Skip to content

एखाद्याला धीर देताना तुमच्याकडूनही या चुका होऊ शकतात.

एखाद्याला धीर देताना तुमच्याकडूनही या चुका होऊ शकतात.


गीतांजली जगदाळे

(मानसशास्त्र विद्यार्थिनी)


आयुष्यात काही क्षण असे येतात जेव्हा आपल्याला धीराने काम घ्यावे लागते, आणि काही वेळा इतरांना धीर द्यावा लागतो.आपला हेतू कितीही चांगला असला तरी कधी-कधी काही गोष्टींचे उलटेच परिणाम पाहावयास मिळतात. इतरांना धीर देण्याचं काम जरी चांगलं असलं, आपली इच्छा त्या माणसाबाबतीत कितीही चांगली असली तरीही काही गोष्टींमुळे त्याचा त्रास समोरच्या माणसाला होऊ शकतो, ज्या की आपण टाळायला हव्यात.

जस की, कोणत्याही परिस्थितीत धीर देताना त्या माणसाला खोटी आश्वासन देऊ नये. समोरचा माणूस खूप खचलेला असल्याने आपण त्याला सगळं ठीक होईल असं सांगतो, आणि ते खरं देखील असत, पण तरीसुद्धा याव्यतिरिक्त त्याला बरं वाटावं म्हणून काही आश्वासनं आपण देत असू तर ते आपण टाळायला हवं. कारण त्या क्षणाला जरी त्यांना आश्वासनं ऐकून चांगलं वाटलं तरी नंतर त्यांना ते पूर्ण नाही झाले असता जास्त त्रास होऊन ते जास्त खचण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जवळचं कोणी सोडून गेलं असता, एखाद्या महत्वाच्या कामगिरीत अपयश आले असता किंवा अजून काही परिस्थिती आयुष्यात येते ज्यावेळी आपला किंवा कोणाचाही धीर खचतो आणि अशा वेळी धीर देण्याची गरज भासते. पण अशावेळी त्या माणसांना नेहमी रडू नको किंवा खचून जाऊ नकोस एवढंच सतत म्हणणं पुरेसं नसत, कधी कधी रडून मोकळं होणं ही उपयोगाचं ठरत. त्यांना झालेलं दुःख एकप्रकारे व्यक्त होणं सुद्धा गरजेचं असत.

आणि अशावेळी त्यांना मार्गदर्शन, उपदेश करत बसण्यापेक्षा काही वेळ त्यांना सोबत करणं आणि त्यांच्या सोबत असणं, आणि त्यांना त्यांची जाणीव करून देणं महत्वाचं असत. त्यामुळे अशावेळी आपण काय बोलतो याच भान ठेवणं महत्वाचं आहे, वायफळ बडबड टाळून विचार करून बोललं गेलं पाहिजे. कारण असा कोणताही शब्द किंवा वाक्य तोंडातून निघता काम नये ज्याने समोरच्या माणसाचा गैरसमज होऊन त्याच्या त्रासात भर पडेल.

अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ते त्यावेळी जे बोलतील त्याने तुम्ही त्यांना judge करू नकात. कारण प्रत्येक माणूस अशा परिस्थितीत वेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देत असतो. त्यामुळे ते जसे प्रतिक्रिया देतील ती स्वीकारून त्यांना काही वेळ हवं तसं वागूद्यात, जोपर्यंत त्या गोष्टी त्यांच्या जीवावर बेतणाऱ्या नसतील तोपर्यंत.

जर तशी काही रिस्क वाटली तर नक्कीच त्यांना थांबवलं पाहिजे. जरी तुम्ही सेम परिस्थितीतून गेलेला असलात तरी त्यांना त्या गोष्टींचा पाढा वाचून दाखवू नका, खूप जास्त बोलणं टाळा. तुम्ही ज्यातून गेलात ते सगळं सांगत बसण्याने त्यांना त्या क्षणी काहीही मदत होणार नाही. आणि त्यामुळेच मला माहितीए हे कसं फील होत, मला समजतंय सगळं हे देखील बोलणं टाळा. फक्त ती व्यक्ती जे बोलेल ते शांतपणे ऐकून घ्यायचा प्रयत्न करा.

जेव्हा समोरची व्यक्ती काही बोलायला लागते, मन मोकळं करते, तुम्हाला सगळं सांगू लागते, तेव्हा त्याचा अर्थ तिला तुमची मदत, सल्ला किंवा उपदेश हवा असतोच असं नसत. बरेच वेळा मन मोकळं करण्यासाठी माणूस बोलत असतो, त्यामुळे अनावश्यक सल्ले, उपदेश देणं टाळा. त्यांचं कोणीतरी ऐकावं आणि त्यांना समजून घ्यावं एवढीच अपेक्षा त्या सांगण्यात असते, ही गोष्टी समजून घ्या.

जोपर्यंत ते स्वतः सल्ला , मदत मागत नाहीत तोपर्यंत तुम्ही देऊ नका. त्या व्यक्तीला तू overreact करतोयस/करतीयेस असं कधीच बोलू नका. आहे ते दुःख कमी आहे हे दाखवण्याच्या दृष्टीने यापेक्षा सुद्धा खराब होऊ शकलं असत, असं देखील सुचवू नका.

यापेक्षा रडू येत असेल तर त्यांना रडू द्या. त्यांच्या भोवती comfortable वातावरणाची निर्मिती करा. तुमचा संवाद स्पष्ट आणि नम्र ठेवा. अशा पद्धतीने प्रश्न विचारा जेणेकरून माणूस नकळत बोलता होईल, आणि त्याच मन मोकळं करेल, पण जर त्याला ते आवडत नाही असं जाणवलं तर शांत राहून त्यांची सोबत करा.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!