझ्यावर प्रेम नाही.. तो तुला फसवेल.. तू सावध रहा.. हे ऐकताच सायलीला काहीच सुचेनास झालं.. पुन्हा तीच चूक होऊ नये म्हणून त्या आधीच तिने सागरशी सगळे संबंध तोडले…

घडलेलं सगळं जेव्हा भेटल्यावर सायलिने मला सांगितल तेव्हा तिच्याबद्दल मला खूप वाईट वाटलं.. माणसाची ओळख नसल्यामुळे घडलेल्या दोन्ही चुका तिला मात्र आयुष्यभर लक्षात राहतील अशा होत्या.. आणि या सगळ्यात तिची चूक काय होती तर तिने विश्वास ठेवला ही… की असलेलं नात पुढेही टिकाव म्हणून शरीर संबंध केले यात चूक आहे पण ते वय असते जेव्हा आपल्याला काय वागतोय हे कळत नाही..सारासार विचार करण्याची क्षमता नसते काहीवेळेस… भावनिक असताना कोणीही आपल्याला फसवू शकते तसच सागर ने सायलीला फसवल.. पण तिने आधी केलेली शरीर संबंधांची चुक आता नव्हती केली..

इतकं सगळ घडल्यावर सायली खूप आनंदात जगत नव्हतीरे…. तर प्रत्येक क्षणाला मरण अनुभवत होती.. जीव देऊन घरच्यांना ती कायमच दुःख देऊ शकत नव्हती..

म्हणून तिने जगायचं ठरवलं.. जे घडल ते सगळं माझ्या चुकीमुळे पण यापुढे मात्र मला प्रेम नको ना कोणती वचन असा निश्चय तिने केला.. आजपर्यंत मी माझ्या मर्जीने जगत आली.. घरच्यांवर माझं लक्षच नव्हतं पण आता फक्त लक्ष द्यायचं ते घरच्यांकडे.. त्यांचा ज्यामधे आनंद तोच माझा आनंद…

आणि म्हणूनच घरच्यांनी सांगितल्याप्रमाणे, ठरवल्याप्रमाणे, त्यांच्या आनंदासाठी सायली लग्न करायला तयार झाली.. पण तिने तिच्या नवऱ्याची फसवणूक केली नाही.. लग्नाच्या आधीच तिने घडलेलं सर्व त्याला सांगितल… फक्त नकार देण्याच करण वेगळं सांग इतकीच माफक अपेक्षा केली तिने… पण तिचा खरेपणा त्याला जाणवला.. त्याने तिला स्वीकारलं..

आज ती तिच्या संसारात सुखी आहे.. कारण मला मिळालं नाही म्हणून मी दुसऱ्यावर प्रेम करायचं नाही हा विचार चुकीचा.. हे तिला तिच्या नवऱ्याच्या वागण्यामुळे कळलं..

आज जर ती तिचा संसार खूप छान करत आहे.. तिच्या नवऱ्याला तिच्यापासून कोणतीच तक्रार नाही.. एक पत्नी म्हणून.. सून म्हणून ती खरपणाने सगळे नाते जपत आहे तर आपण कोण आहोत तिच्या आचरणाला दोष देणारे…

मानसीच्या या बोलण्यामुळे सायलीला नाव ठेवणारे सगळेच एकदम शांत झाले कारण बहुतेक त्यांना त्यांची चूक समजली असेल..

प्रेम तर सगळेच करतात.. कोणाचं यशस्वी होते तर कोणाची फसगत.. म्हणतात ना प्रेम आंधळ असते अगदी हाच प्रकार सायलीचा झाला.. पण तिने कोणाला फसवल नाही.. कोणालाही नाव ठेवण्याचा कोणालाच अधिकार नसतो जो तो ज्याचं त्याच आयुष्य जगण्याचा अधिकारी आहे मग का उगाच कोणाच्या आयुष्यात डोकावून त्याला दुखवायचं…



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!