एखाद्याच्या दुःखाचे कारण जरं आपण असू,तरं आपली ही जबाबदारी ओळखूया
मयुरी महेंद्र महाजन
जीवनाच्या जडणघडणीत चढ-उतार, सुख दुःख, हे जसे माणसाला असतात, तसेच प्राणी व पक्ष्यांना सुद्धा असतातचं, आपण जर प्राणीप्रेमी असालं, तर त्यांच्या वर्तनाचा अभ्यास नक्की असेलं, की प्राणी जेव्हा आपल्या टोळकी मध्ये असतात, तेव्हा एखाद्याला जर त्यामध्ये दुखापत झालेली असेलं, काही ईजा झाली असेल, तर दुसरी त्याला मदत करतात, काहीतरी खाण्यासाठी आणून ठेवतात,
जसे की माकडाचे उदाहरण घेतले तर ,त्यात ते डोक्यावरून हात फिरवून त्याला जवळ घेताना दिसतात, तो एक आधार आहे, धीर आहे ,दुःखातून बाहेर पडण्यासाठी दिलेला एक दिलासा आहे ,यावरून हेच लक्षात येते, की दुःख हे आपल्यामुळे नसले, तरी कोणीतरी दुःखात आहे, त्यासाठी एक जीव म्हणून पण आपली काहीतरी जबाबदारी आहे, हे जर त्या मुक्या प्राण्यांना आणि पक्षांना समजत असेलं,तर आपण चालते-फिरते आणि बोलते माणूस आहोत, आपली जबाबदारी काय असायला हवी, आणि विशेष म्हणजे एखाद्याच्या दुःखाचे कारणचं जर आपण असू तर आपली जबाबदारी काय???? याची ओळख होणे महत्त्वाचे आहे,…
काही वेळेस काही घटना, प्रसंग असे असतात, की नकळतचं बरीच माणसे दुखावली जातात, आता येथे आपण आपल्याला स्वतःला ओळखणे ,पण महत्त्वाचे आहे, कारण की बर्याचं लोकांचे असे सुद्धा असू शकते, की त्यांनी कुणाला दुःखात बघितले, तर त्यांना आनंद होतो, तसा तर हा आसुरी आनंद आहे,
परंतु हा आनंद क्षणिक असतो ,तसेच काही जणांना आपल्यामुळे कोणी दुखावले, तर त्यांना राहवत नाही, ते लगेच सॉरी म्हणतील ,माफी मागतील, किंवा तुला जी शिक्षा मला द्यायची आहे, ती शिक्षा दे, मी ती शिक्षा मान्य करेलं या पर्यंत त्यांची तयारी असते, किंवा तो दुखावला माझ्यामुळे त्यात माझी काय चूक आहे ,तो बघून घेईल त्याच, अशा प्रकारची एटीट्यूड वाली माणसे सुद्धा असतात, काही वेळेस कुणी आपल्यामुळे दुखावेलं, याची कल्पना नसल्यामुळे मस्करी, मौजमजा त्यामुळेही काही वेळेस बरीच भांडणे टोकाला जाताना दिसतात,
समोरचा दुखावला जाईलं, याची कल्पना असताना समोरच्याला त्याची चूक दाखवणे, हेही गरजेचे असते, दुःख हे शारीरिकही असू शकते, किंबहुना मनाचेसुद्धा असू शकते, जसे की चुकून आपण कोणाला धडक दिली, आणि त्या व्यक्तीला जर खूप लागले, तर त्याच्या दुःखाचे कारण नक्कीचं आपण आहोत, तर लक्षात घ्या ,दुःख हे त्या परिस्थितीनुसार, त्या व्यक्तीनुसार, आणि त्या दुःखाच्या तीव्रतेनुसार आहे, जर ते आपल्यामुळे असेलं, तर त्यासाठी आपली जबाबदारीही असते, पण साधारणतः आपली जबाबदारी काय असायला हवी यानुसार….
आपल्यामुळे कोणाच्या डोळ्यात पाणी आले, तर जीवन व्यर्थ आहे, परंतु आपल्यासाठी कुणाच्या डोळ्यात पाणी आले ,तर ते जीवन सार्थक आहे, याप्रमाणे….. तुम्हाला कुणाला दुखावण्याचा हेतू नव्हता, पण दुखावलेल्या मनाचा तोल आपल्याला सावरावा लागेलं, त्यासाठी आपण त्या व्यक्तीला भावनिक आधार देणे ,महत्त्वाचे आहे, जेणेकरून त्या दुःखातून आपण त्या व्यक्तीला बाहेर पडायला मदत करू शकतो,
कारण भावनिक आधार ही गोष्ट त्या व्यक्तीच्या जीवनाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे, कारण त्यामुळे ती व्यक्ती आपल्या दुःखाशी लढू शकते ,त्याच्याशी सामना करण्याची त्याची शक्ती दुप्पट होते, तसेच आपण जर त्या व्यक्तीला पैशांची म्हणजेच जर काही गोष्टींसाठी खर्च करावा लागणार असेल, आणि आपण ते करण्यासाठी जर पूर्णपणे सक्षम असाल, तर आपण नक्कीच मदत करायला हवी, यामुळे जे सर्वात महत्त्वाचे आहे, याचे टेंशन त्या दुःखात असणाऱ्या व्यक्तीला असते, ते कमी होईलं…,
तुझी परिस्थिती कशीही असू दे, मी तुझी साथ देईलं, प्रत्येक वेळेस मी तुझ्या सोबत असेलं, अशी साथ जरं त्या व्यक्तीला मिळाली, तो विश्वास मिळाला ,तर त्या व्यक्तीला एक विश्वास असतो, कुणी तरी माझ्या सोबत आहे, आणि हे आपले कर्तव्य आहे, ही आपली जबाबदारी आहे, नकळत अशी बरीच लोक दुखावली जातात ,खरं तर त्याची कारणे वेगवेगळी असू शकतात, जसे की बोलणे काहीजण खरं ते तोंडावर बोलल्यामुळे पण बरेच लोक दुखावले जातात ,पण मग बोलूचं नये, हा त्यावरती उपाय कसा असू शकतो, कोणी दुखावणारं नाही, याची आपण कितीही काळजी घेतली ,तरी बऱ्याचदा असे होते, की माणूस आहे, शेवटी कधीतरी दुखावला जातोचं…
पण त्यावेळेस फक्त इतकाच विचार करा ,की खरंच ज्या गोष्टींमुळे व्यक्ती दुखावली ती गोष्ट त्या दुःखासाठी कारणीभूत होती का????? किंवा त्या व्यक्तीचा तसा स्वभाव असल्यामुळे ती व्यक्ती दुखावली जातेय, असे तर नाही, किंवा आपल्या मध्ये काही उणिवा आहेत, की आपल्या स्वभावात, की ज्यामुळे खरं सांगून वाईट वाटण्यापेक्षा त्याचे दुःख होते. असे तर नाहीना हे तपासायला हवे ,कारण दुःखाला अनेक प्रकार आहेत, अनेक पैलूंनी आपण त्याचा विचार करू शकतो….!!!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
