एखाद्याची झालेली सवय काही दिवसात कशी बदलता येऊ शकते?
सुधा पाटील
(समुपदेशक)
माणूस हा समाजशील प्राणी आहे.तसाच तो प्रेम,माया,ममता,वात्सल्य, राग,द्वेष,तिरस्कार अशा अनेक भावना सोबत घेऊन जगत असतो. ज्या त्या भावना ज्या त्या वेळी व्यक्त होत आसतात. पण जगताना सर्वच वयोगटातील माणसांना प्रेम,माया,ममता या भावनांची नितांत गरज असते.
जस मातीत पेरलेल्या बीजास रुजवण्यासाठी पावसाची गरज असते अगदी तसंच माणसाच्या मनात आनंदाचं बी रुजण्यासाठी प्रेमाची गरज असते. माणूस हा प्रेमाचा भुकेला असतो. आणि म्हणूनच तो माणसांत गुंततो. हे गुंतणं अनेक प्रकारच्या नात्यांचं असतं.या गुंतण्यातूनच माणसाला माणसांच्या सवयी लागतात. हे अगदी नैसर्गिकच असतं.
पण खूपदा माणूस समोरच्या माणसांत इतका गुंतून जातो की, जणू तो त्याच्याशिवाय जगूच शकत नाही. *”माणसाला माणसाची सवय हे सुद्धा एक व्यसनच असतं.”*मग एखाद व्यसन सोडवणं जितकं अवघड तितकच एखाद्याच्या सवयीतून बाहेर येण अवघड असत. पण हे देखील मानसिक असत. कारण मृत्यु हेच जगातील एकमेव सत्य आहे. याची जाणीव मनाला असली की,सवयी विसरता येतात.
पण या सवयी अनेक असू शकतात ह! म्हणजे तरुण मुलमुली एकमेकांत गुंतून जातात. हे खूपदा आकर्षनातून असत.त्यामुळे त्यांचे उठसूठ ब्रेकअप होत राहतात.त्यात जर एखाद्याला एखाद्याची खूप सवय लागली तर तो एखादा स्वत:ला सावरु शकत नाही.मग नैराश्य,जीवनाकडे पाहण्याची नकारात्मकता हे चक्र सुरु होत.
कधी कधी सवय ही मैत्रीमध्ये देखील एकमेकांना एकमेकांची होते.तशी सवय ही प्रत्येक नात्यातच असते.पण जे नात जास्त महत्वाच वाटत त्यात झालेली सवय ही विसरण कठीण वाटत. खूपदा जास्त हळव्या माणसांना सवयी विसरण खूपच कठीण जात.पण मित्रहो, जगाकडे वास्तववादी नजरेतून पाहता आलं की,कोणाच्याही सवयीतून बाहेर पडता येत.
चला तर हे वास्तववादी विचार काय असतात हे समजून घेऊ…
१) जगात माणूस एकटा येतो आणि एकटा जातो.
२) आपण समुहात, नात्यात जगत असलो तरिही आपला प्रवास हा एकट्याचाच असतो.
३) माणूस परिस्थिती, वेळ यानुसार बदलत असतो.
४)भावना ह्या प्रमाणातच ठेवायच्या असतात.
५)जगात प्रत्येक व्यक्ती भिन्न असते. आणि ती परिस्थितीनुसार भिन्न वागू शकते.
थोडक्यात काय वरील वास्तवाच भान असेल तर आपण एखाद्याच्या सवयीतून बाहेर पडू शकतो. खूपदा आपलीही सवय इतरांना लागलेली असू शकतेच की! पण आपणही त्यावेळी परिस्थितीजन्य निर्णय घेत असतोच की!
म्हणूनच समजा एखाद्या नात्याची आपणास खूपच सवय झालेली असली आणि त्याशिवाय राहण्याची वेळच आली तर माणसाने खचून जाऊ नये. उगाचंच स्वत:ला सतत जुन्या आठवणीत ठेऊ नये. कारण त्यामुळे त्यातून बाहेर पडणं अवघड जात. बघा ह,एखाद्याची सवय लगेचच लागत नाही.
आपण त्याच्या सहवासात खूप काळ घालवतो, आनंदाचे क्षण जगतो. भावनांची देवाणघेवाण करतो. मगच एकमेकांना एकमेकांची सवय जडते.अगदी तसंच लागलेली सवय मोडायला देखील काही काळ जावा लागतो. कारण जगातल्या सर्वच वेदनेवर एकच रामबाण उपाय आहे…. तो म्हणजे वेळ! ठराविक वेळ गेला की,कोणत्याही जखमेवर खपली येते. आणि त्याची तीव्रता कमी होते.
म्हणूनच एखाद्याच्या सवयीतून बाहेर पडण्यासाठी स्वत:ला प्रयत्न करावे लागतात. कारण माणसाच मन नेहमीच भविष्याचा वेध घेत असत. पण माणूस उगाचंच कधी कधी जगाला दाखविण्यासाठी, किंवा मी अजूनही एखाद्याला विसरलो नाही हे इतरांना दाखवण्यासाठी सतत जुन्या गोष्टी, जुनी नाती आठवत बसतो. आणि पुन्हा त्याच गर्तेत अडकत बसतो.
त्यामुळे आपला आज वाया जातो. जीवनाच वास्तव हेच आहे की,आपलं जगणं हे फक्त आज आणि आताचा क्षण आहे. म्हणूनच आपल्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्ती कधीतरी जाणाऱ्या असतात. समोरच्या व्यक्तीसाठी आज आपण महत्वाचे आहोत म्हणजे कायमच तसेच असू अस नाही. हे जगताना लक्षात ठेवाव.या वास्तवाच भान असेल तर मग सवयीतून बाहेर पडणं सोप होत.
समजा हे नाहीच जमल तर मग जाणीवपूर्वक लागलेली सवय मोडण्यासाठी प्रयत्न करावेत.जस की, आपले आवडते छंद जोपासावेत. गाणी ऐकावित. जाणीवपूर्वक जुन्या सवयी टाळाव्यात.नवीन नवीन गोष्टीत मन रमवावं.पण काहीही करुन आपणंच त्या सवयीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करावेत. तसं नाही केल तर मग,माणूस नैराश्यात जाऊ शकतो. मनोरुग्ण बनू शकतो.
त्यातूनच अनेक शारिरीक आजार जडू शकतात. जीवन क्लेशदायक वाटू लागतं.म्हणूनच आपणच यातून बाहेर पडायचं असतं.इतर लोक सल्ला देतील,मार्ग सांगतील. पण प्रयत्न हे ज्याचे त्यालाच करावे लागतात. पण हो…एखाद्याच्या सवयीतून माणूस नक्कीच बाहेर पडू शकतो. ती एखादी व्यक्ती म्हणजे आपलं आयुष्य कधीच नसतं. आयुष्य हा एक वाहता प्रवाह आहे. म्हणूनच जे घडल ते मागे मागे टाकत सतत पुढे जायचं असत… तेही आनंदाने…. यालाच तर जीवन म्हणतात.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

. खूप छान –
वास्तविक लेख,
Chana
So beautiful
Javad javad ha mazha pn aayushatla 1 bhag aahe mi pn tyach paristhitun jat aahe . khup praytn kele junya goshti visrnyasathi pn jamtch nhi aahe .😥