एखादी व्यक्ती खरच द्वेष करण्यालायक आहे का हे कसं ओळखाल?
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
चारू आणि नुर्वी बालपणीपासूनच्या मैत्रिणी. शाळेत एकत्र नंतर कॉलेजमध्ये पण एकत्र. त्यांना सर्व सीता आणि गीता म्हणायचे इतक्या त्या एकत्र असायच्या. चारूचा स्वभाव जरा फटकळ, मनात आलं ते बोललं त्यातून समोरच्याला कसं वाटेल याचा अनेकदा ती विचारच करायची नाही.
याउलट नुर्वी अगदी शांत आणि विचार करून बोलणारी.कोणी काही बोललं तर ऐकून घेणे सहन कारणे असा तिचा स्वभाव. जे चारुला अजिबात पटत नसे. म्हणून तिचं अनेकदा हिच्या बाजूने भांडे. आणि चारूची काही चूक झाली तर नुर्वी माफी मागे, तिच्या बाजूने बोले. हाच त्यांच्या मैत्रीचा धागा होता. एकमेकांचे स्वभाव वेगळे असूनही त्यांनी कधी एकमेकींना एकटं पडू दिलं नाही आणि हीच त्यांच्या मैत्रीची ताकद होती.
पण जे आधीपासून चांगलं असेल ते शेवटपर्यंत टिकेल अस कधी होत नाही आणि तशी कोणाला शाश्वती पण नसते. तसच काहीस यांच्या बाबतीत झालं. झालं असं की कॉलेज मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. ज्यात वेगवेगळ्या अॅक्टिविटी होत्या. डान्स, फॅशन शो, नाटक अस बरच काही. नाटक विभागात या दोघींनी भाग घेतला पण दोघांचे गट मात्र वेगवेगळे होते. या दोघी सतत एकत्र म्हणून सरांनी त्यांना तस करायला सांगितलं.
जेणेकरून त्या बाकीच्या मध्येही मिसळतील. त्याप्रमाणे त्या त्या गटाने आपल्या नाटकाचा विषय आणि एकंदरीत रूपरेषा ठरवून त्यांना सांगायला सांगितलं होत. म्हणून सर्व मुल तयारीला लागली. चारुला एक छान विषय सुचला होता. तिने तो आपल्या ग्रुपला पण सांगितला व त्यांना पण तो आवडला. इकडे नुर्वी च्या ग्रुप ला मात्र अजून समजत नव्हते की नेमके काय घ्यायचे. ती त्याच टेन्शन मध्ये होती. दोन्ही ग्रुप ना वेगवेगळे रूम दिलेले होते. ज्यात त्यांनी तयारी करायची होती.
मधल्या ब्रेक मध्ये नुर्वी चारूला भेटायला आली व तिने आपले अजून काहीच ठरले नसल्याचे सांगितले. जेव्हा चारूने तिला समजावले, तू नको ग टेन्शन घेऊ, तुम्हाला पण नक्की चांगला विषय मिळेल. मग त्यांनी जरा गप्पा मारल्या आणि जेव्हा नुर्वी ने चारुला तिच्या विषयाबद्दल विचारले तेव्हा तिने सांगितले की आमचा विषय तर ठरला आहे. त्या खूप जवळच्या मैत्रिणी असल्याने चारूने तिला नाटकाचा विषय ते त्याच्या सर्व डिटेल सांगितल्या. कारण त्या कधीच काही लपवत नसत.
असेच दोन दिवस गेले. सरांना विषय सांगायचा होता. पण त्यादिवशी नुर्वी तब्येत बरी नसल्याने आली नव्हती. त्यामुळे तिच्या ग्रुप मधल्या बाकीच्यांनी आम्ही सांभाळून घेता अस सांगितल होत. नाटकाचा विषय पण त्यांनी डिस्कस केला होता. सरांना सांगायची जेव्हा वेळ आली तेव्हा नुर्वी चा ग्रुप पुढे गेला. हे पाहून चारू ला खरतर आनंद झाला.
कारण तिला पण वाटत होत आपल्याप्रमाणे आपल्या मैत्रिणीच पण चांगलं नाटक व्हावं. पण जेव्हा त्यांनी माहिती द्यायला व सर्व सांगायला सुरुवात केली तेव्हा मात्र चारूला आणि ग्रुपला धक्का बसला. कारण ते त्यांचं नाटक होत, तो विषयही त्यांचा होता. ते सर्व चारुला म्हणू लागले की आपण सरांना सांगुया. पण तिने त्यांना गप्प केलं. जेव्हा सरांनी त्यांना नाटकाचा विषय विचारला तेव्हा ती त्यांची तयारी नसल्याची बोलली ज्यावर त्यांना सरांचं बोलण देखील ऐकावं लागलं.
कॉलेज सुटल्यानंतर ती लगेच नुर्वीकडे गेली व तिला नाटका बदल विचारले. त्यावर नूर्वी म्हणाली की तिला माहित नाही कारण तिची तब्येत बरी नव्हती. त्यामुळे ग्रुप ने ठरवलं होत व ते तिला नंतर सांगणार होते. हे ऐकल्यावर चारू खूप संतापली व तिला खूप सुनावले, जर तुला विषय माहीत नाही तर तुझ्या ग्रुप ने बरोबर आम्ही ठरवेलेलाच विषय कसा घेतला, तुला मी बहीण मानते म्हणून सर्व विश्वासाने सांगितलं होत.
पण तू मात्र मला फसवल, माझा विश्वास तोडला. हे सर्व ऐकून नुर्वी ला पण धक्का बसला. तिने सांगितलं की ती या विषयाबद्दल कोणालाही बोलली नव्हती. तिला देखील समजले नाही हे सर्व कोणी केलं. पण तिच्या या बोलण्यावर चारू अजिबात विश्वास ठेवायला तयार नव्हती. कारण तिला पण माहित होते तिने फक्त नुरवीलाच हे सर्व सांगितल होते. नुर्वी खोटं सांगत नव्हती.
पण कोणीतरी हे सर्व केलं होत जे या दोघींना माहित नव्हत. याचा परिणाम असा झाला की चारू त्या दिवसापासून नुर्वी चा द्वेष करू लागली. तिच्याशी बोलायचे बंद झाली. कारण तिच्या मते आपल्या इतक्या जवळच्या मैत्रिणी ने आपला विश्वास तोडला होता. तिच्यामुळे यांचे नाटक हातून गेले होते, ओरडा खावा लागला होता. नुर्वी ने तिला खूप समजावू पाहिलं, बोलायचं प्रयत्न केला पण काही फायदा झाला नाही आणि हा मैत्रीवर झालेला परिणाम हळू हळू सर्वांना दिसू लागला. विशेषकरून शिक्षकांना.
म्हणून एक दिवस त्याचं सरांनी चारुला आणि नुर्वी ला एकेकट बोलवून सर्व विचारलं. चारू सुरुवातीला काही बोलली नाही. पण नंतर तिने सर्व सांगितलं. सांगताना पण तिच्या चेहऱ्यावर राग आणि दुःख दिसत होत. सर नुर्वी शी पण बोलले होते. तिने पण सर्व खर खर सांगितलं. तिचा स्वभाव पण सरांना माहीत होता त्यामुळे ती अस काही करणार नाही याची त्यांना खात्री होती.
म्हणून जेव्हा चारूने सर्व सांगितले तेव्हा सर तिला म्हणाले, तू जे सर्व सांगितले, आणि त्यावरून तूझ्या मनात तिच्याबद्दल हा जो राग द्वेष निर्माण झाला त्याला खरच काही भक्कम पुरावा आहे का? तुझी मैत्रीण माझ्याहून तुला जास्त माहीत आहे. ती खरच इतका द्वेष करण्यालायक आहे का? तू इतकी वर्ष तिला ओळखतेस, तिचा स्वभाव तुला माहीत आहे. ती अस काही करेल असं खरच वाटत का तुला? ही जी गोष्ट घडली त्याला बाकी काही कारण असू शकेल असं कधी तुला वाटल नाही का? त्यावर चारू म्हणाली, सर दुसर काय कारण असणार? मी हा विषय फक्त तिलाच बोलले होते. आणि कोणालाही काही माहीत नव्हत.
या वर सरांनी सांगितलं, हो तू नक्कीच तिला एकटीला सांगितलं असशील पण ती जर म्हणत असेल की तिने अस काही केलं नाही याचा अर्थ दुसरे काहीतरी पण कारण असणार. इतक्या वर्षात तुझी मैत्रिण अस वागली नाही. मग या एकाच गोष्टीवरून ज्याला ठोस पुरावा पण नाही त्यावरून तू तिला दोषी ठरवलं. हे कितपत योग्य आहे? यातून तुम्हा दोघांची इतकी चांगली मैत्री खराब झाली. तुझ्या मनात तिच्याविषयी राग द्वेष आला.
इतकं सर्व करण्यापेक्षा तू एकदा शांतपणे विचार कर की खरच ती अस करू शकते का? आणि आपला हा द्वेष योग्य आहे का? चारुला पण सरांच बोलणं पटल. रागाच्या भरात तिने खरच काहीतरी चूक केली होती. आपल्या इतक्या चांगल्या मैत्रिणी वर अविश्वास दाखवला होता. अजून काहीतरी कारण असू शकतं हा विचारच केला नव्हता. म्हणून तिने ठरवलं की आधी खर कारण जाणून घ्यायचं आणि नंतरच तिला भेटायचं.
त्यानुसार ती नुर्वी च्या गृपला भेटली. त्यातल्या एका मुलीने खूप वेळा बोल्यानंतर ही गोष्ट मान्य केली की नुर्वी वे नाही तर तिच्याच ग्रुपच्या एका मुलाने हा विषय घेतला होता. जेव्हा चारू नुर्वी ला हे सर्व सांगत होती तेव्हा त्याने हे सर्व ऐकल होता आणि म्हणून तो नुर्विला याबद्दल काही बोलला नव्हता. काही झालं ते तिच्याच वर सर्व येणार ये त्याला माहीत होत.
हे सर्व ऐकल्यावर चारुला तिची चूक समजली व ती लगेच जाऊन नुर्विला भेटली. तिने तिची माफी मागितली व खूप रडली देखील. कारण दुसऱ्याच्या चुकीमुळे तिने तिच्या मैत्रिणी चा द्वेष राग केला होता. नुर्वी ने तिला मोठ्या मनाने माफ केले कारण तिलाही माहीत होत की चारू हे सर्व मुद्दाम करत नव्हती. अश्या प्रकारे त्यांच्यामध्ये परत सर्व नीट झालं व परत ही सीता गीता ची जोडी सर्वांना पाहायला मिळाली.
आपणही अनेकदा एखाद्या छोट्या गोष्टीवरून आपल्या जवळच्या व्यक्तीचा किंवा आपल्या ओळखीच्या व्यक्तीचा द्वेष करू लागतो, नात तोडतो. इथे खरतर नीट विचार करायची गरज असते. आपण म्हणतोय किंवा विचार करतोय तस खरच काही घडलं असेल का? किंवा त्याला अजून काही कारणे असतील? अजून काही पुरावे असतील? हे सर्व विचार आपण केले तर नात खराब होत नाही आणि आपल्या पण त्रास होत नाही. म्हणून कोणतीही घटना घडली तरी आवेगाने निर्णय न घेता त्यावर नीट विचार केला पाहिजे.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
